Maharashtra

Beed

CC/13/60

रामप्रसाद रमाकांत जवरे, - Complainant(s)

Versus

मॅनेजर,दि न्‍यु इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि. - Opp.Party(s)

अनिलकुमार बडे

19 Nov 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/13/60
 
1. रामप्रसाद रमाकांत जवरे,
रा.जवाहरवाडी ता.गेवराई जि.बीड
बीड
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मॅनेजर,दि न्‍यु इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि.
शाखा बीड अण्‍णाभाऊ साठे चौक,बीड़
बीड
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                          निकाल
                      दिनांक- 19.11.2013
               (द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्‍य)
           तक्रारदार रामप्रसाद रमाकांत जवरे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी सेवेमध्‍ये कसूर केल्‍याबाबत नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.
            तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे, तक्रारदार हा टाटा ट्रक क्रमांक एम.एच.43/ई 9532या वाहनाचा मालक आहे. तक्रारदाराने सदर ट्रकचा सन 2012-2013 या कालावधीसाठी सामनेवाला यांच्‍याकडे विमा काढला आहे. विमा पॉलीसी क्रमांक 15290231110100005826 चे प्रमाणपत्र आहे. तक्रारदार यांने हक्‍कात विमा हमी रक्‍कम रु.19,729/-भरले आहे. सदर विमा प्रमाणपत्राची वैधता दि.06.01.2012 ते 05.01.2013असा आहे.सामनेवाला यांनी सदर विमा पॉलीसी प्रत मध्‍ये तक्रारदाराचा वैयक्तिक अपघाती मृत्‍यू, अपघातामध्‍ये कायमस्‍वरुपी अपंगत्‍व असल्‍यास औषधोपचार खर्च, हॉस्‍पीटल मधील संपूर्ण उपचाराच्‍या खर्चाची हमी घेतली जाते. तक्रारदार हा त्‍याच्‍या मालकीच्‍या ट्रकमध्‍ये दि.18.03.2012 रोजी गेवराई येथून जिनींग फॅक्‍टरीमधून सरकी पेंड भरुन  इगतपूरी येथे घेऊन जाणार होता. तक्रारदार त्‍याच्‍या गावी जवाहरवाडी तालुका गेवराई येथे वाहन घेऊन मुक्‍कामी गेला व सरकी पेंडचे पोते भरलेले सदर वाहन तक्रारदाराने घरासमोरील मंदिराच्‍या बाजूला उभे केले.
            तक्रारदार हा दुस-या दिवशी दि.19.03.2012 रोजी सदर वाहन घेऊन जात असताना त्‍यामधील पेंडचे भरलेले पोते, त्‍यावर बांधलेली रस्‍सी सैल असल्‍याकारणाने ट्रक वरील पोते व्‍यवस्थित थप्‍पी लावून पुन्‍हा खाली उतरुन रस्‍सी पॅक करत असताना ट्रकमधील सरकीचे एक पोते थप्‍पीतून निसटले व ते तक्रारदार यांच्‍या डोक्‍यावर, कानावर पडल्‍याने तक्रारदार हा गंभीर जखमी होऊन जागीच बेशुध्‍द पडला. तक्रारदारास औषधोपचारासाठी नगर येथे डौले हॉस्‍पीटल येथे शरीक केले. परंतू तक्रारदाराची प्रकृती अधिकच खालावल्‍यामुळे डौले हॉस्‍पीटल येथील डॉक्‍टरांनी पुणे येथे हलवण्‍याचा सल्‍ला दिला. डॉक्‍टरांनी दिलेल्‍या सल्‍ल्‍यामुळे तक्रारदार यास दि.23.03.2012 रोजी पुणे येथील मॅक्‍स न्‍यूरो हॉस्‍पीटल येथे शरीक केले. तेथे तक्रारदारावर दि.23.03.2012 ते 17.05.2012पर्यंत विविध शस्‍त्रक्रिया व औषधोपचार केले. सदर औषधोपचार व शस्‍त्रक्रियेसाठी तक्रारदार यास रु.14,63,240/- एवढा खर्च झाला. तक्रारदार याला बाहयरुग्‍ण उपचार चालू होते.
            सदर अपघातामुळे तक्रारदारास शंभर टक्‍के अपंगत्‍व आलेले आहे. त्‍यामुळे तक्रारदार हा पूर्वीप्रमाणे अवजड काम करु शकत नाही, आणि चांगल्‍याप्रकारे बोलू शकत नाही. सदर अपघाताची खबर मधुकर रमाकांत जवरे यांनी पोलीसस्‍टेशन गेवराई येथे दिली. पोलीसांनी अपघाताची नोंद मोटार अपघात नं.20/12 अशी केली आहे. तक्रारदार याने संपूर्ण कागदपत्रासह सामनेवाला यांच्‍याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. परंतू सामनेवाला यांनी दि.10.05.2013रोजी चुकीच्‍या कारणावरुन सदरील क्‍लेम नामंजूर केलेला आहे. सामनेवाला यांनी सदर अपघाताची विमा रकमेची हमी स्विकारुन सुध्‍दा तक्रारदारास विमा हमी रक्‍कम देण्‍यास नाकारले आहे. त्‍यामुळे तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास झाला आहे, त्‍यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडून औषधोपचार व हॉस्‍पीटल मधील शस्‍त्रक्रिया याचा खर्च म्‍हणून रु.14,63,240/- तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.2,00,000/- व तक्रारीचा खर्च रु.20,000/- ची मागणी केली आहे व त्‍यावरील द.सा.द.शे. 18 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळण्‍याची मागणी केलेली आहे. म्‍हणून सदरील तक्रार दाखल केली आहे. 
            सामनेवाला न्‍यू इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी हे मंचात हजर झाले. त्‍यांनी आपले लेखी निवेदन सादर केले आहे. लेखी निवेदनासोबत सामनेवाला यांनी सुनिल एम.देशमुख, सह व्‍यवस्‍थापक यांचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला यांच्‍या कथनेनुसार सामनेवाला यांनी तक्रारदाराच्‍या तक्रारीतील मजकूर स्‍पष्‍टपणे नाकारलेला आहे. सामनेवाला यांच्‍या कथनेनुसार सदर विम्‍याच्‍या प्रमाणपत्रानुसार सदर पॉलीसीत स्‍वतःच्‍या अपघाताची जबाबदारी समाविष्‍ट नाही व त्‍यासाठी तक्रारदार यांनी कोणताही विमा हप्‍ता भरलेला नाही. तक्रारदार याने विमा पॉलीसीच्‍या शर्ती व अटीचा भंग केलेला आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी.
            तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र सामनेवाला यांचे शपथपत्र व लेखी युक्‍तीवाद, सामनेवाला यांचा युक्‍तीवाद याचे अवलोकन केले असता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
               मुददे                                   उत्‍तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम
   नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब
   सिध्‍द केली आहे काय?                                                                            नाही.
2) तक्रारदार हा नुकसान भरपाई मिळण्‍यास
   पात्र आहे काय?                                                              नाही.
3) आदेश काय?                                      अंतिम आदेशाप्रमाणे.
 
                        कारणमिमांसा 
 
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांनी पुराव्‍याकामी आपले शपथपत्र दाखल केले आहे तसेच तक्रारीसोबत घटनास्‍थळ पंचनामा, विमा पॉलिसी, नोंदणी प्रमाणपत्र, मॅक्‍स न्‍युरो हॉस्‍पीटल पूणे येथील कागदपत्र, व औषधोपचार व दवाखान्‍याचे बिल इत्‍यादी कागदपत्र दाखल केले.
            तक्रारदार यांचे वकील श्री. बडे यांनी युक्‍तीवादात सांगितले की, तक्रारदार हा त्‍यांच्‍या मालकीच्‍या वाहनात सरकीने भरलेले पोते व्‍यवस्थित जमवून बांधून ठेवत असताना त्‍यातील एक पोते तक्रारदारांच्‍या अंगावर पडले. तक्रारदार हा गंभीर जखमी होऊन जागेवर बेशुध्‍द झाला. तक्रारदार यांस नगर येथील डौले हॉस्‍पीटल मध्‍ये शरीक केले. तेथील डॉक्‍टरांनी औषधोपचार केला. परंतु तक्रारदाराची प्रकृती अधिकच खालवल्‍यामुळे नगर येथील डॉक्‍टरांनी दिलेल्‍या सल्‍ल्‍यामुळे पुणे येथे मॅक्‍स न्‍युरो हॉस्‍पीटल येथे शरीक केले.तेथे तक्रारदार व शस्‍त्रक्रिया व औषधोपचार केले. तक्रारदार यांस शस्‍त्रक्रिया व औषधोपचारासाठी रु.14,63,240/- एवढा खर्च झाला.तरी तक्रारदार यांची प्रकृती पुर्णपणे बरी झाली नाही. त्रकारदारास या अपघातामुळे अपंगत्‍व आले आहे. सद्यपरिस्‍थीतीत तक्रारदार हा व्‍यवस्थित बोलू शकत नाही व पुर्वीप्रमाणे अवजड काम करु शकत नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे वाहनाचा विमा उतरविलेला आहे. त्‍याकामी तक्रारदाराने सामनेवाले यांना देय विमा रक्‍कम रु.19,729/- भरले आहे. विमा पॉलिसीचा कालावधी ही दि.6.5.2012 ते दि.5.5.2013 पर्यत आहे.तक्रारदार यांने सामनेवाले यांच्‍याकडे अपघातात झालेल्‍या नुकसान भरपाईची मागणी केली. त्‍यासाठी आवश्‍यक कागदपत्राची सामनेवाले यांच्‍याकडे पुर्तता केली आहे. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांची मागणी नाकारली आहे. सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे. तक्रारदार हा नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे.
            सामनेवाले यांचे वकील श्री.महाजन यांनी युक्‍तीवाद केला. त्‍यांच्‍या कथनेनुसार तक्रारदार हा स्‍वतः वाहनाचा मालक आहे. तक्रारदारांनी वाहनाचा विमा काढला आहे. सदर विमा पॉलिसी मध्‍हये त्रि पक्षीय प्रमाणे देय रक्‍कम भरली आहे. विमा पॉलिसी अनुसार तक्रारदार यांचे वैयक्‍तीक अपघाताचे रिस्‍क कव्‍हर होत नाही. तक्रारदार यांने वैयक्‍तीक अपघाताची रिस्‍क कव्‍हर करण्‍यासाठी सामनेवाले यांच्‍याकडे कोणतीही विमा रक्‍कम भरलेली नाही. सबब, तक्रारदार हा मागणी मिळण्‍यास पात्र नाही व तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी.
            तक्रारदारांनी दाखल केलेले शपथपत्र व युक्‍तीवाद यांचे अवलोकन केले. तसेच सामनेवाले यांचा जवाब व युक्‍तीवाद यांचे अवलोकन केले. यावरुन हे पाहणे गरजेचे आहे की, तक्रारदार यांने वैयक्‍तीक अपघाताची रिस्‍क कव्‍हर होण्‍यासाठी सामनेवाले यांच्‍याकडे देय विमा रक्‍कम भरली आहे काय ?   तक्रारदार यांनी दाखल केलेली विमा पॉलिसी यांचे अवलोकन केले असता मंचाचे असे मत आहे की, सदर विमा पॉलिसी मध्‍ये तक्रारदार यांचे जी देयक विमा रक्‍कम भरली आहे ती थर्ड पार्टी प्रिमियम व ओन डॅमेज म्‍हणून आहे. तक्रारदार यांने वैयक्‍तीक अपघाताची रिस्‍क कव्‍हर करण्‍यासासाठी सामनेवाले यांचेकडे कोणतीही देय विमा रक्‍कम भरलेली नाही. म्‍हणून तक्रारदार यांने शर्ती व अटीचा भंग केला आहे म्‍हणून तक्रारदार हा वैयक्‍तीक अपघाताची नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते.
            मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.        
           
            सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
                         आदेश
            1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येत आहे.          
            2) खर्चाबददल आदेश नाही.
            3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
               20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत
               करावेत.
 
     
                    श्रीमती मंजूषा चितलांगे,         श्री.विनायक लोंढे,
                           सदस्‍य                    अध्‍यक्ष
                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.