Maharashtra

Bhandara

CC/21/120

मनोहर बुधा कढव - Complainant(s)

Versus

मुख्‍य प्रबंधक.मॅनेजर, स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया.भंडारा - Opp.Party(s)

श्री. आर.आर.भिवगडे

16 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/21/120
( Date of Filing : 01 Dec 2021 )
 
1. मनोहर बुधा कढव
रा.सिरसी. पो.वरठी. ता.जि.भंडारा.
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मुख्‍य प्रबंधक.मॅनेजर, स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया.भंडारा
भंडाारा
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:श्री. आर.आर.भिवगडे , Advocate for the Complainant 1
 
Dated : 16 Jan 2023
Final Order / Judgement

(पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्‍या)

 

01.    तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍दपक्ष  स्‍टेट बॅंक  ऑफ  इंडीया  शहर शाखा भंडारा  यांचे  विरुध्‍द  बचतखात्‍या  मधील जमा रक्‍क्‍म मिळावी  तसेच अन्‍य अनुषंगिक मागण्‍यां साठी ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम-35 खाली प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केली आहे.

 

02.   तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

      तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे तो उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून शेती व मजूरीचे कामे करतो.  त्‍याचे विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंक ऑफ इंडीया शहर शाखा भंडारा येथे बचत खाते असून  त्‍याचा  क्रमांक-31791618345 असा आहे आणि त्‍यामुळे  तो विरुध्‍दपक्ष  बॅंकेचा  ग्राहक  आहे.  त्‍याचे बचत खात्‍या मध्‍ये रुपये-43,702/- एवढी रक्‍कम जमा होती. तक्रारकर्त्‍याने  त्‍याचे बचत खात्‍या मधून रुपये-40,000/- काढण्‍या करीता तीनदा अनुक्रमे दिनांक-20.09.2021, दिनांक-27.09.2021 आणि  दिनांक-21.10.2021 अशा तारखांना विथड्राल स्लिप  विरुध्‍दपक्ष बॅंके मध्‍ये जमा केल्‍या होत्‍या परंतु संबधित अधिका-‘यांनी प्रत्‍येक तारखेस खाते “Hold” केल्‍याचा शेरा मारला परंतु खाते होल्‍ड केल्‍या बाबत कारण दिले नाही म्‍हणून  तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍दपक्ष बॅंकेस वकीलांचे मार्फतीने रजिस्‍टर नोटीस पाठवून रुपये-40,000/- डी.डी.व्‍दारे त्‍याचे राहते पत्‍त्‍यावर पाठवावे अशी मागणी केली होती परंतु विरुध्‍दपक्ष बॅंकेस नोटीस मिळूनही कोणताही  प्रतिसाद दिला नाही  वा नोटीसला उत्‍तर दिले नाही.  तक्रारकर्त्‍याचे  असेही म्‍हणणे आहे की, त्‍याने यापूर्वी   जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा यांचे समक्ष याच विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंकेच्‍या शाखे विरुध्‍द ग्राहक तक्रार क्रं सीसी/19/60 दाखल केली होती आणि त्‍यामध्‍ये जिल्‍हा ग्राहक आयोगाने दिनांक’27.11.2020 रोजी निकालपत्र पारीत करुन  तक्रारकर्त्‍याची तक्रारविरुध्‍दपक्ष  बॅंके विरुध्‍द अंशतः मंजूर केली होती., त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष बॅंकेनी तक्रारीचा सुड आणि व्‍देष भावनेतून  त्‍याचे बचत खात्‍या  मधील  रक्‍कम होल्‍ड  केलेली आहे, म्‍हणून शेवटी त्‍याने विरुध्‍दपक्ष बॅंकेच्‍या शाख विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार दाखलकरुन  त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष बॅंके विरुध्‍द पुढील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

 

  1. विद्दमान मंचानी विरुध्‍दपक्षास निर्देश दयावेत की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास त्‍याचे राहत्‍या पतत्‍यावर त्‍याची विरुध्‍दपक्ष  बॅंकेत जमा असलेली रक्‍कमरुपये-43,000/- चा डी.डी. पाठवावा.

 

  1. तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-45,000/- विरुध्‍दपक्ष बॅंकेनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्‍दपक्ष बॅंके कडून मिळावा.

 

   4.    या शिवाय योग्‍य ती दाद त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यातयावी.

 

 

03.   जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने यातील विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंक ऑफ इंडीया शहर शाखा भंडारा तर्फे मुख्‍य प्रबंधक यांचे नाव आणि पत्‍त्‍यावर  रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविण्‍यात आली.  सदर नोटीस विरुध्‍दपक्ष बॅंकेस  दिनांक-31.05.2022 रोजी मिळाल्‍या बाबत पोस्‍ट विभागाचा ट्रॅक रिपोर्ट अभिलेखावर  दाखल आहे परंतु  जिल्‍हा ग्राहक आयोगाची नोटीस मिळाल्‍या नंतरही  विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंक ऑफ इंडीया तर्फे  कोणीही  जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्‍यांनी आपले लेखी निवेदन सुध्‍दा दाखल केले नाही म्‍हणून  विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंक ऑफ इंडीया यांचे विरुध्‍द  प्रस्‍तुत  तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश  जिल्‍हा ग्राहक आयोगाने  प्रकरणात  दिनांक-29.07.2022 रोजी पारीत केला.

 

 

04.    तक्रारकर्त्‍याची तक्रार, त्‍याचा शपथे वरील पुरावा, तक्रारकर्त्‍याने  दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाचे जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे अवलोकन  करण्‍यात आले.  तक्रारकर्त्‍या तर्फे वकील  श्री भिवगडे यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगाचा निष्‍कर्ष खालील  प्रमाणे आहे-

 

                                                                                          ::निष्‍कर्ष::

05    तक्रारकर्त्‍याने जिल्‍हा  ग्राहक आयोगा समक्ष विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंकेचे विरोधात प्रतिज्ञालेखावर  तक्रार दाखल केलेली असून सदर तक्रारी व्‍दारे विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंके विरुध्‍द आरोप केलेले आहेत.  विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंकेस जिल्‍हा ग्राहक आयोगाची नोटीस मिळूनही  ते जिल्‍हा ग्राहक आयोगा  समक्ष उपस्थित झाले नाही वा लेखी निवेदन  दाखल केलेले नाही.  अशा परिस्थितीत आम्‍ही प्रस्‍तुत  तक्रार उपलब्‍ध पुराव्‍याचे आधारे  गुणवत्‍तेवर  (On Merit) निकाली काढीत  आहोत.

 

 

06.    तक्रारकर्त्‍याचे आरोपा प्रमाणे त्‍याचे विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंक ऑफ इंडीया शहर शाखा भंडारा येथे बचत खाते असून  त्‍याचा  क्रमांक-31791618345 असा असून त्‍याचे बचत खात्‍या मध्‍ये रुपये-43,702/- एवढी रक्‍कम जमा होती. त्‍याने बचत खात्‍या मधून रुपये-40,000/- काढण्‍या करीता तीनदा अनुक्रमे दिनांक-20.09.2021, दिनांक-27.09.2021 आणि  दिनांक-21.10.2021 अशा तारखांना विथड्राल स्लिप  विरुध्‍दपक्ष बॅंके मध्‍ये जमा केल्‍या होत्‍या. या आरोपाच्‍या अनुषंगाने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंक ऑफ इंडीयाच्‍या 03 विथड्राल स्लिपच्‍या प्रती पुराव्‍यार्थ अभिलेखावर दाखल  आहेत. दिनांक-20.09.2021 च्‍या विथड्राल स्लिपवर Hold असे नमुद आहे.दिनांक-21.09.2021 च्‍या विथड्राल स्लिपवर कुठलाही शेरा दिसून येत नाही. मात्र दिनांक-27.09.2021 रोजीच्‍या विथड्राल स्लिपवर विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंकेचा शिक्‍का सुध्‍दा मारलेला आहे आणि सदर विथड्राल स्लिपवर Hold असे नमुद आहे परंतु संबधित अधिका-‘यांनी प्रत्‍येक तारखेस खाते “Hold” केल्‍याचा शेरा मारला परंतु खाते होल्‍ड  केल्‍या बाबत कारण दिले नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍दपक्ष बॅंकेस वकीलांचे मार्फतीने रजिस्‍टर नोटीस पाठवून रुपये-40,000/- डी.डी.व्‍दारे त्‍याचे राहते पत्‍त्‍यावर पाठवावे अशी मागणी केली होती परंतु  विरुध्‍दपक्ष बॅंकेस नोटीस मिळूनही कोणताही प्रतिसाद दिला नाही वा नोटीसला उत्‍तर दिले नाही.  तक्रारकर्त्‍याचे  असेही म्‍हणणे आहे की, त्‍याने यापूर्वी   जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा यांचे समक्ष याच विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंकेच्‍या शाखे विरुध्‍द ग्राहक तक्रार क्रं सीसी/19/60 दाखल केली होती आणि त्‍यामध्‍ये जिल्‍हा ग्राहक आयोगाने दिनांक’27.11.2020 रोजी निकालपत्र पारीत करुन  तक्रारकर्त्‍याची तक्रारविरुध्‍दपक्ष  बॅंके विरुध्‍द अंशतःमंजूर केली होती., त्‍यामुळे  विरुध्‍दपक्ष बॅंकेनी तक्रारीचा सुड आणि व्‍देष  भावनेतून  त्‍याचे बचत खात्‍या  मधील रक्‍कम होल्‍ड  केलेली आहे,

 

 

07.   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंकऑफ इंडीया सिटी मेन ब्रॅन्‍च भंडारा यांना दिनांक-04.10.2021 रोजी कायदेशीर नोटीस पाठविल्‍या बाबत पुराव्‍यार्थ सदर नोटीसची प्रत दाखल केली. सदर नोटीसमध्‍ये असे नमुद  आहे की, तक्रारकर्ता हा दिनांक-20.09.2021आणि दिनांक-27.09.2021 अशा तारखांना  त्‍याची विरुध्‍दपक्ष बॅंकेत जमा असलेली वत्‍याने  मागणी केलेली रक्‍कम रुपये-40,000/- “HOLD” केल्‍याची बाब सिध्‍द होते. सदर नोटीस विरुध्‍दपक्षास मिळाल्‍या बाबत पोस्‍टाची पोच अभिलेखावर दाखल आहे.  अशाप्रकारे  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष बॅंके विरुध्‍द केलेले आरोपा संदर्भात विरुध्‍दपक्ष बॅंकेस जिल्‍हा ग्राहक आयोगाची रजि.पोस्‍टाव्‍दारे पाठवलेली नोटीस तामील होऊनही ते जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्‍यांनी तक्रारकर्त्‍याने त्‍यांचे  विरुध्‍द तक्रारी मधून केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत.  

 

 

08.    तक्रारकर्त्‍याने पुराव्‍यार्थ विरुध्‍दपक्ष बॅंके  मध्‍ये  जमा  रक्‍कम काढण्‍यासाठी दाखल केलेल्‍या तीन विथड्राल स्लिपच्‍या प्रती पुराव्‍यार्थ दाखल केलेल्‍या आहेत, त्‍यानुसार दिनांक-20.09.2021 रोजीचे विथड्राल स्लिप रुपये-40,000/- एवढी रक्‍कम भरलेली असून खाली  तक्रारकर्त्‍याची  सही  असून सदर स्लिपवर “Hold” असे हाताने लिहिल्‍याचे दिसून येते. या शिवाय दिनांक-21.10.2021 रोजीची विथड्राल स्लिप रुपये-40,000/- ची असून त्‍यावर  तक्रारकर्त्‍याची सही असल्‍याचे  दिसून येते. तसेच दिनांक-27.09.2021 रोजीचे विथड्राल स्लिपवर सुध्‍दा रुपये-40,000/- एवढी रक्‍कम भरलेली असून खाली तक्रारकर्त्‍याची  सही असून सदर विथड्राल स्लिपवर विरुध्‍दपक्ष बॅंकेचा शिक्‍का असून हाताने “Hold” लिहिल्‍याचे दिसून येते. अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याने  त्‍याची जमा रक्‍क्‍म रुपये-40,000/- तीनदा काढण्‍याचा प्रयत्‍न केला असता त्‍याची  रक्‍कम  तीनदा का थांबविण्‍यात आली याचे कोणतेही स्‍पष्‍टीकरण  विरुध्‍दपक्ष बॅंकेनी त्‍याला दिलेले नाही ही बाब सिध्‍द  होते आणि ही त्‍यांनी  तक्रारकर्त्‍यास दिलेली दोषपूर्ण सेवा आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.  एखादया ग्राहकाचे खात्‍यामधील जमा रक्‍कम काढताना  तीन वेळेस त्‍याची रक्‍कम देण्‍यात न येण्‍याचे कारण विरुध्‍दपक्ष बॅंकेनी देणे बंधनकारक व आवश्‍यक (Mandatory) होते. आमचे समोर देखील असा कोणताही पुरावा  आलेला नाही की,  विरुध्‍दपक्ष बॅंकेनी  तक्रारकर्त्‍याची  तीन  वेळा मागणी  केलेली रक्‍कम  थांबविण्‍याचे कारण हे योग्‍य व समर्थनीय (Legal and Just)  होते. अशा परिस्थितीत  विरुध्‍दपक्ष   बॅंके कडून  तक्रारकर्त्‍याची खात्‍यातील जमा रक्‍कम न देण्‍या मागे (There is no explanation from the Opposite Bank regarding holding three times the saving bank  amount of Complainat)  कोणताही खुलासा  न आल्‍याने तक्रारकर्त्‍याची  तक्रार  विरुध्‍दपक्ष  बॅंके विरुध्‍द अंशतः मंजू  रहोण्‍यास  पात्र आहे  असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे  मत आहे.  विरुध्‍दपक्ष  बॅंकेनी तीनदा  रक्‍कम  देण्‍यास नाकारले असल्‍याने व कोणतेही स्‍पष्‍टीकरण न  दिल्‍याने  तक्रारकर्त्‍यास निश्‍चीतच शारिरीक वमानसिक त्रास सहन करावा   लागला  तसेच प्रस्‍तुत तक्रार  जिल्‍हा ग्राहक आयोगा  समक्ष दाखल करावी लागली. त्‍यामुळे  तक्रारकर्ता हा  विरुध्‍दपक्ष बॅंके कडून   शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/-  आणि  तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्‍दपक्ष बॅंके कडून मिळण्‍यास पात्र आहे  असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे  मत आहे. 

 

09   तक्रारकर्त्‍याची अशीही मागणी आहे की,  विरुध्‍दपक्ष बॅंकेस  असे आदेशित करावे की,त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे राहते पत्‍त्‍यावर रुपये-43,000/- चा डी.डी. पाठवावा परंतु असे आदेशित करता येत नाही  कारण बॅंकींग नियमानुसार  तक्रारकर्त्‍याने  रक्‍कम काढण्‍यासाठी भरुन दिलेल्‍या आधीच्‍या विथड्राल स्लिप या आता निष्‍प्रभ झालेल्‍या आहेत. अशा परिस्थितीत तक्रारकर्त्‍याने स्‍वतः विरुध्‍दपक्ष  बॅंकेत जाऊन नव्‍याने योग्‍य  रकमेची (खात्‍यातील जमा रकमे  प्रमाणे ) विथड्राल स्लिप भरुन दयावी व विरुध्‍दपक्ष बॅंकेनी विथड्राल स्लिप प्रमाणे  त्‍याचे खात्‍यात जमा असलेली रक्‍कम हिशोबात  घेऊन त्‍यास रक्‍कम अदा करावी असे आदेशित करणे  योग्‍य  व न्‍यायोचित  होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

 

10.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन प्रस्‍तुत  तक्रारी मध्‍ये जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे  खालील प्रमाणे  अंतीम आदेश पारीत  करण्‍यात  येतो-

 

                                                         :: अंतीम आदेश ::

 

  1.  तकारकर्ता श्री मनोहर बुधा कढव यांची तक्रार विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंक  ऑफ इंडीयाशहर शाखा, भंडारा  तर्फे मुख्‍य प्रबंधक (मॅनेजर) यांचे विरुध्‍द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1.   विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंक  ऑफ इंडीया शहर शाखा, भंडारा  तर्फे मुख्‍य प्रबंधक (मॅनेजर) यांना  आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याने स्‍वतः विरुध्‍दपक्ष  बॅंकेत येऊन नव्‍याने योग्‍य  रकमेची (खात्‍यातील जमा रकमे प्रमाणे ) विथड्राल स्लिप भरुन बॅंकेच्‍या  काऊंटरवर जमा केल्‍या नंतर  विरुध्‍दपक्ष बॅंकेनी विथड्राल स्लिप प्रमाणे  त्‍याचे खात्‍यात जमा असलेली रक्‍कम हिशोबात  घेऊन  रक्‍कम  तक्रारकर्त्‍यास  अदा करावी.

 

  1.  विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंक  ऑफ इंडीया शहर शाखा, भंडारा  तर्फे मुख्‍य प्रबंधक (मॅनेजर) यांना  आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- (अक्षरी रुपये पंधरा  हजार फक्‍त) आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा  हजार फक्‍त) अशा रकमा अदा कराव्‍यात.

 

  1.  सदर आदेशाचेअनुपालन विरुध्‍दपक्ष स्‍टेट बॅंक  ऑफ इंडीया शहर शाखा, भंडारा  तर्फे मुख्‍य प्रबंधक (मॅनेजर) यांनी प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

  1. उभय  पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्‍ध करुन दयावी

 

  1. उभय पक्षकार व त्‍यांचे अधिवक्‍ता यांना निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी जिल्‍हाग्राहक आयोगा समक्ष प्रकरणात दाखल केलेले अतिरिक्‍त संच जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.  
 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.