Maharashtra

Ahmednagar

MA/19/70

सचिन बाळासाहेब भुजबळ - Complainant(s)

Versus

मा.शाखाधिकारी,सुदरम फायनान्‍स लि. - Opp.Party(s)

संदीप मुळे

16 Jan 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Miscellaneous Application No. MA/19/70
( Date of Filing : 30 Dec 2019 )
In
Complaint Case No. CC/19/320
 
1. सचिन बाळासाहेब भुजबळ
रा. खळेवाडी,भिंगार
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. मा.शाखाधिकारी,सुदरम फायनान्‍स लि.
डौले हॉस्‍पीटल समोर,सावेडी अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Appellant:संदीप मुळे, Advocate
For the Respondent:
Dated : 16 Jan 2020
Final Order / Judgement

किरकोळ अर्जावरील आदेश

आदेश दिनांक – १६/०१/२०२०

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

 

१.     तक्रारदारातर्फे त्‍याचा मालकीचा ट्रक क्रमांक एमएच-१६ एवाय ७५७३ सामनेवाले यांनी तक्रारदाराचे अपरोक्ष विक्री केलेला आहे. सदरचा वादातील ट्रक हा सामनेवाले यांनी इतर इसमाचे नावे करून देऊ नये असा हुकुम मनाईचा अर्ज सादर केलेला होता. परंतु सामनेवालेने त्‍यावर जबाब दाखल केलेला आहे. त्‍यात सामनेवालेने असे नमुद केले आहे की, सामनेवालेने वादातील वाहनाकरीता कर्ज दिले होते. कर्जाचे करारनाम्‍याप्रमाणे व नियमाप्रमाणे वादातील वाहन विकलेले असुन सदर अर्ज बेकायदेशीर आहे, म्‍हणुन खारीज करण्‍यात यावा अशी विनंती करण्‍यात येते. उभयपक्षांचा सदर अर्जावर तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यात आला. तक्रारदार यांनी वादातील ट्रक कोणत्‍या इसमाला विकण्‍यात आला आहे हे माहित नाही, तसेच राज्‍य परीवहन विभाग यांना पक्षकार केलेले नाही. याकरीता तक्रारदाराला सदर अर्ज पुढे चालवायचा नाही व योग्‍य अर्ज दाखल करण्‍याची परवानगी द्यावी, असा तक्रारदारातर्फे वकिलांनी शेरा अर्जावर नोंद‍वीला. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आ दे श

१.  तक्रारदाराला सदर अर्ज पुढे चालवायवा नाही म्‍हणुन नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

 

२.  तक्रारदाराला योग्‍य अर्ज दाखल करण्‍याची परवानगी देण्‍यात येते.

 

३.  उभयपक्षांनी सदर अर्जाचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 

४.   सदरील आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना विनामुल्‍य देण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.