Maharashtra

Ahmednagar

CC/19/388

नामदेव माधवराव खोसे - Complainant(s)

Versus

मा.व्‍यवस्‍थापक,भारतीय स्‍टेट बॅंक - Opp.Party(s)

विकास ढोकळे

22 Jan 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/19/388
( Date of Filing : 05 Dec 2019 )
 
1. नामदेव माधवराव खोसे
रा.पारनेर ता.अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मा.व्‍यवस्‍थापक,भारतीय स्‍टेट बॅंक
शाखा-पारनेर ता.पारनेर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:विकास ढोकळे, Advocate
For the Opp. Party:
Dated : 22 Jan 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – २२/०१/२०२०

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदर यांनी सामनेवाकडुन त्‍याचे व्‍यवसायासाठी कर्ज घेतलेले होते. काही कारणामुळे ते कर्जाची रक्‍कम भरू शकले नाही. सामनेवाले बॅंकेने तक्रारदाराचे वाहनाचा इन्‍शुरन्‍स फक्‍त दोन वर्षांकरीता काढलेला होता. त्‍यानंतर त्‍या तो काढलेला नाही. सदर वाहन सन २०१३ मध्‍ये विकत घेतले होते. सामनेवाले बॅंकेने सन २०१५ पासुन इन्‍शुरन्‍स रक्‍कम भरणा केली नव्‍हती, असे दिसुन येते. सदर सामनेवाले बॅंकेने सेवेत त्रुटी केली आहे म्‍हणुन सदर तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, वादातील वाहनाचा इन्‍शुरन्‍स न भरल्‍याने त्‍याला वाहनाचा वापर करता आला नाही व सदर वाहन बरेच कालावधीकरीता उभे राहिलेले असल्‍याने त्‍या वाहनामध्‍ये  बिघाड झाला. त्‍याची दुरूस्‍तीकरीता घेऊन जात असतांना सामनेवालेचे अधिका-यांनी रस्‍त्‍यावर सदर वाहनाचा ताबा घेतला. तक्रारदाराचे वाहनाचा इन्‍शुरन्‍स न भरल्‍याने त्‍याला सदर वाहन रस्‍त्‍यावर चालविता आले नाही व भाड्याची गाडी घ्‍यावी लागली. तक्रारदाराला नुकसान भरपाई सामनेवालेकडुन मिळण्‍यासाठी सदर तक्रार दाखल केली आहे.

२.   सदर तक्रारीत प्राथमीक युक्तिवाद ऐकण्‍यात आला असता मंचाचे असे निदर्शनास आले की, सामनेवालेने तक्रारीत वाहनाकरीता इन्‍शुरन्‍सचे हप्‍ते  सन २०१५ पासुन भरलेले नाही व सदर तक्रार दाखल करण्‍याचे कारण सन २०१५ मध्‍ये घडले असल्‍याने सदर तक्रार मुदतीत दाखल करण्‍यात आलेली नाही, असे मंचाचे मत आहे. तक्रारदाराने सदर तक्रारीसोबत कोणताही विलंब माफीचा अर्ज सादर केला नाही. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आदेश

१.  तक्रार मुदतीत दाखल केली नसल्‍याने अस्विकृत करण्‍यात येत आहे.

 

२.  तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 

३.  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी

 

४. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.