Maharashtra

Beed

CC/13/91

गयाबाई जिजाबा साबळे - Complainant(s)

Versus

मा.मुख्‍याधिकारी,नगरपरिषद बीड - Opp.Party(s)

गंडले

26 Sep 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/13/91
 
1. गयाबाई जिजाबा साबळे
इंदिरा नगर बीड
बीड
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मा.मुख्‍याधिकारी,नगरपरिषद बीड
कांरजा रोड,बीड
बीड
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल

                       दिनांक- 26.09.2014

                  (द्वारा- श्रीमती मजुंषा चितलांगे, सदस्‍या )

           तक्रारदार गयाबाई जिजाबा साबळे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले  यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे  म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.

 

             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात  खालील प्रमाणे आहे,  तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 नगर परिषद बीड येथे सफाई कामगार म्‍हणून कायमस्‍वरुपी नोकरीस आहेत. तक्रारदार यांनी भविष्‍य काळातील हित पाहून सामनेवाला क्र.2 यांचेकडून विमा पॉलीसी क्रमांक 981993412,  व 984369391 हया क्रमांकाच्‍या विमा पॉलिसी काढलेल्‍या आहेत. विमा पॉलिसीची मुदत दि.28.01.2007 ते 28.01.2025 पर्यंत आहे.  तक्रारदार हया  नगर परिषद येथे सफाई कामगार म्‍हणून नोकरीत असल्‍यामुळे तिला मिळणा-या वेतनातून सामनेवाला क्र.1 हे तक्रारदाराच्‍या विमा पॉलीसीचे हप्‍ते कपात करत होते. दि.08.07.2013 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 कडे विमा पॉलीसीची रक्‍कम कधी मिळणार त्‍याबाबत विचारपूर केली असता त्‍यांनी तक्रारदाराचे विमा पॉलिसीचे हप्‍ते सामनेवाला क्र.1 कडून सामनेवाला क्र.2 यांचे कार्यालयात जमा केलेले नाही अशी माहिती सामनेवाला क्र.2 यांचे अधिका-यांनी तक्रारदारास दिली. सामनेवाला क्र.1 यांना विमा हप्‍ते भरण्‍या बाबत पत्र दिल्‍याचे सांगितले.  तक्रारदारास विमा पॉलीसीची रक्‍कम सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडे वर्ग केली नाही हे कळाल्‍यावर तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांच्‍याकडे जाऊन विचारपूस केली असता एकूण 15 ते 16 हप्‍ते कपात करुन सामनेवाले क्र.2 कडे जमा केलेले नाहीत.  तसेच सामनेवाले क्र.1 यांनी सदरील हप्‍ते हे विमा कार्यालयात जमा करु अशी माहिती दिल्‍यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेवर विश्‍वास ठेवला. सामनेवाला क्र.1 ची जबाबदारी आहे की, कर्मचा-यांचे कपात केलेले विमा हप्‍ते तात्‍काळ विमा कंपनीस पाठविणे गरजेचे आहे परंतू सामनेवाला क्र.1 यांनी सदरील हप्‍ते कपात करुन विमा कंपनीस न पाठविल्‍यामुळे सेवा देण्‍यात त्रुटी ठेवली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचे विमा हप्‍ते हे सामनेवाला क्र.1 कडून वेळेत आले नाही हे माहित असून सुध्‍दा तक्रारदारास पत्र पाठवून कळविले नाही. त्‍यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी सेवा देण्‍यात कसूर केला आहे. सामनेवाला क्र.1 व 2 यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे तक्रारदाराचे विमा हप्‍ते भरण्‍यास विलंब झालेला आहे. विलंब झालेल्‍या  व्‍याजास संपूर्णतः सामनेवाले क्र.1 व 2 हे संयूक्‍तरित्‍या जबाबदार आहेत. सामनेवाला यांनी केलेल्‍या निष्‍काळजीपणामुळे तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रास झाला आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सेवेत कसूर केल्‍यामुळे रक्‍कम रु. रु.5,000/-  नुकसान भरपाई तसेच तक्रारदार यांचे कपात केलेले विमा पॉलीसीचे हप्‍ते सामनेवाला क्र.2 यांच्‍या कार्यालयात जमा करण्‍याचे व त्‍यावरील होणारे व्‍याज सुध्‍दा सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 कडे वर्ग करण्‍याची मागणी केली आहे. तक्रारदाराचे यापूढे पगारामधून कपात केलेले विमा पॉलीसीचे हप्‍ते तात्‍काळ विमा कार्यालयात जमा करण्‍याचे आदेश व्‍हावे. तक्रारदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- देण्‍यात यावा, तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात यावी.

            सामनेवाला क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी नि.16 अन्‍वये आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे.  सामनेवाला क्र.1 यांचे कथनेनुसार तक्रारदार हे नगर परिषद बीड येथे सफाई कामगार म्‍हणून नोकरीस आहे व तिला मिळणा-या वेतनातून विमा पॉलीसीचे हप्‍ते कपात करत असल्‍याचा मजकूर हा अंशतः खरा व बरोबर आहे. उर्वरीत तक्रारीतील मजकूर  सामनेवाला क्र.1 यांनी स्‍पष्‍टपणे नाकारलेला आहे. सामनेवाला क्र.1 यांचे अधिक कथन की, तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांचे कार्यालयात नोकरीत असून ग्राहक या संज्ञेत बसत नाहीत. सदर तक्रार ही नियमबाहय असून या मंचाला तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही.  सदर तक्रारीत तक्रारदार यांनी महाराष्‍ट्र शासनास पार्टी न केल्‍याने असंयोजनाची बाधा येत असल्‍याने सदर तक्रार नामंजूर करण्‍यात यावी. सामनेवाला क्र.1 हे स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था  असून महाराष्‍ट्र शासनाच्‍या अधिपत्‍याखाली काम करते. शासनाकडून प्राप्‍त  झालेल्‍या अनुदानानुसार सामनेवाला क्र.1 हे कर्मचा-यांचे पगार व शहरातील विकास कामे करतात.            

 

           सामनेवाला क्र.1 यांचे आस्‍थापनेवरील कर्मचारी यांना नोव्‍हेंबर 2010 पासून महाराष्‍ट्र शासनाने सहावा वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी लागू केली असून सदर वेतनश्रेणी नुसार कामगारांच्‍या वेतनामध्‍ये भरघोस वाढ झालेली आहे. महाराष्‍ट्र शासनाकडून प्राप्‍त होणारे सहायक अनुदार कमी प्राप्‍त होत असल्‍यामुळे कामगारांचे वेतनास निधी कमी परत असल्‍यामुळे कामगारांचे वेतन हे वेळेवर होत नाही म्‍हणून सामनेवाला क्र.1 यांनी दि.29.03.2012 रोजी जाहीर सुचना नगर पालिकेच्‍या नोटीस बोर्डवर लावली होती, सदर सुचनेनुसार सामनेवाला क्र.1 यांनी कामगारांना सुचित केले होते की, विमा पॉलीसीचे हप्‍ते  दि.01.04.2012 पासून नगरपालिका कपात करणार नाही. तसेच फेब्रुवारी 2011 ते मार्च 2012 पर्यंत कपात केलेले हप्‍त्‍याची रक्‍कम कामगारांना परत देण्‍यात येतील. सबब सामनेवाला क्र.1 यांनी मुदतीत तक्रारदाराचा विमा हप्‍ता  सामनेवाला क्र.2 यांचेकडे जमा केलेला नाही. सदर जाहीर सुचनेनुसार तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचे दरम्‍यान कोणताही वैध करार अस्तित्‍वात नव्‍हता. सबब सामनेवाला क्र.1 यांनी सेवा देण्‍यात कसूर केला नाही. सामनेवाला क्र.1 हे नुकसान भरपाई देण्‍यास जबाबदार नाही.   

 

           तक्रारदार यांनी  दि.31.10.2013  रोजी सामनेवाला क्र.1 यांचेकडे कपात केलेल्‍या विमा हप्‍त्‍याची रक्‍कम परत मिळणेकामी अर्ज केला होता सदर अर्ज सामनेवाला क्र.1 यांनी मंजूर करुन तक्रारदारास विमा हप्‍त्‍याची कपात केलेली प्रतिमहिना रक्‍कम रु.674/- प्रमाणे 14 हप्‍त्‍याची एकूण रक्‍कम रु.9,436/- तक्रारदार यांचे स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद येथे पगार खाते क्रमांक 62022908551 यावर जमा केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदारास कपात केलेली सर्व रक्‍कम सामनेवाला क्र.1 यांनी अदा केली असून तक्रारदार यांनी खात्‍यावरुन उचललेली आहे. सबब सामनेवाला क्र.2 कडे जमा करण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. सबब तक्रारदार यांनी सदरची तक्रार ही सामनेवाला क्र.1 यांना त्रास देण्‍याच्‍या उददेशाने दाखल केली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार ही खर्चासह खारीज करावी.

 

            सामनेवाले क्र.2 हे हजर झाले व त्‍यांनी नि.12 अन्‍वये आपले लेखी म्‍हणणे सादर केले आहे.  तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 कडून दोन विमा पॉलिसी घेतली आहे सदर पॉलिसीचे विवरण व मुदत खालील नमुद केलेल्‍या तक्‍त्‍यामध्‍ये आहेत.

 

1

Policy Number

984369391

981993412

2

Date of commencement of Policy.

28.1.2007

28.3.2002

3

Sum assured

Rs.50,000/-

Rs.50,000/-

4

Premium

Rs.373.00

Rs.301/-

5

Plan-Term

179-12

14/15

6

More

S.S.S.

S.S.S.

7

First unpaid premium

02/2011

02/2011

 

            सामनेवाले क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार यांनी वर नमुद केल्‍याप्रमाणे दोन विमा पॉलीसी घेतलेल्‍या आहेत. सदर पॉलीसी ही SSS या योजनेमधील असून त्‍यामध्‍ये मालक तर्फे तक्रारदार यांचे वेतनातून रक्‍कम कपात करुन सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडे जमा करण्‍यात येते. सामनेवाला क्र.1 यांनी फेब्रुवारी 2011 पासून सदर विमा हप्‍ते भरलेले नाही. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, तक्रारदार यांनी सदर पॉलीसीवर कर्ज काढलेले आहे. सामनेवाला यांचे अधिक कथन की, फेब्रुवारी 2011 पासून सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांचे पगारातून कपात केलेली विमा हप्‍त्‍याची रक्‍कम ही सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडे जमा न केल्‍यामुळे सदरील पॉलीसीज हया बंद होण्‍याच्‍या मार्गावर आहे. सामनेवाला क्र.2 यांचे कथन की, सदर पॉलीसीज हया विमा हप्‍ते नियमितपणे दिल्‍यास सदरील शर्ती व अटीनुसार पॉलीसी बाबत विचार करण्‍यात येईल. तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत येत नाही त्‍यामुळे  सामनेवाला क्र.2 यांनी सेवा देण्‍यात कसूर केला आहे असे म्‍हणता येणार नाही. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ही दाखल करण्‍यास कोणतेही कारण नसतांना दाखल केलेली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी.

 

            तक्रारदार यांनी तक्रारीसोबत विमा पॉलीसीची छायांकित प्रत तसेच सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांना दिलेले पत्र दाखल केलेले आहे. तसेच पुराव्‍याकामी तक्रारदार यांचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी निशाणी 18 अन्‍वये कागदपत्र दाखल केले आहे त्‍यामध्‍ये दि.29.03.2012 रोजीची जाहीर सुचना तसेच दि.21.10.2013 रोजी हप्‍ता जमा केल्‍याची बँकेची पावती इत्‍यादी कागदपत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी विमा पॉलीसीची प्रत तसेच पॉलीसीच्‍या शर्ती व अटी व तक्रारदार यांच्‍या पॉलीसीचा उतारा इत्‍यादी कागदपत्राच्‍या छायांकित प्रती दाखल केलेल्‍या आहेत. वरील नमुद केलेल्‍या सर्व कागदपत्राचे अवलोकन केले. तक्रारदार व सामनेवाला यांच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद लक्षात घेतला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

               मुददे                                   उत्‍तर

1) सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदाराच्‍या पगारातून विमा हप्‍ते

   कपात करुन सदर विमा हप्‍ते सामनेवाले क्र.2 यांच्‍याकडे

   जमा न करुन सेवा देण्‍यात त्रूटी ठेवली आहे ही बाब तक्रारदार

   यांनी सिध्‍द केली काय ?                                होय.

2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास पात्र आहेत काय?    होय.

3) काय आदेश ?                                अंतिम आदेशाप्रमाणे.

 

                        कारणमिंमासा

मुददा क्र.1 व 2ः- तक्रारदार यांनी युक्‍तीवाद करत असताना असे सांगितले की, तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांच्‍याकडे कायमस्‍वरुपी नोकरीस आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडून विमा पॉलीसीज घेतलेल्‍या आहे. सदर विमा पॉलीसीचे हप्‍ते हे सामनेवाला क्र.1 हे तक्रारदार यांचे पगारातून कपात करुन सामनेवाला क्र2 यांच्‍याकडे वर्ग करण्‍याची जबाबदारी घेतली आहे. असे असताना सुध्‍दा सामनेवाला क्र.1 यांनी फेब्रुवारी 2011 पासून तक्रारदार यांचे वेतनातून विमा हप्‍ते कपात करुन सुध्‍दा सामनेवाला क्र.2 यांचेकउे जमा केलेले नाही. सबब सामनेवाला क्र.1 यांनी विमा हप्‍ते जमा न करुन सेवा देण्‍यात कसूर केलेला आहे. सबब सामनेवाला क्र.1 यांनी कपात केलेले विमा हप्‍त्‍याची रक्‍कम सामनेवाला क्र.2 यांचेकडे वर्ग करण्‍यात यावी. तसेच पुढील हप्‍ते नियमितपणे भरण्‍यात यावे असे तक्रारदार यांची विनंती आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात यावी.

 

            सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्‍या लेखी युक्‍तीवादाप्रमाणे तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांचे ग्राहक नाही. तसेच दि.29.03.2012 रोजी दिलेल्‍या सुचनेनुसार सामनेवाला क्र.1 हे कर्मचा-यांच्‍या विमा पॉलीसीच्‍या  हप्‍त्‍याची कपात करुन सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडे वर्ग करणार नाही, थकीत हप्‍त्‍यावर कोणताही व्‍याज दंड अथवा नुकसान भरपाई देण्‍यास सामनेवाला क्र.1 जबाबदार नाही. तक्रारदार यांनी दि.21.10.2013 रोजी सामनेवाला क्र.1 यांच्‍याकउे विमा हप्‍त्‍याची कपात केलेली रक्‍कम मिळण्‍यास अर्ज दिला होता सदर अर्ज मंजूर करुन तक्रारदारास रक्‍कम रु.674/- प्रमाणे 14 हप्‍त्‍याची एकूण रक्‍कम रु.9,436/- ही तक्रारदार यांचे खात्‍यावर जमा करण्‍यात आली आहे. सदर रक्‍कम ही तक्रारदाराने खात्‍यावरुन उचललेली आहे. त्‍यामुळे सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडे रक्‍कम जमा करण्‍याची जबाबदारी सामनेवाला यांची नाही. तक्रारदार यांनी विमा हप्‍त्‍याची रक्‍कम जमा केली आहे किंवा नाही या बाबत कोणताही नकार किंवा ठोस पुरावा शपथपत्रात किंवा युक्‍तीवादात केलेला नाही. यावरुन कपात केलेली रक्‍कम रु.9,436/- ही तक्रारदारास अदा केलेली स्‍पष्‍ट होते. तक्रारदाराने सदरची तक्रार ही त्रास देण्‍याच्‍या उददेशाने दाखल केलेली आहे. सदर तक्रार ही न्‍याय मंचास चालविण्‍याचा अधिकार नसल्‍यामुळे सदर तक्रार ही मंचात चालू शकत नाही. तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांचे लोकसेवक कर्मचारी असून तो ग्राहक या संज्ञेत येत नसल्‍यामुळे तक्रारदाराची तक्रार ग्राहय नाही. त्‍याबाबत सामनेवाला क्र.1 यांनी खालील नमुद केलेला न्‍याय निवाडा युक्‍तीवादाचे पुष्‍टयर्थ दाखल केलेले आहे.

 

  1. महाराष्‍ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे प्रकरण 22 कलम 302 ची प्रत.
  2. Supreme Court- 2014 (3) Mh.L.J.P.No. 127 Jagmittar Sain Bhagat & others V/s. Director Health Services, Haryana & others.
  3. State Commission Chhattisgarh State Appeal No. FA/13/132 Order Date- 04/02/2014 Accountant General State of Chhattisgarh V/s. Shyam Lal Mehar & others
  4. State Commission Delhi- 1993 (1) C.P.R.P.No.552 Yogesh Kumar V/s. Silverline Holdings Pvt. Ltd.

 

सबब तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी.

 

            वर नमुद केलेला युक्‍तीवाद लक्षात घेतला. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र याचे अवलोकन केले. तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांच्‍याकडे कायमस्‍वरुपी नोकरीस आहे ही बाब सामनेवाला क्र.1 यांना मान्‍य आहे. तक्रारदाराच्‍या पगारातून सामनेवाला क्र.1 हे तक्रारदार यांनी घेतलेल्‍या विमा पॉलीसीच्‍या अंतर्गत विमा पॉलीसीचे हप्‍त्‍याची रक्‍कम कपात करुन सामनेवाला क्र.2 कडे वर्ग करत होते ही बाब सामनेवाला क्र.1 यांना मान्‍य आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास पॉलीसी क्र. 981993412, 984369391 प्रमाणे तक्रारदाराची विमा पॉलीसी काढली आहे ही बाब सामनेवाला क्र.2 यांना मान्‍य आहे. सदर विमा पॉलीसीचे हप्‍ते हे सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराच्‍या वेतनातून कपात करुन सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडे सदरील रक्‍कम वर्ग करण्‍याची जबाबदारी घेतली आहे. सदर पॉलीसीची मुदत ही दि.28.01.2007 ते 28.01.2025 अशी आहे सदर कालावधीसाठी सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांचे वेतनातून विमा हप्‍ते  रक्‍कम कपात करुन सामनेवाला क्र.2 कडे जमा करण्‍याची जबाबदारी घेतली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेला विमा पॉलीसीचा खाते उतारा याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सामनेवाला क्र.1 यांनी फेब्रुवारी 2011 पासून तक्रारदार यांच्‍या विमा हप्‍त्‍याची रक्‍कम सामनेवाला क्र.2 कडे जमा केलेली नाही. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांचे वेतनातून फेब्रुवारी 2011 पासुन विमा हप्‍ते कपात केलेले असून सुध्‍दा सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडे जमा केलेले नाही असे निदर्शनास येते. तक्रारदार हे आपल्‍याला भविष्‍यात लाभ मिळावा किंवा आवश्‍यकतेनुसार योग्‍य वेळेस  आपल्‍याला रक्‍कम मिळावी त्‍या  करता सामनेवाला क्र.2 यांचेकडून विमा पॉलीसी काढतात. त्‍यांचा लाभ योग्‍य वेळी तक्रारदारास घेता यावा.

 

             सामनेवाला क्र.1 यांचे युक्‍तीवादाचे अवलोकन केले असता त्‍यांनी दि.29.03.2012 रोजी दिलेल्‍या जाहीर सुचनेनुसार कपात केलेली विमा रक्‍कम फेब्रुवारी 2011 ते मार्च 2012 पर्यंत कपात केलेली रक्‍कम परत देण्‍यात येईल याची नोंद घेतलेली आहे व तसेच दि.01.04.2012 पासून कार्यालयात विमा हप्‍ते कपात करणार नाही असे जाहीर सुचना सामनेवाला क्र.1 यांनी दिलेली आहे. यावरुन असे निदर्शनास येते की, फेब्रुवारी 2011 पासून तक्रारदार यांच्‍या वेतनातून रक्‍कम कपात केली परंतू सामनेवाला क्र.2 कउे रक्‍कम जमा केली नाही. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्‍या एल.आय.सी.परतावा बाबतची दि.21.10.2013 चे पत्र याचे अवलोकन केले. सदर पत्रावर तक्रारदार यांचे नावे रक्‍कम जमा झाल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तसेच दाखल केलेल्‍या  बँकेची स्‍लीप याचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये  सदर चेक हे कोणत्‍या  खाते क्रमांकावर जमा केलेले आहे तसे नमुद केलेले नाही. आणि कोणाच्‍या  नावावर जमा केलेले आहे हे सुध्‍दा स्‍पष्‍ट नाही. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार याने ज्‍या दिवशी विमा पॉलीसी काढली आहे, त्‍या दिवसापासूनच तक्रारदार यांचे वेतनातून विमा हप्‍ते कपात करुन सदरील रक्‍कम सामनेवाला क्र.2 यांचेकडे जमा करण्‍याची जबाबदारी घेतली आहे. सबब सामनेवाला क्र.1 हे मध्‍येच कोणतीही जाहीर सुचना करुन तक्रारदारास दिलेल्‍या  हमी नुसार तक्रारदार यांचे वेतनातून हप्‍ते कपात करणे बंद करु शकत नाही. ज्‍या मुदती पर्यंत सामनेवाला क्र.1 यांनी जिम्‍मेदारी स्विकारलेली आहे, त्‍या  तारखेपर्यंत सामनेवाला क्र.1 हे सदरील विमा हप्‍ते तक्रारदाराच्‍या वेतनातून कपात करुन सामनेवाला क्र.2 कडे जमा करण्‍याची जबाबदारी आहे. त्‍याबाबत सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेले दस्‍त हे विश्‍वसनीय नाही. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी घेतलेला बचाव हा स्विकार्य नाही. तक्रारदार हे विश्‍वास ठेवूनच स्‍वतःच्‍या भविष्‍याकरता आपल्‍याला दैनंदिन मिळकतीपासून काहीतरी रक्‍कम जमा करुन विमा पॉलीसी काढून सदरील रक्‍कम ही योग्‍य वेळी योग्‍य  हितासाठी वापरण्‍यात यावी म्‍हणून सदर योजनेखाली विमा पॉलीसी काढतात, जेणेकरुन तक्रारदारास त्‍याचा लाभ घेता यावा. सामनेवाला क्र.1 यांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला त्‍यासोबत खाली नमुद केलेला न्‍याय निवाडा दाखल केलेला आहे. सदरील न्‍यायनिवाडा विचारात घेतला यावरुन असे निदर्शनास येते की,

1)CLAIM OF RETIRAL BENEFITS BY GOVERNMENT SERVANT CANNOT BE ENTERTAINED BY CONSUMER FORUM( Supreme Court)

JAGMITTAR SAIN BHAGAT and others V/s. DIRECTOR, HEALTH SERVICES, HARYANA and others.

 

16. In view of the above, it is evident that by no stretch of imagination a government servant can raise any dispute regarding his service conditions or for payment of gratuity or GPF or any of his retiral benefits before any of the Forum under the Act. The government servant does not fall under the definition of a “consumer” as defined under section 2(1) (d) (ii) of the Act. Such Government servant is entitled to claim his retiral benefits strictly in accordance with his service conditions and regulations or statutory rules framed for that purpose. The appropriate forum, for redressal of any of his grievance, may be the State Administrative Tribunal, if any, or Civil Court but certainly not a Forum under the Act.

2)STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, DELHI Ygesh Kumar V/s. Silverline Holdings Pvt.Ltd.

 

        Consumer Protection Act, 1986- Sectopm 2(1) (d)- Complainant employed as an Architect worked for opp-party – Amount claimed due on account of salary, perquisites and price of designs – Complainant is not a consumer as he cannot be said to have hired services for consideration.

 

          सदरील निवाडयाचे अवलोकन केले असता सदरील तक्रारीत तक्रारदार हे सेवानिवृत्‍तीचा लाभ मिळणेकामी दाखल केलेली होती त्‍यामुळे सदरील केस लॉ हा तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या तक्रारीतील वस्‍तुस्थितीनुसार लागू होत नाही.

 

          यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार हया तक्रारीतील मागणी मिळण्‍यास पात्र आहे. सामनेवाले क्र 1 यांनी तक्रारदाराच्‍या पगारातून कपात केलेली विमा हप्‍त्‍याची थकीत रक्‍कम  सामनेवाले क्र 2 कडे व्‍याजासह जमा करावी व तक्रारदाराच्‍या पॉलिसीच्‍या कालावधी पर्यत पुढील विमा हप्‍ता रक्‍कम तक्रारदाराच्‍या पगारातून कपात करुन वेळोवेळी सामनेवाले क्र 2 कडे जमा करावेत. सबब, तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे. मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

 

          सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

                        आदेश

         1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.

         2) सामनेवाले क्र.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदार

            यांच्‍या पगारातून  कपात केलेले  थकीत विमा हप्‍त्‍याची

            रक्‍कम  व्‍याजासह सामनेवाला क्र 2 कडे निकाल कळाल्‍यापासून

            30 दिवसांचे आत जमा करावेत.

         3) सामनेवाला क्र 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी यापूढे 

            तक्रारदाराच्‍या पगारातून कपात होणारी विमा हप्‍त्‍याची रक्‍कम 

            योग्‍य  रितीने सामनेवाले क्र 2 कडे वेळोवेळी जमा करावी.

         4) सामनेवाले क्र 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, सदर विमा

            हप्‍ताची थकीत रक्‍कम व यापुढे पगारातून कपात होणारी विमा

            रक्‍कम सामनेवाले क्र 2 कडे जमा न केल्‍यास त्‍यामुळे

            तक्रारदारास होणा-या नुकसान  भरपाईस सामनेवाले क्र 1 हे

            सर्वस्‍वी जबाबदार राहतील.

   5) सामनेवाले क्र 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदाराच्‍या

      विमा पॉलीसीच्‍या हप्‍त्‍याची रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर

      तक्रारदाराची विमा पॉलीसी पुर्ववत चालू करावी.

         6) सामनेवाले क्र 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार यांना 

                        झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.2000/-

            व तक्रारीच्‍या  खर्चापोटी  रक्‍कम रु.1,000/- दयावेत.

         7) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील

            कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला

            परत करावेत.

 

 

 

                    श्रीमती मजुंषा चितलांगे        श्री.विनायक लोंढे,

                          सदस्‍या                   अध्‍यक्ष

                       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

             

 

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.