Maharashtra

Satara

CC/21/125

प्रभाकर दिगंबर सटाले - Complainant(s)

Versus

मातोश्री बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मलकापुर - Opp.Party(s)

Adv Abhijit kale

26 Jul 2024

ORDER

Consumer Disputes Redressal
Commission, Satara
 
Complaint Case No. CC/21/125
( Date of Filing : 01 Jul 2021 )
 
1. प्रभाकर दिगंबर सटाले
विश्रामनगर, मलकापुर, ता. कराड, जि. सातारा
सातारा
महाराष्ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मातोश्री बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मलकापुर
कोयना वसाहत, कराड, ता. कराड, जि, सातारा
सातारा
महाराष्ट्र
2. श्री.अशोकराव जगन्‍नाथ भावके
मु.पो.घोगाव, ता.कराड,जि.सातारा
सातारा
महाराष्ट्र
3. श्री.प्रभाकर मारुती तवटे
रा.मलकापूर,ता.कराड,जि.सातारा.
सातारा
महाराष्ट्र
4. श्री.दत्‍तात्रय रामचंद्र जाधव
रा.पाचवड वस्‍ती पाचवड ता.कराड, जि.सातारा.
सातारा
महाराष्ट्र
5. श्री.नारायण काशिनाथ सांळुखे
रा.घोगाव, ता.कराड,जि.सातारा.
सातारा
महाराष्ट्र
6. श्री. अनंत शिवाजीराव पाटील
रा.आटके, ता.कराड, जि.सातारा
सातारा
महाराष्ट्र
7. श्री.मोहन विठ्ठल निकम
रा. शेरे, ता.कराड, जि.सातारा
सातारा
महाराष्ट्र
8. श्री.श्रीरंग कृष्‍णा पाटील
रा.पोतले,ता.कराड, जि.सातारा
सातारा
महाराष्ट्र
9. श्री.रविंद्र यशवंत हिनुकले
रा.येळगांव, ता.कराड, जि.सातारा
सातारा
महाराष्ट्र
10. सौ.वंदना सिध्‍दनाथ घराळ
रा. घराळवाडी,ता.कराड, जि.सातारा
सातारा
महाराष्ट्र
11. सौ.साधना चंद्रकांत थोरात
रा.ओंड,ता.कराड, जि.सातारा
सातारा
महाराष्ट्र
12. श्री.जनार्दन निवृत्‍ती कारंडे
रा.कालवडे,ता.कराड, जि.सातारा
सातारा
महाराष्ट्र
13. श्री.चंद्रकांत तानाजी शिंदे
रा.मलकापूर,ता.कराड, जि.सातारा
सातारा
महाराष्ट्र
14. श्री.सुनिल बाजीराव शिंदे
रा.वाठार,ता.कराड, जि.सातारा
सातारा
महाराष्ट्र
15. 9. रविंद्र यशवंत हिनुकले.
मु. पो. कोयनावसाहत, मलकापूर, कराड, ता. कराड जि सातारा.
सातारा
महाराष्ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. BHARATI S. SOLAWANDE PRESIDENT
 HON'BLE MRS. ROHINI B. JADHAV MEMBER
 HON'BLE MS. MANISHA H. REPE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 26 Jul 2024
Final Order / Judgement

न्या य नि र्ण य

 

द्वारा माश्रीमती मनिषा हि. रेपे, सदस्य

 

1.    प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.

 

2.    तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –

 

      तक्रारदार हे वर नमूद पत्‍त्‍यावरील कायमचे रहिवासी आहेत.  तक्रारदार हे ज्‍येष्‍ठ नागरिक आहेत.  जाबदार क्र.1 ही नोंदणीकृत पतसंस्‍था आहे.  जाबदार क्र.2 ते 14 हे सदर संस्‍थेचे पदाधिकारी आहेत. तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये मुदत ठेव योजनेपोटी रकमा ठेवलेल्या होत्या. त्याचा तपशील पुढील प्रमाणे –

 

अ)  तक्रारदार क्र.1 यांचे नावे ठेवलेल्‍या ठेवींचा तपशील

अ.क्र.

पावती क्र.

खाते क्रमांक

ठेव रक्कम रु.

ठेव ठेवलेली तारीख

ठेव संपलेची तारीख

व्याजदर

1

1442

3334

 4,500/-

11/02/2019

12/02/2020

11.5 टक्के

2

1840

3431

11,000/-

19/06/2019

20/06/2020

11.5 टक्के

3

1850

299

50,000/-

01/07/2019

02/07/2020

11.5 टक्के

4

2201

300

50,000/-

01/07/2019

02/07/2020

11.5 टक्के

5

2202

301

25,000/-

01/07/2019

02/07/2020

11.5 टक्के

6

5105

3467

34,000/-

01/10/2019

09/01/2020

10.5 टक्के

7

1852

202

 1,000/-

21/12/2018

21/07/2026

10 टक्के

 

ब)  तक्रारदार क्र.2 यांचे नावे ठेवलेल्‍या ठेवींचा तपशील

अ.क्र.

पावती क्र.

खाते क्रमांक

ठेव रक्कम रु.

ठेव ठेवलेली तारीख

ठेव संपलेची तारीख

व्याजदर

1

3325

5606

15,345/-

01/10/2018

02/10/2019

11.5 टक्के

2

7220

6338

13,424/-

31/07/2017

01/08/2018

11.5 टक्के

3

456

6914

 4,000/-

01/10/2018

02/10/2019

11.5 टक्के

4

457

6915

12,000/-

01/10/2018

02/10/2019

11.5 टक्के

5

489

6944

33,025/-

31/10/2018

01/11/2019

11.5 टक्के

6

243

6579

45,000/-

11/02/2019

12/02/2020

11.5 टक्के

7

1316

7061

 5,500/-

11/02/2019

12/02/2020

11.5 टक्के

8

937

6616

 1,194/-

10/06/2019

11/06/2020

11.5 टक्के

9

2404

7187

19,360/-

03/08/2019

04/08/2020

11.5 टक्के

10

2403

409

63,000/-

03/08/2019

03/08/2021

12 टक्के

11

6604

2826

1,05,000/-

29/09/2018

30/09/2019

11.5 टक्के

12

2230

3229

  16,000/-

29/09/2018

30/09/2019

11.5 टक्के

13

8017

2978

  25,000/-

01/10/2018

02/10/2019

11.5 टक्के

14

2231

3230

   3,000/-

01/10/2018

02/10/2019

11.5 टक्के

15

2232

3231

  25,000/-

01/10/2018

02/10/2019

11.5 टक्के

16

1601

74

  85,000/-

31/10/2018

31/10/2019

11.5 टक्के

17

625

3274

  53,950/-

31/10/2018

01/11/2019

11.5 टक्के

18

624

3273

   2,241/-

31/10/2018

01/11/2019

11.5 टक्के

19

191

96

  35,000/-

14/12/2018

15/12/2019

11.5 टक्के

20

190

95

  40,000/-

14/12/2018

15/12/2019

11.5 टक्के

21

1441

3333

   7,300/-

11/02/2019

12/02/2020

11.5 टक्के

22

396

3094

  34,000/-

11/02/2019

12/02/2020

11.5 टक्के

23

382

3086

  25,000/-

11/02/2019

12/02/2020

11.5 टक्के

24

1440

3332

  27,500/-

11/02/2019

12/02/2020

11.5 टक्के

25

519

81

  12,000/-

09/03/2019

09/03/2020

11.5 टक्के

26

1638

3380

  10,000/-

10/04/2019

11/04/2020

11.5 टक्के

27

2226

3442

   6,000/-

26/07/2019

03/11/2019

10.5 टक्के

28

2239

320

  30,000/-

02/08/2019

03/08/2021

12 टक्के

29

768

70

1,55,000/-

01/09/2019

02/09/2021

12 टक्के

30

648

198

   1,000/-

21/12/2018

21/07/2026

10 टक्के

 

अशी एकूण रक्‍कम रु.11,83,609/- व सेव्हिंग्‍ज खात्‍यावरील रक्‍कम रु.41,142/- वरील पावतींचे दि. 31/10/2021 रोजी अखेर प्रतिमाह होणारे व्‍याज रफ. 2,19,029/- असे एकूण रक्‍कम रु. 14,43,780/- व त्‍यावरील व्‍याज मिळणेकरिता तक्रारदारांनी प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे.  तक्रारदारांनी जाबदार यांचेकडे अनेकवेळा हेलपाटे मारुन ठेव रकमेची तोंडी मागणी केली. परंतु जाबदार यांनी वर नमूद रकमा देण्यास टाळाटाळ केली आहे.  अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देणेमध्ये त्रुटी केली आहे.  म्हणून तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.  सबब, तक्रारदाराने याकामी जाबदार यांचेकडून मुदत ठेव व बचत खात्यातील व्‍याजासह होणारी एकूण रक्कम रु. 14,43,780/- व त्यावर रक्कम प्रत्यक्ष वसूल होऊन मिळेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व अर्जाचा खर्च रु. 25,000/- जाबदारकडून मिळावेत अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे.

 

3.    तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत ठेवपावत्यांच्या व बचत खात्याच्या पासबुकाच्या झेरॉक्स प्रती, संचालक मंडळाच्या यादीची प्रत, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. 

4.    जाबदार क्र. 1, 4, 5, 6, 9, 10, 11, 12, 14 यांना नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.  जाबदार क्र. 3, 8, 13 हे याकामी हजर झाले परंतु त्यांनी विहीत मुदतीत म्हणणे दाखल केले नाही. सबब, सदरचे जाबदारांविरुध्द विनाकैफियत आदेश करण्यात आला. जाबदार क्र.2 हे मयत असल्याने तक्रारदारांचे दि. 17/1/24 चे पुरसीसनुसार प्रस्तुत प्रकरणातून वगळणेत आले.

 

5.    जाबदार क्र.7 यांनी याकामी हजर होवून म्हणणे व शपथपत्र दाखल केले आहे.  सदर जाबदार यांचे कथनानुसार, दैनंदिन व्यवहारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही चेअरमन व शाखा व्यवस्थापक यांची होती.  सदरचा अर्ज तक्रारदार यांनी एकत्रितरित्‍या केला आहे.  तक्रारदार यांनी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. बॅंकेचे सर्व व्‍यवहार हे संस्‍थापक, चेअरमन, मॅनेजर हेच पाहत असत.  मॅनेजर यांना याकामी पक्षकार केलेले  नाही. तक्रारदाराच्या ब-याच ठेवपावतींची मुदत संपलेली नाही. सदरच्या पावत्यांची रक्कम परत करण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या कागदपत्रांची पूर्तता तक्रारदारांनी करणे आवश्‍यक आहे. तसेच त्‍यात नमूद केलेल्‍या अटीप्रमाणे दिलेले व्‍याज कापून रक्‍कम परत करण्‍याचे नियम सहकार खात्‍याने पतसंस्थेवर घालून दिले आहेत.  जाबदार क्र.1 संस्‍थेचे कामकाज जाबदार क्र.2 हेच पहात होते.  त्‍यामध्‍ये सामनेवाला क्र.7 यांचा कोठेही संबंध नव्‍हता.  सदरचे जाबदार हे कित्‍येक महिने संस्‍थेत सभेला गेले नाहीत.  त्‍याला व्‍यवस्‍थापनाबाबत काहीच कल्‍पना नाही. सबब, तक्रारअर्ज जाबदार क्र.7 विरुध्‍द फेटाळणेत यावा अशी मागणी जाबदार क्र.7 यांनी केली आहे. 

 

6.    तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे, तसेच जाबदार क्र.7 यांचे म्हणणे, शपथपत्र तसेच उभय पक्षांचा युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात. 

 

.क्र.

मुद्दे

उत्तरे

1

तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ?

होय.

2

जाबदार यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ?

होय.

3

तक्रारदार जाबदार यांचेकडून ठेव रक्कम व बचत खातेतील रकमा व्याजासह परत मिळणेस पात्र आहे काय ?

होय.

4

अंतिम आदेश काय ?

खालीलप्रमाणे

     

           

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र.1

 

7.         तक्रारदार हा जाबदारांचा ठेवीदार ग्राहक आहे ही वस्‍तुस्थिती तक्रारदाराने दाखल केलेल्या ठेव पावत्‍यांचे प्रतींवरुन शाबीत होते आहे. तक्रारदारांनी जाबदार पतसंस्थेत ठेव ठेवली हे तक्रारदाराचे कथन जाबदारांनी नाकारलेले नाही. त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदारांचे  ग्राहक होतात या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात आले आहे.

 

मुद्दा क्र.2

 

8.    तक्रारदाराचे कथनानुसार, ठेवींची मुदत संपलेनंतर तक्रारदाराने मागणी करुनही जाबदार यांनी त्‍यांना ठेव रक्‍कम व्‍याजासह अदा केलेली नाही.  जाबदार क्र. 1, 3 ते 6 व 8 ते 14 यांनी याकामी हजर होवून सदरची बाब नाकारलेली नाही.  यावरुन जाबदारांना तक्रारदाराची तक्रार त्‍यांना मान्‍य आहे असा निष्‍कर्ष काढणे चुकीचे होणार नाही.  ग्राहकाच्‍या ठेव रकमा मुदतीनंतर व्‍याजासहीत परत करणेचे जाबदार यांचेवर कायदेशीर बंधन आहे.  त्‍याचे पालन जाबदारांनी केलेले नाही.  सबब, जाबदार यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी ठेवली आहे या निष्‍कर्षास हे आयोग येत आहे.

 

9.    जाबदार क्र.7 यांनी आपले म्हणणेमध्ये, दैनंदिन व्यवहारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही चेअरमन व शाखा व्यवस्थापक यांची होती.  बॅंकेचे सर्व व्‍यवहार हे संस्‍थापक, चेअरमन, मॅनेजर हेच पाहत असत.  मॅनेजर यांना याकामी पक्षकार केलेले  नाही. तक्रारदाराच्या ब-याच ठेवपावतींची मुदत संपलेली नाही. सदरच्या पावत्यांची रक्कम परत करण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या कागदपत्रांची पूर्तता तक्रारदारांनी करणे आवश्‍यक आहे. तसेच त्‍यात नमूद केलेल्‍या अटीप्रमाणे दिलेले व्‍याज कापून रक्‍कम परत करण्‍याचे नियम सहकार खात्‍याने पतसंस्थेवर घालून दिले आहेत.  जाबदार क्र.1 संस्‍थेचे कामकाज जाबदार क्र.2 हेच पहात होते.  त्‍यामध्‍ये सामनेवाला क्र.7 यांचा कोठेही संबंध नव्‍हता.  सदरचे जाबदार हे कित्‍येक महिने संस्‍थेत सभेला गेले नाहीत.  त्‍याला व्‍यवस्‍थापनाबाबत काहीच कल्‍पना नाही असे कथन जाबदार क्र.7 यांनी केले आहे.  तथापि जाबदार क्र.7 यांनी केलेली सदरची कथने ही केवळ मोघम स्वरुपाची आहेत.  सदर कथनाचे पुष्‍ठयर्थ जाबदार क्र.7 यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.  सबब, जाबदार क्र.7 यांनी आपली कथने शाबीत केलेली नाहीत असे या आयोगाचे मत आहे.  सबब, जाबदार क्र.7 यांनाही तक्रारदारांच्‍या ठेवपरतीसाठी जबाबदार धरण्‍यात येत आहे.

 

10.       सबब, सदरकामी तक्रारदारांची ठेव रक्कम व बचत खात्यातील रक्कम अदा करण्यास जाबदार क्र.1 संस्था, जाबदार क्र.3 ते 14 हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सदरकामी हे आयोग खालील न्यायनिवाडयाचा आधार घेत आहे.

      Appeal No. A/21/438 dated 11th May 2023

      Namdevrao Mohite

            Vs.

      Sh. Sanjay Shankar Suryawanshi

 

      Held – It is also necessary to mention that personal liability arises only in case of criminal act.  But here, we are dealing a case of deficiency in service on the part of the society and therefore, the appellants who were Directors were collectively and jointly responsible for the acts of the society, unless shown otherwise.  As such, we feel that the line of distinction has to be drawn as we are dealing with the deficiency in service under the Consumer Protection Act.  As such, in view of discussion made, we are of the view that the judgments on which the reliance has been placed by Advocate for the Appellants, will not go to help the case of the appellants and will not be applicable in the peculiar facts of the present case, as here the complainants have not alleged any fraud on the part of the Directors but have alleged deficiency in service.

 

      वरील निवाडा प्रस्तुत प्रकरणास लागू होतो असे या आयोगाचे मत आहे.  वरील निवाडयात मा. राज्य आयोग, मुंबई यांनी नोंदविलेले निरिक्षण विचारात घेता प्रस्तुत प्रकरणात जाबदार क्र.1 संस्‍था व जाबदार संस्थेचे पदाधिकारी जाबदार क्र.3 ते 14 हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या हे तक्रारदारांच्या ठेव रकमा देण्यास जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.

 

11.   जाबदार क्र.2 हे मयत असलेने त्‍यांना या प्रकरणातून वगळण्‍यात आले आहे.

 

मुद्दा क्र.3

 

12.   सबब, तक्रारदार हे खालील कोष्टकात नमूद ठेव रकमा परत मिळणेस पात्र आहेत.  

अ)  तक्रारदार क्र.1 यांचे नावे ठेवलेल्‍या ठेवींचा तपशील

अ.क्र.

पावती क्र.

खाते क्रमांक

ठेव रक्कम रु.

ठेव ठेवलेली तारीख

ठेव संपलेची तारीख

व्याजदर

1

1442

3334

 4,500/-

11/02/2019

12/02/2020

11.5 टक्के

2

1840

3431

11,000/-

19/06/2019

20/06/2020

11.5 टक्के

3

1850

299

50,000/-

01/07/2019

02/07/2020

11.5 टक्के

4

2201

300

50,000/-

01/07/2019

02/07/2020

11.5 टक्के

5

2202

301

25,000/-

01/07/2019

02/07/2020

11.5 टक्के

6

5105

3467

34,000/-

01/10/2019

09/01/2020

10.5 टक्के

7

1852

202

 1,000/-

21/12/2018

21/07/2026

10 टक्के

 

ब)  तक्रारदार क्र.2 यांचे नावे ठेवलेल्‍या ठेवींचा तपशील

अ.क्र.

पावती क्र.

खाते क्रमांक

ठेव रक्कम रु.

ठेव ठेवलेली तारीख

ठेव संपलेची तारीख

व्याजदर

1

3325

5606

15,345/-

01/10/2018

02/10/2019

11.5 टक्के

2

7220

6338

13,424/-

31/07/2017

01/08/2018

11.5 टक्के

3

456

6914

 4,000/-

01/10/2018

02/10/2019

11.5 टक्के

4

457

6915

12,000/-

01/10/2018

02/10/2019

11.5 टक्के

5

489

6944

33,025/-

31/10/2018

01/11/2019

11.5 टक्के

6

243

6579

45,000/-

11/02/2019

12/02/2020

11.5 टक्के

7

1316

7061

 5,500/-

11/02/2019

12/02/2020

11.5 टक्के

8

937

6616

 1,194/-

10/06/2019

11/06/2020

11.5 टक्के

9

2404

7187

19,360/-

03/08/2019

04/08/2020

11.5 टक्के

10

2403

409

63,000/-

03/08/2019

03/08/2021

12 टक्के

11

6604

2826

1,05,000/-

29/09/2018

30/09/2019

11.5 टक्के

12

2230

3229

  16,000/-

29/09/2018

30/09/2019

11.5 टक्के

13

8017

2978

  25,000/-

01/10/2018

02/10/2019

11.5 टक्के

14

2231

3230

   3,000/-

01/10/2018

02/10/2019

11.5 टक्के

15

2232

3231

  25,000/-

01/10/2018

02/10/2019

11.5 टक्के

16

1601

74

  85,000/-

31/10/2018

31/10/2019

11.5 टक्के

17

625

3274

  53,950/-

31/10/2018

01/11/2019

11.5 टक्के

18

624

3273

   2,241/-

31/10/2018

01/11/2019

11.5 टक्के

19

191

96

  35,000/-

14/12/2018

15/12/2019

11.5 टक्के

20

190

95

  40,000/-

14/12/2018

15/12/2019

11.5 टक्के

21

1441

3333

   7,300/-

11/02/2019

12/02/2020

11.5 टक्के

22

396

3094

  34,000/-

11/02/2019

12/02/2020

11.5 टक्के

23

382

3086

  25,000/-

11/02/2019

12/02/2020

11.5 टक्के

24

1440

3332

  27,500/-

11/02/2019

12/02/2020

11.5 टक्के

25

519

81

  12,000/-

09/03/2019

09/03/2020

11.5 टक्के

26

1638

3380

  10,000/-

10/04/2019

11/04/2020

11.5 टक्के

27

2226

3442

   6,000/-

26/07/2019

03/11/2019

10.5 टक्के

28

2239

320

  30,000/-

02/08/2019

03/08/2021

12 टक्के

29

768

70

1,55,000/-

01/09/2019

02/09/2021

12 टक्के

30

648

198

   1,000/-

21/12/2018

21/07/2026

10 टक्के

 

तसेच ज्‍या ठेवींची मुदत संपलेली आहे, त्‍या ठेवींच्‍या मूळ रकमेवर ठेव ठेवले तारखेपासून ठेवीची मुदत संपले तारखेपर्यंत ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने व ठेवीची मुदत संपलेनंतर ते संपूर्ण रक्कम तक्रारदाराला मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  ज्‍या ठेवपावत्‍यांची मुदत अद्याप संपलेली नाही, अशा ठेवपावत्‍यांच्‍या मूळ रकमेवर जाबदार पतसंस्थेच्या नियमाप्रमाणे मुदतपूर्व ठेवपावत्यांवर देय असणारे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  तसेच तक्रारदार हे बचत खाते क्र. 4527, 1084 व 855 वरील शिल्लक रक्कम व सदर रकमेवर तक्रारदारास संपूर्ण रक्कम मिळपावेतो बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणारे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.

 

13.   तसेच जाबदारांनी तक्रारदारास सेवात्रुटी दिलेमुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच या आयोगात तक्रारअर्ज दाखल करावा लागला.  या बाबींचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु. 5,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब आदेश.

 

आदेश

 

  1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
  2. जाबदार क्र.1 संस्‍था व जाबदार क्र. 3 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास ठेवपावती क्र. 1442, 1840, 1850, 2201, 2202, 5105, 3325, 7220, 456, 457, 489, 243, 1316, 937, 2404, 2403, 6604, 2230, 8017, 2231, 2232, 1601, 625, 624, 191, 190, 1441, 396, 382, 1440, 519, 1638, 2226, 2239, 768, 648 वरील मूळ रकमा व सदर ठेवींच्या रकमेवर ठेव ठेवले तारखेपासून ठेवीची मुदत संपले तारखेपर्यंत ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या व्याजदराने व ठेवीची मुदत संपलेनंतर ते संपूर्ण रक्कम तक्रारदाराला मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
  3. जाबदार क्र.1 संस्‍था व जाबदार क्र. 3 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास ठेवपावती क्र. 1852 व 648 वरील मूळ रकमा व सदर ठेवींच्या मूळ रकमेवर मुदतपूर्व ठेवपावतीवर जाबदार संस्थेच्या नियमाप्रमाणे देय होणारे व्याज अदा करावे.
  4. जाबदार क्र.1 संस्‍था व जाबदार क्र. 3 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास बचत खाते क्र. 4527, 1084 व 855 वरील शिल्लक रक्कम व सदर रकमेवर तक्रारदारास संपूर्ण रक्कम मिळपावेतो बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणारे व्याज अदा करावे.
  5. जाबदार क्र.1 संस्‍था व जाबदार क्र. 3 ते 14 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अदा करावेत.
  6. सदर आदेशाचे अनुपालन जाबदार यांनी निकालाची प्रत मिळालेपासून 45 दिवसांचे आत करावे.
  7. जाबदार यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा, 2019 मधील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
  8. सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.

 

 
 
[HON'BLE MRS. BHARATI S. SOLAWANDE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. ROHINI B. JADHAV]
MEMBER
 
 
[HON'BLE MS. MANISHA H. REPE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.