जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 79/2021. आदेश दिनांक : 12/08/2022.
श्रीमती राधाबाई भ्र. श्रावण धुमाळ, वय 41 वर्षे, व्यवसाय : शेती
व घरकाम, रा. मांजरी, पो. चिखुर्डा, ता. जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) महाव्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, 321/ए/2,
ओसवाल बंधु समाज बिल्डींग, जे.एन. रोड, हॉटेल सेवन लव्हज्
समोर, एच.डी.एफ.सी. बँकेशेजारी, पुणे - 411 042.
(2) व्यवस्थापक, जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लिमिटेड,
मुख्य कार्यालय, दुसरा मजला, जयका बिल्डींग, कमर्शिअल
रोड, सिव्हील लाईन्स्, नागपूर - 440 001.
(3) व्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.,
सुभाष चौक, लातूर, ता. जि. लातूर.
(4) तालुका कृषि अधिकारी, कृषि कार्यालय,
औसा रोड, लातूर, ता. जि. लातूर.
(5) जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय,
प्रशासकीय इमारत, लातूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- उमाकांत बी. देशपांडे (मांजरीकर)
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांच्या पतीच्या अपघाती मृत्यूनंतर गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दाखल केलेल्या विमा दाव्याची रक्कम देण्यास विरुध्द पक्ष यांनी टाळाटाळ करुन सेवेमध्ये त्रुटी केल्यामुळे अनुतोष मिळण्यासाठी तक्रारकर्ती यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रार दाखल करुन घेऊन विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्यात आले. परंतु उचित संधी प्राप्त होऊनही तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणीसंबंधी आवश्यक पूर्तता केलेली नाही. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. तक्रारकर्ती व त्यांचे विधिज्ञ मागील अनेक तारखांपासून सातत्याने अनुपस्थित आहेत. तक्रारकर्ती यांना ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने स्वारस्य दिसून येत नाही. ग्राहक तक्रारींचे कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त अनुषंगाने तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-