Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/12/159

श्री.हरी उरकुडाजी डायरे - Complainant(s)

Versus

महादेव लॅन्‍ड डेव्‍हलपर्स प्रोप्रा.श्री.चेतन चिंधुजी झाडे - Opp.Party(s)

डी.आर.भेदरे

13 Aug 2013

ORDER


importMaharashtra Nagpur
Complaint Case No. CC/12/159
1. श्री.हरी उरकुडाजी डायरेमु.पो.पारशिवनीनागपूरमहाराष्‍ट्र ...........Appellant(s)

Versus.
1. महादेव लॅन्‍ड डेव्‍हलपर्स प्रोप्रा.श्री.चेतन चिंधुजी झाडेरा.जुनी पारडी,भंडारा रोड नागपूरनागपूरमहाराष्‍ट्र ...........Respondent(s)



BEFORE:
HON'ABLE MR. Amogh Shyamkant Kaloti ,PRESIDENTHON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde ,MEMBER
PRESENT :डी.आर.भेदरे, Advocate for Complainant

Dated : 13 Aug 2013
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

( आदेश पारित द्वारा- श्री नितीन घरडे, मा.सदस्‍य


 

- आदेश -


 

(पारित दिनांक – 13 ऑगस्‍ट 2013)


 

 


 

1.     तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.


 

 2.               तक्रारकर्त्‍याचे कथन थोडक्‍यात येणेप्रमाणे 


 

तक्रारकर्त्‍याने  दिनांक 05/12/2011 रोजी विरुध्‍द पक्षाचे मौजा पारशिवनी


 

ले-आऊट प.ह.नं.11, शेत क्रं.114, मधील भुखंड क्रं.13 एकुण आराजी 1760.00


 

चौ.फुट रुपये 2,20,000/-मध्‍ये विकत घेण्‍याचा विरुध्‍द पक्षासोबत करारनामा


 

केला. सदर करारनाम्‍याचे वेळी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास रुपये 1,65,000/-


 

अग्रीम म्‍हणुन दिले. उर्वरित रक्‍कम विक्रीपत्राचे वेळी देण्‍याचे उभयपक्षात ठरले


 

होते. बयाणापत्रानुसार विक्रीपत्र करुन देण्‍याची मुदत दिनांक 20/1/2011 ते


 

02/9/2011 ठरली होती. तथापी विरुध्‍द पक्षाने दिलेल्‍या मुदतीत उर्वरित रक्‍कम


 

स्विकारुन विक्रीपत्र करुन दिले नाही. म्‍हणुन तक्रारकर्त्‍याने 03/11/2012


 

रोजी विरुध्‍द पक्षास वकीलामार्फत कायदेशीर नोटीस बजावली. सदर नोटीसला


 

विरुध्‍द पक्षाने कोणताही प्रतीसाद दिला नाही म्‍हणुन तक्रारकर्त्‍याने


 

दिनांक 15/12/2012 रोजी मंचासमक्ष तक्रार दाखल करुन खालील प्रमाणे मागणी


 

केली आहे.


 

तक्रारकर्तीची प्रार्थना-


 

1.     विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन उर्वरित रक्‍कम रुपये 55,000/- स्विकारुन विरुध्‍द पक्षाचे भुखंड क्रं.13, मौजा पारशिवनी,प.ह.नं.11, शेत क्रं.114, एकुण आराजी 1760चौ.फुट चे विक्रीपत्र नोंदवुन द्यावे.


 

2.    तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मानसिक, शारिरीक त्रासापोटी व आर्थिक नुकसान भरपाई म्‍हणून रु.50,000/- मिळावे.


 

3)    तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/- मिळावे.


 

किंवा


 

1)    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याकडुन वर नमुद भुखंडाचे पोटी घेतलेली रक्‍कम रुपये 1,65,000/- द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह परत मिळावी. अशी प्रार्थना केली.


 

 


 

3.    सदर तक्रारीचे अनुषंगाने, मंचाद्वारे सदर प्रकरणात विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठविण्‍यात आली. नोटीस प्राप्‍त होवुनही विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष उपस्थीत झाले नाही अथवा त्‍यांनी आपला लेखी जवाब प्रकरणात दाखल केला नाही म्‍हणुन त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 12/2/2013 रोजी मंचाने पारित केला.  


 

//*// कारण मिमांसा //*//


 

4.    तक्रारकर्त्‍याचे वकीलांनी तक्रार निकालाकरिता ठेवली असता दिनांक 29/6/13 रोजी तक्रारकर्त्‍याचे वकीलांनी दुरुस्‍तीचा अर्ज करुन प्रार्थनमध्‍ये अधिकची प्रार्थना करावयची असल्‍याचे नमुद केले. सदर अर्ज मंचाने मंजूर केला व प्रकरण दुरुस्‍तीकरिता ठेवण्‍यात आले. आदेशाप्रमाणे तक्रारकर्त्‍याने तक्रारीत दुरुस्‍ती केली.


 

5.    तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्तिवाद यांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन भुखंड विकत घेण्‍यासंबंधी दिनांक 05/12/2011 रोजी करारनामा केला होता. करारनाम्यानुसार तक्रारकर्त्‍याने रुपये 1,65,000/- विरुध्‍द पक्षास अग्रीम म्‍हणुन दिलेले आहेत. पुढे तक्रारकर्त्‍याने उर्वरित रक्‍कम स्विकारुन भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्‍याबाबत विचारणा केली असता विरुध्‍द पक्षाने टाळाटाळ केली म्‍हणुन तक्रारकर्त्‍याने दिनांक 03/11/2012 रोजी विरुध्‍द पक्षास कायदेशीर नोटीस दिली. परंतु विरुध्‍द पक्षाने त्‍यास उत्तर दिले नाही व विक्रीपत्र देखील नोंदवुन दिले नाही. विरुध्‍द पक्षाची सदरची कृती ही सेवेतील कमतरता आहे. करिता हे मंच पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे. 


 

 


 

- आदेश   -


 

1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.


 

2)    विरुध्‍द पक्ष ला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीकडून भुखंडाचेपोटी घेतलेली रक्‍कम रुपये 1,65,000/-, ही द.सा.द.शे. 10 टक्‍के व्‍याजासह तक्रार दाखल दिनांक 15/12/2012 पासुन रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपावेतो परत करावी.


 

3)    विरुध्‍द पक्ष ने तक्रारकर्त्‍याला मानसिक, शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून     रु.5000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.2000/-, याप्रमाणे एकूण रुपये 7000/- (रुपये सात हजार फक्‍त) एवढी रक्‍कम द्यावी.


 

4)    सदर आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्षाने आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.


 

      5)    सदर आदेशाच्‍या प्रती उभयपक्षकारांना नि:शुल्‍क देण्‍यात याव्‍या.

[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde] MEMBER[HON'ABLE MR. Amogh Shyamkant Kaloti] PRESIDENT