Maharashtra

Pune

CC/12/304

निर्मल कुमार - Complainant(s)

Versus

मण्‍डल रेल प्रबन्‍धक - Opp.Party(s)

-

30 Jun 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/12/304
 
1. निर्मल कुमार
८,अनिल अपार्टमेंट,अनिल नवार,रेल्‍वे फिल्‍टरहाऊस के सामन, भुसावल, जिला जलगांव-४२५२०१
...........Complainant(s)
Versus
1. मण्‍डल रेल प्रबन्‍धक
पुणे डिवीजन, मध्‍य रेल,पुणे-४११००१
2. निदेशक, स्‍थापना (क्‍वार्टर सॅक्‍शन)
रेल्‍वे बोर्ड, रेल मन्‍त्रालय, भारत सरकार, नई दिल्‍ली.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्रीमती, अंजली देशमुख, मा. अध्‍यक्ष यांचेनुसार
                                                :- निशाणी 1 खाली आदेश :-
                               30 जून 2012
1.           तक्रारदारांनी प्रस्‍तूतची तक्रार पोस्‍टानी पाठविली आहे. तक्रार दाखल करते वेळेसच निकाली काढण्‍यात येत आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार ते रेल्‍वे प्रशासनाचे कर्मचारी आहेत. त्‍यांची बदली झाल्‍यानंतर बदली झालेल्‍या ठिकाणी जाण्‍यापुर्वी ते ज्‍या क्‍वार्टर मध्‍ये आधी रहात होते तेथील क्‍वार्टरच्‍या घरभाडयावर अधिकाचा दंड आकारण्‍यात येऊ नये असा रेल्‍वे प्रशासनचा नियम असतांना देखील जाबदेणार यांनी दरमहा रुपये 4312/- ही रक्‍कम वेतनातून वजावट केली. म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदारांनी शपथपत्र दाखल केले.
2.          तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदार हे रेल्‍वे कर्मचारी असून त्‍यांना राहण्‍यासाठी रेल्‍वे प्रशासन क्‍वार्टरची सोई करते. बदली झाल्‍यानंतर क्‍वार्टर रिकामे करुन दयावे लागते. ग्राहक संरक्षण कायदयानुसार तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार आणि जाबदेणार यांच्‍यात ग्राहक आणि सेवा देणारे असे नातेसंबंध होत नाही, म्‍हणून प्रस्‍तूत वाद ग्राहक वाद नाही असे मंचाचे मत आहे. म्‍हणून तक्रार दाखल करते वेळेसच तक्रार नामंजुर करण्‍यात येत आहे.
3.          तक्रारीचा मुळ संच सोडून उर्वरित संच तक्रारदारांना परत करण्‍यात यावेत.
 
            आदेशाची प्रत तक्रारदारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.