निकालपत्र
(दि.15.07.2015)
(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
1. अर्जदार ही मयत विजयकुमार मुंडकर यांची आई आहे. गैरअर्जदार क्र. 2 रेणुका विजयकुमार मुंडकर ही मयत विजयकुमार यांची पत्नी असून गैरअर्जदार क्र. 3 ही मयत विजयकुमार यांची मुलगी आहे. मयत विजयकुमार यांनी हयातीत असतांना गैरअर्जदार क्र. 1 कडून जिवन सरल या प्रकारातील दोन पॉलिसी प्रत्येकी रक्कम रु.1,25,000/- च्या घेतल्या होत्या. दुर्दैवाने दिनांक 07.01.2013 रोजी विजयकुमार मुंडकर यांचा मृत्यु झाला. सदर मृत्यु हा विमा कालावधीत झाला. हिंदू वारस कायद्यानुसार अर्जदार व गैरअर्जदार क्र. 2 व 3 हे सर्व मयत विजयकुमार यांचे वारस आहेत. म्हणून विमा पॉलिसीतील करारानुसार विमा पॉलिसीचे सर्व लाभ घेण्याचा हक्क या तिघांना आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचे कार्यालयात जाऊन विनंती केली असता गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे विनंतीकडे दुर्लक्ष केले गैरअर्जदार क्र. 2 यांनी हिला एकटीला विम्याची रक्कम दिली अशी माहिती दिनांक 26.06.2014 च्या पत्रान्वये गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास कळविली. हिंदू वारस कायद्यानुसार अर्जदार ही मयत विजयकुमार यांची वर्ग 1 ची वारस आहे. त्यामुळे विमा पॉलिसीचे लाभाचे रक्कमेतील 1/3 हिस्सा अर्जदारास घेण्याचा हक्क आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास विमा लाभ रक्कमेतील 1/3 रक्कम न देऊन सेवेत कमतरता दिलेली आहे. त्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून एल.आय.सी. विमा क्रमांक 987707571 आणि पॉलिसी क्रमांक 987708409 मधील विमा लाभाची रक्कम पैकी 1/3 हिश्याची रक्कम अर्जदारास व्याजासहीत द्यावी. तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासाबद्दल रक्कम रु. 25,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- देण्याचा आदेश करावा अशी मागणी तक्रारीद्वारे अर्जदार यांनी केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार क्र. 1 यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
4. अर्जदारास तक्रार दाखल करणेसाठी कोणतेही कारण घडलेले नाही. अर्जदाराला जर वारसाबद्दल उजर असेल तर तीने याबाबतचा वाद मा.दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर,नांदेड येथे दाखल करणे इष्ट होते. मयत विजयकुमार यांनी त्यांची पत्नी रेणुका उर्फ पदमीनी हीचे नाव नॉमिनी म्हणून दिलेले असल्याने विजयकुमार मुंडकर यांचे मृत्यु प्रश्चात रेणुका हीस इंशुरन्स कायद्याच्या कलम 39 या तरतुदच्या अधिन राहून वादातीत पॉलिसीची रक्कम दिलेली आहे. त्यामुळे अर्जदार ही मयत विजयकुमार यांची वारस आहे व विमा पॉलिसीतील सर्व लाभ घेण्याचा तीला सु्द्धा हक्क आहे ही बाब अत्यंत चुकीची आहे व कायद्याच्या विपरीत आहे. त्यामुळे अर्जदाराचा अर्ज खारीज करावा अशी विनंती गैरअर्जदार क्र. 1 यांनी लेखी जबाबाव्दारे केलेली आहे.
गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस प्राप्त होऊनही तक्रारीमध्ये हजर झालेले नाहीत.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
6. गैरअर्जदार क्र. 1 यांनी दाखल केलेल्या मयत विजयकुमार यांनी घेतलेल्या विमा पॉलिसीचे अवलोकन केले असता विमा पॉलिसी मध्ये नॉमिनी म्हणून सौ.रेणुका,पत्नी हीचे नाव अंतर्भूत केलेले आहे. पॉलिसीमध्ये नॉमिनी म्हणून मयताची पत्नी रेणुका हीचे नाव असल्यामुळे इंशुरन्स कायद्याच्या कलम 39 नुसार गैरअर्जदार क्र. 1 ,विमा कंपनीने विमाधारकाच्या मृत्यु नंतर नॉमिनी रेणुका हीस विमा पॉलिसीची रक्कम दिलेली असल्याचे क्लेम पेमेंट पत्र दाखल केलेले आहे. वरील कागदपत्रांवरुन विमा कंपनीने कायद्याच्या तरतुदीच्या अधीन राहून पॉलिसीतील नॉमिनीस रक्कम दिलेली आहे ही बाब सेवेतील त्रुटी ठरत नाही. अर्जदार हीचे नाव नॉमिनी म्हणून विमा पॉलिसीत अंतर्भूत नसल्याने अर्जदारास देण्याचा प्रश्नच उदभवत नाही.
त्यामुळे मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.