Maharashtra

Latur

CC/94/2019

महादेव काशिनाथ सावळे - Complainant(s)

Versus

ब्रॅन्च मॅनेजर/चेअरमन, चोलामंडलम एम. एस. जनरल इंश्युरंस कं. लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड. बावणे ए.एस.

21 Jun 2024

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/94/2019
( Date of Filing : 26 Apr 2019 )
 
1. महादेव काशिनाथ सावळे
d
...........Complainant(s)
Versus
1. ब्रॅन्च मॅनेजर/चेअरमन, चोलामंडलम एम. एस. जनरल इंश्युरंस कं. लि.
d
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Amol B. Giram PRESIDENT
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 21 Jun 2024
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 94/2019.                                 तक्रार नोंदणी दिनांक : 25/04/2019.

                                                                                         तक्रार दाखल दिनांक : 06/05/2019.                                                                                       तक्रार निर्णय दिनांक : 21/06/2024.

                                                                                        कालावधी :  05 वर्षे 01 महिने 27 दिवस

 

महादेव काशिनाथ साबळे (मयत) यांचे कायदेशीर वारस :-

(1) नेहा पती महादेव साबळे, वय 36 वर्षे, व्यवसाय : घरकाम.

(2) प्रिती पिता महादेव साबळे, वय 17 वर्षे, व्यवसाय : शिक्षण.

(3) आरती पिता महादेव साबळे, वय 16 वर्षे, व्यवसाय : शिक्षण.

(4) स्नेहा पिता महादेव साबळे, वय 14 वर्षे, व्यवसाय : शिक्षण.

(5) सम्राट पिता महादेव साबळे, वय 10 वर्षे, व्यवसाय : शिक्षण.

(6) सुभाबाई पती काशिनाथ साबळे, वय 63 वर्षे, व्यवसाय : घरकाम,

     सर्व रा. अवंती नगर, लातूर.                                                                :-         तक्रारकर्ते

 

                        विरुध्द

 

(1) ब्रँच मॅनेजर / चेअरमन, चोलामंडलम् एम.एस. जनरल इन्शुरन्स

     कंपनी लिमिटेड, सोलापूर ब्रँच ऑफीस, मालिनी बिल्डींग,

     ब्लॉक नं. 4, विश्राम नगर, होटगी रोड, सोलापूर.

(2) ब्रँच मॅनेजर / चेअरमन, चोलामंडलम् एम.एस. जनरल इन्शुरन्स

     कंपनी लिमिटेड, लातूर एम. एच. 2.                                                    :-         विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :          श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष

                        श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ते यांचेकरिता विधिज्ञ :-  ए. एस्. बावणे

विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :-  सुरेश जी. डोईजोडे

 

आदेश 

श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

(1)       महादेव काशिनाथ साबळे यांनी प्रस्तुत ग्राहक तक्रार दाखल केलेली होती आणि ग्राहक तक्रार प्रलंबीत असताना दि.18/6/2021 रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर महादेव काशिनाथ साबळे यांच्या वारसांची नोंद प्रकरणामध्ये करण्यात येऊन ग्राहक तक्रारीमध्ये त्यांना "तक्रारकर्ते" नात्याने समाविष्ट करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने यापुढे महादेव काशिनाथ साबळे यांना 'मयत महादेव', त्यांच्या वारसांना 'तक्रारकर्ते' व विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना 'विमा कंपनी' असे संबोधण्यात येत आहे. 

(2)       ग्राहक तक्रारीचा आशय असा की, मयत महादेव यांनी त्यांच्या आयशर टेम्पो क्र. एम.एच. 24 एफ. 9978 (यापुढे "विमा संरक्षीत वाहन") करिता दि.22/11/2018 ते 21/11/2019 कालावधीकरिता विमा कंपनीकडून विमा संरक्षण घेतलेले होते. विमा संरक्षीत वाहनाचा विमापत्र क्रमांक 3379/02193401/000/00 आहे. दि.1/12/2018 रोजी चालक किशोर बाळासाहेब कांबळे व हमाल नामदेव मोहन बनसोडे हे विमा संरक्षीत वाहनातून अंबाजोगाई येथून लातूरकडे परत येत असताना त्यांच्या थांबलेल्या विमा संरक्षीत वाहनास ट्रॅव्हल्सने धडक दिली आणि अपघातामध्ये विमा संरक्षीत वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघाताबद्दल ट्रॅव्हल्सच्या चालकाविरुध्द पोलीस ठाणे, रेणापूर येथे गुन्हा क्र. 412/2018 नोंद करण्यात आला.

(3)       ग्राहक तक्रारीमध्ये पुढे असे नमूद करण्यात आलेले आहे की, मयत महादेव यांनी विमा संरक्षीत वाहन दुरुस्तीकरिता गजराज मोटर्स, रिंग रोड, लातूर येथे आणले आणि त्यांना दुरुस्तीकरिता रु.10,04,543/- चे अंदापत्रक देण्यात आले. मयत महादेव यांच्या अर्जानुसार विमा कंपनीद्वारे नियुक्त केलेल्या सर्वेक्षक उमेशकुमार शिवप्रसाद विश्वकर्मा यांनी अपघातग्रस्त विमा संरक्षीत वाहनाची पाहणी केली आणि नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. परंतु विमा कंपनीने दि.2/1/2019 रोजी चालक बदलल्याचे कारण देऊन विमा दावा नामंजूर करणारे पत्र पाठविले. 

(4)       ग्राहक तक्रारीमध्ये पुढे असे नमूद करण्यात आलेले आहे की, मयत महादेव यांनी कोणत्याही अटीचा भंग केलेला नसताना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले. सेवेमध्ये त्रुटी व फसवणूक केल्याबद्दल विमा कंपनीस सूचनापत्र पाठविले असता दखल घेतलेली नाही. उक्त कथनांच्या अनुषंगाने रु.10,04,543.26 विमा रक्कम; शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाकरिता रु.50,000/- नुकसान भरपाई व ग्राहक तक्रार खर्च रु.10,000/- अशी एकूण रु.10,64,543.26 व्याजासह देण्याचा विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती केलेली आहे.

(5)       विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने खोटे असल्याचे नमूद करुन अमान्य केलेले आहेत. त्यांचे कथन असे की, मयत महादेव यांनी विमा संरक्षीत वाहनाच्या नुकसानीबद्दल दावा प्रपत्र दाखल करताना त्यामध्ये अपघातसमयी नामदेव बनसोडे हे विमा संरक्षीत वाहन चालवत असल्याचे नमूद केलेले आहे. परंतु नामदेव बनसोडे यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे त्यांनी वाहन चालवत असल्याबद्दल किशोर कांबळे यांचे नांव नमूद केले. अपघातामध्ये नामदेव बनसोडे हे जखमी झालेले आहेत. विमा कंपनीने प्रकरणाची चौकशी करण्यासाठी टेक्नोटेक डिटेक्टीव्ह सर्व्हीसेस यांची नियुक्ती केली आणि त्यांच्याकडून प्राप्त अहवालामध्ये अपघातसमयी नामदेव बनसोडे हे विमा संरक्षीत वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले. मयत महादेव यांनी किशोर कांबळे यांचे नांव चालक म्हणून समाविष्ठ केले आणि चूक माहिती दिलेली आहे. विमा कंपनीने विमा संरक्षीत वाहनाच्या नुकसान भरपाईसंदर्भात सर्वेक्षक उमाशंकर शिवप्रसाद विश्वकर्मा यांची नियुक्ती केलेली असून सर्वेक्षण अहवालामध्ये अपघातसमयी नामदेव मोहन बनसोडे हे विमा संरक्षीत वाहन चालवत असल्याचे नमूद आहे. विमाधारक महादेव यांनी विमा कंपनीस अपघाताची माहिती देत असताना चालकाचे चूक नांव सांगितल्यामुळे विमापत्राच्या अटी  व शर्तींचा भंग झाल्यामुळे विमा दावा नामंजूर करण्यात आला. अंतिमत: विमा कंपनीच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.

(6)       ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्‍यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्‍यात येतात आणि त्‍या मुद्दयांची कारणमीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

                       

मुद्दे                                                                                              उत्तर

(1) विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्‍ये त्रुटी

      केल्‍याचे सिध्‍द होते काय ?                                                                                होय

(2) मुद्दा क्र.1 च्‍या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय  ?                     होय

     असल्‍यास किती ?                                                                                  अंतिम आदेशाप्रमाणे

(3) काय आदेश  ?                                                                                     अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

 

(7)       मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे विवेचन संयुक्तपणे करण्यात येते. विमा संरक्षीत वाहनास घेतलेले विमापत्र अभिलेखावर दाखल केलेले असून विमापत्राबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आढळते. प्रामुख्याने, अपघातसमयी चालकाकडे कार्यक्षम वाहन चालविण्याचा परवाना नव्हता आणि मयत महादेव यांनी तथ्यांचे अपवेदन केल्यामुळे; तसेच अट क्र. 9 चे उल्लंघन झाल्यामुळे विमा कंपनीने विमा दावा रक्कम देण्यास असमर्थता दर्शविल्‍याचे दिसून येते. अशा स्थितीत, विमा कालावधीमध्ये झालेला अपघात, दाखल केलेला विमा दावा व विमा रक्कम देण्याचे अमान्य केलेले दायित्व इ. बाबीबद्दल मान्यस्थिती ठरते.

(8)       विमा कंपनीचा युक्तिवाद असा की, वाहन दावा सूचना प्रपत्रामध्ये अपघातसमयी वाहन चालकाचे नांव नामदेव मोहन बनसोडे नमूद केलेले होते आणि नामदेव बनसोडे यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. त्यानंतर विमा संरक्षीत वाहन चालवत असल्याबद्दल किशोर कांबळे यांचे नांव नमूद केले. टेक्नोटेक डिटेक्टीव्ह सर्व्हीसेस यांच्या चौकशी अहवालामध्ये अपघातसमयी नामदेव बनसोडे हे विमा संरक्षीत वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले आणि चालकाचे चूक नांव सांगितल्यामुळे विमापत्राच्या अटी  व शर्तींचा भंग झाल्यामुळे विमा दावा नामंजूर केल्यासंबंधी युक्तिवाद विमा कंपनीतर्फे करण्यात आला. उलटपक्षी, तक्रारकर्ते यांच्यातर्फे वाहन दावा सूचना प्रपत्राचे खंडन करण्यात येऊन त्या प्रपत्रावर त्यांची स्वाक्षरी नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.

(9)       विमा संरक्षीत वाहनाच्या अपघातानंतर दाव्याच्या अनुषंगाने विमा कंपनीने नियुक्त केलेल्या टेक्नोट्रॅक डिटेक्टीव्ह सर्व्हीसेस - दिपक कुलकर्णी यांचा अन्वेषण अहवाल अभिलेखावर दाखल आहे. अहवालामध्ये नमूद केलेल्या निरीक्षणानुसार विमा संरक्षीत वाहन रस्त्यावर धावत असताना अपघात झाला आणि त्यावेळी नामदेव बनसोडे हे वाहन चालवत होते. मयत महादेव यांनी श्री. किशोर कांबळे यांना वाहन चालवत असल्याचे नमूद करुन त्यांचे नांव गोवले आहे. वस्तुत: नामदेव बनसोडे यांच्याकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता, असे नमूद आहे.

(10)     उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद, युक्तिवाद व कागदपत्रांची दखल घेतली असता प्रथम खबर अहवालामध्ये थांबलेल्या विमा संरक्षीत वाहनास अन्य ट्रॅव्हल्सने धडक दिल्यामुळे विमा संरक्षीत वाहनामध्ये बसलेले नामदेव मोहन बनसोडे जखमी झाल्याचा उल्लेख आढळतो. तसेच ट्रॅव्हल्स चालक इस्माईल नजीर पठाण यांचा पोलीस जबाब पाहता रस्त्यावर डाव्या बाजूस थांबलेल्या टेम्पोचा अंदाज न आल्यामुळे टेम्पोला समोरुन धडक दिल्यामुळे दोन्ही गाड्यांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे.

(11)     विमा कंपनीने ज्या टेक्नोट्रॅक डिटेक्टीव्ह सर्व्हीसेस यांचा अन्वेषण अहवाल दाखल केला, त्यापृष्ठयर्थ संबंधीतांचे घेतलेले जबाब, पुरक कागदपत्रे व अन्वेषकाचे शपथपत्र दाखल नाही. उलटपक्षी, पोलीस कागदपत्रांची दखल घेतली असता विमा संरक्षीत वाहन हे रस्त्यावर थांबलेल्या स्थितीत असताना अन्य ट्रॅव्हल्स वाहनाने धडक दिल्याचे ग्राह्य धरावे लागेल.

(12)     ज्यावेळी विमा संरक्षीत वाहन हे थांबलेल्या स्थितीत होते आणि ते रस्त्यावर धावत नव्हते, त्यावेळी वाहनामध्ये वाहन चालक असलाच पाहिजे, ही धारणा उचित ठरणार नाही. आमच्या मते, थांबलेल्या विमा संरक्षीत वाहनास अन्य वाहनाने धडक दिल्यानंतर त्या वाहनामध्ये असणारे नामदेव मोहन बनसोडे जखमी झाले. केवळ कथित वाहन दावा सूचना प्रपत्रामध्ये मदेव मोहन बनसोडे यांचे नांव नमूद असल्यामुळे नामदेव मोहन बनसोडे हेच विमा संरक्षीत वाहनाचे चालक होते, हा निष्कर्ष तथ्यहीन ठरतो.

(13)     तक्रारकर्ते यांच्यातर्फे मा. सर्वोच्च न्यायालयाचा "बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. /विरुध्द/ मुकूल अग्रवाल" सिव्हील अपील नं. 1544/2023, निर्णय दि. 20/11/2023 संदर्भ दाखल करण्यात येऊन विमा दाव्यातील विसंगतीच्या कारणास्तव विमा दावा नामंजूर करता येणार नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. ज्यामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदविलेले आहे.

            27. The third ground is that in the claim forms and the accident reported to the police, there are discrepancies about the manner in which the accident happened. The fact that the accident happened is not disputed. As mentioned earlier, it is not the case of the insurer that there was any negligence on the part of the driver of the car. Moreover, it is not the case of the insurer that any of the general or specific exceptions in the policy of insurance apply to this case. Hence, the policy could not have been repudiated on account of alleged discrepancies.

(14)     विमा कंपनीतर्फे अभिलेखावर मा. राष्ट्रीय आयोगाच्या "दिलावर खान /विरुध्द/ न्यू इंडिया अश्युरन्स कं. लि." रिव्हीजन पिटीशन नं. 2741/2008, निर्णय दि. 17/11/2017 व "पुरुषोत्तम दास सोनी /विरुध्द/ नॅशनल इन्शुरन्स कं. लि." रिव्हीजन पिटीशन नं. 2941/2016, निर्णय दि. 1/12/2016 या न्यायनिर्णयांचा संदर्भ सादर केला. त्यांचे सुक्ष्म अवलोकन केले असता त्यामध्ये नमूद तथ्ये व प्रश्न प्रस्तुत प्रकरणाशी सुसंगत नसल्याचे आढळून येते.

(15)     विलंबाने सूचना देण्याबद्दल विमा कंपनीचा प्रतिवाद पाहता मा. सर्वोच्च न्यायालय व मा. राष्ट्रीय आयोगाद्वारे निर्णयीत प्रकरणांमध्ये सत्‍य दावे विलंबाने सूचना दिल्याच्या कारणास्तव नामंजूर करता येत नाहीत, असे न्यायिक तत्व आढळते.

(16)     उक्त विवेचनाअंती विमा संरक्षीत वाहन रस्त्यावर थांबलेले असताना अन्य ट्रॅव्हल्सने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये ट्रॅव्हल्समध्ये बसलेल्या नामदेव मोहन बनसोडे यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता, या तथ्यहीन कारणास्तव विमा दावा नामंजूर करुन विमा कंपनीने सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारकर्ते हे विमा कंपनीकडून विमा संरक्षीत वाहनाकरिता विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरतात, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.

(17)     विमा संरक्षीत वाहन दुरुस्तीकरिता गजराज मोटर्स, लातूर यांनी रु.10,04,543.26 अंदाजपत्रक दिल्याचे नमूद करण्यात येऊन त्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. त्याप्रमाणे दुरुस्ती खर्चाचे अंदाजपत्रक अभिलेखावर दाखल आहे. विमापत्राचे अवलोकन केले असता Insured Declared Value रु.4,00,000/- दिसून येते. निर्विवादपणे, विमापत्र हा संविदेचा प्रकार आहे. विमा जोखीम रक्कम निश्चित करुन विमा हप्ता आकारला असल्यामुळे विमा जोखीम रकमेपेक्षा जास्त मागणी असंयुक्तिक व अनुचित ठरते.

(18)     विमा संरक्षीत वाहनाच्या अपघातानंतर विमा कंपनीने सर्वेक्षकांकडून सर्वेक्षण अहवाल घेतलेला दिसून येतो. त्यानुसार विमा कंपनीवर रु.3,38,016/- दायित्व निश्चित केल्याचे दिसून येते. तक्रारकर्ते यांनी सर्वेक्षण अहवालाचे खंडन केलेले नाही किंवा खंडन करण्यासाठी स्वतंत्र कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. अशा स्थितीत, सर्वेक्षण अहवाल ग्राह्य धरणे न्यायोचित ठरतो आणि तक्रारकर्ते हे विमा कंपनीकडून रु.3,38,016/- मिळण्याकरिता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.

(19)     तक्रारकर्ते यांनी द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने विमा रकमेची मागणी केलेली आहे. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेतली असता विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.2/1/2019 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज देण्याकरिता विमा कंपनीस आदेश करणे न्यायोचित राहील.

(20)     मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- रकमेची मागणी पाहता प्रकरणानुरुप परिस्थितीजन्य गृहीतकाच्या अनुषंगाने नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली पाहिजे, असे जिल्हा आयोगाचे मत आहे. असे दिसते की, विमा रक्कम मिळविण्याकरिता मयत महादेव यांना विमा कंपनीकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्यांना जिल्‍हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. प्रकरणामध्ये तक्रारकर्ते यांना समाविष्ठ व्हावे लागले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्‍ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्‍या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्‍यायप्रविष्‍ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्‍यय होतो आणि तक्रारकर्ते यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्‍वाभाविक आहे. योग्‍य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ते पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.

(21)     उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

ग्राहक तक्रार क्र. 94/2019.

 

आदेश

 

(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्‍यात येते.     

(2) विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना रु.3,38,016/- विमा नुकसान भरपाई द्यावी.

तसेच, विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्ते यांना उक्त रकमेवर दि.2/1/2019 पासून रक्‍कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.     

(3) विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्ते यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.

(4) विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.

 

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)                                                                   (श्री. अमोल बा. गिराम)

             सदस्‍य                                                                                                  अध्यक्ष

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MR. Amol B. Giram]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.