Maharashtra

Ahmednagar

CC/18/257

राजेंद्र भरत कदम - Complainant(s)

Versus

बाकलीवाल टयुटोरिअलस् प्रा.लि. - Opp.Party(s)

एम.एस.काबरा

28 Feb 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/18/257
( Date of Filing : 13 Aug 2018 )
 
1. राजेंद्र भरत कदम
रा. पदमा नगर, पाईपलाईन रोड, सावेडी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. बाकलीवाल टयुटोरिअलस् प्रा.लि.
रजि.ऑफिस- 608, ब्‍लॉक नं.2, लोईड चेंबर, मालधक्‍का, आंबेडकर सांस्‍कृतिक भवन समोर, पुणे- 411 001
पुणे
महाराष्‍ट्र
2. वैभव बाकलीवाल, संचालक,
बाकलीवाल टयुटोरिअल्‍स् प्रा.लि. रजि.ऑफिस-608 ब्‍लॉक नं.2, लोईड चेंबर, मालधक्‍का, आंबेडकर सांस्‍कृतिक भवन समोर, पुणे- 411 001
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:एम.एस.काबरा , Advocate
For the Opp. Party:
Dated : 28 Feb 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

1.   तक्रारकर्ता यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ता हा ग्रामीण भागातील रहिवासी असून सामनेवाला ही शैक्षणिक संस्था आहे. व शैक्षणिक सेवा देणेकरीता सामनेवाला सेवा शुल्‍क आकारतात. अज्ञान पाल्‍य व लाभार्थी  चि.प्रथमेश राजेंद्र कदम करीता पालक पिता व ग्राहक या नात्‍याने सदरची तक्रार दाखल करण्‍यात आलेली आहे. तक्रारकर्ताने पुढे असे कथन केलेले आहे की, नोव्‍हेंबर-2017 मध्‍ये सामनेवाले शैक्षणिक संस्‍थेने तक्रारकर्ताचा पाल्‍य शिक्षण घेत असलेल्‍या अहमदनगर सावेडी भागातील ऑकझीलिएम शाळेतील गेटवर त्‍याचे कॉम्‍प्रहेसिव 2020 टयुटोरिअल बाबत माहिती दिली होती. तसेच विद्यार्थी पात्रता बाबत पडताळणी करीता परीक्षा शाळेत घेण्‍याची तयारी दर्शविली होती. पात्र विद्यार्थ्‍यांना पुणे येथील कॉम्‍प्रहेसिव 2020 टयुटोरिअल करीता प्रवेश दिला जाईल असे आश्‍वासन दिले होते. तक्रारकर्ताने पाल्‍य करीता नमुद सामनेवाले यांचे कॉम्‍प्रहेसिव 2020 टयुटोरिअल करीता परीक्षा शुल्‍क रु.500/- दिनांक 26.11.2017 रोजी अहमदनगर येथे भरले होते. मात्र अहमदनगर येथे कमी विद्यार्थी असल्‍यामुळे पुणे येथे टेस्‍ट होईल असे कळविले म्‍हणुन पुणे येथे टेस्‍ट दिली होती. त्‍यानंतर तक्रारकर्ताचा पाल्‍य टेस्‍टमध्‍ये पात्र ठरल्‍यामुळे कोर्सची सविस्‍तर माहिती अहमदनगर येथे देऊन एकुण शुल्‍क रक्‍कम रुपये 2,85,000/- असेल असे सांगितले. दिनांक 01.01.2018 रोजी सामनेवाले यांनी प्रवेशाकरीता अॅडव्‍हान्‍स शुल्‍क रक्‍कम रु.80,000/- रोख भरणा अहमदनगर येथे स्विकारुन लेखी पावती नं.670 तक्रारकर्तास दिली व जुलै 2018 मध्‍ये क्‍लासेस सुरु होतील असे सांगितले. दुदैवाने तक्रारकर्ताचे वडील व पाल्‍याचे आजोबा श्री.भरत कदम यांना एप्रिल 2018 मध्‍ये ह्दयविकाराचा झटका आल्‍यामुळे औषधोपचारासाठी मोठा खर्च करावा लागला. व त्‍यांचेवर शस्‍त्रक्रिया करावी लागली. त्‍यामुळे तक्रारकर्ताचा शैक्षणिक खर्च करणे शक्‍य नाही, प्रवेश रद्द करा असे तक्रारकर्ताने सामनेवाले यास कळविले. आणि अॅडव्‍हान्‍स शुल्‍क भरणा केलेली रक्‍कम रु.80,000/- परत मिळावेत अशी विनंती 2 मे 2018 रोजी सामनेवाला यांचेकडे केली. सामनेवालानी तक्रारकर्ताला कोणतीही रक्‍कम परत केली नाही. म्‍हणून तक्रारकर्ताने सामनेवाला यांचेकडे दिनांक 2 मे 2018 रोजी लेखी अर्ज दाखल केला. त्‍यानंतर परत ईमेलव्‍दारे स्‍मरणपत्र दिले. परंतु त्‍यावर सामनेवालाने कोणतीही दखल घेतली नाही. म्‍हणून तक्रारकर्ताने अॅड.अतुल गुगळे यांचेमार्फत दिनांक 04.06.2018 रोजी रजि.पोष्‍टाने नोटीस पाठविली आणि अॅडव्‍हान्‍स शुल्‍क रकमेची मागणी केली. नमुद नोटीस सामनेवाला यास मिळाली असताना त्‍यांनी कोणतेही उत्‍तर दिले नाही अथवा अॅडव्‍हान्‍स शुल्‍क रक्‍कम दिली नाही. म्‍हणून तक्रारकर्ताने सामनेवाला यांचेविरुध्‍द सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.

3. तक्रारकर्ताने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाला यांनी तक्रारकर्ताकडून घेतलेली अॅडव्‍हान्‍स शुल्‍क रक्‍कम रुपये 80,000/- व्‍याजासह परत करावी. तक्रारकर्ताला झालेल्‍या शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई तसेच तक्रारीचा खर्च सामनेवालाकडून मिळण्‍याचा आदेश व्‍हावा.

4. तक्रारकर्ताची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्‍याचे आदेश पारीत करण्‍यात आले. सदरहू नोटीस सामनेवाला नं.1 व 2 यांना प्राप्‍त होऊनसुध्‍दा ते प्रकरणात हजर झाले नाही. म्‍हणून दिनांक 01.12.2018 रोजी सामनेवाला क्र.1 व 2 यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचे आदेश पररीत करण्‍यात आला.

5. तक्रारकर्ताने दाखल तक्रार, दस्‍तावेज तसेच तक्रारकर्तातर्फे करण्‍यात आलेल्‍या युक्‍तीवादावरुन सदर तक्रारीत खालील निष्‍कर्षाप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

निष्‍कर्ष

6.  तक्रारकर्ताने त्‍याच्‍या मुलाकरीता सामनेवालाकडे त्‍यांचे शैक्षणिक संस्थेमध्‍ये शैक्षणिक प्रवेशाकरीता शुल्‍क अॅडव्‍हान्स रक्‍कम रु.80,000/- भरले होते. तसेच तक्रारकर्ताला आर्थिक अडचण आल्‍यामुळे सामनेवालाला प्रवेश रद्द करुन त्‍यासंदर्भात अॅडव्‍हान्‍स शुल्‍क रकमेची मागणी केली होती. ही बाब तक्रारकर्ताने निशाणी क्र.7/2 वर दाखल दस्‍तावरुन सिध्‍द होते. तक्रारकर्ता हे सामनेवालाचे    “ ग्राहक ” आहेत असे सिध्‍द होते. तक्रारकर्ताने निशाणी क्र.7 वर दाखल केलेल्‍या अॅडव्‍हान्‍स रक्‍कम मिळणे बाबतचा अर्ज तसेच ईमेलचे पत्र व तक्रारकर्ताने वकीलामार्फत पाठविलेली रजि.नोटीस व रजि.पावतीवरुन सिध्‍द होते की, तक्रारकर्ताने सामनेवालाकडे अॅडव्‍हान्‍स भरलेली रक्‍कम मागण्‍याकरीता विनंती केली. सामनेवालाने तक्रारकर्ताला त्‍यावर कोणतीही दखल घेतली नाही. उलट सामनेवालाने तक्रारकर्ताला पाठ‍विलेल्‍या मेसेजवरुन असे दिसून येते की, सामनेवालाने तक्रारकर्ताला रक्‍कम देण्‍यास नाकारले ही बाब सामनेवालाने तक्रारकर्ताप्रति अनुचित व्‍यवहार प्रथेची अवलंबना दर्शविते व सिध्‍द होते. सामनेवालाने नोटीस प्राप्‍त होऊनसुध्‍दा सामनेवाला हे प्रकरणात हजर झाले नाही व त्‍यांचे बचाव पक्षात त्‍यांची बाजू मंचासमोर मांडली नाही. त्‍याअर्थी तक्रारकर्ताने तक्रारीत सामनेवालाविरुध्‍द लावलेले आरोप सिध्‍द होतात. व सामनेवालाने तक्रारकर्ताप्रति अनुचित व्‍यवहार प्रथेची अवलंबना केली आहे. म्‍हणून खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवालाने तक्रारकर्ताकडून घेतलेले शै‍क्षणिक अॅडव्‍हान्‍स शुल्‍क रक्‍कम रु.80,000/- (रक्‍कम रु.ऐंशी हजार फक्‍त ) तक्रारकर्ताला परत करावे.

3.   सामनेवाला क्र.1 व 2 यांनी व्‍यक्‍तीगत व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्ता यांना झालेल्‍या शारीरीक व मानसिक, आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रुपये.10,000/- (रक्‍कम रु.दहा हजार फक्‍त) व या तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.5,000/- (रक्‍कम रु.पाच हजार फक्‍त) तक्रारकर्ताला द्यावे.

4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला क्र.1 व 2 यांनी व्‍यक्‍तीगत व संयुक्‍तीकरित्‍या  आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

5. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

6. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.