Maharashtra

Bhandara

CC/20/22

अरविंद शोभाराम काठाणे. - Complainant(s)

Versus

फलींद उदाराम बोरकर. शाखा व्‍यवस्‍थापक. बँक ऑफ इंडीया. साकोली - Opp.Party(s)

श्री. डी. एस. कटोर

13 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/20/22
( Date of Filing : 15 Feb 2020 )
 
1. अरविंद शोभाराम काठाणे.
रा. सोनपूरी. ता.साकोली. भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
2. विभागीय व्‍यवस्‍थापक. बँक ऑफ इंडीया
4 माळा. एस.व्हि.पटेल मार्ग. किंग्‍स वे. नागपूर
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. फलींद उदाराम बोरकर. शाखा व्‍यवस्‍थापक. बँक ऑफ इंडीया. साकोली
ता.साकोली.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 13 Aug 2021
Final Order / Judgement

                   (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्‍या)

                                                                                   (पारीत दिनांक- 13 ऑगस्‍ट,  2021)

   

01.  तक्रारकर्त्‍याने  प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष बॅंक ऑफ इंडीया विरुध्‍द कर्ज खात्‍या संबधी दोषपूर्ण सेवा मिळाल्‍याने झालेल्‍या नुकसानीची भरपाई मिळावी  आणि इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

           तक्रारकर्त्‍याचे  तक्रारी प्रमाणे त्‍याने ट्राली क्रमांक-MH-36-G-2069 नगदी स्‍वरुपात भगवान फॅब्रीकेशन वर्क्‍स साकोली यांचे कडून खरेदी केला होता, या करीता त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेच्‍या  शाखे कडून कोणतेही कर्ज उचलले नव्‍हते परंतु असे असताना विरुध्‍दपक्ष बॅंकेनी केवळ व्‍देष बुध्‍दीने  दिनांक-07 मार्च, 2019 रोजी ट्रक सोबत सदर ट्रॉली सुध्‍दा  ताब्‍यात घेतली. त्‍याचा असाही आरोप आहे की, विरुध्‍दपक्ष बॅंकेनी त्‍याचे खात्‍याचा हिशोब खोटेपणाने तयार केल्‍यामुळे त्‍याचे नुकसान केले.

      त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याचे  विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंके मध्‍ये बचत खाते क्रं-922710110002451 असून त्‍याच बरोबर  कर्ज खाते क्रमांक-922777210000004 आणि पिक कर्ज खाते क्रमांक-922776310000011      आहे. त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, त्‍याने  ट्रॅक्‍टर क्रमांक-MH-36-L-3223 करीता विरुध्‍दपक्ष बॅंके कडून एकूण रुपये-5,00,000/- एवढया रकमेचे कर्ज घेतले होते आणि त्‍या कर्ज खात्‍याचा क्रमांक-922777210000004 असा आहे, त्‍याने या कर्ज खात्‍याच्‍या रकमेची बरीचशी परतफेड विरुध्‍दपक्ष बॅंके मध्‍ये केलेली आहे.

       त्‍याने असा आरोप केलेला आहे की, विरुध्‍दपक्ष बॅंकेनी त्‍याचे खात्‍याचा योग्‍य हिशोब न ठेवता चुकीच्‍या नोंदी घेऊन बनावट दस्‍तऐवजाचे आधारे त्‍याचे  कडील ट्राली क्रं-MH-36-G-2069 ही  ट्रॅक्‍टर सोबत ऐन हंगामाचे वेळी  दिनांक-07 मार्च, 2019 रोजी ताब्‍यात घेऊन निघून गेले. या संदर्भात त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, विरुध्‍दपक्ष बॅंकेनी  त्‍याचे कडील ट्रॅक्‍टर व ट्राली जप्‍त केली परंतु या ट्राली बाबत त्‍याने विरुध्‍दपक्ष बॅंके कडून कोणतेही कर्ज घेतलेले नव्‍हते तर सदर ट्राली क्रं-MH-36-G-2069  त्‍याने नगदी स्‍वरुपात विकत घेतली होती. त्‍याने विरुध्‍दपक्ष बॅंकेला दिनांक-19.08.2019 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून ट्राली परत करण्‍याची व प्रतीदिन रुपये-2000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्‍याची मागणी केली परंतु विरुध्‍दपक्ष यांनी नोटीसला उत्‍तर दिले नाही व कोणताही प्रतिसाद दिला नाही. तो विरुध्‍दपक्ष बॅंकेचा ग्राहक असून त्‍याला विरुध्‍दपक्ष बॅंकेनी दोषपूर्ण सेवा दिल्‍यामुळे त्‍याला आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्‍याला दुसरी कडून ऊसाची वाहतुक करण्‍या करीता प्रती दिन रुपये-2000/- प्रमाणे ट्राली भाडयाने घ्‍यावी लागत असल्‍याने 309 दिवसांचे झालेले नुकसान रुपये-6,18,000/- मिळावे तसेच शारिरीक व मानसिक त्रासा करीता रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- या प्रमाणे एकूण रुपये-6,88,000/- नुकसान भरपाई व जप्‍त  केलेली ट्राली विरुघ्‍दपक्षा कडून मिळावी म्‍हणून त्‍याने प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षां विरुध्‍द खालील प्रकारच्‍या मागण्‍या केल्‍यात-

  1. विरुध्‍दपक्ष बॅंके कडून त्‍याला दोषपूर्ण सेवा मिळाल्‍यामुळे त्‍याचे झालेले नुकसान रुपये-6,88,000/- विरुध्‍दपक्षांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेनी त्‍याचे जप्‍त केलेली ट्राली क्रं- MH-36-G-2069 त्‍याला परत करण्‍याचे विरुध्‍दपक्ष बॅंकेला आदेशित व्‍हावे.

 

  1. तक्रारकर्त्‍यास  विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेनी जप्‍त केलेल्‍या   ट्रालीचा ताबा मिळे पर्यंत प्रतीदिवस रुपये-2000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्‍याचे विरुध्‍दपक्षांना आदेशित व्‍हावे. तसेच त्‍याची तक्रार खर्चासह मंजूर करण्‍यात यावी.

 

03.           विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेच्‍या वतीने शाखा व्‍यवस्‍थापक श्री बोरकर यांनी लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरा मध्‍ये तक्रारकर्त्‍याने ट्रॅक्‍टर-ट्राली क्रं- MH-36-G-2069  भगवान फेब्रीकेशन वर्क्‍स साकोली यांचे कडून नगदी स्‍वरुपात खरेदी केली होती हे विधान नामंजूर केले. तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष बॅंके विरुध्‍द केलेले आरोप की, त्‍याचे खात्‍याचा योग्‍य हिशोब न ठेवता खोटेपणाने व आकस बुध्‍दीने त्‍याचे ताब्‍यातील ट्रॅक्‍टर-ट्राली क्रं- MH-36-G-2069  दिनांक-07 मार्च, 2019 रोजी जप्‍त केली  व त्‍यामुळे त्‍याचे आर्थिक नुकसान झाले या बाबी नामंजूर केल्‍यात.  तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेचा ग्राहक असून त्‍याचे बॅंके मध्‍ये कर्ज खाते क्रमांक-922777210000004 तसेच पुर्नगठीत खाते क्रमांक-922776410000003 आणि बचत खाते क्रमांक-922710110002451 असल्‍याची बाब मान्‍य केली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंके मध्‍ये असलेल्‍या कर्ज खात्‍यावर दिनांक-20.12.2012 रोजी रुपये-5,00,000/- कर्ज रकमेची उचल करुन ट्रॅक्‍टर घेतला होता ही बाब मान्‍य केली. तक्रारकर्त्‍याने सदर कर्ज खात्‍या मध्‍ये ब-याचशा रकमेची परतफेड केली होती ही बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्‍याची तक्रार बनावट व खोटी असून त्‍याच्‍या  मागण्‍या नामंजूर केल्‍यात.

      आपले विशेष कथनात विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंके तर्फे  नमुद करण्‍यात आले की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेच्‍या शाखे मध्‍ये दिनांक-25.11.2012 रोजी ट्रॅक्‍टर, ट्राली व कल्‍टीव्‍हेटर खरेदी करण्‍यासाठी रुपये-5,00,000/- व पिक कर्ज रुपये-2,00,000/- असे एकूण रुपये-7,00,000/- कर्जाची मागणी केली होती. त्‍यावेळेचे शाखा व्‍यवस्‍थापक यांनी  दिनांक-19.12.2012 रोजी तक्रारकर्त्‍यास रुपये-7,00,000/- रकमेचे कर्ज मंजूर केले होते, त्‍या संबधात उभय पक्षांमध्‍ये दिनांक-19.12.2012 रोजी करार केला होता व त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने दुय्यम निबंधक, साकोली यांचे कडे दस्‍तऐवज क्रं-901/2012 दिनांक-19.12.2012 रोजी गहाण खत विरुध्‍दपक्ष बॅंकेचे नावे करुन दिले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंके मध्‍ये उपरोक्‍त नमुद केलेले क्रमांकाचे  कर्ज खाते, पिक कर्ज खाते आणि पुर्नगठीत खाते उघडण्‍यात आले होते. तक्रारकर्ता हा नियमित स्‍वरुपात कर्ज रकमेची परतफेड करीत नव्‍हता म्‍हणून कर्जाची रक्‍कम भरण्‍यासाठी त्‍याला विरुध्‍दपक्ष बॅंके तर्फे नोटीस पाठविली होती परंतु तरी सुध्‍दा त्‍याने कर्जाची रक्‍कम भरली नाही म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंके तर्फे तक्रारकर्त्‍याला जप्‍तीची नोटीस देऊन त्‍याचे कडील ट्रॅक्‍टर व ट्राली जप्‍त केला व त्‍या बाबत पेपर मध्‍ये जाहिरनामा प्रसिध्‍द करण्‍यात आला होता. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार व मागण्‍या या नामंजूर करण्‍यात येतात. तक्रारकर्त्‍याची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेला त्‍याने रुपये-2,00,000/- नुकसान भरपाई देण्‍याचे आदेशित होऊन खारीज करण्‍यात यावी अशी विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंके तर्फे करण्‍यात आली.

 

04.  तक्रारकर्त्‍याने ट्राली क्रं- MH-36-G-2069  भगवान फेब्रीकेशन वर्क्‍स साकोली यांचे कडून दिनांक-20.12.2012 रोजी विकत घेतल्‍या बाबतचे बिल तसेच  त्‍याने सदर ट्राली आर.टी.ओ.यांचे कडे नोंदणी केल्‍याचे दस्‍तऐवज, ट्रालीची विमा पॉलिसी, टिचकुले ट्रॅक्‍टर्स, साकोली यांनी वि.प.क्रं 1 बॅंकेला दिलेले पत्र तसेच तक्रारकर्त्‍याचे नावे दिलेले ट्रॅक्‍टरचे  बिल तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष यांना दिलेली कायदेशीर नोटीस अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तसेच तक्रारकर्त्‍याने शपथे वर पुरावा आणि लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

 

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेनी लेखी उत्‍तरा सोबत तक्रारकर्त्‍याने बॅंके मध्‍ये कर्ज मिळण्‍यासाठी केलेला अर्ज, गहाण करार, तक्रारकर्त्‍याचे कर्ज खाते क्रमांक-922777210000004,  पुर्नगठीत खाते क्रमांक-922776410000003 आणि बचत खाते क्रमांक-922710110002451 तसेच खाते क्रमांक-922776310000011 चे खाते उतारे दाखल केले. त्‍याच बरोबर जप्‍तीच्‍या नोटीस, लिलाव्‍याच्‍या नोटीस, गहाण खत दस्‍तऐवज क्रं-901/2012 अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तसेच वि.प.क्रं 1 बॅंके तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक यांनी  शपथे वर पुरावा आणि लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

 

06. प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री डी.एस.कातोरे तर विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंके तर्फे वकील श्री एस.सी.बोरकर यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

    

07.  उभय पक्षां तर्फे  दाखल दस्‍तऐवज, साक्षी पुरावे, लेखी युक्‍तीवाद इ्रत्‍यादीचे   अवलोकन करण्‍यात आले. तसेच उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद  यावरुन  जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

अ.क्रं

मुद्दा

उत्‍तर

01

तक्रारकर्त्‍याची ट्राली क्रं- MH-36-G-2069  विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंके तर्फे जप्‍त करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय   

-नाही-

02

काय आदेश

अंतिम आदेशा नुसार

 

                                                                                                    कारणे व मिमांसा

मुद्दा क्रं 1 व क्रं 2

  08.   या प्रकरणा मध्‍ये संक्षीप्‍त वादाचा मुद्दा असा आहे की, तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍या प्रमाणे त्‍याने  विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंके कडून ट्रॅक्‍टर व पिक कर्ज असे एकूण रुपये-7,00,000/- चे कर्ज रकमेची उचल केली होती. परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेचे म्‍हणण्‍या प्रमाणे तक्रारकर्त्‍याने ट्रॅक्‍टर, ट्राली, अवजारे व पिक यांचे करीता एकूण रुपये-7,00,000/- कर्ज रकमेची मागणी केली  होती व ती त्‍यांनी मंजूर केली होती, परंतु त.क. याने कर्ज रकमेची परतफेड नियमित न केल्‍यामुळे थकीत कर्ज प्रलंबित राहिले त्‍यामुळे त्‍यांनी त.क. याचे कडील ट्रॅक्‍टर व ट्राली जप्‍त केली. त.क. याचे म्‍हणण्‍या प्रमाणे त्‍याने ट्राली ही नगदीने खरेदी केलेली असल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेला त्‍याचे कडील ट्राली जप्‍त करण्‍याचा अधिकार नव्‍हता.

 

09.    प्रकरणातील दाखल दस्‍तऐवजाचे जिल्‍हा आयोगाव्‍दारे अवलोकन केले असता तक्रारकर्ता याने विरुध्‍दपक्ष बॅंके मध्‍ये जो कर्ज मागणीसाठी अर्ज केलेला आहे त्‍यामध्‍ये त्‍याने ट्रॅक्‍टर, ट्राली व अवजारे खरेदीसाठी रुपये-5,00,000/- तसेच पिक कर्ज म्‍हणून रुपये-2,00,000/- ची मागणी केल्‍याचे दिसून येते.  कर्ज करारा मध्‍ये कर्जाचा हेतू हा ट्रॅक्‍टर, ट्राली तसेच शेतीचे अवजारासाठी असे नमुद आहे, त्‍याच प्रमाणे सदर मागणी अर्जा मध्‍ये गहाण म्‍हणून ट्रॅक्‍टर, ट्राली, अवजारे व पिक गहाण ठेवणार असल्‍याचे  दिसून येते. सदर कर्ज करार हा इंग्रजी व हिंदी दोन्‍ही भाषे मध्‍ये नमुद आहे. गहाण खता मध्‍ये सुध्‍दा ट्रॅक्‍टर व ट्राली गहाण केल्‍याचे नमुद केलेले आहे.

 

10.   टीचकुले ट्रॅक्‍टर्स साकोली यांनी विरुध्‍दपक्ष बॅंकेला जे दिनांक-20.12.2012 रोजी जे कोटेशन दिले त्‍यामध्‍ये  त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला ट्रॅक्‍टर, अवजारे पुरविण्‍या बाबत कोटेशन मंजूर झाल्‍याचे नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍या प्रमाणे त्‍याने ट्राली दुसरी कडून मे. भगवान फेब्रीकेशन वर्क्‍स साकोली यांचे कडून नगदीने दिनांक-20.12.2012 रोजी रुपये-1,85,000/- मध्‍ये नगदीने खरेदी केली आणि ती ट्राली दिनांक-30.12.2013 रोजी आर.टी.ओ. यांचेकडे नोंदणी केली असून तिचा नोंदणी क्रं-MH-36-G-2069 असा आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचा वादाचा मुद्दा एवढाच आहे की, त्‍याने ट्राली क्रं-MH-36-G-2069 मे. भगवान फेब्रीकेशन वर्क्‍स साकोली यांचे कडून नगदीने दिनांक-20.12.2012 रोजी रुपये-1,85,000/- मध्‍ये नगदीने खरेदी केलेली असताना विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेनी कोणत्‍या अधिकारा खाली ट्रॅक्‍टर सोबत त्‍याने नगदीने खरेदी केलेली सदर ट्राली जप्‍त केली. जिल्‍हा आयोगाने प्रकरणातील दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्‍याला जे कर्ज मंजूर झाले होते तेच मूळात ट्रॅक्‍टर, ट्राली, अवजारे व पिक यासाठी मंजूर झाले होते तसेच गहाण खता मध्‍ये सुध्‍दा ट्रॅक्‍टर व ट्रालीचा उल्‍लेख आहे. असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं-1 बॅंके कडून जे कर्ज ट्रॅक्‍टर, ट्राली व अवजारे यासाठी उचलले आहे त्‍याची परतफेड नियमित स्‍वरुपात केलेली नाही.

 

11.   असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेनी दिनांक-20/11/2018 रोजीची जी कर्ज थकबाकी रक्‍कम भरण्‍यास नोटीस पाठविली त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याचे  कर्ज खाते क्रमांक-922777210000004 नमुद असून सदर नोटीस प्राप्‍त होताच 15 दिवसांचे आत कर्ज थकबाकीची रक्‍कम रुपये-2,73,209.31 पैसे जमा करावे, जर अशी रक्‍कम जमा करण्‍यास चुकल्‍यास अधिकृत व्‍यक्‍ती कडून मालमत्‍तेची जप्‍ती करुन त्‍याची विक्री करुन त्‍या मधून थकीत रकमेची वसुली करण्‍यात येईल असे नमुद आहे. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेनी दिनांक-20/03/2019 रोजीची नोटीस पाठविली त्‍यामध्‍ये जप्‍त केलेल्‍या व गहाण असलेल्‍या मालमत्‍तेची विक्री करण्‍याचे सुचित केलेले असून विरुध्‍दपक्ष बॅंकेची नोटीस क्रं-SKL/FUB/2018-19 dated-20/11/2018 अन्‍वये कर्ज थकबाकीची रक्‍कम न भरल्‍यास  गहाण मालमत्‍ता जप्‍त करुन व त्‍याची विक्री करुन वसुली करण्‍यात येईल असे कळविले होते परंतु कर्ज थकबाकीची रक्‍कम न भरल्‍यामुळे बॅंके मध्‍ये गहाण असलेली मालमत्‍ता दिनांक-07 मार्च, 2019 रोजी जप्‍त केली, त्‍या संबधाने केलेल्‍या पंचनाम्‍याची प्रत पाठविण्‍यात येत असल्‍याचे नमुद असून नोटीस मध्‍ये  रुपये-3,52,339/- एवढी रक्‍कम नोटीस मिळताच 07 दिवसाचे आत भरुन जप्‍त मालमत्‍तेचा ताबा घ्‍यावा, अन्‍यथा बॅंक सदर मालमत्‍तेची विक्री करेल असे नमुद आहे विरुध्‍दपक्ष बॅंके तर्फे तक्रारकर्त्‍याची ट्रॅक्‍टर व ट्राली विक्री करीता दैनिक लोकसत्‍ता दिनांक-05.05.2019 आणि दैनिक इंडीयन एक्‍सप्रेस दिनांक-05.05.2019 रोजी प्रसिध्‍द केलेल्‍या निविदा सुचनेच्‍या प्रती अभिलेखावर दाखल आहेत.

 

12.  अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष बॅंकेनी कर्ज करारा प्रमाणे तसेच गहाण खता व्‍दारे  गहाण केलेली ट्रॅक्‍टर-ट्राली जप्‍त करण्‍या बाबत योग्‍य त्‍या कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केलेला आहे. तक्रारकर्त्‍याला नोटीस मिळाल्‍या वर त्‍याने प्रलंबित कर्जाची रक्‍कम विरुध्‍दपक्ष बॅंके मध्‍ये भरणे अभिप्रेत होते परंतु तसे त्‍याने केल्‍याचे दिसून येत नाही. तक्रारकर्त्‍याने जरी ट्राली दुसरी कडून नगदीने खरेदी केलेली असली तरी त्‍याने ट्रॅक्‍टर व ट्राली, शेतीचे अवजारे यासाठी कर्ज घेतले होते ही बाब कर्ज करारनाम्‍या वरुन व गहाण खता वरुन दिसून येते. विरुध्‍दपक्ष क्रं 1 बॅंकेनी योग्‍य त्‍या कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करुन त्‍याचे कडील ट्रॅक्‍टर-ट्राली जप्‍त केली. अशा परिस्थितीत ट्रॅक्‍टर व ट्राली तसेच शेती अवजारे विकत घेण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष बॅंके सोबत जो दिनांक-19.12.2012 रोजी कर्ज करार व गहाणखत करुन दिलेले आहे त्‍याचे अनुपालन करणे तक्रारकर्त्‍यावर भारतीय करार कायदया अन्‍वये बंधनकारक आहे परंतु तक्रारकर्ता करारा प्रमाणे वागलेला नसल्‍याने सदर तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे, त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर नकारार्थी देत आहोत. मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर नकारार्थी आल्‍याने  मुद्दा क्रं 2 अनुसार सदरची तक्रार  खारीज करीत आहोत.

13.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                                                                         :: अंतिम आदेश ::

 

  1. तक्रारकर्त्‍याची   तक्रार  विरुध्‍दपक्ष क्रं-1 बॅंक ऑफ इंडीया शाखा  साकोली, जिल्‍हा भंडारा आणि विभागीय कार्यालय, बॅंक ऑफ इंडीया, नागपूर यांचे  विरुध्‍दची खारीज  करण्‍यात येते.

 

  1. खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.

 

(03) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध   करुन देण्‍यात याव्‍यात.

 

(04) उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त फाईल्‍स त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्‍यात.

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.