Maharashtra

Bhandara

CC/20/18

मे. महाविर मेटल वर्क्‍स. - Complainant(s)

Versus

नॅशनल इन्शु कंपनी दृारा शाखा व्यआवस्थापक - Opp.Party(s)

श्री. आर.एस.रामटेके

17 Nov 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/20/18
( Date of Filing : 14 Feb 2020 )
 
1. मे. महाविर मेटल वर्क्‍स.
रा. स्‍टेशन रोड. शिवाजी वार्ड. भंडारा. ४४१९०४
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. नॅशनल इन्शु कंपनी दृारा शाखा व्यआवस्थापक
जि.प. चौक.गुर्जर पेट्रोलपंपाच्‍या मागे. भंडारा . ४४१९०४
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 17 Nov 2022
Final Order / Judgement

                   (पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी. योगी, मा.अध्‍यक्ष )

                         

01.  तक्रारकर्ता यांनी प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019च्‍या  कलम 35 खाली विरुध्‍दपक्ष विमा कंपनी यांचे विरुध्‍द कामगार न्‍यायालय, भंडारा यांचे आदेशा पोटी भरलेली रक्‍कम विम्‍या अंतर्गत मिळण्‍या बाबत जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे

     

   तक्रारकर्ता यांचा मे. महाविर मेटल वर्क्‍स नावाने पितळी भांडे बनविण्‍याचा व्‍यवसाय असून सदर व्‍यवसाया मध्‍ये कार्यरत एकूण 16 कामगारांसाठी त्‍यांनी विरुदपक्ष विमा कंपनी कडे विमा पॉलिसी क्रं-281303411810000006 असून कालावधी दिनांक-07.04.2018 ते दिनांक-06.04.2019 असा आहे. दिनांक-05.11.2018 रोजी अंदाजे दुपारी 3.30 वाजता तक्रारकर्ता यांचे कंपनीतील एक कामगार श्री मनोज शंकर वैद्द यांचे उजव्‍या हाताची तीन बोटे ब्रास  प्रेसींग मशीन मध्‍ये कापल्‍या गेली.

 

   तक्रारकर्ता यांनी पुढे असे नमुद केले की, कामगार न्‍यायालय भंडारा यांनी “Employees Compensation Act” अंतर्गत दाखल झालेले प्रकरण क्रं- WCA (Agrement Application No.-2/2018 (CNR No.-MHLC 36-2018)  मध्‍ये दिनांक-03.12.2018 रोजीचे आदेशा प्रमाणे युको बॅंक, भंडारा यांचा धनादेश क्रं-000191, दिनांक-03.12.2018 अन्‍वये  रक्‍कम रुपये-1,95,696/- शारीरीक अपंगत्‍व आल्‍या  बद्दल कामगार न्‍यायालयात जमा केलेली आहे.

 

    तक्रारकर्ता यांनी पुढे असे नमुद केले की, त्‍यांनी कामगार न्‍यायालयाचे आदेशा नुसार  रक्‍कम कामागारास नुकसान भरपाई म्‍हणून दिलेली आहे. तसेच तक्रारकर्ता यांनी या व्‍यतिरिक्‍त जखमी कामगारावर औषधोपचारासाठी रुपये-30,124/- खर्च केलेले आहे. त्‍यानुसार  तक्रारकर्ता यांनी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला दिनांक-22.01.2019रोजी कायदेशीर नोटीस पाठवून नुकसान भरपाई तसेच औषधोपचाराचे खर्चाची मागणी केलेली आहे तसेच  दिनांक-22.03.2019, 04.07.2019, 26.08.2019, 28.08.2019 अशा तारखांना लेखी अर्ज सुध्‍दा विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडे केलेत परंतु पुर्तता केलेली नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दोषपूर्ण सेवा दिल्‍यामुळे त्‍यांना आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून शेवटी तक्रारकर्ता  प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष  दाखल करुन  त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विरुध्‍द पुढील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

 

1.    तक्रारकर्ता यांनी कामगार न्‍यायालय भंडारा यांचे आदेशा नुसार जमा केलेली रक्‍कम रुपये-1,95,696/- त्‍याच बरोबर जखमी कामगारावर औषधोपचारासाठी केलेला खर्च रुपये-30,124/- अशी एकूण रक्‍कम रुपये-2,25,820/- आणि सदर रकमेवर दिनांक-03.12.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.18 टक्‍के दराने व्‍याज यासह तक्रारकर्ता यांना विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने  रक्‍कम देण्‍याचे आदेशित करावे.

 

 

2.   तक्रारकर्ता यांना  झालेल्‍या शारिरीक  व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- तसेच प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-50,000/- विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

 

         3.     या शिवाय योग्‍य ती दाद त्‍यांचे  बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

 

03.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष लेखी उत्‍तर दाखल केले, त्‍यांनी  तक्रारकर्ता यांचा मे. महाविर मेटल वर्क्‍स नावाने पितळी भांडे बनविण्‍याचा व्‍यवसाय असून सदर व्‍यवसाया मध्‍ये कार्यरत एकूण 16 कामगारांसाठी त्‍यांनी  विरुध्‍दपक्ष विमा कंपनी मध्‍ये विमा पॉलिसी क्रं-281303411810000006 असा असून कालावधी दिनांक-07.04.2018 ते दिनांक-06.04.2019 असा आहे ही बाब मान्‍य केलेली आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी जखमी कामगाराचे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सकांचे अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र सादर करण्‍यास वेळोवेळी तक्रारकर्ता यांना सांगितले होते परंतु त्‍यांनी ते सादर केलेले नाही.  ते आजही जखमी कामगाराची नुकसान भरपाई देण्‍यास तयार आहेत. करीता तक्रारकर्ता यांनी जखमी कर्मचा-याचे सिव्‍हील सर्जन, भंडारा यांचे प्रमाणपत्र सादर करावे.  सबब तक्रारकर्ता यांची संपूर्ण तक्रार व मागण्‍या या अमान्‍य असून तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली.

 

 

04.  प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये तक्रारकर्ता यांचे तर्फे वकील श्रीमती एस.पी. अवचट यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकला.  तक्रारकर्ता यांची शपथे वरील तक्रार, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे शपथे वरील लेखी उत्‍तर तसेच उभय पक्षांनी दाखल केलेलया दस्‍तऐवजाचे अवलोकन जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे करण्‍यात आले, त्‍यानुसार जिल्‍हा ग्राहक आयोगाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहे-

 

                                                                                     ::निष्‍कर्ष  ::

 

05.  जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे कामगार न्‍यायालय भंडारा  यांनी “Employees Compensation Act” अंतर्गत दाखल झालेले प्रकरण क्रं- WCA (Agreement Application No.-2/2018 (CNR No.-MHLC 36-2018) मध्‍ये दिनांक-03.12.2018 रोजीचे आदेशाचे अवलोकन करण्‍यात आले, त्‍यामध्‍ये असे नमुद आहे की, करार आणि दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता कर्मचारी श्री मनोज शंकर वैद्द राहणार भंडारा या कामगाराचे उजव्‍या हाताचे तीन बोटांना आंशिक अपंगत्‍व आलेले आहे तसेच जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, भंडारा यांचे प्रमाणपत्र सुध्‍दा अभिलेखावर दाखल आहे, सदर वैद्दकीय प्रमाणपत्रा नुसार कामगार श्री मनोज शंकर वैद्द आणि मालक मे. महाविर मेटल वर्क्‍स भंडारा यांचे मध्‍ये करार करण्‍यात येऊन त्‍याव्‍दारे युको बॅंक,भंडारा यांचा धनादेश क्रं-000191, दिनांक-03.12.2018 अन्‍वये रक्‍क्‍म रुपये-1,95,696/- शारीरीक अपंगत्‍व आल्‍या  बद्दल दिलेले आहे. सदर मालक आणि कामगार यांचे मधील करार हा योग्‍य असून सदर करार मंजूर करुन तो कामगार न्‍यायालयात नोंदविण्‍याचे आदेशित केलेले आहे.

 

 

06.   जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, ज्‍याअर्थी कामगार न्‍यायालय, भंडारा यांनी उपरोक्‍त नमुद प्रकरणा मध्‍ये आदेश पारीत केलेला आहे, त्‍याअर्थी सदर आदेश योग्‍य असून त्‍या अनुसार विरुदपक्ष विमा कंपनीने विम्‍याव्‍दारे स्विकारलेलया जोखीमी प्रमाणे तक्रारकर्ता यांना विम्‍याची रक्‍कम देणे अभिप्रेत होते परंतु तसे त्‍यांनी केलेले नाही करीता शेवटी तक्रारकर्ता यांना जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष प्रस्‍तुत तक्रार दाखल करावी लागली.  अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना विम्‍याची रक्‍कम न देऊन दोषपूण्र सेवा दिल्‍यामुळे त्‍यांना निश्‍चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे या बाबी उघड आहेत.

 

 

07.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी वारंवार तक्रारकर्ता यांना सदर कामगाराचे अपंगत्‍वाचे प्रमाणपत्राची मागणी केली परंतु तक्रारकर्ता यांनी ती पुरविली नाही.  ते आजही विम्‍याची रक्‍कम देण्‍यास तयार आहेत. विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांचे कडे दिनांक-23.12.2020 रोजीचे तसेच दिनांक-12.03.2021 रोजीचे पत्रान्‍वये कामगार श्री मनोज वैद्द यांचे अपंगत्‍वा बद्दल जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक भंडारा यांचे वैद्दकीय प्रमाणपत्राची मागणी केलेली आहे, सदर पत्राच्‍या प्रती अभिलेखावर दाखल आहेत.  याउलट तक्रारकर्ता यांनी सदर कामगार श्री मनोज शंकर वैद्द यांना अपंगत्‍व आल्‍या बद्दल जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक भंडारा यांचे वैद्दकीय मंडळाचे दिनांक-09.08.2019 रोजीचे अपंगत्‍वाचे प्रमाण्‍पत्र दाखल केले.

 

 

08.  जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मते विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक भंडारा यांचे वैद्दकीय प्रमाणपत्र दाखल केलेले नसल्‍याने विम्‍याची रक्‍कम देण्‍यास नकार दिलेला आहे  परंतु तक्रारकर्ता यांनी कामगार न्‍यायालयाचे दिनांक-03.12.2018 रोजीचे आदेशा नुसार “Employees Compensation Act” धनादेश क्रं-000191, दिनांक-03.12.2018 अन्‍वये रक्‍कम रुपये-1,95,696/- शारीरीक अपंगत्‍व आल्‍या  बद्दल कामगार न्‍यायालयात जमा केलेली आहे. ज्‍याअर्थी तक्रारकर्ता यांनी सक्षम न्‍यायालयाचे आदेशा प्रमाणे कामगारास आलेल्‍या अपंगत्‍वाची नुकसान भरपाईची रक्‍कम  कामगार न्‍यायालय, भंडारा येथे जमा केलेली आहे, त्‍याअर्थी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विम्‍या प्रमाणे रक्‍कम देण्‍याची जबाबदारी होती परंतु विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक यांचे प्रमाणपत्राची मागणी करुन आज पर्यंत रक्‍कम दिलेली नाही. तक्रारकर्ता यांनी सदर कामगार श्री मनोज शंकर वैद्द यांना अपंगत्‍व आल्‍या बद्दल जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक भंडारा यांचे वैद्दकीय मंडळाचे दिनांक-09.08.2019 रोजीचे अपंगत्‍वाचे प्रमाण्‍पत्र दाखल केले, सदर प्रमाणपत्रा नुसार श्री मनोज शंकर वैद्द यांचे उजव्‍या हाताचे तीन बोटांना कायमस्‍वरुपी 8 टक्‍के अपंगत्‍व आल्‍याचे नमुद आहे.

 

 

09.   जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असेही मत आहे की, ज्‍याअर्थी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा पॉलिसी क्रं -281303411810000006 चे प्रतीमध्‍ये “EMPLOYEE COMPENSATION ACT, 1923” प्रमाणे नुकसान भरपाई देण्‍याची जोखीम स्विकारलेली आहे, त्‍याच बरोबर MEDICAL EXPENSES-A) LIMIT PER EMPLOYEE RS. 50,000/- B) AGGREGATE LIMIT (AOP) RS.-5,00,000/- जोखीम स्विकारलेली आहे, त्‍याअर्थी सदरचे कायदया नुसार सक्षम कामगार न्‍यायालय, भंडारा यांनी आदेशित केलेली नुकसान भरपाईची रक्‍कम विमा पॉलिसीतील अटी व नियमां प्रमाणे त्‍वरीत देणे बंधनकारक होते परंतु त्‍यांनी विमा पॉलिसी मध्‍ये घालून दिलेल्‍या नियम व अटी कडे संपूर्णतः दुर्लक्ष्‍य करुन आज पर्यंत तक्रारकर्ता यांना विम्‍याचे रकमे पासून वंचीत ठेऊन दोषपूर्ण सेवा दिली तसेच अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला या बाबी सिध्‍द होतात.

 

 

10.   वरील सर्व वस्‍तुस्थितीचा सर्वकष विचार करुन तक्रारकर्ता मे. महाविर मेटल वर्क्‍स भंडारा तर्फे प्रोप्रायटर श्री धर्मपाल हंसराज मल्‍होत्रा यांना विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा पॉलिसी क्रं-281303411810000006 अनुसार “EMPLOYEE COMPENSATION ACT, 1923” प्रमाणे
नुकसान भरपाईची रक्‍कम रुपये-1
,95,696/- त्‍याच बरोबर  तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर दाखल केलेल्‍या वैद्दकीय देयकांचे प्रतीवरुन जखमी कामगार श्री मनोज वैद्द याचे औषधोपचारासाठी तक्रारकर्ता यांनी केलेला खर्च रुपये-30,724/- (या ठिकाणी जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे विशेषत्‍वाने नमुद करण्‍यात येते की, तक्रारकर्ता यांनी कामगार श्री मनोज वैद्द यांचे औषधोपचाराचे खर्चाची रक्‍कम रुपये-30,124/- मागणी केलेली आहे परंतु प्रत्‍यक्षात देयकाचे प्रतीवरुन सदर खर्च खर्च रुपये-30,724/- असल्‍याने सदर रक्‍कम हिशोबात घेण्‍यात येतो) आणि सदर रकमेवर दिनांक-03.12.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. तसेच विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्ता यांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारचा खर्च रुपये-10,000/- मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

 

11.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहोत-

 

 

                                                                   :: अंतीम आदेश :: 

 

  1. तक्रारकर्ता मे. महाविर मेटर वर्क्‍स भंडारा तर्फे प्रोप्रायटर श्री धर्मपाल हंसराज मल्‍होत्रा यांची तक्रार विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा भंडारा यांचे विरुध्‍द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1.  विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा भंडारा यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी विमा पॉलिसी क्रं-281303411810000006 अनुसार “EMPLOYEE COMPENSATION ACT, 1923” प्रमाणे कामगार न्‍यायालय, भंडारा यांचे आदेशा प्रमाणे नुकसान भरपाईची रक्‍कम रुपये-1,95,696/- त्‍याच बरोबर  तक्रारकर्ता यांनी जखमी कामगार श्री मनोज वैद्द याचे औषधोपचारासाठी केलेला खर्च रुपये-30,724/- असे मिळून एकूण रक्‍कम रुपये-2,26,420/- (अक्षरी रुपये दोन लक्ष सव्‍वीस हजार चारशे विस फक्‍त) आणि सदर विमा रकमेवर दिनांक-03.12.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज अशा रकमा तक्रारकर्ता यांना अदा कराव्‍यात.

 

  1. विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा भंडारा यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्ता यांना झालेल्‍या शारिरीक व मान‍सिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) अशा रकमा तक्रारकर्ता यांना अदा कराव्‍यात.

 

  1. सदर अंतीम आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा भंडारा  यांनी प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विहित मुदतीत आदेशित विमा रक्‍कम रुपये-2,26,420/- आणि सदर विमा रकमेवर दिनांक-03.12.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्ता यांना न दिल्‍यास मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के व्‍याज दरा ऐवजी द.सा.द.शे.-12 टक्‍के दंडनीय दराने व्‍याजासह येणारी संपूर्ण रक्‍कम तक्रारकर्ता यांना देण्‍यास विरुध्‍दपक्ष विमा कंपनी जबाबदार राहिल.

 

  1. निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 

  1. उभय पक्षकारांनी अतिरिक्‍त संच जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.
 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.