Maharashtra

Nanded

CC/14/135

महेंद्रसिंग भूपेंद्रसिंग टेलर - Complainant(s)

Versus

नंद रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स व इतर - Opp.Party(s)

अँड. उ. आ. पौळ

30 Mar 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/14/135
 
1. महेंद्रसिंग भूपेंद्रसिंग टेलर
नंदीग्राम मार्केट, गांधी पुतळ्याजवळ, वजीराबाद, नांदेड.
नांदेड
महाराष्ट्र
...........Complainant(s)
Versus
1. नंद रेडिओ इलेक्ट्रॉनिक्स व इतर
शॉप नं. 17, नंदीग्राम मार्केट, नांदेड.
नांदेड
महाराष्ट्र
2. सोनी बालाजी ईन्ट्रप्राईजेस
शॉप नं. 9, भगतसिंग रोड, गणराज नगर जवळ, नांदेड
नांदेड
महाराष्ट्र
3. सोनी इंडिया प्रा. लि.
ऎ-31, मोहन कोऑपरेटीव इंड्स्ट्रीयल ईस्टेट, मथुरा रोड, नवी दिल्ली-110044
दिल्ली
दिल्ली
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. S.B.Kulkarni PRESIDENT
 HON'ABLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                 निकालपत्र                                   

(घोषीत द्वारा- मा.श्री.आर.एच.बिलोलीकर,सदस्‍य)

 

1.          अर्जदार यांनी  गैरअर्जदार यांचेविरुध्‍द सेवेत त्रुटीच्‍या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.

            अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्‍यात खालील प्रमाणेः-

2.         अर्जदार महेंद्रसिंग भूपेंद्रसिंग टेलर यांनी  दिनांक 04.07.2011 रोजी 12,990/- रुपयास गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून सोनी कंपनीचा कॅमेरा  विकत घेतला,त्‍याचा पावती क्रमांक 1835 आहे.  सदर कॅमेरा मॉडेल नं.डी एस सी डब्‍लू एक्‍स 7/एल  इ 32 (DSC-WX7/L, E32)  असुन सिरीअल नं.2272047 असा आहे.  अर्जदार यांनी कॅमेराचा वापर चालु केल्‍यानंतर कॅमेराच्‍या फीटींगचा प्रॉब्‍लेम येऊ लागला.  त्‍याबद्दल अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडे गेले असता सदर कॅमेरा हा वारंटी काळात असल्‍याने गैरअर्जदार क्र. 2 सर्व्‍हीस सेंटरकडून दुरुस्‍ती करुन मिळेल असा सल्‍ला दिला.  अर्जदाराने दिनांक 09.05.2014 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे नेला असता कॅमेरा बिघडल्‍याची तक्रार नोंदवून कॅमेरा जमा केला.  गैरअर्जदार क्र. 2 यांनी त्‍याची नोंद जॉब सीट क्र.1610 असे करुन आठ दिवसानंतर फोन करण्‍यास सांगितले.  आठ दिवसांनी फोन केल्‍यानंतर प्रतिसाद दिला नाही.  दिनांक 30.06.2014 रोजी अर्जदार स्‍वतः गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे गेला असता गैरअर्जदार क्र. 2 सर्व्‍हीस सेंटर यांनी सदर कॅमेरा दुरुस्‍त होणार नाही असे सांगितले.  अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांना सदर कॅमेरा बदलून द्या अशी विनंती केली असता कॅमेरा बदलून देण्‍यास नकार दिला.  सदर बाब गैरअर्जदार क्र. 3 यांना फोनवर कळविले असता कोठे जायचे ते जा आम्‍हाला काहीही फरक पडत नाही.  तुमचा कॅमेरा पण देत नाही असे सांगितले.  त्‍यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे व मंचास विनंती केलेली आहे की, अर्जदारास कॅमेराची किंमत रक्‍कम रु.12,990/- गैरअर्जदार याचेकडून देण्‍याचा आदेश व्‍हावा,  तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्‍यादी रक्‍कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्‍दारे केलेली आहे.

3.          गैरअर्जदार क्र. 1 ते 3  यांना नोटीस तामील होऊन त्‍यांनी आपले लेखी जबाब दाखल केलेले आहेत.

            गैरअर्जदार क्र. 1 यांचा लेखी जबाब थोडक्‍यात पुढील प्रमाणेः-

4.          अर्जदाराची संपूर्ण तक्रार ही चुकीची दिशाभूल करणारी व सत्‍यता दडवून काल्‍पनीक घटनेवर आधारीत असल्‍याने खर्चासहीत खारीज करावी. तक्रारीतील परिच्‍छेद क्र. 2 मधील माहिती कथन मान्‍य आहे.

            अर्जदार जेव्‍हा त्‍यांचेकडे कॅमेरा आणला होता तेव्‍हा त्‍यांनी अर्जदारास कॅमेरा वारंटी कालावधीत असल्‍याने सर्व्‍हीस सेंटर कडे नेऊन दुरुस्‍त करुन घेण्‍याचा सल्‍ला दिला होता. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे कॅमेरा दुरुस्‍तीसाठी दिला नाही. अर्जदाराने कॅमेरा विकत घेतांना अर्जदारास बील दिले होते, त्‍या बीलांत सर्व सेवा शर्तींचा उल्‍लेख असून अर्जदारास दिलेल्‍या बीलावर नो एक्‍सचेंज असे नमुद केलेले होते.  त्‍यामुळे कॅमेरा बदलून देण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही.  गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून अर्जदारास कोणतेही नुकसान झालेले नाही अथवा मानसिक व शारिरिक त्रास झालेला नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांना जाणिवपुर्वक त्रास देण्‍याच्‍या हेतूने या अर्जामध्‍ये पक्षकार केलेले आहे.  वास्‍तविक पाहता गैरअर्जदार क्र. 1 यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.  गैरअर्जदार क्र. 1 यांनी मंचास विनंती केलेली आहे की, अर्जदाराचा अर्ज रक्‍कम रु.20,000/- खर्चासहीत गैरअर्जदार क्र. 1 यांचेविरुध्‍द फेटाळण्‍यात यावा.

            गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचे लेखी जबाबातील थोडक्‍यात म्‍हणणे पुढील प्रमाणेः-

 5.         गैरअर्जदार क्र. 3 ही कंपनी असून तीचे ऑफीस नवी दिल्‍ली येथे आहे.  गैरअर्जदार क्र. 1 हे गैरअर्जदार क्र. 3 चे अधिकृत विक्रेते असून गैरअर्जदार क्र. 2 हे अधिकृत सर्व्‍हीस सेंटर आहे.

            अर्जदाराची तक्रार ही खोटी आणि चुकीची असून कायद्याचा दुरुपयोग करणारी आहे. दिनांक 29.04.2014 रोजी अर्जदाराने प्रथम व नंतर दिनांक 20.05.2014 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांचेशी संपर्क करुन “capture button irresponsive & no video”  अशी तक्रार दिली.  सदर कॅमेराची तपासणी केली असता असे आढळून आले की, कॅमेराच्‍या खालच्‍या कोप-यात एक खाच/पोचा असून कॅबीनेटमध्‍ये गॅप पडलेला आहे.   असे कॅमेरा निष्‍काळजीपणे खाली पाडल्‍यामुळेच होऊ शकते.  कॅमेराची या स्थिती बाबतचे प्रात्‍याक्षिक अर्जदारासस दाखविण्‍यात आले होते.  अर्जदाराने शेवटी दिनांक 20.05.2014 रोजी सदर कॅमेरा गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे दिला व नंतर त्‍याला अनेकवेळा फोन करुन सदर कॅमेरा नेण्‍याबाबत विनंती करुनही अर्जदाराने गैरअर्जदार यांचेशी संपर्क करुन कॅमेरा नेला नाही व नवीन कॅमेरा देण्‍याची मागणी केली.  अर्जदाराची सदर मागणी ही अयोग्‍य व अन्‍यायकारक असून मान्‍य करण्‍यायोग्‍य नाही. 

            अर्जदाराने सदर कॅमेराचा दोन वर्ष,नऊ महिने वापरानंतर नवीन कॅमेराची अयोग्‍य मागणी करुन गैरअर्जदारास त्रास देणे सुरु केले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडे दुरुस्‍ती खर्चाची कधीही मागणी केली नाही. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचे पुढे असे म्‍हणणे आहे की, इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तुचे आयुष्‍य फार कमी असते व नैसर्गीकरीत्‍या इलेक्‍ट्रॉनीक फेल्‍युअर होऊ शकते.  म्‍हणून त्‍या कारणास्‍तव या वस्‍तुंना वारंटी दिलेले असते.  अर्जदाराने कॅमेरा विकत घेतेवेळेस कॅमेरा चांगला होता व तो व्‍यवस्थीत कार्य करीत होता.  इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तु हया अल्‍पजीवी असून त्‍यासाठी गैरअर्जदारास कायमचे जबाबदार धरता येत नाही.  गैरअर्जदार यांनी कॅमेराच्‍या दिलेल्‍या वारंटीच्‍या कलम 8 प्रमाणे अर्जदारास काहीही देणे लागत नाही.  गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी मंचास विनंती केलेली आहे की, अर्जदाराचा अर्ज खर्चासह खारीज करण्‍यात यावा.

5.          अर्जदार यांनी पुराव्‍याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  दोंन्‍ही बाजूंचा युक्‍तीवाद ऐकला.  दोन्‍ही बाजूंनी दाखल  केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्‍टी स्‍पष्‍ट होतात. 

6.          अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या टॅक्‍स इनव्‍हाईस वरुन दिसून येते.  सदर टॅक्‍स इनव्‍हाईसचे अवलोकन केले असता अर्जदाराने दिनांक 04.07.2011 रोजी रक्‍कम 12,600/- रुपयास सदर कॅमेरा खरेदी केल्‍याचे स्‍पष्‍ट आहे.  तसेच सदर बीलावर नो एक्‍सचेंज असे मोठया अक्षरांत लिहिलेले आहे आणि  Terms and Conditions  या सदराखाली कलम 1 मध्‍ये Goods once sold will not be taken back on any condition असे लिहिलेले असून पावतीवर ‘’ नो एक्‍सचेंज’’ असा मोठया अक्षरामधील शिक्‍काही मारलेला आहे.  बिलावर सदरचे लिहीणे हे ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या तरतुदींच्‍या विरोधात आहे व असे लिहून गैरअर्जदार क्र. 1 यांनी ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींचे उल्‍लंघन केलेले आहे.

            गैरअर्जदार क्र. 1 हा ग्राहकांना त्‍यांच्‍या हक्‍कापासून वंचीत करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे.  कारण सदोष वस्‍तू निघाल्‍यास गैरअर्जदार क्र. 1 यांनी बीलावर – No Exchange  व Goods once sold will not be taken back on any condition लिहून एक प्रकारे सदोष वस्‍तू ग्राहकांच्‍या माथी मारण्‍यासाठी आधार घेत आहे. सदोष वस्‍तू ग्राहकांच्‍या माथी मारण्‍याचा प्रयत्‍न करुन गैरअर्जदार क्र. 1 यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करीत असल्‍याचे निदर्शनास येते.  यासाठी मंचाने मा. राज्‍य आयोग खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेला निर्णय प्रकरण क्रमांक 322/2006 –अशोक देशपांडे विरुध्‍द शशिकांत सोनवळकर,दिनांक 29.03.2010  व मा. राज्‍य आयोग खंडपीठ नागपूर यांनी दिलेला निर्णय प्रकरण- Angela Fonseca Vs. Coral Lawns K Anr, eported in  C.P.J.  1991(II) 670  चा आधार घेतलेला आहे.  प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये मा. राज्‍य आयोगाने खालील प्रमाणे मत नोंदविलेले आहे.

            “Mere mention  of the word “advance once paid will not be refunded” on the receipt is an exploitation of a needy and helpless consumer and imposition of said condition amounts to Unfair Trade Practice”.

            गैरअर्जदार क्र. 2 हे गैरअर्जदार क्र. 3 उत्‍पादक कंपनीचे अधिकृत सर्व्‍हीस सेंटर आहे.  अर्जदार यांनी दिनांक 09.05.2014 रोजी सदर कॅमेरा हा दुरुस्‍तीसाठी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे दिलेला होता हे अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या दिनांक 09.05.2014 रोजीच्‍या पावती क्रमांक 1610 च्‍या प्रतीवरुन स्‍पष्‍ट आहे.  सदर पावतीत ‘DOP’ या सदरात In warranty असे लिहिलेले आहे. तसेच Set condition या सदरात Fitting problem  असे लिहिलेले आहे.  यावरुन हे स्‍पष्‍ट आहे की, अर्जदाराच्‍या कॅमेरामध्‍ये Fitting चा प्रॉब्‍लेम होता आणि सदर कॅमेरा हा वारंटी कालावधीत होता. अर्जदार यांनी वारंटी कार्डची प्रत देखील मंचात दाखल केलेली आहे.  गैरअर्जदार क्र. 3 यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबाच्‍या परिच्‍छेद क्रमांक 8 मध्‍ये असे म्‍हटले आहे की, अर्जदाराने दिनांक 29.04.2014 व नंतर दिनांक 20.05.2014 गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे “capture button irresponsive & no video” हयाकरीता कॅमेरा आणला होता.  सदर कॅमेराची तपासणी केली असता कॅमेराच्‍या खालच्‍या बाजुच्‍या कोप-यात खोप/खाच आढळून आली व ते कॅमेरा निष्‍काळजीपणाने आपटल्‍याने झाल्‍याचे म्‍हटले आहे व त्‍यामुळे वारंटीच्‍या कलम 1 प्रमाणे गैरअर्जदार हे अर्जदारास जबाबदार नाहीत असे म्‍हटले आहे.  हे गैरअर्जदार क्र. 3 यांचे म्‍हणणे योग्‍य दिसत नाही.  करण गैरअर्जदार क्र. 2 सर्व्‍हीस सेंटर यांनी अर्जदाराने कॅमेरा दुरुस्‍तीसाठी आणल्‍यानंतर सदर कॅमेराची तपासणी केल्‍यानंतरच अर्जदाराचा कॅमेराचा  Fitting problem  आहे असे पावतीवर लिहिलेले आहे.  परंतु लेखी जबाबामध्‍ये अर्जदाराच्‍या कॅमेराचा  problem  हा “capture button irresponsive & no video” स्‍वरुपाचा आहे व सदरील दोष हा कॅमेरा निष्‍काळजीपणे हाताळलेला असल्‍याने तो पडला व त्‍यामुळे उद्भवला आहे असे नमुद केलेले आहे. परंतु ही बाब गैरअर्जदार यांनी अर्जदारास कॅमेरा दुरुस्‍तीसाठी आणला त्‍यावेळीच सांगावयास पाहिजे होती. परंतु गैरअर्जदार यांनी तक्रार दाखल केल्‍यानंतर ही बाब सांगितलेली आहे व कॅमेरा पडलेला असल्‍याबद्दलचा पुरावाही मंचासमोर दिलेला नाही.

            प्रकरणांतील वादातीत कॅमेरा गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडेच आहे. गैरअर्जदार यांनी सदर कॅमेरा मंचासमोर देखील आणलेला नाही. अर्जदाराचा कॅमेरा हा वारंटी कालावधीत होता तरीपण गैरअर्जदार यांनी तो दुरुस्‍त करुन दिलेला नाही.  तसेच गैरअर्जदार यांची जबाबदारी नाही हे दर्शविणेसाठी दिलेल्‍या कारणांच्‍या पृष्‍ट्यर्थ गैरअर्जदार यांनी कसलाही योग्‍य पुरावा/कागदपत्रे दाखल केलेले नाहीत.  असे करुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिलेली आहे आणि मानसिक व शारिरिक त्रास दिलेला आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.

                       आ दे श

 

1.     अर्जदार यांची  तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.    गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदारास कॅमेराची किंमत रक्‍कम र.12,600/- आदेश कळाल्‍यापासून तीस दिवसाच्‍या आत द्यावेत.

3.    गैरअर्जदार क्र. 1 यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याबद्दल अर्जदारास रक्‍कम र.5000/- आदेश कळाल्‍यापासून तीस दिवसाच्‍या आत द्यावेत.

4.    गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्‍यांचे बीलावर – No Exchange  व Goods once sold will not be taken back on any condition.असे लिहिणे आदेश तारखेपासून 30 दिवसाच्‍या आत बंद करावे.

5.    गैरअर्जदार क्र. 3 यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्‍याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.2000/- आदेश कळाल्‍यापासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

5.    दोन्‍ही पक्षकारास निकालाच्‍या प्रती मोफत पुरविण्‍यात याव्‍यात. 

6.    वरील आदेशाच्‍या  पुर्ततेचा अहवाल दोन्‍ही पक्षकारांनी निकालाच्‍या तारखेपासून  45 दिवसांच्‍या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर   आदेशाच्‍या पुर्ततेसाठी ठेवण्‍यात यावे.

 

 
 
[HON'BLE MRS. S.B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.