Maharashtra

Beed

CC/14/18

डॉ.फकरुज्‍जमा खॉन पि युसुफखॉन - Complainant(s)

Versus

धनराज अंनतराव मुंढे,(वाहक) - Opp.Party(s)

20 Jun 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/14/18
 
1. डॉ.फकरुज्‍जमा खॉन पि युसुफखॉन
रा.सांगळे बिल्‍डींग प्रशांत नगर,अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि.बीड
बीड
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. धनराज अंनतराव मुंढे,(वाहक)
रा.अंबाजोगाई आगार,ता.अंबाजोगाई जि.बीड
बीड
महाराष्‍ट्र
2. विभागीय वाहतुक नियंत्रक,
विभागीय कार्यालय,महाराष्‍ट्र राज्‍य,परिवहन महामंडळ बीड
बीड
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. MANJUSHA CHITALANGE MEMBER
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल

                       दिनांक- 20.06.2014

               (द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्‍य)

            तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांच्‍याकडून  नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.

            तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे, तक्रारदार डॉ.फकरुज्‍जमा खॉन हे व्‍यवसायाने  डॉक्‍टर आहे. ते सांगळे बिल्‍डींग प्रशांत नगर हाऊसिंग सोसायटी अंबाजोगाई  येथे राहतात. सामनेवाला क्र.1 हे महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाअंतर्गत अंबाजोगाई आगारात वाहक म्‍हणून नोकरीस आहे. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 चे विभागीय नियंत्रक अधिकारी आहे.

 

            तक्रारदार हे दि.17.09.2013 रोजी पूणे अंबाजोगाई बस क्रमांक एम.एच.20 बीएल 2352 मध्‍ये अहमदनगर बस स्‍टँड येथून रात्री 12.30 वाजण्‍याच्‍या सुमारास अंबाजोगाईकडे येण्‍यासाठी बसमध्‍ये बसत असतांना सदर बसचा वाहक सामनेवाला क्र.1 नामे धनराज अनंतराव मुंडे, बॅच क्रमांक 4325 याने तक्रारदारास बॅग ठेवण्‍याच्‍या कारणावरुन उर्मटपणे बोलण्‍यास सुरुवात केली. तसेच बॅगा लवकर गाडीत ठेवा असे म्‍हणून वाद निर्माण केला. परिणामी तक्रारदाराच्‍या हातातील बॅग व लॅपटॉप असलेली बॅग ओढून फेकून देण्‍याचा प्रयत्‍न केला. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी  तक्रारदाराची धरपकड केली व त्‍यास खाली ढकलून देण्‍याचा प्रयत्‍न केला त्‍यामुळे तक्रारदाराच्‍या शर्टच्‍या खिशातील अॅपल कंपनीचा 3 जी आयफोन हा मोबाईल खाली पडून फुटला व निकामी झाला. मोबाईल हा खराब झाल्‍याबददल अंबाजोगाई येथील अधिकृत मोबाईल दुरुस्‍त करणा-या तंत्रज्ञाने दि.19.09.2013 रोजीचा अहवाल सादर केला आहे. सदर अहवाल हा रुबी मोबाईल प्रशांत नगर अंबाजोगाई येथील आहे. सामनेवाला क्र.1 हा बेकायदेशिर कृत्‍य करतेवेळी दारुच्‍या नशेत होता. तक्रारदार यांना अंबाजोगाई येथे येणे गरजेचे असल्‍यामुळे त्‍यांनी सदर प्रकार निमूटपणे सहन केला व बसमध्‍ये बसून अंबाजोगाई येथे आले.

 

            तक्रारदार यांनी सदर बाबींची माहिती इ-मेल वरुन सामनेवाला क्र.2 व त्‍यांच्‍या वरीष्‍ट अधिका-यांना दिली. तसेच तक्रारदार यांनी अहमदनगर पोलीस स्‍टेशनला सदर घटनेची तक्रार नोंदवलेली आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदार इ-मेल वरुन तसेच दुरध्‍वनी वरुन झालेल्‍या प्रकाराची चौकशी करण्‍याकरता ब-याच तारखा देऊन देखील सामनेवाला क्र.2 यांनी कोणत्‍याही प्रकारची चौकशी केली नाही. त्‍यामुळे तक्रारदारास झालेल्‍या प्रकारामुळे प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. सबब तक्रारदाराने त्‍याचा मोबाईल निकामी झाल्‍यामुळे झालेले नुकसान रु.45,000/- नोटीसचा खर्च रु.5,000/-, मानसिक त्रासाबददल रु.50,000/- असे एकूण रक्‍कम रु.1,00,000/- नुकसान भरपाई मिळण्‍याची विनंती केली आहे.

            सामनेवाला क्र.1 व 2 मंचासमोर हजर झाले. त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे निशाणी क्र.13 वर दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1 हा महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाअंतर्गत अंबाजोगाई आगारात वाहक म्‍हणून नोकरीस आहे व सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 यांचे विभाग नियंत्रक अधिकारी आहे. तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 यांच्‍या एस.टी.मधून प्रवास करत होता ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. तसेच दि.17.09.2013 रोजी एस.टी.बस क्रमांक एम.एच.20 बीएल 2352 या बसने तक्रारदार यांनी अहमदनगर ते अंबाजोगाई  असा प्रवास केला सदर बस वर वाहक म्‍हणून सामनेवाला क्र.1 हे होते. सामनेवाला यांचे कथन की, बसमध्‍ये वाहकासह केवळ 18 प्रवासी प्रवास करत होते. एस.टी.बसची प्रवासी आसन क्षमता 44 सीट इतकी आहे. त्‍यामुळे सदर बसमध्‍ये 26 सीट रिकामे होते. तक्रारदार यांनी हात दाखवल्‍यावरुन बसचा चालक नामे श्री.गिरी यांनी बस थांबवली. तक्रारदाराकडे असलेल्‍या मोठया बॅगा सामनेवाला क्र.1 यांनी स्‍वतः घेऊन तक्रारदारास बसमध्‍ये चढण्‍यास मदत केली. तक्रारदार हा वाहकाच्‍या पाठीमागील सीटवर महिला प्रवाशाच्‍या बाजूस बसण्‍याचा प्रयत्‍न करीत असल्‍याने, सदर महिला ही गरोदर असल्‍याने सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास अन्‍य सीटवर बसण्‍याची विनंती केली. त्‍यावेळी तक्रारदाराने सदर बसमधील वाहकाशी हुज्‍जत घातली व अपमानास्‍पद वागणूक दिली. तक्रारदार यांचा 3 जी आयफोन फुटून कायमस्‍वरुपी निकाली झाला व खांद्यावरील बॅग व लॅपटॉप संगणक फेकून देण्‍याचा प्रयत्‍न केला हे चुकीचे आहे.

 

            सामनेवाला हे मद्यप्राशन करुन कर्तव्‍य बजावत होते हे म्‍हणणे चुकीचे आहे. त्‍याबाबतची तक्रार बसमधील इतर प्रवाशांनी केलेली नाही किंवा वाहतुक नियंत्रकाच्‍या निदर्शनास आणून दिली नाही. तक्रारदार यांनी सदर घटनेबाबत अहमदनगर पासून ते केज या मार्गात नियंत्रण कक्ष चालू असताना देखील सामनेवाला क्र.1 यांचे कृत्‍य निदर्शनास आणून दिले नाही. सदर बसमधील वाहकाने लेखी जबाब देऊन तक्रारदाराच्‍या चौकशीची मागणी केली होती. सदर चौकशी ही दि.27.11.2013 रोजी निश्चित केली होती, त्‍याबाबत तक्रारदारास कळवले होते. तसेच दि.18.11.2013 रोजी तक्रारदाराने चौकशीसाठी हजर राहू शकत नाही असे कळवले आहे. त्‍यानंतर दि.29.11.2013 रोजी सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास दि.03.12.2013 ही तारीख चौकशीसाठी कळवण्‍यात आली होती परंतू सदर तारखेस महत्‍वाचे व्हिडीओ कॉन्‍फरन्सिंग  मिटींग मध्‍यवर्ती कार्यालयाने आयोजित केल्‍यामुळे सदरच्‍या सुनावणीची तारीख ही दि.04.12.2013 रोजी ठेवल्‍याचे तक्रारदारास कळवले. सामनेवाला यांनी तक्रारदारास सुनावणीच्‍या तारखा वेळोवेळी इ-मेल द्वारे कळवल्‍या होत्‍या. तक्रारदाराने दि.06.12.2013 रोजी सामनेवाला क्र.1 यास नोटीस पाठविली होती, सदर नोटीसचे उत्‍तर सामनेवाला क्र.2 यांनी दि.24.12.2013 रोजी दिलेली आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांना त्रास देण्‍याच्‍या हेतुने सदरची तक्रार दाखल केलेली आहे.

                                तक्रारदार यांनी तक्रारीसोबत रुबी मोबाईल यांचा अहवाल, सामनेवाला यांना वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, सामनेवाला यांच्‍या नोटीसचे उत्‍तर, सामनेवाला क्र.2 यांना पाठविलेले अर्ज, सुपरिटेंडेन्‍ट ऑफ पोलीस अहमदनगर यांना दिलेली तक्रार, पोलीस स्‍टेशन अंबाजोगाई येथे दिलेली तक्रार इत्‍यादीच्‍या छायांकित प्रती दाखल केलेल्‍या आहेत. तक्रारदार यांचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले. सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र, सामनेवाला यांनी तक्रारदाराला पाठविलेले पत्र तसेच तक्रारदार यांना पाठविलेला इ-मेल, मानव अधिकार व सामाजिक न्‍याय यांचे पत्र, तिकीटाचे वेब बिल याचा रिपोर्ट दाखल केलेला आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकला. दाखल केलेल्‍या कागदपत्राचे अवलोकन केले. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

           मुददे                                       उत्‍तर

 

1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात

   त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार यांनी सिध्‍द

   केली काय ?                                         होय.                                                 2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास

   पात्र आहे काय ?                                  अंशतः होय.

3) आदेश काय ?                                  अंतिम आदेशाप्रमाणे.

 

                        कारणमिंमासा

मुददा क्र.1 ते 3 ः-

            तक्रारदार यांच्‍या वकीलांनी युक्‍तीवाद करत असतांना सांगितले की, तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 यांचे एस.टी.बस क्रमांक एम.एच.20 बीएल 2352 या बसने दि.17.09.2013 रोजी अहमदनगर ते अंबाजोगाई प्रवास केला होता, सदर बसवर वाहक म्‍हणून श्री.धनराज मुंडे बॅच क्रमांक 4325 कार्यरत होते. सदर बसमध्‍ये बसत असताना सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराला बॅग ठेवण्‍याच्‍या कारणावरुन अपमानास्‍पद वागणूक दिली. तसेच तक्रारदाराचे हातातील बॅग व लॅपटॉप संगणक असलेल्‍या खांद्यावरील बॅग फेकून देण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यामुळे तक्रारदाराचे अॅपल कंपनीचा 3 जी आयफोन हा मोबाईल खाली पडून फुटला व कायमचा निकामी झाला. तक्रारदार यांनी त्‍यानंतर इ-मेल वरुन सामनेवाला क्र.2 यांना व त्‍यांचे वरीष्‍ट अधिका-यांना तसेच पोलीस स्‍टेशन अहमदनगर व पोलीस स्‍टेशन अंबाजोगाई येथे दि.18.09.2013 रोजी तक्रार नोंदवलेली आहे. चौकशीच्‍या ब-याच तारखा देऊन सामनेवाला क्र.2 यांनी कोणत्‍याही प्रकारची योग्‍य कार्यवाही केली नाही. त्‍यामुळे तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला. सबब तक्रारदाराचे झालेले नुकसान रु.50,000/-, मोबाईल निकामी झालेले नुकसान रु.45,000/- व नोटीसचा खर्च रु.5,000/- असे एकूण रक्‍कम रु.1,00,000/- देण्‍याची विनंती केली. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात यावी.

 

            सामनेवाला यांचे वकील श्री.कोल्‍हे  यांनी युक्‍तीवाद केला. युक्‍तीवाद करत असताना त्‍यांनी खालील बाबी मान्‍य केलेल्‍या आहेत. सामनेवाला क्र.1 हा अंबाजोगाई आगारात वाहक म्‍हणून नोकरीस आहे ही बाब मान्‍य आहे, तसेच तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 यांच्‍या बसमधून प्रवास करत होते ही बाब मान्‍य आहे, दि.17.09.2013 रोजी पूणे – अंबाजोगाई एस.टी.बस क्रमांक एम.एच.20 बीएल 2352 या बसने अहमदनगर ते अंबाजोगाई प्रवास केला ही बाब मान्‍य आहे, सदर बसवर वाहक म्‍हणून सामनेवाला क्र.1 हे कर्तव्‍यावर होते ही बाब मान्‍य आहे. सामनेवाला यांनी युक्‍तीवाद करत असताना कथन केले की, बसमध्‍ये बसण्‍याची एकूण प्रवासी आसन क्षमता 44 इतकी होती त्‍या बसमध्‍ये केवळ 18 प्रवासी प्रवास करत होते त्‍यामुळे 26 आसन हे रिकामे होते. तक्रारदार हे वाहकाच्‍या पाठीमागील आसनावर बसलेल्‍या महिलेच्‍या बाजूला बसले होते, सदर महिला ही गरोदर असल्‍याने तिला त्रास होत असल्‍याने सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास अन्‍य सीटवर बसण्‍याचे सांगितले होते. तेव्‍हा तक्रारदार सामनेवाला क्र.1 यांचेवर चिडून बोलले त्‍यावेळी तक्रारदाराने सदर बसमधील वाहकास विनाकारण हुज्‍जत घातली. तक्रारदाराचा आयफोन फुटून निकामी झाला ही बाब चुकीची आहे. तसेच लॅपटॉप संगणक व खांद्यावरील बॅग फेकून देण्‍याचा प्रयत्‍न केला ही बाब चुकीची आहे.

 

            तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 हे मद्यप्राशन करुन कर्तव्‍य बजावत होते त्‍या बाबतची तक्रार बसमधील कोणत्‍याही प्रवाशांनी केलेली नाही. तसेच सामनेवाला क्र.1 हे मद्यप्राशन केल्‍याची बाब अहमदनगर ते केज या मार्गात 24 तास नियंत्रण कक्ष चालू असताना सुध्‍दा नियंत्रण कक्षाच्‍या निदश्रनास आणून दिली नाही. सामनेवाला यांनी तक्रारदारास वेळोवेळी चौकशीसाठी हजर राहण्‍याचे कळवले असताना सुध्‍दा तक्रारदार हे चौकशीसाठी हजर राहीले नाही. तक्रारदारांनी पाठविलेल्‍या नोटीसचे उत्‍तर सामनेवाला यांनी दि.24.12.2013 रोजी दिले आहे. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ही इ-मेल वरुन मध्‍यवर्ती कार्यालय विभागीय कार्याल, पोलीस अधिक्षक अहमदनगर यांच्‍याकउे दिल्‍याचे भासवून सामनेवाला यांना त्रास देण्‍याच्‍या उददेशाने केलेली आहे. तक्रारदार यांनी केलेली मागणी ही चुक व खोटी आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्‍यात यावी.

            वर नमुद केलेले कथन लक्षात घेतले. तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र याचे बारकाईन अवलोकन केले. तक्रारदार हे दि.17.09.2013 रोजी पूणे – अंबाजोगाई बसने अहमदनगर ते अंबाजोगाई प्रवास करत होते ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. तसेच सदर बसवर सामनेवाला क्र.1 हे वाहक म्‍हणून कार्यरत होते ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेले रुबी मोबाईलचे दि.19.09.2013 रोजीचे अहवाल याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सदर अहवालात मोबाईल निकामी झाल्‍याबददल स्‍पष्‍ट असा उल्‍लेख केलेला नाही. सदर मोबाईल याच्‍यात काय दोष आहे या बाबतही उल्‍लेख केलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी सदर मोबाईल मंचामार्फत तपासून घेण्‍याची योग्‍य ती कार्यवाही केली नाही. तसेच मोबाईल खराब झाल्‍याबाबातचा स्‍पष्‍ट असा पुरावा दाखल केलेला नाही जेणेकरुन ही बाब सिध्‍द होऊ शकली असती. तसेच तक्रारदार यांनी लॅपटॉप संगणक नादुरुस्‍त आहे त्‍या बाबतही मंचासमोर स्‍पष्‍ट उल्‍लेख व ठोस पुरावा सादर केलेला नाही. तक्रारदार यांनी इ-मेल वरुन पाठविलेले पत्र याचे अवलोकन केले. त्‍याबाबतचा सामनेवाला क्र.2 यांनी योग्‍य चौकशी केली नाही. सामनेवाला यांनी दाखल केलेले वेब बिल तिकीट कलेक्‍शन रिपोर्ट याचे अवलोकन केले. सदर बसमधील प्रवासी आसन क्षमतेपेक्षा कमीच प्रवासी प्रवास करत होते ही बाब सिध्‍द होते. सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्राचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी तक्रारदारास वेळोवेळी दिलेल्‍या तक्रारीसोबत चौकशीसाठी हजर राहण्‍याचे कळवले असताना सुध्‍दा तक्रारदार हजर राहीले नाही. मानव अधिकार व सामाजिक न्‍यायमिशन याचे पत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची तक्रार संस्‍थेने स्विकारलेली नाही असे निदर्शनास येते. तक्रारदार हे सामनेवाला यांच्‍या बसमधून प्रवास करत होते ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. बसमधील प्रवाशांना योग्‍य ती मदत करणे हे बसच्‍या चालक व वाहकाचे कर्तव्‍य आहे. तसेच बसमधील प्रवाशांना वागणूक ही व्‍यवस्थित दिली पाहिजे, सामाजिक हिताच्‍या दृष्‍टीने बसमधील प्रवाशांना वेळोवेळी मदत करायला पाहिजे पण सामनेवाला यांनी तक्रारदारास चांगली वर्तणूक न दिल्‍यामुळे तसेच अपमानास्‍पद वागणूक दिल्‍यामुळे  मानसिक त्रास सहन करावा लागला. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार हे त्‍यांना झालेल्‍या मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.1,000/- मिळण्‍यास पात्र आहे. म्‍हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

 

            सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

 

                         आदेश

            1)  तक्रारदाराची  तक्रार अंशतः मंजूर  करण्‍यात येत आहे.          

            2)  सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी

                तक्रारदार यांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रुपये

                3,000/- (अक्षरी रु.तीन हजार ) व तक्रारीचा खर्च म्‍हणून

                रक्‍कम रु.1,000/- (अक्षरी रु.एक हजार) आदेश कळाल्‍यापासून

                30 दिवसांच्‍या आंत दयावे.

            3)   ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील

                 कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला

                 परत करावेत.     

 

 

 

          श्री.रविंद्र राठोडकर,   श्रीमती मंजूषा चितलांगे,    श्री.विनायक लोंढे,

               सदस्‍य               सदस्‍य               अध्‍यक्ष

                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 

            

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MANJUSHA CHITALANGE]
MEMBER
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.