Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/13/54

श्रीमती सुशिला सुखदेव बन्‍सोड - Complainant(s)

Versus

द.ओरीयंटल इन्‍सुरंन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर अरुनकुमार रामनायक जैस्‍वाल - Opp.Party(s)

उदय क्षीरसागर

18 Nov 2013

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/13/54
 
1. श्रीमती सुशिला सुखदेव बन्‍सोड
रा.झिंझोरीया ता.रामटेक
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. द.ओरीयंटल इन्‍सुरंन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर अरुनकुमार रामनायक जैस्‍वाल
डिव्‍हीजनल ऑफीस न.2 प्‍लॉट न. 8 हिन्‍दुस्‍थान कॉलोनी अजनी चौकाजवळ वर्धा रोड नागपूर - 15
नागपूर
महाराष्‍ट्र
2. कबाल इन्‍सुरंन्‍स ब्रोकिंग सर्व्‍हीसेस लिमिटेड तर्फे श्री.संदीप त्रयंबकराव खैरनार
फ्लट न. 1 पारीजात अपार्टमेंट प्‍लॉट क्र. 135 सुरेन्‍द्र नगर नागपूर.
नागपूर
महाराष्‍ट्र
3. मा. तहसिलदार रामटेक
ता. रामटेक
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्‍यक्ष )

(पारीत दिनांक 18 नोव्‍हेंबर, 2013 )

 

1.    तक्रारकर्तीने, तिचा मुलगा मुकेश सुखदेव बन्‍सोड याचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्‍दपक्षा कडून विमा रक्‍कम  मिळणेसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.

2.    तक्रारकर्तीचे कथन थोडक्‍यात येणे प्रमाणे-

       तक्रारकर्तीचा मुलगा मुकेश सुखदेव बन्‍सोड याचे मालकीची मौजा झिंझेरीया, तालुका रामटेक, जिल्‍हा नागपूर येथे शेती असून तिचा सर्व्‍हे क्रमांक-131 असा आहे आणि शेतीचे उत्‍पन्‍नावर संपूर्ण कुटूंबियाचा उदरनिर्वाह आहे.

      महाराष्‍ट्र शासनाने शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून उतरविला होता. महाराष्‍ट्र शासन विरुध्‍दपक्ष क्रं-3 तहसिलदार, रामटेक यांचे कार्यालया तर्फे संबधित शेतक-याचा विमा क्‍लेम हा, विरुध्‍दपक्ष क्रं-2 यांचे कार्यालयात पाठविल्‍या जातो व वि.प.क्रं 2 चे मार्फतीने प्रस्‍तावाची छाननी करुन पुढे तो विमा प्रस्‍ताव, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे सादर करण्‍यात येतो.

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचा मुलगा मुकेश सुखदेव बन्‍सोड हा दि.01.10.2007 रोजी नागपूर-जबलपूर रोडवर मोटरसायकलवर डबलसिट मागे बसून जात असताना उभा ट्रक न दिसल्‍याने, मोटरसायकल उभ्‍या ट्रकवर आदळल्‍याने जखमी होऊन त्‍यात त्‍याचा मृत्‍यू झाला.

 

 

 

 

 

 

       तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे मुलाचा महाराष्‍ट्र शासना तर्फे शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत सदरचे कालावधीत  विमा उतरविलेला असल्‍याने, मुलाचे अपघाती मृत्‍यूनंतर कायदेशीर वारसदार म्‍हणून विमा रक्‍कम रुपये-1,00,000/- मिळावी म्‍हणून तक्रारकर्तीने, विरुध्‍दपक्ष क्रं 3 तहसिलदार, रामटेक यांचे कार्यालयात आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा प्रस्‍ताव दि.01.11.2007 रोजी सादर केला. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रं 3 तहसिलदार रामटेक यांचे कार्यालया मार्फतीने पुढे सदर विमा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचेकडे पाठविण्‍यात आला व वि.प.क्रं 2 यांनी विमा प्रस्‍तावाची छाननी करुन सदर विमा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे सादर केला तसेच विरुध्‍दपक्षाने वेळोवेळी मागीतलेल्‍या दस्‍तऐवजांची तक्रारकर्तीने  पुर्तता केली.

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, विमा प्रस्‍ताव दि.01.11.2007 रोजी सादर केल्‍या नंतर, सदर दावा मंजूर अथवा नामंजूर झाला या संबधी तक्रारकर्तीस विरुध्‍दपक्षाने काहीही कळविले नाही म्‍हणून तक्रारकर्तीने विमा दाव्‍या संबधाने दि.08.02.2013 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. त्‍यामुळे तक्रारीचे कारण हे सदोदीत घडत आहे.

      म्‍हणून तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा कडून विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- विमा दावा प्रस्‍ताव सादर केल्‍याचा दिनांक-01/11/2007 पासून द.सा.द.शे.18% दराने व्‍याजासह मिळावी, तसेच मानसिक, शारिरीक त्रास व आर्थिक नुकसानी पोटी रुपये-20,000/- आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-10,000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे कडून मिळावे इत्‍यादी मागण्‍या केल्‍यात.

 

3.    प्रस्‍तुत न्‍यायमंचा तर्फे यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांना स्‍वतंत्ररित्‍या नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्‍यात आली. सदर न्‍यायमंचाची नोटीस संबधित वि.प.क्रं 1 ते 3 यांना प्राप्‍त झाल्‍या बद्दल रजिस्‍टर पोच अभिलेखावर दाखल आहेत.

 

4.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले प्रतिज्ञालेखावरील उत्‍तर निशाणी क्रं 12 अनुसार पान क्रं 61 ते 65 वर न्‍यायमंचा समक्ष सादर केले. त्‍यांनी आपले लेखी उत्‍तरामध्‍ये प्राथमिक आक्षेप घेतला की, त्रिपक्षीय करारनामा हा महाराष्‍ट्र शासन आणि कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट सर्व्‍हीसेस लिमिटेड व ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी यांचेमध्‍ये दि.29 ऑगस्‍ट, 2007 रोजी करण्‍यात आला. विम्‍याचा कालावधी दि.15.08.2007 ते 14.08.2008 असा होता. सदर


 

 

करारनाम्‍या नुसार विम्‍या संबधी कोणताही वाद उदभवल्‍यास, वादासाठी मुंबई परिक्षेत्रातील न्‍यायमंचातच तक्रार करता येईल अशी अट घालण्‍यात आली होती, त्‍यामुळे, प्रस्‍तुत न्‍यायमंचास सदर प्रकरणी अधिकारक्षेत्र येत नाही. तसेच त्रिपक्षीय करारा नुसार विमा दाव्‍याशी संबधीत अन्‍य व्‍यक्‍तीनां प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये प्रतिपक्ष केलेले नाही. मृतकाच्‍या वारसदारानांही सदर प्रकरणात सामील केलेले नाही, त्‍यामुळे,  तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. तक्रारकर्तीचा मुलगा अपघाताचे वेळी मोटर सायकलवर मागे बसला असताना अपघात झाला असे पोलीस दस्‍तऐवजां वरुन आढळून येत नाही. तसेच तक्रारकर्तीस, विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांनी वेळोवेळी मागणी करुनही, तक्रारकर्तीने, वैध मोटर सायकल परवाना सादर केला नाही. तक्रारकर्तीने वेळेच्‍या आत आवश्‍यक दस्‍तऐवजांची पुर्तता केलेली नाही, त्‍यामुळे, तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केल्‍या बाबत दि.31.03.2009 रोजीचे पत्रान्‍वये कळविले होते. प्रस्‍तुत तक्रार ही मुदतीचे आत दाखल न केल्‍यामुळे, मुदतबाहय कारणा वरुन खारीज व्‍हावी. त्‍यांनी तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्तीच्‍या सर्व मागण्‍या या नामंजूर करण्‍यात येत आहेत. तक्रारकर्तीची तक्रार खारीज व्‍हावी, अशी विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरामध्‍ये केली.

 

5.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे प्रतिज्ञालेखावरील उत्‍तर निशाणी क्रं 9 अनुसार पान क्रं 53 व 54 वर न्‍यायमंचा समक्ष सादर केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरामध्‍ये ते केवळ मध्‍यस्‍थ सल्‍लागार म्‍हणून शासन आणि विमा कंपनी यांचे मध्‍ये कार्य करतात व शासनास विना मोबदला सहाय्य करीत असल्‍याने तक्रारकर्ती या त्‍यांच्‍या ग्राहक होऊ शकत नाहीत. संबधित तहसिलदार यांचे कडून प्राप्‍त विमा प्रस्‍तावाची, योग्‍य ती छाननी करुन, तसेच आवश्‍यक दस्‍तऐवजांची पुर्तता संबधितां कडून करवून घेऊन, विमा प्रस्‍ताव संबधित विमा कंपनीकडे मंजूरीसाठी ते पाठवितात. मृतक मुकेश सुखदेव बन्‍सोड याचा अपघाती मृत्‍यू दि.01.10.2007 संबधाने विमा प्रस्‍ताव तहसिल कार्यालय, रामटेक यांचे मार्फतीने, विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचे कार्यालयास उशिरा प्राप्‍त झाल्‍या नंतर,आहे त्‍या स्थितीत त्‍यांनी सदर विमा प्रस्‍ताव, वि.प.क्रं 1 विमा कंपनीस दि.04.02.2009 रोजी पाठविला. पुढे वि.प.क्रं 1 विमा कंपनीने दि.31.03.2009 चे पत्रान्‍वये अधिकृत वाहन परवाना सादर न केल्‍याचे कारणावरुन विमा दावा फाईल बंद केली असल्‍या बाबत वारसदारास कळविले.  वि.प.क्रं 2 यांनी  तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने त्‍यांना मुक्‍त करण्‍यात यावे, अशी विनंती केली.

 

 

 

 

 

6.    विरुध्‍दपक्ष क्रं 3 तहसिलदार, रामटेक यांना या न्‍यायमंचाची नोटीस मिळाल्‍या बाबत नोंदणीकृत डाकेची पोच निशाणी क्रं-7 नुसार अभिलेखावर दाखल आहे परंतु वि.प.क्रं 3  नोटीस मिळूनही न्‍यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा आपले लेखी उत्‍तरही दाखल केले नाही म्‍हणून वि.प.क्रं 3 यांचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने दि.01.10.2013 रोजी प्रकरणात पारीत  केला

 

7.    तक्रारकर्तीने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार एकूण 08 दस्‍तऐवजाच्‍या प्रती सादर केल्‍यात, ज्‍यामध्‍ये शेतकरी अपघात विमा योजना शासन निर्णय, तक्रारकर्तीचे मुलाचे नावाचा शेतीचा 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-8-अ व 6-क उतारा प्रत, तक्रारकर्तीचे मुलाचे अपघाती मृत्‍यू संबधाने एफ.आय.आर. प्रत, घटनास्‍थळ पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र, त.क.चे मुलाचे मृत्‍यू नंतर घेतलेल्‍या फेरफार पत्रकाची प्रत तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस, पोस्‍टाच्‍या पावत्‍या इत्‍यादीचा समावेश आहे. तसेच तक्रारकर्तीने अनुक्रमे निशाणी क्रं 13 व निशाणी क्रं 19 वर शपथपत्र दाखल केलेत. तसेच लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

 

8.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने त्रिपक्षीय करार दि.29.08.2007 रोजीची प्रत दाखल केली. तसेच नि.क्रं 16 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

 

9.   वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस तर्फे महाराष्‍ट्र शासनाचे राजपत्र, मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांचे निर्णयाची प्रत, वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे दावा नाकारल्‍याचे पत्र अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

 

10.   प्रस्‍तुत प्रकरणात त.क. आणि वि.प.क्रं 1 विमा कंपनी यांचे तर्फे  त्‍यांचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

11.   तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएन्‍टल  इन्‍शुरन्‍स कंपनी आणि वि.प.क्रं 2 कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांचे लेखी उत्‍तर आणि प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवज व त.क. व वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे अधिवक्‍ता यांचा युक्‍तीवाद यावरुन न्‍यायमंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे-

                                             

::  निष्‍कर्ष    ::

 

12.   प्रकरणातील उपलब्‍ध तलाठी 7/12, गाव नमुना 7-अ व 12 चे         उता-यावरुन मृतक श्री मुकेश सुखदेव बन्‍सोड यांची मौजा झिंझेरीया, तालुका रामटेक, जिल्‍हा नागपूर येथे शेती होती तसेच संबधित तलाठी देवलापार यांनी

 

 

मृतक मुकेश सुखदेव बन्‍सोड याचा दि.01.10.2007 रोजी मृत्‍यू झाल्‍या बद्दलची नोंद फेरफार रजिस्‍टरवर दि.17.09.2008 रोजी घेतल्‍याचे दिसून येते व मृतकाची वारसदार म्‍हणून तक्रारकर्ती आई सुशिला वि.सुखदेव बन्‍सोड यांचे नाव त्‍यामध्‍ये दर्शविलेले आहे.  यावरुन मृतक हे शेतकरी होते आणि तक्रारकर्ती आई या नात्‍याने मृतकाची  कायदेशीर वारसदार असल्‍या बद्दल स्‍पष्‍ट होते.

 

13.   प्रकरणातील उपलब्‍ध पोलीस दस्‍तऐवज एफ.आय.आर, घटनास्‍थळ पंचनामा, आणि डॉक्‍टरांचे शवविच्‍छेदन अहवाल यावरुन मृतक श्री मुकेश सुखदेव बन्‍सोड यांचा अपघाताने मृत्‍यू  दि.01.10.2007 रोजी झाल्‍याचे दिसून येते.

14.    महाराष्‍ट्र शासन निर्णय दि.24 ऑगस्‍ट, 2007 अन्‍वये दि.15 ऑगस्‍ट, 2007 ते 14 ऑगस्‍ट, 2008 या कालावधीमध्‍ये शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्‍वीत असून विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे (वि.प.क्रं 1 म्‍हणजे ओरिएन्‍टल  इन्‍शुरन्‍स कंपनी असे समजण्‍यात यावे) पुणे,नाशिक, अमरावती व  नागपूर या कार्यक्षेत्रातील शेतक-यांचा विमा सदर कालावधीत उतरविल्‍याचे दिसून येते. थोडक्‍यात मृतकाचा विमा सदरचे कालावधीत काढलेला होता ही बाब स्‍वयंस्‍पष्‍ट होते.

 

15.  विमाधारकाचा झालेला अपघाती मृत्‍यू तसेच विमा पॉलिसी या बद्दल उभय पक्षांमध्‍ये विवाद नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरा सोबत खालील प्राथमिक आक्षेप घेतलेले आहेत-

 

      (1)  प्रस्‍तुत तक्रारीत मंचास अधिकार क्षेत्र येत नाही.

      (2)  प्रस्‍तुत तक्रार मुदतबाहय असल्‍याचे कारणा वरुन खारीज व्‍हावी

      (3)  पोलीस दस्‍तऐवजां मध्‍ये अपघाताचे वेळी मृतक मोटरसायकलचे

           मागे बसलेला होता असे कुठेही नमुद नसल्‍यामुळे, मृतकाचे

           वाहन चालविण्‍याचे वैध परवान्‍याची तक्रारकर्तीस मागणी करुनही

           तिने तो विमा कंपनीस पुरविलेला नाही.

 

 

आक्षेप क्रं-1- मंचास अधिकार क्षेत्र नसल्‍या बाबत-

15(1)   यातील मृतक मुकेश सुखदेव बन्‍सोड याची शेती ही तहसिल रामटेक, जिल्‍हा नागपूर येथे असून, मृतकाचा शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा  योजने अंतर्गतचा विमा, विरुध्‍दपक्ष क्रं-3 तहसिलदार, रामटेक यांचे मार्फतीने


 

 

उतरविलेला असल्‍यामुळे, ग्राहक संरक्षण कायदया नुसार नागपूर ग्रामीण अंतर्गत प्रस्‍तुत न्‍यायमंचास तक्रार चालविण्‍याचे पूर्ण अधिकारक्षेत्र येते. त्‍यामुळे वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे अधिकारक्षेत्र येत नसल्‍याचे आक्षेपात काहीही तथ्‍य दिसून येत नाही.

आक्षेप क्रं-2- तक्रार मुदतबाहय असल्‍या बाबत-

15(2)   वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार त्‍यांनी मृतका जवळ अपघाताचे वेळी वैध वाहन चालक परवाना नसल्‍याचे कारणावरुन विमा फाईल बंद केल्‍या बाबत दि.31.03.2009 रोजीचे पत्रा नुसार वारसदारास कळविले असल्‍यामुळे व प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार विहित मुदतीत दाखल न केल्‍याचे कारणा वरुन  मुदतबाहय ठरते असे नमुद केले आहे. या संदर्भात तक्रारकर्तीने निशाणी क्रं 13 वर मुदती संबधाने व निशाणी क्रं 19 वर तक्रारकर्ती आई या नात्‍याने मृतकाची वारसदार असल्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारकर्तीने नि शाणी क्रं 13 वरील शपथपत्रात नमुद केले की, वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे दि.31.03.2009 रोजीचे पाठविलेले पत्र, तक्रारकर्तीस मिळाले नसल्‍या बाबत नमुद केले आहे. वि.प. क्रं 1 विमा कंपनीने  दि.31.03.2009 रोजीचे विमा दावा नामंजूरीचे पत्र तक्रारकर्तीस पाठविल्‍या बाबत कोणताही पुरावा जसे पोच, जावक रजिस्‍टर मधील उतारा प्रत दाखल केलेली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीचे शपथपत्रातील मजकूरास मंचास तथ्‍य दिसून येते. वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे विमा दावा नामंजूरीचे पत्र तक्रारकर्तीस मिळाले नसल्‍या बद्दल तक्रारकर्तीचे प्रतिज्ञालेखावरील कथन लक्षात घेता, सदर तक्रारीचे कारण हे सतत घडणारे असल्‍यामुळे, तक्रार मुदतबाहय असल्‍या बाबत वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे आक्षेपात काहीही तथ्‍य दिसून येत नाही.

 

आक्षेप क्रं-3- अपघाताचे वेळी मृतका जवळ वाहन चालविण्‍याचा वैध परवाना

           नसल्‍या बाबत-

15(3)    सदर आक्षेपा संदर्भात तक्रारकर्तीने आपले तक्रारी सोबत नि.क्रं 3 वरील यादी नुसार एफ.आय.आर. व पोलीस घटनास्‍थळ पंचनाम्‍याची प्रत दाखल केलेली आहे. एफ.आय.आर.मध्‍ये अपघात दि.01.10.2007 रोजी झाल्‍याचे नमुद असून, अपघात स्‍थळ जबलपूर-नागपूर हाय-वे रोड क्रं 7, पोलीस स्‍टेशन देवलापार असे नमुद आहे. घटनास्‍थळ चौकशी अहवालामध्‍ये अपघात दि.01.10.2007 रोजी झाल्‍याचे नमुद आहे. जबलपूर-नागपूर हाय-वे


 

 

रोड क्रं 7 वर ट्रक क्रं-यु.पी.42-सी-5376 चा चालक अब्‍दुल रशीद शेख,          रा. धोपीया, जिल्‍हा प्रतापगड, यु.पी. याने गाडीचे समोरील चाक पंक्‍चर झाल्‍याने रोडवर ट्रक उभा ठेवला व वाहनाचे मागे कोणत्‍याही प्रकारचे इंडीकेटर/लाईट न लावता वाहन सोडून निघून गेला. त्‍याच दिशेने येणा-या हिरो-होन्‍डा सी.डी.डीलक्‍स क्रं-एम.एच.40 ई 860 वर डबलसिट बसून मृतक श्रीचंद सुखराम वहाणे, वय-32 व मुकेश सुखदेव बन्‍सोड वय 25 उभ्‍या असलेल्‍या ट्रकवर अंधारात न दिल्‍यामुळे ट्रकचे मागील भागावर आदळल्‍याने दोघेही मोटरसायकल स्‍वार गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावल्‍याचे नमुद केले आहे. तसेच पोलीस घटनास्‍थळ पंचनाम्‍या मध्‍ये सुध्‍दा अशाच प्रकारचा मजकूर नमुद आहे. अपघाताचे वेळी मोटरसायकल नेमकी कोण चालवित होते या बद्दल पोलीस दस्‍तऐवजा मध्‍ये कुठेही उल्‍लेख नाही. मात्र तक्रारकर्तीचे प्रतिज्ञालेखावरील तक्रारीमध्‍ये आणि शपथपत्रामधील मजकूरा नुसार सदर अपघाताचे वेळी हिरो होंडा सी.डी.डिलक्‍स या वाहनाचे मागील बाजूचे सिटवर तक्रारकर्तीचा मृतक मुलगा मुकेश सुखदेव बन्‍सोड बसून जात असताना, रस्‍त्‍यावरील उभा ट्रक न दिसल्‍याने, ट्रक वर मोटर सायकल आदळून त्‍यामध्‍ये अपघात होऊन तक्रारकर्तीचा मुलगा मुकेश याचा मृत्‍यू झाल्‍याचे नमुद केलेले आहे. तसेच सदर अपघाताचे वेळी प्रत्‍यक्ष्‍यदर्शी साक्षीदार असल्‍याचा पुरावा प्रस्‍तुत प्रकरणात मंचा समक्ष आलेला नाही. अपघाताचे वेळी मृतक विमा धारक मुकेश बन्‍सोड हा मोटरसायकल चालविता होता असा कोणताही पुरावा मंचा समक्ष न आल्‍यामुळे, मृतक विमा धारक मुकेश बन्‍सोड याचे वैध चालक परवान्‍याची वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे मागणीत काहीही तथ्‍य दिसून येत नाही, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

      तक्रारकर्तीने या संदर्भात आपली भिस्‍त आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग, महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई यांनी- नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी-विरुध्‍द-अनिता राजाभाऊ खिस्‍ते या प्रकरणी पारीत केलेला अपिलीय आदेश जो-II (2012) CPJ 14 या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे, यावर ठेवली.

     सदर अपिलीय आदेशातील वस्‍तुस्थिती नुसार संबधित विमा कंपनीने, शेतकरी अपघात विमा योजने अनुसार विमा धारकाचे मृत्‍यू संबधीचा विमा दावा हा मोटर वाहन कायदयातील तरतुदी नुसार, मृतक विमा धारकाचा वैध वाहन चालक परवाना सादर न केल्‍याचे कारणावरुन फेटाळला होता. त्‍यानंतर ग्राहक मंचाने तक्रारकर्ती (मृतक विमाधारकाची पत्‍नी) विमा दावा मंजूर करुन विमा दावा रक्‍कम रुपये-1,00,000/- संबधित विमा कंपनीस देण्‍याचे आदेशित केले होते. ग्राहक मंचाचे आदेशा विरुध्‍द प्रस्‍तुत अपिलीय प्रकरण आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग, महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई यांचेकडे दाखल करण्‍यात आले


 

होते. आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग मुंबई यांनी आपले अपिलीय आदेशात शासन परिपत्रकामध्‍ये संबधित शेतक-याचा वाहन परवाना सादर करणे आवश्‍यक राहिल असे कुठेही नमुद केलेले नाही. या संबधात जी दुरुस्‍ती करण्‍यात आली ती 29.05.2009 रोजी करण्‍यात आली, सदर दुरुस्‍ती नुसार शेतक-याचा मोटर वाहनाने अपघाती मृत्‍यू झाल्‍यास त्‍याचा वैध चालक परवाना सादर करणे आवश्‍यक राहिल असे नमुद आहे. आमचे समोरील अपिलीय प्रकरणातील विमा योजना ही सन 2008-2009 मध्‍ये सुरु झाल्‍यामुळे आणि तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्‍यू हा दि.22.02.2007 रोजी झालेला असल्‍यामुळे मृतकाचे वैध वाहन चालक परवान्‍याची मागणी लागू होत नसल्‍याचे नमुद करुन, ग्राहक मंचाचा आदेश  आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग यांनी कायम ठेवला.  

 

16.   उपरोक्‍त नमुद आदरणीय राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांचा अपिलीय आदेश आमचे समोरील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो कारण आमचे समोरील प्रकरणात महाराष्‍ट्र शासन निर्णय दि.24 ऑगस्‍ट, 2007 अन्‍वये                दि.15 ऑगस्‍ट, 2007 ते 14 ऑगस्‍ट, 2008 या कालावधीमध्‍ये शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्‍वीत होती आणि विमा योजनेचे कालावधीत मृतक               श्री मुकेश सुखदेव बन्‍सोड यांचा अपघाताने मृत्‍यू  दि.01.10.2007 रोजी झाल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची मृतकाचा वैध चालक परवान्‍याची मागणी प्रस्‍तुत प्रकरणात लागू होत नाही, कारण वैध वाहन परवाना सादर करण्‍या संबधात जी दुरुस्‍ती करण्‍यात आली ती 29.05.2009 रोजी करण्‍यात आली, सदर दुरुस्‍ती नुसार शेतक-याचा मोटर वाहनाने अपघाती मृत्‍यू झाल्‍यास त्‍याचा वैध चालक परवाना सादर करणे आवश्‍यक राहिल असे नमुद आहे आणि आमचे समोरील प्रकरणातील विमाधारकाचा अपघाती मृत्‍यू हा दि.01.10.2007 रोजी झालेला असल्‍यामुळे वैध वाहन चालक परवाना सादर करण्‍याची अट लागू होत नाही,  असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

17.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा आणखी एक असाही आक्षेप आहे की, तक्रारकर्तीने योग्‍य वारसदारांसह तक्रार दाखल केलेली नाही. नि.क्रं 19 अनुसार शपथपत्रामध्‍ये तक्रारकर्तीने असे नमुद केले आहे की, दि.01.10.2007 रोजी मृतक मुकेश हा अविवाहित असल्‍याने तक्रारकर्ती ही आई या नात्‍याने मृतक विमाधारकाची कायदेशीर वारसदार आहे.

 

18. उपरोक्‍त नमुद परिस्थितीत तक्रारकर्ती शेतकरी अपघात विमा योजने संबधाने  विमा क्‍लेमची रक्‍कम रुपये-1,00,000/-  वि.प.क्रं 1 विमा कंपनीने विमा क्‍लेम नाकारल्‍याचा दिनांक-31.03.2009 पासून द.सा.द.शे.12% दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्ष  क्रं 1 विमा कंपनी कडून  मिळण्‍यास पात्र आहे, असे

 

 

न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तक्रारकर्तीस झालेल्‍या शारिरीक, मानसिक          त्रासा बद्दल रुपये-5000/-आणि तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-2000/- तक्रारकर्ती,

विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मिळण्‍यास पात्र आहे असे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 आणि विरुध्‍दपक्ष क्रं-3  यांना सदर प्रकरणातून मुक्‍त करण्‍यात येते.

 

19.      वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

           

               ::आदेश::

 

1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2)    विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीस निर्देशित करण्‍यात येते की,  

      तक्रारकर्तीस तिचे अविवाहीत मुलाचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी

      व्‍यक्‍तीगतअपघात विमा योजने अंतर्गत रक्‍कम रुपये-1,00,000/-

      (अक्षरी रुपये एक लक्ष फक्‍त ) विमा दावा नाकारल्‍याचा दिनांक-

      31.03.2009 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो

      द.सा.द.शे.12%  दराने व्‍याजासह द्दावी.

3)    तक्रारकर्तीस झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/-

      (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) आणि तक्रारीचे खर्चा बद्दल

      रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त) वि.प.क्रं 1 विमा कंपनीने

      तक्रारकर्तीस द्दावेत.

3)    विरुध्‍दपक्ष क्रं- 2 व क्रं-3 यांना सदर तक्रारीतून मुक्‍त करण्‍यात येते.

4)    सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर

      निकालपत्राची प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसाचे आत करावे..

5)    निकालपत्राची प्रमाणित प्रत सर्व  पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

      देण्‍यात यावी.

 

 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.