Maharashtra

Thane

CC/08/570

श्री. हितेश रमेश भोईर - Complainant(s)

Versus

द ब्रॉच मॅनेजर, बजाज अलाईन्‍स जनरल इन्‍शूरन्‍स कं लि - Opp.Party(s)

26 Aug 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/08/570
 
1. श्री. हितेश रमेश भोईर
102, A Wing, Vinay Kutir, 1st Floor, 2nd, Tirupati Nagar, Uniteck Road, Virar (West), Tal. Vasai, Dist. Thane.
Thane.
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. द ब्रॉच मॅनेजर, बजाज अलाईन्‍स जनरल इन्‍शूरन्‍स कं लि
Bajaj Allianz General Insurance Co. Ltd., having office at 6th Floor, Sun Mugnelica, Service Road, Near New R.T.O., Teen Hathnaka, Loiswadi, Thane (W)
Thane.
Maharastra
2. Dhruva Mehata
Magnus Motors, Virar (W), Dist. Thane.
Thane
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 26 Aug 2015

                       तक्रारदारातर्फे अँड. ए.जी. म्‍हस्‍के

                  सामनेवाले तर्फे अँड. आर.आर. अभ्‍यंकर  

 

              न्‍यायनिर्णय   

               (द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्‍य)

 

               

  1. सामनेवाले क्र. 1 ही सर्वसाधारण विमा कंपनी आहे. सामनेवाले क्र. 2 हे सामनेवाले क्र. 2 यांचे एजंट आहेत. तक्रारदार हे विरार येथील रहिवासी आहेत. सामनेवाले क्र. 1 यांनी तक्रारदाराच्‍या वाहन चोरीचा विमा दावा नाकारल्‍याच्‍या बाबीतून प्रस्‍तुत वाद निर्माण झाला आहे.

     

  2. तक्रारदारांच्‍या तक्रारीमधील कथनानुसार तक्रारदारांनी त्‍यांच्‍या मालकीच्‍या वाहनाचा विमा दावा सामनेवाले क्र. 1 यांचेकडून घेऊन विमा प्रिमियम रक्‍कम रु. 17,776/- रकमेचा धनादेश सामनेवाले क्र. 1 यांना दिला. त्‍यानुसार सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍या वाहनास दि. 27/03/2008 पासून विमा संरक्षण सुरु झाल्‍याचे सामनेवाले यांनी मान्‍य करुन त्‍याप्रित्‍यर्थ कव्‍हरनोट तक्रारदारांना दिली. यानंतर तक्रारदारांचे सदरील वाहनास दि. 13/04/2008 रोजी गोवा मुंबई रोडवर अपघात होऊन वाहनाचे नुकसान झाले. सदर अपघाताची सूचना पोलिसांना देण्‍यात आली. सदर घटनेची माहिती टेलिफोनद्वारे तसेच वैयक्‍तीकरित्‍या भेटून सामनेवाले क्र. 1 यांना दि. 14/04/2008 व दि. 15/04/2008 रोजी देण्‍यात आली. त्‍यानंतर सामनेवाले क्र. 1 यांचे आदेशानुसार अपघातग्रस्‍त वाहन टोईंग करुन उदित मोटर्स यांचेकडे दुरुस्‍तीसाठी सुपुर्द केले. तेव्‍हापासून रु. 200/- प्रमाणे पार्कींग चार्जेसची आकारणी केली जात आहे. तक्रारदारांच्‍या वाहनाचे संपूर्ण नुकसान (Total Loss) झाले असल्‍याने वाहन दुरुस्‍तीचा खर्च रु. 4.50 लाख होणार असल्‍याबाबतचे अंदाजपत्रक तक्रारदारांनी दिले. यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍या वाहन दुरुस्‍तीचा खर्च देण्‍याऐवजी तक्रारदाराने प्रिमियम रक्‍कम रु. 17,776/- चा दिलेला धनादेश अनादर झाला असल्‍याने वाहन पॉलिसी आपोआपच रद्द झाली असून तक्रारदारांना पॉलिसीअंतर्गत कोणतीही सुविधा देता येत नाही. त्‍यामुळे तक्रारदारांना कोणताही फायदा देता येत नाह

  3. सामनेवाले यांनी लेखी कैफियत दाखल करुन तक्रारदारांचे सर्व आक्षेप फेटाळतांना असे नमूद केले आहे की तक्रारदारांनी त्‍यांच्‍या वाहनाचा विमा घेण्‍यासाठी रु. 17,776/- रकमेचा धनादेश सामनेवाले यांजकडे जमा केला. परंतु सदर धनादेश बँक खात्‍यामध्‍ये जमा करण्‍यासाठी दिला असता धनादेशाचे अधिदान अनादर करण्‍यात आले. त्‍यामुळे तक्रारदारांना कव्‍हरनोटअन्‍वये दिलेले संरक्षण आपोआप रद्द झाले.यासंदर्भात कव्‍हरनोटच्‍या मागील पृष्‍ट भागावर विशेषपणे नमूद केल्‍यानुसार, धनादेशाचा आदर झाल्‍यानंतरच विमा संरक्षण ग्राहकास प्राप्‍त होणार होते. तथापि, सदर प्रकरणात प्रिमियमची रक्‍कमच अदा न केल्‍याने तक्रारदारांच्‍या वाहनास विम्‍याचे संरक्षण प्राप्‍त होत नाही.

  4. तक्रारदार व सामनेवाले यांनी आपला वाद, प्रतिवाद, पुरावा शपथपत्र व लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तोंडी युक्‍तीवादाचेवेळी तक्रारदार/त्‍यांचे वकील गैरहजर असल्‍याने सामनेवाले यांचे वकील बालाजी उमाटे यांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. त्‍यानुसार प्रकरणामध्‍ये खालीलप्रमाणे निष्‍कर्ष निघतातः

     

  5. तक्रारदारांनी त्‍यांच्‍या वाहनाचा विमा पॉलिसी सामनेवालेकडून घेतली. पॉलिसीचा प्रिमियम धनादेशाद्वारे सामनेवाले यांना दिला. तथापि, धनादेशाचे अधिदान सामनेवाले यांना प्राप्‍त न होता त्‍यापूर्वीच तक्रारदारांचे वाहनास अपघात झाला, या सर्व बाबी सामनेवाले यांनी मान्‍य केल्‍या आहेत.

ब.     सामनेवाले यांच्‍या दावा नाकारण्‍याच्‍या कारणासंदर्भात उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदारांनी त्‍यांचे वाहन क्रमांक एम.एच.झिरो फोर सी एम वन वन टू झीरो (MH04 CM1120) या वाहनाचा विमा घेण्‍यासाठी त्‍यांनी सामनेवाले यांना रु. 17,776/- रकमेचा धनादेश क्र. 454875 दि. 26/03/2008 दिला. सदर धनादेश मिळाल्‍यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदारास कव्‍हरनोट क्र. पी.सी. 0612351843 दिली. सदर कव्‍हरनोटनुसार तक्रारदारांचे सदरील वाहन दि. 27/03/2008 पासून विमा संरक्षित झाले होते. तथापि, कव्‍हरनोटच्‍या मागील पृष्‍ट भागावर  स्‍पष्‍टपणे खालीलप्रमाणे नमूद केले आहे:

 

      “ In case of Dishonour of the premium cheque the document stands automatically void  ab initio.”

 

  • या सूचनेनुसार धनादेश अनादर होताक्षणी वाहनाचे विमा संरक्षण आपोआप सुरुवातीपासून रद्द होते.

  • प्रिमियम रकमेचा धनादेश दि. 31/03/2008 रोजी अनादर झाल्‍याची सूचना सामनेवाले यांना त्‍यांच्‍या बँकेमार्फत दि. 02/04/2009 रोजी मिळाल्‍यानंतर, सामनेवाले यांनी                     दि. 08/04/2008 रोजीच्‍या पत्रान्‍वये ही बाब तक्रारदार व आरटीओ यांना कळवून विमा पॉलिसीचे संरक्षण रद्द झाल्‍याची सूचना दिल्‍याचे, सामनेवाले यांनी नमूद केले आहे व सदर पत्रे व ती पाठविली असल्‍याचा पोस्‍टल पुरावा शपथेवर दाखल केला आहे. सामनेवाले यांनी दाखल केलेल्‍या सदरील कागदपत्रांचे सूक्ष्‍म अवलोकन केले असता असे स्‍पष्‍ट होते की, सामनेवाले यांनी उपरोक्‍त पत्रावर           दि. 08/04/2008 अशी तारीख नमूद केली असली तरी ही पत्रे सामनेवाले यांनी ठाणे येथील गोखले रोड पोष्‍ट ऑफिसमधून           दि. 16/04/2008 रोजी दुपारी 1.42 वाजता पाठविली आहेत. प्रकरणात तक्रारदारांचे वाहन दि. 13/04/2008 रोजी अपघातग्रस्‍त झाले. याबाबतची सूचना त्‍यांनी पोलिसांना त्‍याचदिवशी दिली व पंचनामाही त्‍याच दिवशी झाला. तक्रारदारांच्‍या कथनानुसार सदर घटनेची माहिती सामनेवाले यांना त्‍याचदिवशी त्‍यांचे कार्यालयात जाऊन दिली व सामनेवाले यांचे सूचनेनुसार वाहन टोईंग करुन दुरुस्‍तीसाठी आणले. सदर घटनेचा सुसंगतपणे विचार केल्‍यास अशी स्‍पष्‍ट शक्‍यता दिसून येते की तक्रारदारांनी वाहन अपघाताची सूचना दिल्‍यानंतर तक्रारदारांच्या विमा पॉलिसीतील तपशिल पाहिल्‍यानंतर धनादेश अनादराची बाब लक्षात येताच अगोदरच्‍या तारखेचे म्‍हणजे दि. 08/04/2008 रोजीचे पत्र तयार करुन प्रत्‍यक्षात ते पोष्‍टमध्‍ये           दि. 16/04/2009 रोजी दुपारी 1.42 वाजता पाठविले, जेणेकरुन तक्रारदारांचा संभावित प्रतीपूर्ती दावा नाकारता येईल. वास्‍तविकतः दि.31/03/2008 रोजी धनादेश अनादर झाल्‍यावर त्‍यांनी तक्रारदारांशी त्‍वरीत संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून देणे आवश्‍यक होते.

  •  

ड.       वर नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदारांनी प्रिमियम रकमेचा दिलेला धनादेश अनादर झाल्‍याने व अपघाताच्‍या वेळेपर्यंत प्रिमियम सामनेवाले यांना अदा न केल्‍याने तक्रारदारांच्‍या वाहनास विम्‍याचे संरक्षण नव्‍हते. सबब तक्रारदार अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या दुरुस्ती खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्‍यास पात्र नाहीत.

 

  यासंदर्भात काही न्‍यायनिवाडयामधील तपशिल खालीलप्रमाणे देण्‍यात येत आहेः

 

  In the absence of any consideration there can be no contract and that is all what is recognised by section 64-VB of the Insurance Act

 

Appeal (civil) 1350 of 2001, PETITIONER: NATIONAL INSURANCE  COMPANY LTD Vs. SEEMA MALHOTRA AND ORS.,DATE OF JUDGMENT:20/02/2001

 

Section 54 of the Contract Act is to be read in that background. It is extracted below:

 

When a contract consists of reciprocal promises,

such that one of them cannot be performed, or that its performance cannot be claimed till the other has been performed, and the promisor of the promise last mentioned fails to perform it, such promisor cannot claim the performance of the reciprocal promise, and must make compensation to the other party to the contract for any loss which such other party may sustain by the non- performance of the contract.

 

In a contract of insurance when an insurer gives a cheque towards payment of premium or part of the premium, such a contract consists of reciprocal promise. The drawer of the cheque promises the insurer that the cheque, on presentation, would yield the amount in cash. It cannot be forgotten that a cheque is a bill of exchange drawn on a specified banker. A bill of exchange is an instrument in writing containing an unconditional order directing a certain person to pay a certain sum of money to a certain person. It involves a promise that such money would be paid.

    Thus, when the insured fails to pay the premium promised, or when the cheque issued by him towards the premium is returned dishonoured by the bank concerned the insurer need not perform his part of the promise. The corollary is that the insured cannot claim performance from the insurer in such a situation.

 

Under Section 25 of the Contract Act an agreement made without consideration is void.

Section 65 of the Contract Act says that when a contract becomes void any person who has received any advantage under such contract is bound to restore it to the person from whom he received it. So, even if the insurer has disbursed the amount covered by the policy to the insured before the cheque was returned dishonoured, insurer is entitled to get the money back.

 

सामनेवाले क्र. 2 यांच्‍याविरुध्‍द तक्रारदार कसूरदार सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द करु शकले नसल्‍याने त्‍यांच्‍याबाबत कोणताही आदेश नाही.

 

उपरोक्‍त चर्चेनुरुप व निष्‍कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

            

               आ दे श

 

  1. तक्रार क्र. 570/2008 फेटाळण्‍यात येते.

  2. खर्चाबाबत आदेश नाही.

  3. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनामुल्‍य विनाविलंब पाठविण्‍यात याव्‍यात.

  4. तक्रारीचे अतिरिक्‍त संच असल्‍यास तक्रारदारास परत करावे

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.