Maharashtra

Thane

CC/11/200

श्री.रमेश सिताराम पाटील - Complainant(s)

Versus

दि मॅनेजर, नवनीत मोटर्स प्रा.लि., - Opp.Party(s)

23 Jul 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/11/200
 
1. श्री.रमेश सिताराम पाटील
एचएसई नं.113,एमएलए हाऊस, जैन मंदीरा जवळ, कलहेर, ता.भिवंडी,
ठाणे
...........Complainant(s)
Versus
1. दि मॅनेजर, नवनीत मोटर्स प्रा.लि.,
प्रिन्‍सीपल ऑफीस नवनीत हाऊस , गोकुळ नगर,मुंबई आग्रा रोड,ठाणे.
ठाणे
महाराष्‍ट्र
2. दि मॅनेजर नवनीत मोटर्स प्रा.लि.,
शोरुम सी विंग, वॉटरफोर्ड बिल्‍डींग, सीडी बर्फीवाला मार्ग, (जुहू ), अंधेरी(वेस्‍ट), मुंबई-400058.
मुंबई
महाराष्‍ट्र
3. दि मॅनेजर, बीएमडब्‍ल्‍यु इंडिया प्रा.लि., ndia Pvt.Ltd.
डीएलएफ सायबर सीटी, फासे II, बिल्‍डींग नं.8, टावर -बी, 7 वा मजला, गुडगांव-122002, हरियाणा (इंडिया)
गुडगांव
हरियाणा
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 23 Jul 2015

मा.अध्‍यक्ष रजेवर

     तक्रारदार गैरहजर. सामनेवाले क्र.  1 व 2  चे वकील सुनंदा आदक हजर. सामनेवाले क्र. 3 चे प्रतिनिधी सुरेंद्र यादव हजर.

    प्रस्‍तुत प्रकरणात आज रोजी तक्रारदारांना पुरावा शपथपत्र दाखल करणेकामी अंतिम संधी देण्‍यात आली होती. तक्रारदार सातत्‍याने गैरहजर आहेत.

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास   प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतिम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.