Maharashtra

Bhandara

CC/20/88

विशाल मोरेश्वलर साखरवाडे व इत्तयर ३ - Complainant(s)

Versus

तालुका कृषी अधिकारी - Opp.Party(s)

श्री. अमोल ए.भुजाडे

13 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/20/88
( Date of Filing : 22 Oct 2020 )
 
1. विशाल मोरेश्वलर साखरवाडे व इत्तयर ३
रा. ऑंबेडकर वार्ड भंडारा. ता.जि.भंडारा.
भंंडारा
महाराष्‍ट्र
2. प्रणाली मोरश्‍वर साखरवाडे
रा. ऑंबेडकर वार्ड भंडारा. ता.जि.भंडारा.
भंंडारा
महाराष्‍ट्र
3. प्रणाली मोरश्‍वर साखरवाडे
रा. ऑंबेडकर वार्ड भंडारा. ता.जि.भंडारा.
भंंडारा
महाराष्‍ट्र
4. प्रशांत मोरेश्‍वर साखरवाडे
रा. ऑंबेडकर वार्ड भंडारा. ता.जि.भंडारा.
भंंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. तालुका कृषी अधिकारी
भडारा
भंंडारा
महाराष्‍ट्र
2. जिल्‍हा कृषी अधिकारी
भडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
3. दि ओरीएंटल इन्‍शुरन्‍स कं. लि.
फेअर टोवर. पुणे.मुंबई रोड. वाकडेवाडी शिवाजी नगर पुणे 5
भंडारा
महाराष्‍ट्र
4. दि ओरीएंटल इन्‍शुरन्‍स कं. लि.
स्‍थानिय शाखा. संत तुकडोजी वार्ड. भारत पेट्र्राेि‍लियम. जिंंदल पेट्रोल पम्‍पचे मागे. भंडारा तह.जि.भंडारा.४४१९०४
भंडारा
महाराष्‍ट्र
5. दि ओरीएंटल इन्‍शुरन्‍स कं. लि.
नागपुर. ४ माळा एस.के.टोवर्स नेल्‍संंन चौक. छिंदवाडा रोड नागपूर-४४००१३
महाराष्‍ट्र
6. जायका इं. ब्रोकरेज प्रा. लि.
२ माळा जायका बिल्डिंग. कमर्शियल रोड. सिव्हीौल लाईन. नागपूर ४४०००१
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 13 Aug 2021
Final Order / Judgement

(पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्‍या)

                                          (पारीत दिनांक13 ऑगस्‍ट,2021)

01.    उपरोक्‍त नमुद  तक्रारदारांनी  प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 35 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1 तालुका कृषी अधिकारी आणि इतर विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्‍यांचे आईचा विषारी सर्पदंशामुळे झालेल्‍या अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

02.      तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

          तक्रारदार क्रं 1 ते 3 हे उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून, त्‍यांची आई नमीता सावजी पडोळे (लग्‍ना नंतरचे नाव शालु मोरेश्‍वर साखरवाडे) ही व्‍यवसायाने शेतकरी होती व तिचे नावाने वडीलोपार्जीत शेती  गट क्रं-159 मौजा झबाडा, तालुका-जिल्‍हा- भंडारा येथे होती. विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 अनुक्रमे तालुका कृषी अधिकारी व जिल्‍हा कृषी अधिकारी असून ते शासनाचे वतीने विमा दावे स्विकारतात. विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-4) विमा सल्‍लागार कंपनी आहे. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारदारांची आई शालु साखरवाडे हिचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा सरकाद्वारे काढण्‍यात आला असल्‍याने आईचे मृत्‍यू नंतर तिची मुले या नात्‍याने तक्रारदार क्रं 1 ते 3 हे  कायदेशीर वारसदार म्‍हणून “लाभार्थी” आहेत.

     तक्रारदारांनी  पुढे असे नमुद केले की, त्‍यांची आई ईतर महिलां सोबत दिनांक-18.11.2018 रोजी सकाळी-8.00 वाजता नत्‍थु वाडीभस्‍मे यांचे शेतात धान कापायला वैनगंगा नदीचे पात्रा जवळ गेली असताना कडबा उचलत असताना  विषारी सापाने तिचे डाव्‍या पायाचे गुडघ्‍या जवळ दंश केल्‍याने तिला सामान्‍य रुग्‍णालय भंडारा येथे उपचारासाठी भरती केले असता तिचा त्‍याच दिवशी वैद्दकीय उपचारा दरम्‍यान  अपघाती मृत्‍यू झाला होता. तिचे मृत्‍यू नंतर त्‍याच दिवशी पोलीसांनी घटनास्‍थळ पंचनामा तयार करुन सर्पदंशामुळे मृत्‍यू झाल्‍याचे नमुद केले. मृतक श्रीमती शालु हिचे दिनांक-19.11.2018 रोजीचे शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये “The Post Mortem findings are consistent with that of death due to Snake Bite” सर्पदंशामुळे मृत्‍यू  असे नमुद केलेले आहे. तक्रारदार कं 1 ते 3 यांचे आईचे मृत्‍यू नंतर त्‍यांचे वडीलांनी विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे कडे रितसर अर्ज संपूर्ण दस्‍तऐवजासह दिनांक-31.01.2019 रोजी दाखल  केला होता परंतु सदर विमा दाव्‍या संबधी काहीही कळविण्‍यात आले नाही त्‍यामुळे माहिती अधिकारा अंतर्गत माहिती मागितली असता विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी असे कळविले की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिनांक-16 डिसेंबर, 2020 रोजी तक्रारकर्ता यांचा विमा दावा 6-ड मध्‍ये नाव नसल्‍याने खारीज केलेला आहे. विमा दावा नामंजूरीचे दिनांका पासून तक्रार मुदतीत आहे. म्‍हणून तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षां विरुध्‍द खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

     विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 4 यांचे कडून वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- मृतकाचे मृत्‍यू दिनांका पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्‍याजासह   देण्‍याचे आदेशित व्‍हावे. तसेच तक्रारखर्च  विरुध्‍दपक्षां कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे. या शिवाय योग्‍य ती दाद त्‍यांचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

03.   तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केली. त्‍यांनी लेखी उत्‍तरात मृतक सौ.शालु मोरेश्‍वर साखरवाडे हिचे अपघाती मृत्‍यू संबधात तिचे पती श्री मोरेश्‍वर गणपत साखरवाडे यांनी विमा दावा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी, भंडारा कार्यालयात दिनांक-02 फेब्रुवारी, 2019रोजी सादर केला होता, त्‍यांनी सदर प्रस्‍ताव जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधिकारी कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी दिनांक-06 फेब्रुवारी, 2019रोजी सादर केला. जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने पुढे तो प्रस्‍ताव जायका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज नागपूर  यांना दिनांक-27 फेब्रुवारी, 2019 रोजी पाठविला. जायका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज नागपूर यांनी तपासणी करुन 6-ड, एफ.आय.आर व ईतर दस्‍तऐवज, आधारकार्ड नसल्‍याने पुर्तता करण्‍यासाठी परत केले. त्‍या अनुसार अध्‍यक्ष नगर परिषद प्रमाणपत्र, पोलीस पाटील प्रमाणपत्र, 6-ड प्रमाणपत्र, एफ.आय.आर. व ईतर कागदपत्र, आधारकार्ड ईत्‍यादी दस्‍तऐवजांची पुर्तता करुन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्‍हा अधिक्षक कृषी कार्यालयात विमा प्रस्‍ताव पुन्‍हा दिनांक-11 सप्‍टेंबर, 2019 ला सादर केला. अशाप्रकारे तालुका कृषी अधिकारी यांनी विमा दावा प्रस्‍तावातील त्रृटींची पुर्तता करुन  विमा दावा प्रस्‍ताव त्‍यांचे वरीष्‍ठ कार्यालय जिल्‍हा कृषी अधिकारी, भंडारा यांचे कडे सादर केलेला आहे. सदर शेतक-याचे नाव 6-ड मध्‍ये नसल्‍याचे कारण दर्शवून विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केलेला आहे. अशाप्रकारे त्‍यांनी विहित मुदतीत त्रृटींची पुर्तता करुन विमा दावा प्रस्‍ताव त्‍यांचे वरीष्‍ठ कार्यालय जिल्‍हा कृषी अधिक्षक  भंडारा यांचे कार्यालयात सादर केला, त्‍यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारदारांना दिलेली नाही, करीता त्‍यांचे लेखी उत्‍तर मान्‍य करण्‍यात यावे अशी विनंती केली.

04    जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांनी लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले.  त्‍यांचे लेखी उत्‍तरा नुसार तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी त्‍यांचे कार्यालयात दिनांक-11 फेब्रुवारी, 2019 रोजी विमा दावा प्रस्‍ताव सादर केला होता, तयांनी सदर विमा दावा प्रस्‍ताव कोणताही विलंब न लावता पुढील कार्यवाहीसाठी जायका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर यांचेकडे दिनांक-27 फेब्रुवारी, 2019 रोजी पाठविला होता. विमा दावा मंजूर करणे वा नामंजूर करणे ही त्‍यांचे कक्षेतील बाब नसल्‍याचे नमुद केले.

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 4 जायका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड यांनी लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्‍यांचे लेखी उत्‍तरा प्रमाणे ते शासन आणि विमा कंपनी यांचे मध्‍ये फक्‍त मध्‍यस्‍थाची भूमीका बजावतात. तसेच विमा दावा प्रस्‍तावातील त्रृटींची पुर्तता करुन पुढे तो विमा दावा प्रस्‍ताव विमा कंपनीकडे पाठवितात. विमा दावा मंजूर करणे वा नामंजूर करणे ही विमा कंपनीचे अधिकारातील बाब आहे. जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फतीने पाठविलेला विमा दावा प्रस्‍ताव त्‍यांना दिनांक-28.02.219 रोजी प्राप्‍त झाला. विमा दावा प्रस्‍तावाचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये काही त्रृटी त्‍यांना आढळून आल्‍यात, त्‍याप्रमाणे त्‍यांनी जिल्‍हा कृषी अधिक्षक यांचे मार्फत तक्रारकर्त्‍या कडे फेरफार-क कागदपत्राची मागणी केली, त्‍या प्रमाणे पुर्तता झाल्‍या नंतर त्‍यांनी सदरचे दस्‍तऐवज दिनांक-30.09.2019 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने कडे पाठविले. अशाप्रकारे त्‍यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडले, त्‍यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्त्‍याला दिलेली नाही, सबब त्‍यांचे  विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती केली.

06.   तक्रारदारांची  तक्रार, त.क. क्रं 1 चा शपथेवरील पुरावा, दाखल दस्‍तऐवज तसेच  विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2अनुक्रमे तालुका कृषी अधिकारी व विमा कंपनीतर्फे लेखी उत्‍तर व दाखल दस्‍तऐवज, विरुध्‍दपक्ष  क्रं 3  व क्रं 4 यांचे लेखी उत्‍तर इत्‍यादीचे अवलोकन करण्‍यात आले. तक्रारदारां तर्फे वकील श्री अमोल भुजाडे तर विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 यांचे प्रतिनिधी आणि वि.प.क्रं 3 विमा कंपनी तर्फे वकील कु.ए.व्‍ही.दलाल मौखीक युक्‍तीवादाचे वेळी उपस्थित होते. विरुध्‍दपक्ष क्रं 4 तर्फे कोणीही मौखीक युक्‍तीवादाचे वेळी उपस्थित नव्‍हते. उपस्थित पक्ष व त्‍यांचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहे-

                                                                                 :: निष्‍कर्ष ::

07.   सदर प्रकरणांत विरुध्‍दपक्ष क्रं.-3 विमा कंपनी तर्फे दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात विम्‍याचे वैध कालावधीत तक्रारदारांचे आईचा सर्पदंशाने वैद्यकीय उपचारा दरम्‍यान दिनांक-18 नोव्‍हेंबर, 2018 रोजी मृत्‍यू झाला होता  या बाबी संबधाने कोणताही विवाद उपस्थित केलेला नाही. विरुध्‍दपक्ष क्रं -3 विमा कंपनीचा मुख्‍य विवाद असा आहे की, अपघाती घटना दिनांक-18 नोव्‍हेंबर, 2018 रोजी मृतक नमीता सावजी पडोळे (लग्‍ना नंतरचे नाव शालु मोरेश्‍वर साखरवाडे) हिचे नावाची नोंद गाव नमुना 6-ड मध्‍ये नव्‍हती, त्‍यामुळे तक्रारदारांचा विमा दावा नामंजूर केला होता. या संदर्भात तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष क्रं 2 जिल्‍हा कृषी अधिक्षक भंडारा यांचे कार्यालयातून माहिती अधिकारा अंतर्गत जी माहिती पुरविली त्‍यानुसार वि.प.क्रं 3 विमा कंपनीने दिनांक-16.12.2020 रोजी तक्रारदारांचा विमा दावा अपघाताचे दिनांकास  6-ड मध्‍ये मृतकाचे नावाची नोंद नसल्‍याचे कारणा वरुन खारीज केला. सदर माहितीचा दस्‍तऐवज अभिलेखावर दाखल आहे. वि.प.क्रं 2 जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा यांनी वि.प.क्रं 4 जायका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रा.लि. नागपूर यांना जे दिनांक-27.02.2019 चे पत्र पाठविले त्‍याचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये विमा दावा प्रस्‍तावातील त्रृटी एफ.आय.आर. , मृतक शेतक-याच्‍या नावावर जुना फेरफार पुढील कार्यवाहीस्‍तव पाठविण्‍यात येत असल्‍याचे नमुद आहे. सदर पत्रा सोबत तलाठी साझा क्रं 24 झबाडा याने दिनांक-26.08.2019 रोजी दिलेल्‍या अहवालात नमीता उर्फ शालु मोरेश्‍वर साखरवाडे राहणार आंबेडकर वार्ड, भंडारा यांची शेतजमीन मौजा झबाडा, गट क्रं 159 आराजी .85 हेक्‍टर आर असून मौजा झाबाडा येथे सदर व्‍यक्‍तीची तलाठी रेकार्डला नमुना-6 ड मध्‍ये कोणतीही नोंद नाही असे नमुद केलेले आहे.

08.   जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे प्रकरणातील दाखल दस्‍तऐवजाचे अवलोकन करण्‍यात आले. दिनांक-25.01.2019 रोजीचे 7/12 उता-या मध्‍ये मृतक नमीता सावजी पडोळे हिचे नावाची नोंद आहे. दिनांक-28 जानेवारी, 2019 रोजीचे गाव नमुना-6-क मध्‍ये मृतक नमीता सावजी पडोळे हिचे मृत्‍यू नंतर तिची मुले अनुक्रमे विशाल मोरेश्‍वर साखरवाडे, प्रणाली मोरेश्‍वर साखरवाडे आणि प्रशांत मोरेश्‍वर साखरवाडे यांचे नावाची फेरफार नोंद दिनांक-08 जानेवारी, 2019 रोजी केलेली आहे.

09.   उपलब्‍ध दस्‍तऐवजा वरुन असे दिसून येते की, तक्रारदारांची आई हिचे लग्‍नापूर्वीचे नाव नमीता सावजी पडोळे असून लग्‍ना नंतरचे नाव शालू मोरेश्‍वर साखरवाडे असे आहे. ज्‍याअर्थी 7/12 चे उता-यामध्‍ये मृतक हिचे लग्‍ना पूर्वीचे नाव नमीता सावजी पडोळे नावाची नोंद आहे, त्‍याअर्थी मृतक नमीता सावजी पडोळे हिचे नावाने लग्‍नापूर्वी पासून वडीलोपार्जीत शेती असल्‍याची बाब सिध्‍द होते. कारण मृतकाचा मृत्‍यू हा लग्‍ना नंतर तीन अपत्‍य झाल्‍या नंतर झालेला आहे. तसेच गाव नमुना-6 क मध्‍ये सुध्‍दा मृतक नमीता सावजी पडोळे हिचे मरणोपरांत तिची मुले अनुक्रमे विशाल मोरेश्‍वर साखरवाडे, प्रणाली मोरेश्‍वर साखरवाडे आणि प्रशांत मोरेश्‍वर साखरवाडे यांचे नावाची फेरफार नोंद झालेली आहे, जर मृतक नमीता सावजी पडोळे (लग्‍ना पूर्वीचे नाव) हिचे नावावर जमीन नसती तर तिचे मुलांचे नावाची फेरफार नोंद करण्‍याचे कोणतेही प्रयोजन नसते. मृतकाचे लग्‍ना नंतरचे नाव शालु मोरेश्‍वर साखरवाडे असे आहे परंतु 7/12 उतारा आणि गाव नमुना-6-क मध्‍ये लग्‍नापूर्वीचे नाव नमीता सावजी पडोळे असा उल्‍लेख असून तिचे मृत्‍यू नंतर तिचे वारसदार मुले यांचे नावाची नोंद झालेली आहे.  या सर्व दस्‍तऐवजी पुराव्‍यां वरुन अपघाताचे दिवशी मृतक शेतकरी होती ही बाब सिध्‍द होते. केवळ गाव नमुना-6 ड मध्‍ये मृतकाचे नाव नाही याचा आधार घेऊन विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनी विमा दावा नामंजूर करु शकत नाही. कारण शेतीची मालकी दर्शविणारे अन्‍य दस्‍तऐवज यांचा सुध्‍दा आधार घेऊन निर्णय घेता येतो. अशाप्रकारे केवळ गाव नमुना-6-ड मध्‍ये अपघाताचे दिनांकास मृतकाचे नावाची नोंद नाही या एकाच कारणा वरुन तक्रारदारांचा अस्सल विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनीने नामंजूर करुन तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते परिणामी त्‍यांना आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे व जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल करावी लागली.

10.    या संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे खालील मा. वरीष्‍ट न्‍यायालयांचे निवाडयाचा आधार घेण्‍यात येतो-

  1.    IV (2012) CPJ 51 (NC) “Reliance General Insurance Company Ltd.-Versus-Sakorba Hethuba Jadeja & Others.

सदर न्‍यायनिवाडया मध्‍ये  शेतकरी अपघात विमा योजना ही दिनांक -26/01/2002 रोजी सुरु झाली होती आणि त्‍यातील शेतकरी श्री हेतुभा जडेजा याचा विद्दुत शॉक लागून मृत्‍यू दिनांक-13.05.2002 रोजी झाला होता, त्‍याचे मृत्‍यू नंतर कायदेशीर वारसदारांनी विमा दावा दाखल केला होता परंतु विमा पॉलिसी जारी केल्‍याचा दिनांक-26.01.2002 रोजी श्री हेतुभा हा नोंदणीकृत शेतकरी नसल्‍याचे कारणावरुन विमा दावा फेटाळला होता. मृतक श्री हेतुभा हा दिनांक-12 एप्रिल, 2002 रोजी नोंदणीकृत शेतकरी झाला होता व तशी नोंद महसूली अभिलेखात घेण्‍यात आली होती. सदर न्‍यायनिवाडयामध्‍ये मा.राष्‍ट्रीय आयोगाने स्‍पष्‍ट केले की, श्री हेतूभा यांचे वडील  श्री बहीरामजी जाडेजा यांचा मृत्‍यू डिसेंबर-2001 मध्‍ये झालेला होता आणि त्‍यांचे वडीलांचे मृत्‍यू नंतर त्‍यांचे सर्व कायदेशीर वारसदार हे कायदेशीर वारसदार होतात आणि महसूली अभिलेखामध्‍ये त्‍यांचे कायदेशीर वारसदारांचे नावाची नोंद होण्‍याची प्रक्रिया व्‍हावयाची होती, त्‍यामुळे श्री हेतुभाचे मृत्‍यू मुळे त्‍याचे कायदेशीर वारसदार हे विमा राशी मिळण्‍यास पात्र असल्‍याचे मत नोंदविले.

  1. Hon’ble Maharashtra State Commission Order in F.A.No.70 of 2008 Order dated-04/09/2009 “I.C.I.C.I. Lombard General Insurance Co.Ltd.-Versus-Smt. Tulsabai B. Kamble

     या प्रकरणा मध्‍ये फेरफारपत्रकामध्‍ये मृतकाचे नावाची नोंद नसल्‍याने विमा दावा फेटाळल्‍याचे विमा कंपनीचे म्‍हणणे होते परंतु मा. महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक आयोगाने स्‍पष्‍टपणे नमुद केले की, मृतक हा 7/12 उता-यावरुन विमा पॉलिसी सुरु झाल्‍याचे दिनांकास  शेतकरी असल्‍याची बाब सिध्‍द होत असल्‍याने वि़मा देय राशी मिळण्‍यास कायदेशीर वारसदार हक्‍कदार ठरतात.

  1. Hon’ble Maharashtra State Commission Order in F.A.No.146 of 2013 Order dated-02/01/2015 “Smt. Sunita Maruti Bagde-Versus-The Oriental Insurance Company Ltd.”

    सदर निवाडयामध्‍ये मा. महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक आयोग यांनी 7/12 चे उता-यामध्‍ये शेती पडीक असल्‍याचे नमुद जरी असले तरी मृतक शेती करीत नव्‍हता असा जो निष्‍कर्ष विमा कंपनीने काढला आहे तो चुकीचा असल्‍याचे नमुद केलेले आहे.

  1.  Hon’ble State Commission Circuit Bench  Nagpur Order in F.A.No.A/16/149 Order dated-20/03/2019 “Tata AIG General Insurance Co.Ltd-Versus- Smt. Asha Gunwant Koche.”
  1. Hon’ble State Commission Circuit Bench Nagpur Order in F.A.No.A/14/219 Order dated-03/02/2017 “United India Insurance Co.Ltd-Versus- Smt. Indubai Waghmare.”

उपरोक्‍त दोन्‍ही नमुद निवाडयां मध्‍ये  मा. राज्‍य ग्राहक आयोग, परिक्रमा खंडपिठ नागपूर यांनी मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोग यांनी IV (2012) CPJ 51 (NC) “Reliance General Insurance Company Ltd.-Versus-Sakorba Hethuba Jadeja & Others पारीत केलेल्‍या निवाडयाचा आधार घेऊन मृतक शेतक-याचे मृत्‍यू नंतर त्‍याचे कायदेशीर वारसदार हे आपोआपच शेतकरी होतात, जरी महसूली अभिलेखामध्‍ये उशिराने मालकी हक्‍काची नोंद घेतली असेल तरी सुध्‍दा ते विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र असल्‍याचे मत नोंदविले आहे.      उपरोक्‍त मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे हातातील प्रकरणात अंशतः लागू पडतात असे मंचाचे मत आहे.

 11.    उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांना  त्‍यांचे आईचे  अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- त्‍यांनी  सर्वप्रथम विमा दावा प्रस्‍ताव तालुका कृषी अधिकारी भंडारा, तालुका- जिल्‍हा भंडारा यांचे कार्यालयात दाखल केल्‍याचा दिनांक-02.02.2020 नंतर महाराष्‍ट्र शासनाचे शेतकरी अपघात विमा योजनेचे परिपत्रका प्रमाणे विमा कंपनीला विमा दावा निश्‍चीतीसाठी 60 दिवसाची मुदत दिलेली असल्‍याने  दोन महिन्‍या नंतर म्‍हणजे  दिनांक-02.04.2020 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्ष क्रं-3 विमा कंपनीकडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित आहे. त्‍याच प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 3 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे  तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक, मानसिक  त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं-3 विमा कंपनीकडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे  मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-1 व क्रं 2 तालुका कृषी अधिकारी, भंडारा तसेच जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍य रितीने पार पाडल्‍यामुळे  त्‍याच बरोबर विरुध्‍दपक्ष क्रं 4 जायका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड यांनी सुध्‍दा त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍य रितीने पार पाडल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

12.       उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन जिल्‍हा ग्राहक आयोगा व्‍दारे  खालील प्रमाणे तक्रारीत आदेश पारीत करण्‍यात येत आहे-

                                                                      :: अंतिम आदेश ::

 (01)    तक्रारदारांची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 3, 3-I, 3-II ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी विरुध्‍द  वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या खालील प्रमाणे  अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02)     विरुध्‍दपक्ष क्रं-3, 3-I, 3-II विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदारांना त्‍यांचे आईचे अपघाती मृत्‍यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) अदा करावी आणि सदर रकमेवर दिनांक-02/04/2020 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याज तक्रारदारांना दयावे.

(03)      विरुध्‍दपक्ष क्रं.- 3, 3-I, 3-II विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं-3, 3-I, 3-II विमा कंपनीने तक्रारदारांना  द्यावेत.

(04)     विरुध्‍दपक्ष क्रं -1 तालुका कृषी अधिकारी, भंडारा, तालुका-जिल्‍हा भंडारा विरुध्‍दपक्ष                क्रं -2 जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05)  विरुध्‍दपक्ष क्रं 4 जायका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(06)    सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-3, 3-I, 3-II विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं -3, 3-I, 3-II विमा कंपनीने न केल्‍यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्‍ये नमुद केलेली देय विमा राशी मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारदारांना  देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं-3, 3-I, 3-II  विमा कंपनी जबाबदार राहिल.

(07)    निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

(08)   उभय पक्षांनी  दाखल केलेले  अतिरिक्‍त संच जिल्‍हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.