जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 103/2022. आदेश दिनांक : 13/02/2023.
गणेश बाबुराव मगर, वय 35 वर्षे, :- तक्रारकर्ता
व्यवसाय : शेती, रा. रामेगांव, ता. जि. लातूर.
विरुध्द
(1) तालुका कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, :- विरुध्द पक्ष
लातूर, तालुका : लातूर, जिल्हा : लातूर.
(2) जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, जिल्हा कृषि अधिकारी कार्यालय,
लातूर, तालुका : लातूर, जिल्हा : लातूर.
(3) शाखाधिकारी, जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड,
दुसरा मजला, जयका बिल्डींग, कमर्शियल रोड,
सिव्हील लाईन्स, नागपूर - 440 001.
(4) विभागीय व्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,
विभागीय कार्यालय, 321/ए/2, ओसवाल बंधू समाज बिल्डींग,
जे.एन. रोड, पुणे - 411 042.
(5) शाखाधिकारी, दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,
शाखा कार्यालय, लोखंडे कॉम्प्लेक्स, पहिला मजला,
सिंध टॉकीजसमोर, सुभाष चौक, लातूर, ता. व जि. लातूर.
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- उमाकांत एम. राऊत
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) दि. 27/4/2022 रोजी प्रस्तुत ग्राहक तक्रार दाखल करण्याचा व विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्याचा आदेश करण्यात आला. मात्र, त्यानंतर विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठविणे / बजावणी करण्यासंबंधी तक्रारकर्ता यांनी पूर्तता केली नाही. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ सातत्यपूर्ण अनुपस्थित आहेत. उचित संधी प्राप्त होऊनही आवश्यक पूर्तता केली नाही. त्यामुळे ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांना स्वारस्य नाही, असे दिसते. ग्राहक तक्रारींचे कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त अनुषंगाने ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/13223)