Dated The 06 Nov 2015
न्यायनिर्णय
(द्वारा सौ. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या)
- तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार सामनेवाले यांचेविरुध्द वैदयकीय निष्काळजीपणा बाबत दाखल केली आहे. तक्रारदारांच्या आई श्रीमती श्यामादेवी यांना “Lumbar Spondylosis” आजारावर डॉ. के.एन. गुप्ता (M.S.) अलाहाबाद येथे उपचार देत होते. डॉ. गुप्ता यांनी उपचारादरम्यान श्यामादेवी यांची MRI तपासणी करण्याचा सल्ला दिला. दि. 04/08/2010 रोजी MRI अहवालानुसार श्यामादेवी यांची Disc L 4-5 दोषयुक्त असल्याचे निष्पन्न झाले.
- तक्रारदार MTNL मुंबई येथे कार्यरत असून सामनेवाले यांचे हॉस्पिटल त्यांचे घराजवळ आहे. त्यामुळे तक्रारदारांनी श्रीमती श्यामादेवी यांचे दोषयुक्त Disc L4-5 बाबतचे ऑपरेशन सामनेवाले यांचेकडे करण्याचे ठरवले.
- सामनेवाले यांनी श्यामादेवी यांची तपासणी केली व ऑपरेशननंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याबाबतचे आश्वासन दिले. तक्रारदारांचे आईच्या दि. 12/08/2010 रोजी झालेल्या ऑपरेशनकरीता सामनेवाले यांनी रु. 1,29,900/- चे बिल दिले रु. 35,000/- चे औषधांचा खर्च झाला. तक्रारदारांनी सामनेवाले यांचे बिल व औषधांचा खर्च केला परंतु दि. 30/08/2010 रोजी डिसचार्ज दिल्यानंतरही श्यामादेवी (पेशंट) यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही, त्यांना बेडवरुन उठून चालता येत नव्हते.
- तक्रारदारांनी सामनेवाले यांचे आश्वासनावर विश्वास ठेवून श्यामादेवी यांना अलाहाबाद येथे घरी पाठवले होते. परंतु त्यांचे प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने डॉ. के.एन. गुप्ता अलाहाबाद यांचेकडे तपासणीसाठी घेऊन गेले. डॉ. गुप्ता यांना श्यामादेवी यांचे ऑपरेशननंतर सुधारणा का झाली नाही? असा प्रश्न पडला. त्यामुळे त्यांनी श्यामादेवी यांची पुन्हा MRI तपासणी करण्यास सांगितले.
- श्रीमती श्यामादेवी यांचे दि. 30/09/2010 च्या MRI अहवालानुसार सामनेवाले यांनी L4-5 disc ऐवजी L2-3 disc चे ऑपरेशन केल्याचे निष्पन्न झाले. सामनेवाले यांचे नि ष्काळजीपणामुळे तक्रारदारांच्या आईला शेवटपर्यंत (Lifelong) बिछान्यावरुन उठता आले नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
-
- तक्रारदारांनी सामनेवाले यांना पाठविलेली तक्रारीची नोटीस “Intimation Posted” या शे-यासह परत आली. तक्रारदारांनी जाहिर प्रकटनाद्वारे सामनेवाले यांना नेाटीसची बजावणी केली. परंतु सामनेवाले गैरहजर असून लेखी कैफियत दाखल नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द प्रस्तत प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.
- तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. असता खालीलप्रमाणे बाबी स्पष्ट होतातः
-
| मुद्दे | निष्कर्ष |
-
| तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(d) नुसार ग्राहक या संज्ञेत येतात का? | होय |
-
| तक्रारदारांना त्यांची आई श्यामलादेवी यांचेवर Discharge card वर नमूद केल्यानुसार दोषयुक्त disc ची शस्त्रक्रिया न करुन त्रुटीची वैदयकीय सेवा दिल्याची बाब तक्रारदारांनी सिध्द केली आहे का? | होय |
क. | तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास पात्र आहेत का? | नियमाप्रमाणे |
कारणमिमांसाः
- तक्रारदारांची आई श्रीमती श्यामलादेवी यांना सामनेवाले यांचे दिपक आर्थोपेडीक अँड जनरल हॉस्पिटल (मिरारोड ठाणे) मध्ये दि. 13/08/2010 जे दि. 30/08/2010 या कालावधीत Spine Surgery करण्यासाठी आंर्तरुग्ण म्हणून उपराचाकरीता दाखल असल्याचे हॉस्पिटलच्या डिसचार्ज कार्ड व इतर दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते. डिसचार्ज कार्डची मूळप्रत मंचात दाखल आहे.
- तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे ऑपरेशनचार्जेस व हॉस्पिटलचे इतर चार्जेसपोटी रु. 1,29,900/- एवढी रक्कम भरणा केल्याबाबतचे बिल मंचात दाखल आहे. तक्रारदारांनी त्यांचे आईचे उपचाराकरीता सामनेवाले यांची वैदयकीस सेवा मोबदला देऊन घेतली असल्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(d) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत येतात असे मंचाचे मत आहे.
ब. श्रीमती श्यामादेवी दि. 04/08/2010 रोजीच्या किर्ती स्कॅनिंग अलाहाबाद येथील MRI अहवालानुसार
Lumbar Spondylosis with mild disc bulge at L1-2, L2-3 & L3-4 levels indenting thecal sac with encroachment of bilateral lateral recesses and intervertebral neural foramina.
Bilateral L4-5 facet degereration with mild L4 anterolisthesis, large posterior L4-5 disc protrusion and ligamentum favum hypertrophy causing severe canal stenosis, narrowing of bilateral recesses and intervertebral neural foramina and compression of thecal sac and cauda equine nerve roots.
Transitional vertebra at lumbo-sacral junction? Sacralization of L5 vertebra.
वरील अहवालामधील असलेल्या medical term हया oxford dictionary व U.S. National Library of Medicine medline Plus तसेच Farlex Dictionary व Dr. John Hesselink, M.D. FACR यांच्या आधारे खालीलप्रमाणे आहेः
Lumber : means relating to lower back
Spondylosis : means painful condition of the spine
resulting from degeneration of inter
vertebral disc.
Lumber spondylosis means denerative
changes in intervertebral disc and facet joints.
Anterolisthesis or
Spondylolisthesis : means forward displacement of one
of the lower lumbar vertebrae over
the vertebrae below it or on the sacrum.
Thecal Sac : Fluid in which spinal cord floats.
Foramina : Opening of either side of the spine where
Nerve exists.
Neural Foramina : Compression of spinal nerve
Stenosis : is a narrowing of any tubular vessel or
structural passageway within body.
Protrusion : Enlargement
Disk Buldge : circum Ferential enlargement of disc
contour in a symmetric fashion.
Ligamentum Flavum: are tough bands of tissue that connect
the vertebrae and provide stability for
good posture & back movement.
Laminectomy: Removal of entire lamina. A portion of
the vertebral arch that serve as an
anchor points for a lingamontum
flavum –It is known as Laminectomy.
Spinal Fusion: Placement of stabilizing implants (metal rods, screws or plates or screens – known as spinal fusion)
Hypertrophy : abnormal enlargement of a part or organ or
excessive growth.
Canal stenosis : narrowing of the spinal canal-or tunnels.
Cquda equine nerve roots : extreme pressure and swelling of
the nerves at the end of the
spinal cord.
Transitional vertebra at Lumbo : Sacral junction
- Assimilation of L5 to sacrum.
Sacralizarion of L5 vertebra : anomalous fusion of fifth
vertebra with the first segment
of the sacrum.
Paraspioral muscle : muscles next to the spine are called
paraspioral muscles.
तक्रारदारांनी दाखल केलेल्या वरील दि. 04/08/2010 रोजीच्या अहवालानुसार L1-2, L2-3 व L3-4 या Vertebra ला Lumbar Spondylosis असून L 4 व L5 Vertebra displaced होऊन overlap झाल्याचे नमूद केले आहे.
सामनेवाले यांचे हॉस्पिटलचे डिसचार्ज कार्डचे अवलोकन केले असता
Diagnosis दि. 19/08/2010
Prolapsed Hard disc L4-5 with cannal stenosis with Recess stenosis with L3-4. Disc Prolaps with Motor Deficit L3 L4 L5 Rood (Lt) with foot drop left side असे नमूद केले आहे.
त्याप्रमाणे तक्रारदारांच्या आईच्या L4 व L5 Vertebra च्या disc Prolapsed (Slipped disc) झाल्याचे दिसून येते. तसेच L3-4 Vertebra येथे Canal Stenosis with Recess Stenosis म्हणजेच आतील बाजूने narrow झाला असल्याचे नमूद केले आहे व त्याप्रमाणे सामनेवाले यांनी खालीलप्रमाणे Treatment (उपचार) दिल्याचे discharge card मध्ये नमूद केले आहे.
Treatment- Paraspiral muscle separated from L3 to S1 level
- Luminectomy of L4 & L5 done
- Thic layered ligamentum Flavum excersied central
canal stenosis.
- Released L4 L5 Recess widening done Bilateraly
- Since L3-4/L4-5 disc is very hard could not be
exercised.
तक्रारदारांच्या आई सामनेवाले यांचेकडे दि. 13/08/2010 ते दि. 30/08/2010 या कालावधीत औषधोपचार घेत होत्या. सामनेवाले यांनी दि. 30/08/2010 रोजी डिसचार्ज दिल्यानंतर त्यांना अलाहाबाद येथे त्यांचे गांवी गेल्यानंतर प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्यामुळे तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्रीमती श्यामलादेवी यांची दि. 30/09/2010 रोजी MRI तपासणी किर्ती स्कॅनिंग सेंटर (p) लि. अलाहाबाद येथे करण्यात आली. दि. 30/09/2010 रोजीच्या सदर अहवालामध्येः
“Post operative laminectomy L2-3 Vertebral Level” असे नमूद करण्यात आल्याचे दिसून येते.
तक्रारदारांनी दि. 30/09/2010 रोजीचा सदर MRI अहवाल “स्वरुप रानी नेहरु चिकित्सालय, इलाहाबाद” यांचेकडे दि. 06/10/2010 रोजी तपासणीसाठी दिला असता डॉ. एन.एन. गोपाल (न्युरो सर्जरी, असिस्टंट प्रोफेसर) यांनी
“Laminoctomy done at L2-3 level
L4-5 disc is as it is”
असे नमूद करुन “Refer back to the operating surgeon for needful” असा शेरा बाहयरोगी टिकट (Out Patient Ticket) वर दिला आहे.
तक्रारदारांच्या आई श्रीमती श्यामलादेवी यांना सामनेवाले हॉस्पिटलचे दि. 13/08/2010 ते दि. 30/08/2010 या कालावधीचे उपचारासंदर्भातील डिसचार्ज कार्डमध्ये नमूद केल्याप्रमाणे सामनेवाले डॉक्टरांनी Laminoctomy of L4 & L5 level केली नसून laminoctomy L2-3 vertebral level ची केल्याचे दि. 30/08/2010 रोजीच्या MRI अहवालानुसार स्पष्ट होते.
सामनेवाले डॉक्टरांनी डिसचार्ज कार्डमध्ये Laminectomy of L4 & L5 done असे नमूद केलेल्या मजकूरानुसार L4 व L5 Vertebra येथे surgery केलेली नसल्याचे तक्रारदारांनी त्यांचे आईचा दि. 30/09/2010 रोजी केलेल्या MRI तपासणी अहवालावरुन स्पष्ट होते. तसेच डॉ. एन.एन. गोपाल यांनी दि. 06/10/2010 रोजीच्या वैदयकीय पेपर्सवर L4-5 disc as it is” असे नमूद करुन “Refer back to the operation surgeon” असा शेरा दिला आहे. यावरुन सामनेवाले डॉक्टरांनी डिसचार्जकार्डमध्ये नमूद केल्याप्रमाणे L4-L5 Vertebra येथे Laminectomy चा उपचार न करता L2-L3 vertebra येथे उपचार केला व सदरची बाब डिसचार्ज कार्डमध्ये नमूद केली नाही. डिसचार्ज कार्डमध्ये L2-L3 Vertebra ची laminectomy केल्याची बाब नमूद केली नाही. अशाप्रकारे डिसचार्ज कार्डमध्ये नमूद केलेला मजकूर व प्रत्यक्षात केलेले ऑपरेशन यामध्ये विसंगती दर्शवून वैदयकीय निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा ब चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
- तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांच्या आई श्रीमती श्यामलादेवी यांचेवर सामनेवाले L2-3 vertebral level ला प्रत्यक्षात सर्जरी केली असून डिसचार्ज कार्डमध्ये L4 &L5 level ला केल्याचे दिसून येते. श्रीमती श्यामलादेवी दि. 04/08/2010 रोजीच्या MRI अहवालानुसार L4 &L5 level ला सर्जरीच्या उपचारांची आवश्यकता असल्याचे दिसते. तसेच सामनेवाले यांनी डिसचार्ज कार्डमध्ये L3, L4 &L5 level ला उपचारांची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. डिसचार्ज कार्डमध्ये L2-L3 level संदर्भातील कोणतीच बाब नमूद नाही. सामनेवाले यांची सदरची कृती “वैदयकीय सेवेतील निष्काळजीपणा” असल्याचे दिसून येते.
-
ड) तक्रारदारांच्या आईचे वय 75 वर्षे असल्याचे डॉ. एन.एन. गोपाल यांचे वैदयकीय कागदपत्रांवर नमूद केल्याचे दिसते. डिसचार्ज कार्डवर 72 वर्षे नमूद आहे. म्हणजेच त्यांचे वय 70 वर्षांपुढील असल्याचे दिसते. दोन्ही MRI अहवालानुसार त्यांचे वयोमानाप्रमाणे Spinal Cord Vertebra तसेच disc चे function व्यवस्थित नसल्याचे दिसून येते. तसेच सामनेवाले डॉक्टरांनी डिसचार्ज कार्डमध्ये नमूद केल्यानुसार L4 &L5 level वर सर्जरी न करता L2 &L3 level वर सर्जरी केल्यामुळे निश्चितच श्रीमती श्यामलादेवी यांच्या प्रकृतीमध्ये योग्यप्रकारे सुधारणा झालेली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे श्रीमती श्यामलादेवी यांचे सर्जरीकरीता रक्कम रु. 1,29,900/- भरणा करुनही योग्यप्रकारे वैदयकीय सेवा प्राप्त न झाल्यामुळे निश्चितच मानसिक, आर्थिक, शारिरीक त्रास झाला आहे. तसेच सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे.
इ) तक्रारदारांच्या तक्रारीस सामनेवाले यांचेतर्फे आक्षेप दाखल नाही. तसेच तक्रारदारांनी तक्रारीमध्ये दाखल केलेले कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद यावरुन तक्रारीतील मजकूर ग्राहय धरणे उचित होईल असे मंचाचे मत आहे.
सबब खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतोः
आ दे श
- तक्रार क्र. 365/2011 मंजूर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांना वैदयकीय सेवा देण्यात निष्काळजीपणा करुन सेवा सुविधा पुरविण्यामध्ये कसूर केल्याचे जाहिर करण्यात येते.
- सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदारांना वैदयकीय बिलाची रक्कम रु. 1,29,900/- तक्रारदार दाखल दिनांकापासून म्हणजेच दि. 05/07/2011 पासून 6% व्याजदाराने दि. 19/12/2015 पर्यंत दयावी. विहीत मुदतीस रक्कम न दिल्यास दि. 20/12/2015 पासून 9% व्याजदराने दयावी.
- सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्कम रु. 50,000/- व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु. 10,000/- दि. 19/12/2015 पर्यंत दयावी. विहीत मुदतीस रक्कम न दिल्यास दि. 20/12/2015 पासून 9% व्याजदराने दयावी.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
- संचिकेच्या अतिरिक्त प्रती तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.