Maharashtra

Aurangabad

CC/13/35

शाहनाबेगम अब्‍दुल कादरी ,वय 38,घरकाम - Complainant(s)

Versus

डॉ नरेंद्र कुलकर्णी,वय मेजर,धधा वैदयकिय अधिकारी - Opp.Party(s)

अॅड एस एस थिटे

30 Jan 2015

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद

________________________________________________________________________________________________

ग्राहक तक्रार क्रमांक :-35/2013          

तक्रार दाखल तारीख :-19/01/2013

निकाल तारीख :- 30/01/2015

________________________________________________________________________________________________

                           श्री.के.एन.तुंगार, अध्‍यक्ष

श्रीमती संध्‍या बारलिंगे,सदस्‍या                        श्री.के.आर.ठोले,सदस्‍य

________________________________________________________________________________________________

                                                                                

 

1.  शहानाबेगम अब्‍दूल जब्‍बर काद्री,

    रा.मदरबाडा ता.भोकरदन जि.जालना

    अॅट प्रझेंट शहा बाजार, औरंगाबाद                    

2.  सना अनंजुम अब्‍दूल जब्‍बार काद्री, वय 17 वर्षे

3.  नेहा तबसुम अब्‍दूल जब्‍बार काद्री, वय 15 वर्षे

4.  समिना अब्‍दूल जब्‍बार काद्री      वय 10 वर्षे

5.  उमे अमन अब्‍दूल जब्‍बार काद्री   वय 8 वर्ष

    सर्व राहाणार अर्जदार नं.1 वरील प्रमाणे             ……..  तक्रारदार          

            

              विरुध्‍द

 

डॉ. नरेंद्र कुलकर्णी,

रा. द्वारा- हेगडेवार हॉस्‍पीटल,

गारखेडा परिसर, औरंगाबाद                         ........ गैरअर्जदार 

________________________________________________________________________________________________

तक्रारदारांतर्फे  – अॅड. गाझी बहुद्दीन

गैरअर्जदारातर्फे  – अॅड. भुषण कुलकर्णी

​________________________________________________________________________________________________

निकाल

 (घोषित द्वारा श्रीमती. संध्‍या बारलिंगे, सदस्‍या)

 

          तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्‍ये दाखल केली आहे.

 

         तक्रारदार क्रं 1 हिचे पती आणि तक्रारदार क्रं 2 ते 5 (Minor) यांचे वडील अब्दुल जब्बार काद्री यांना Kidney Stone चा त्रास होता. त्यांनी गैरअर्जदाराकडून त्याचे उपचार केले. त्यांच्या सल्यानुसार सदर  कारणाकरिता Operation केले. त्याकरिता तो गैरअर्जदारांच्या हॉस्पिटल मध्ये दि.17/6/11 रोजी दाखल झाला. रुग्णाच्या  Ecg, Blood Pressure  इ. तपासण्या केल्या. दि.18/6/11 रोजी सकाळी 11.00 वाजता त्याला  Operation Theatre मध्ये नेण्यात आले. तक्रारदारास असे सांगण्यात आले होते की, Kidney Stone चे Operation  हे Normal Operation असून त्याकरिता 30 ते 60 मिनीटाचा अवधी लागतो. परंतु गैरअर्जदाराने सांगितलेली वेळ टळून गेल्यानंतर देखील रूग्णाला बाहेर आणले नाही म्हणून तक्रारदारांनी दुपारी 2.30 वाजता गैरअर्जदारास Operation विषयी विचारले असता गैरअर्जदाराने टाळाटाळ केली. तक्रारदार व त्याच्या इतर नातेवाइकांनी जबरदस्ती Operation Theatre मध्ये जाऊन पहिले तर रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत होता व त्याला बराच रक्तस्त्राव झालेला होता. गैरअर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे व रक्तस्त्रावामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. गैरअर्जदारांनी सदर बाब उघडकीला येऊ नये याकरिता रुग्णाची Body Postmortem करिता पाठवली नाही. तक्रारदारांनी जवाहरनगर पोलिस स्टेशनला  गैरअर्जदाराविरुद्ध तक्रार नोंदवली होती. रुग्ण हा त्यांच्या कुटुंबाचा एकमेव कमावता व्यक्ति होता. त्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे तक्रारदारांनी रु.10,00,000/- नुकसान भरपाई ची मागणी केली आहे.

 

          गैरअर्जदाराने त्याचा लेखी जवाब दाखल केला. त्यांनी तक्रारदाराच्या पतीचे Operation  केल्याचे मान्य केले आणि इतर मुदद्ये नाकारले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, Kidney Stone च्या Operation करताना stone चे  Size, Location आणि रुग्णाची स्थिती या बाबी देखील महत्वाच्या असतात. रुग्णाच्या सर्व तपासण्या केल्यानंतर त्याला Operation पूर्वी त्याला Anesthesiologist व Physician कडून देखील तपासण्यात आले. त्याला सदर ऑपरेशन विषयी माहिती दिली व त्यातील Possible Risk ची कल्पना दिली. Operation नंतर 2 ते 4 तास त्याला Observation खाली ठेवले होते. त्यानंतर त्याला ICU मध्ये शिफ्ट केले. रुग्णास अनेक दिवसांपासून Kidney Stone( Rental Calculus) चा त्रास होता. तसेच त्याला Hypertension व Polycystic Kidney Disease (Bilaterally) हा आजार होता. या दोन तक्रारी  एकत्रित असताना Stressful Condition मध्ये Heart Attack ची शक्यता असते. Kidney Stone काढताना करावी लागलेली शस्त्रक्रिया व Anesthesia या दोन्ही बाबीं रुग्णाकरिता Stressful परिस्थिती  निर्माण करणार्‍या असू शकतात . रुग्णास व त्याच्या नातेवाइकांना याची पूर्व कल्पना दिलेली होती. रुग्णाचे (L) RENTAL CALICUS चे Operation 12.00 Pm वाजता सुरू झाले आणि 2.30 Pm वाजता संपले. त्यानंतर त्याला Recovery Room मध्ये हलवण्यात आले. Recovery Room मध्ये असताना 4.30 Pm त्याला Severe Heart Attack आला. त्यानंतर रुग्णास ICU मध्ये शिफ्ट केले. रुग्णाच्या नातेवाइकास सदर  परिस्थितीची कल्पना दिली. त्यांची  Consent Form वर सही घेतली. 7.30 Pm पर्यन्त त्याच्या वर उपचार केले. परंतु त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. शेवटी  7.30 Pm वाजता त्याचा मृत्यू झाला. Post Mortem साठी  रुग्णाच्या नातेवाइकांनी नकार दिला. तक्रारदारांनी जवाहरनगर पोलिस स्‍टेशनला तक्रार केल्‍याबद्दल काहीही माहिती नाही. गैरअर्जदाराने सेवेमध्ये कोणतीही त्रुटी दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारची  तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.

          आम्ही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराची तक्रार, गैरअर्जदाराचा लेखी जवाब आणि दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले.

          तक्रारदाराने खालीलप्रमाणे कागदपत्रांच्या प्रती दाखल केल्या  आहेत:- दि.18/6/11 रोजीचे गैरअर्जदाराच्या हॉस्पिटलचे Registration Slip, त्यांची तपासणी केल्यानंतरचे Prescription Card, Pre-Anesthetic Check Up, Anesthesia Repot आणि Indoor Continuation Sheet.

          गैरअर्जदाराने ‘अनुमती पत्र’ व ‘शारीरिक उपाय योजना तथा Anesthesia परवानगी’  पत्राच्या प्रती दाखल केल्या आहेत.

          तक्रारदाराने दाखल केलेल्या Anesthesia Record नुसार, रुग्णावर दि.18.6.2011 रोजी Pylolithotomy  ही शस्त्र क्रिया केली होती. त्याला General Anesthesia दिला होता. Anesthesia Time  12.40 Pm ते  3.00 Pm पर्यंतचा होता. Surgery Time 1.00 Pm To  3.00 Pm इतका होता. Recovery मध्ये ‘Conscious असल्याचे नमूद आहे. Monitoring च्या Table  मध्ये 12.45 Pm ते 2.45 Pm पर्यन्त रुग्णाची शारीरिक स्थिती चे Observations नमूद आहे. सर्वात खाली Patient Shifted To :- Recovery असे नमूद आहे. याचा अर्थ तक्रारदाराचे Operation झाल्यानंतर त्याचे स्थिती सामान्य होती. व तो शुद्धीवर आल्यानंतर त्याला Recovery Room मध्ये हलवण्यात आले होते.  

                       दि.18/6/11 रोजीच्या Indoor Continuous Sheet मध्ये सुरूवातीला त्याच्या ऑपरेशन विषयी Notes लिहिलेल्या आहेत. तसेच त्याला दिलेल्या उपचाराविषयी नोट्स लिहिलेल्या  आहेत. त्याच Sheet मध्ये 4.30 वाजता च्या नोट्स मध्ये त्याला  Recovery नंतर 1 ते 1½ तासानंतर Sudden Cardio Respiratory Arrest झाल्याची नोंद आहे. त्यानंतर त्याला देण्यात आलेले उपचार व ICU मध्ये Shift केल्याची नोंद आहे. 6.30 वाजता रुग्णाच्या नातेवाईकांना सदर बाब  सांगितल्याची नोंद आहे. 7.00 Pm वाजता उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे रुग्णाची मृत्यू झाल्याची नोंद आहे. Cause Of Death Cardio Respiratory Arrest असे दिलेले आहे. त्यानंतरच्या Sheet वर एक Note दिसून येत आहे, त्यात असे लिहिलेले आहे की, ‘रुग्णाचा मृत्यू Operation नंतर ह्रदय विकाराचा तीव्र झटका आल्यामुळे झाला. याची कल्पना आम्हाला डॉक्टरांनी दिली आहे. त्यांचा मृत्यू अचानक झाल्यामुळे मृत्युच्या कारणासाठी  Post Mortem करण्याची इच्छा नाही व आमची संमती नाही.’ या Note च्या खाली रुग्णाचे नातेवाईक A G KADRI यांची स्वाक्षरी दिसून येत आहे.

     

          वरील निरीक्षणावरून असे दिसून येते की, गैरअर्जदाराने दिलेली उपचारपद्धती ही आजाराला अनुसरून योग्य अशी होती.  त्यात कुठेही रुग्णाच्या शारीरिक स्थितीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत नाही. शस्त्र क्रिया करण्याआधी ज्या औपचारिकता पाळायच्या असतात त्या सर्व पाळलेल्या आहेत. Sudden Cardio Respiratory Arrest ही परिस्थिती निर्माण होण्यास डोक्टरांची निष्काळजी अथवा हलगर्जी दिसून येत नाही. ही परिस्थिती Operation नंतर 5% प्रमाणात उद्भवण्याची शक्यता असल्याबाबत गैरअर्जदाराने तक्रारदारास सांगितलेले होते व त्याबाबतच्या  अनुमती पत्रावर रुग्णाच्या पत्नीने म्हणजेच तक्रारदार क्रं 1 ने  सही केल्यावरुन  दिसून येत आहे. Operation नंतर रूग्णाला Recovery Room मध्ये Shift केल्याची नोंद आहे. याचा अर्थ Operation झाल्यानंतर 4.30 वाजेपर्यंत त्याची स्थिती सामान्य होती. Indoor Continuous sheet  वर लिहिलेल्‍या Notes वरुन असे दिसून येते की, दि.18.6.2011 रोजी 4.30 pm ते 7.00 pm  पर्यन्‍त गैरअर्जदाराने रुग्‍णावार उपचार करुन त्‍याला वाचवण्‍यासाठी शर्तीचे प्रयत्‍न केलेले होते.  परंतु उपचाराला प्रतिसाद न दिल्‍यामुळे 7.00 वाजता रुग्‍णाचा मृत्‍यू झाला. यावरुन रुग्णाचा मृत्यू गैरअर्जदाराच्या निष्काळजी पणामुळे झालेला नाही, हे स्‍पष्‍ट होते.

 

          वैद्यकीय क्षेत्रातील अनेक  तज्ञांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे की, अनेक वेळा सर्व प्रयत्न केल्यानंतर देखील Operation नंतर 5 ते 10% केसेस मध्ये बिकटाची (Complications) परिस्थिती  निर्माण होऊ शकते. परंतु त्यावरून डॉक्टरांचा दोष किंवा निष्काळजी असल्यामुळे तसे झाल्याचे निष्पन्न होत नाही. ज्या डॉक्टरांनी रुग्णावर उपचार केलेले आहे ते डॉक्टर रुग्णास झालेल्या आजाराच्‍या विषयातील तज्ञ आहेत. त्यामुळे रूग्णाला दिलेल्या उपचारामध्ये कोणतीही दिरंगाई किंवा दिशाहीन उपचार केल्याचे दिसून येत नाही. शस्त्र क्रिये नंतर देखील रुग्ण शुद्धीवर आल्याचे Anesthesia Record मध्ये नमूद आहे सदर प्रकरणात डॉक्टरांनी पुरेपूर खबरदारी घेऊन शस्त्र क्रिया केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने सेवेमध्ये त्रुटी दिली नाही, असे आमचे मत आहे.

       

          मा. सर्वोच्च न्यायालयाने Kusum Sharma & others vs. Batra hospital & medical research centre [1 (2010) CPJ 29 (SC)] मधील न्याय निवाड्यात मध्ये खालीलप्रमाणे निरीक्षण केलेले आहे :-   

‘The medical profession is often called upon to adopt a procedure which involves higher element of risk, but which he honestly believes as providing greater chances of success for the patient rather than a procedure involving lesser risk but higher chances of failure . Just because a professional is looking to the gravity of illness & has taken higher element of risk to redeem the patient out of his/her suffering, which did not yield the desired result may not amount to negligence’

वरील निरीक्षण आमच्या मतास पुष्टी देणारे आहे. त्यामुळे तक्रारदार कोणत्याही नुकसान भरपाईस पात्र ठरत नाहीत.    

 

          वरील कारणामुळे हा मंच खालील आदेश पारित करत आहे.

आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
  2.  खर्चाबद्दल आदेश नाही.                         

 

         

           (श्रीमती संध्‍या बारलिंगे)        (श्री.किरण.आर.ठोले)       (श्री.के.एन.तुंगार)

            सदस्‍या                    सदस्‍य                 अध्‍यक्ष

 

               

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.