Maharashtra

Bhandara

CC/22/76

अनुसुया पुरुषोत्‍तम हुकरे. - Complainant(s)

Versus

डिव्‍हीजनल मॅनेजर. दि ओरीयंटल इंश्‍युरन्‍स कं.लि. - Opp.Party(s)

श्री.उदय क्षीर्सागर

16 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/22/76
( Date of Filing : 17 May 2022 )
 
1. अनुसुया पुरुषोत्‍तम हुकरे.
रा.पो.जैतपूर. ता.लाखांदूर जि.भंडारा.
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. डिव्‍हीजनल मॅनेजर. दि ओरीयंटल इंश्‍युरन्‍स कं.लि.
डिव्‍हीजनल मॅनेजर डिव्‍हीजन नं.3, 321.ऐ.2 ओसवाल बंधु समाज बिल्‍डींग जे.एन.रोड, हॉटेल सेव्‍हन लव्‍हज समोर पुणे. 411042
पुणे
महाराष्‍ट्र
2. क्षेत्रीय कार्यालय, दि ओरीयंटल इंशुरन्‍स कं.लि
पागलखाना चौक, छिंदवाडा रोड, नागपूर.
नागपुर
महाराष्‍ट्र
3. तालुका कृषी धिकारी लाखांदूर.
ता.लाखांदूर जि.भंडारा.
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 16 Jan 2023
Final Order / Judgement

 (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्‍या)

                     

   

01.  तक्रारकर्तीने  प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या  कलम 35 खाली विरुध्‍दपक्ष ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी आणि इतर यांचे विरुध्‍द तिचा  मृतक पती याचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी दाखल केलेली आहे.

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे

    तक्रारकर्त्‍याचे  तक्रारी प्रमाणे तिचा  मृतक पती श्री पुरुषोत्‍तम चेपटू हुकरे हा शेतकरी होता  आणि त्‍याचा विमा शासनाने काढलेला होता आणि विम्‍याचे वैध कालावधीत त्‍याचा अपघाताने मृत्‍यू झाल्‍याने मृतकाची पत्‍नी आणि कायदेशीर वारसदार या नात्‍याने विमा दाव्‍याची रक्‍कम मिळावी यासाठी तिने जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर प्रस्‍तुत तक्रार दाखल केली. तक्रारी मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे तिचे मृतक पतीची माहिती खालील विवरणपत्रामध्‍ये देण्‍यात येते-

मृतक शेतक-याचे नाव

श्री पुरुषोत्‍तम चेपटू हुकरे

मृतकाचे नावे असलेल्‍या शेतीचा तपशिल

मृतक श्री पुरुषोत्‍तम चेपटू हुकरे याचे मालकीची मौजा मौजा जैतपूर, तालुका लाखांदूर,  जिल्‍हा भंडारा येथे भूमापन क्रं 199/2 शेती आहे.

अपघाती मृत्‍यूचा दिनांक

28/10/2018

 

मृत्‍यूचे कारण

दिनांक-28.10.2018 रोजी शेतात विषारी औषधाची फवारणी केल्‍या नंतर नाकातोंडात विष गेलयाने विषबाधा होऊन  मृत्‍यू झाला.

तालुका कृषी अधिकारी यांचे कडे विमा दावा सादर केल्‍याचा दिनांक

21/12/2021

.क.चे विमा दाव्‍या संबधात सद्द स्थिती काय आहे

विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तिचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर केल्‍याचे तिला आज पर्यंत  कळविलेले नाही.

 

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्‍दपक्ष क्रं 2  विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी असून त्‍यांचे मार्फतीने विमा दावा निर्णयार्थ विमा कंपनी कडे पाठवितात. सदर विमा पॉलिसी प्रमाणे अपघाती मृत्‍यू संबधात कायदेशीर वारसदारास रुपये-2,00,000/- एवढी रक्‍कम मिळणार होती. परंतु विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दाव्‍या बाबत आज पर्यंत तिला न कळवून दोषपूर्ण सेवा दिली, त्‍यामुळे तिला  शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून शेवटी तिने  प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षां विरुध्‍द खालील मागण्‍या केल्‍यात-

 

1.    विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्तीला विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- विमा दावा प्रस्‍ताव दाखल केल्‍याचा दिनांक-21/12/2021 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचे आदेशित व्‍हावे

 

2.    तिला झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्‍दपक्षां कडून मिळावा. या शिवाय योग्‍य  ती दाद तिचे  बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

03.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा प्रमाणे मृतक हा शेतकरी असल्‍याची बाब मान्‍य केली. विमा कंपनीने असे नमुद केले की, मृतकाचा मृत्‍यू दिनांक-28.10.2018 रोजी झाला ही बाब मान्‍य आहे परंतु शेतात रासायनिक औषधांची फवारणी करताना औषध नाकातोंडात गेल्‍याने मृत्‍यू झाला ही बाब नामंजूर केली. मृतकाचे शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये मृतकाचा मृत्‍यू नेमका कोणत्‍या कारणा मुळे झाला ते नमुद केलेले नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी मध्‍ये विमा प्रस्‍ताव दाखल झाल्‍या नंतर तक्रारकर्तीला कळविले होते की, तिने तिचे पतीचे मृत्‍यू संबधात व्‍हीसेरा रिपोर्ट दाखल करावा कारण शवविच्‍छेदन करणा-या डॉक्‍टरांनी तयांचे मत व्‍हीसेरा रिपोर्टसाठी राखून ठेवलेले होते. तसेच मृत्‍यू सन 2018 मध्‍ये झालेला असताना विमा दावा प्रस्‍ताव सन 2021 मध्‍ये पाठविला. तक्रारकर्तीला विमा दावा दाखल करण्‍यास झालेल्‍या विलंबा बद्दल सुस्‍पष्‍ट कारणे दिलेली नाहीत. अशा परिस्थितीत मृतकाचा मृत्‍यू हा अपघातामुळे झाला ही बाब सिध्‍द होऊ शकलेली नाही.  तक्रारकर्तीला मागणी केलेले दस्‍तऐवज न पुरविता सरळ सरळ  ही तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली असल्‍याने तक्रार अपरिपक्‍व असून पळवाट शोधलेली आहे. सबब तक्रारकर्तीच्‍या सर्व मागण्‍या या नामंजूर करण्‍यात येतात. विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली.

 

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, लाखांदूर, जिल्‍हा भंडारा यांना जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविण्‍यात आली. पोस्‍ट विभागाचे पोस्‍ट ट्रॅक रिपोर्ट नुसार सदर नोटीस विरुध्‍दपक्ष क्रं 3  तालुका कृषी अधिकारी यांना दिनांक-27.07.2022 रोजी तामील झाल्‍याची बाब दिसून येते. परंतु अशी नोटीस मिळूनही विरुध्‍दपक्ष क्रं 3 हे जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाहीत तसेच त्‍यांनी कोणतेही लेखी निवेदन जिल्‍हा आयोगा समक्ष दाखल केले नाही करीता विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश जिल्‍हा ग्राहक आयोगाने तक्रारी मध्‍ये दिनांक-13.12.2022 रोजी पारीत केला.

 

 

05.  तक्रारकर्तीची तक्रार, दाखल दस्‍तऐवज, शपथे वरील पुरावा व लेखी युक्‍तीवाद तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्‍तर व शपथे वरील पुरावा  याचे अवलोकन  करण्‍यात आले. तक्रारकर्ती   तर्फे  वकील श्री उदय क्षिरसागर तर  विरुध्‍दपक्ष  क्रं 2 विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती निला नशीने यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहे- 

 

                                                                                ::निष्‍कर्ष::

 

06.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा प्रमाणे मृतकाचा मृत्‍यू दिनांक-28.10.2018 रोजी झाला ही बाब मान्‍य आहे परंतु शेतात रासायनिक औषधांची फवारणी करताना औषध नाकातोंडात गेल्‍याने मृत्‍यू झाला ही बाब नामंजूर असून  मृतकाचे शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये मृतकाचा मृत्‍यू नेमका कोणत्‍या कारणा मुळे झाला ते नमुद केलेले नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी मध्‍ये विमा प्रस्‍ताव दाखल झाल्‍या नंतर तक्रारकर्तीला कळविले होते की, तिने तिचे पतीचे मृत्‍यू संबधात व्‍हीसेरा रिपोर्ट दाखल करावा कारण शवविच्‍छेदन करणा-या डॉक्‍टरांनी तयांचे मत व्‍हीसेरा रिपोर्टसाठी राखून ठेवलेले होते. तसेच मृत्‍यू सन 2018 मध्‍ये झालेला असताना विमा दावा प्रस्‍ताव सन 2021 मध्‍ये पाठविला. तक्रारकर्तीला विमा दावा दाखल करण्‍यास झालेल्‍या विलंबा बद्दल सुस्‍पष्‍ट कारणे दिलेली नाहीत. अशा परिस्थितीत मृतकाचा मृत्‍यू हा अपघातामुळे झाला ही बाब सिध्‍द होऊ शकलेली नाही.  तक्रारकर्तीला मागणी केलेले दस्‍तऐवज न पुरविता सरळ सरळ  ही तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली असल्‍याने तक्रार अपरिपक्‍व असून पळवाट शोधलेली आहे.

 

07.     जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने सरळ सरळ मृतकाचा अपघाती मृत्‍यू झाला होता ही बाब केवळ व्‍हीसेरा दसतऐवजाचे अभावी नामंजूर केलेली आहे, व्‍हीसेरा रिपोर्ट मागविण्‍याची जबाबदारी ही संबधित जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक/पोलीस विभागाची आहे, व्‍हीसेरा रिपोर्ट ही बाब तक्रारकर्तीचे हातातील नाही. मृतकाचा मृत्‍यू हा अपघातामुळे झाला किंवा कसे हे पाहण्‍यासाठी प्रकरणातील पोलीस दस्‍तऐवजांचे अवलोकन होणे आवश्‍यक आहे. पोलीस स्‍टेशन दिघोरी, तहसिल पवनी, जिल्‍हा भंडारा यांनी उपविभागीय अधिकारी साकोली, जिल्‍हा भंडारा यांना जो अकस्‍मात मृत्‍यू सारांश अहवाल दाखल केलेला आहे त्‍यामध्‍ये स्‍पष्‍टपणे असे नमुद आहे की, मृतक हा स्‍वतःचे शेतात धानाचे पिकाला विषारी फवारणी औषध करीत असताना त्‍याचे नाकातोंडात विषारी औषध गेलयाने उपचारा दरम्‍यान मृत्‍यू झालेला आहे. तसेच पोलीस स्‍टेशन दिघोरी, उपविभाग पवनी, जिल्‍हा भंडारा यांचे अकस्‍मात मृत्‍यू सुचने मध्‍ये सुध्‍दा मृत्‍यूचे कारण विषारी औषधामुळे मृत्‍यू दिनांक-28.10.2018 रोजी झाल्‍याचे नमुद आहे. पोलीस मरणान्‍वेषन प्रतिवृत्‍त पोलीस स्‍टेशन कळंब, तहसिल भंडारा यांचा मरणान्‍वेषन प्रतीवृत्‍त दाखल आहे.  मेडीकल ऑफीसर,  जनरल हॉस्‍पीटल भंडारा यांचे शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये अक्रं 5 मध्‍ये असे नमुद आहे की, “Police Inquest Panchama-According to Police Inquest Panchama probable cause of death may be due to acute poisioning  ” शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये केमीकल अॅनालायसीस बाबत पुढील नमुने घेतलयाचे  नमुद आहे

Bottle No. 1) Stomach and Coop intestine with their contents

Bottle No. 2) 1/3rd Liver, ½ Spleen, ½ of each of kidney, piece of Brain

Bottle No. 3) Blod sample for Chemical Analysis

Opinion as to the cause probable cause of death- Opinion regarding cause of death could not be given as Vissera is preserved for Chemical Ananysis. Final opinion will be given aftger Viseera/Chemical Analysis Report.

 

 

      यावरुन वैददकीय अधिकारी, जनरल हॉस्‍पीटल भंडारा यांनी सुध्‍दा त्‍यांचे शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये पोलीस इन्‍क्‍वेस्‍ट पंचनाम्‍या मधील मृत्‍यूचे कारण हे विषारी औषधीमुळे झाल्‍याचे नमुद केलेले आहे. जर शवविच्‍छेदन अधिकारी यांना मृतकाचे अपघाती मृत्‍यू बद्दल शंका आली असती तर त्‍यांनी पोलीसांचे इन्‍क्‍वेस्‍ट पंचनाम्‍याचा उल्‍लेखच केला नसता. वैद्दकीय अधिकारी यांनी मृत्‍यूचे कारण हे फक्‍त रासायनिक अहवालासाठी  राखून ठेवलेले आहे असे दिसून येते.  व्‍हीसेरा रिपोर्ट आणणे हे काम तक्रारकर्तीचे नाही असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

08.   तक्रारकर्तीने आपले  शपथे वरील पुराव्‍या मध्‍ये असे नमुद केलेले आहे की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीला तिचे पतीचे मृत्‍यू संबधात रासायनिक विश्‍लेषण अहवाल मागणी करणारे पत्र दिले होते असे लेखी उत्‍तरात नमुद केलेले आहे परंतु त्‍यांनी अशा पत्राची कोणतीही प्रत अभिलेखावर दाखल केलेली नाही.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने प्रकरणात रासायनिक विश्‍लेषण अहवाल मागणी करणारे कोणतेही पत्र दाखल केलेले नाही असे दिसून येते.  

 

09.  जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असेही मत आहे की महाराष्‍ट्र शासनाचे निर्णया नुसार एखादा दस्‍तऐवज उपलब्‍ध नसेल तर अन्‍य पर्यायी उपलब्‍ध दस्‍तऐवजांचे आधारे निष्‍कर्ष काढून अपघाती मृत्‍यू संबधात विमा दावा निकाली काढता येतो.  दुसरी महत्‍वाची बाब अशी आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने आपले शपथे वरील पुराव्‍यात असेही नमुद केलेले आहे की, त्‍यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला होता पंरतु तो कधी नामंजूर केला होता त्‍याचा उल्‍लेख केलेला नाही तसेच विमा दावा नामंजूरीची प्रत तसेच सदर पत्र तक्रारकर्तीला पाठविल्‍या बाबत रजि. पोच असा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.  जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने कोणतेही सबळ कारण नसताना तक्रारकर्तीचा विमा दावा हा निष्‍कारण इतके दिवस प्रलंबित ठेऊन तिचे पतीचे अपधाती मृत्‍यू संबधात विमा रक्‍कम न देऊन तक्रारकर्तीला वंचित ठेऊन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे, त्‍यामुळे तिला निश्‍चीतच आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या बाबी पुराव्‍यानिशी सिध्‍द झालेल्‍या आहेत

 

10.   तक्रारकर्तीचे वकील श्री उदय क्षिरसागर यांनी खालील मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयांवर भिस्‍त ठेवली, त्‍या निवाडयांचे जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे काळजीपूर्वक वाचन करण्‍यात आले त्‍यातील संक्षीप्‍त निरिक्षणे नोंदविण्‍यात आलीत, ती निरिक्षणे खालील प्रमाणे आहेत-

 

  1. IV (2011) CPJ 243 (NC)- “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Venkatesh Babu”

      सदर प्रकरणात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, पोलीसानीं नोंदविलेला एफआयआर आणि जबाब हा पुराव्‍याचे कायद्दा नुसार भक्‍कम पुरावा आहे असे म्‍हणता येणार नसल्‍याने पोलीसांचे दस्‍तऐवजाचा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला फायदा घेता येणार नसल्‍याचे मत नोंदविले.

                                ***** 

 

  1. 2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka

      सदर प्रकरणात मा.राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी असे नमुद केले की,  पोलीसानीं गुन्‍हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्‍हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचा तर्फे जबाब देणा-याची साक्ष घेतल्‍या जात नाही असे मत नोंदविले.

                                ***** 

 

  1.  III (2016) CPJ-574 (NC) “S.B.I.Life Insurance Co.-Versus-Sudesh

           Khanduja & Anr.”

      सदर प्रकरणात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने डॉक्‍टरांचा अहवाला वरुन मृतकाने विष घेतले किंवा नाही हे स्‍पष्‍ट होऊ शकले नाही. पोलीसांनी घेतलेल्‍या जबाबाचा आधार हा विमा दावा नामंजूर करताना विमा कंपनीला घेता येणार नसल्‍याचे मत नोंदविले.

                                      *****    

 

  1. 2016 (4) CPJ 574 (NC) “United India Insurance Company-Versus- Shankarlal”

                                    ***** 

 

  1. (2015) CPJ 307 (NC)-“United  India Assurance Co.Ltd.-Versus-Saraswatabai Balabhau Bharti”

      सदर प्रकरणात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, मृतकाने विष प्राशन केले होते या संबधाने पुरावा आलेला नसल्‍याने त्‍याने आत्‍महत्‍या केली होती असा निष्‍कर्ष काढता येणार नसल्‍याचे मत नोंदविले.

                                      ***** 

  1.  Order of Hon’ble State Comission, Nagpur in First Appeal No. –A/06/231 “Branch Manager United India Insurance Company-Versus- Smt. Subhadra Gaike”, Order dated-21/09/2021

      उपरोक्‍त नमुद मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडयां मधील काही तत्‍वे (Ratio) हातातील प्रकरणात काही अंशी लागू पडतात असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

                                   ***** 

 

 

11.   जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे  खालील मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडयांवर भिस्‍त ठेवण्‍यात येते-

 

1.    Hon’ble State Consumer Dispute Redressal Commission, Mumbai, Circuit Bench at Aurangabad, First Appeal No.FA/427/2011, Decided on-21/11/2011-“United India Insurance Company Ltd.-Versus-Smt.Sumanbai Rangrao Mugal and others”

        मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांनी आदेशा मध्‍ये  स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, सदर मृत्‍यू प्रकरणात पोलीसांनी फौजदारी प्रक्रिया संहिते अंतर्गत कलम 174 अनुसार गुन्‍हा नोंदविलेला असून पोलीस चौकशी प्रलंबित आहे. विमा कंपनीने मृतकाने आत्‍महत्‍या केल्‍या बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही, जेणे करुन ही बाब सिध्‍द होईल की, मृतकाने आत्‍महत्‍या केलेली आहे.  

                                                                 ***** 

 

2.      Hon’ble National Consumer Commission, New Delhi-Consumer Case No.-100 of 2013 Decided on-01 March, 2019- “MS. Manisha Gupta & 03 others-Versus-M/s Birla Sun Life Insurance Company Ltd.” 

     मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग यांनी दिलेल्‍या निवाडया मध्‍ये   रासायनिक विश्‍लेषक विभागाचे (Dept. of Forensic Medicine)  अहवाला मध्‍ये  मृतकाने  सायनाईड प्राशन करुन (No evidence of consumption of cyanide by late Ajay Gupta was found) आत्‍महत्‍या केल्‍या बाबतचा कोणताही पुरावा आढळून न आल्‍याने अपिलार्थी-मूळ तक्रारकर्तीचे अपिल मंजूर केले.

                                                                      ***** 

 

3.  Hon’ble National Consumer Commission, New Delhi-Revision Petition No.-421 of 2013 Decided on-05 Sep., 2019- “Oriental Insurance Company Ltd.-Versus-Rishikesh Sandeep Kale & 04 others.” 

    मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्‍ये मृतकाने आत्‍महत्‍या केल्‍या बाबतचा कोणताही पुरावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनी दाखल न करु शकल्‍याने विमा कंपनीचे अपिल खारीज केले. उपरोक्‍त नमुद मा.वरीष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे हातातील प्रकरणात लागू होतात असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

                                                                       ***** 

उपरोक्‍त मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे हातातील प्रकरणात वस्‍तुस्थितीचा तपशिल वगळता त्‍यातील काही तत्‍वे  लागू होतात आणि सदर न्‍यायनिवाडे आमचेवर बंधनकारक आहेत. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारुन दोषपूर्ण सेवा दिली असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

     या व्‍यतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे खालील मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडयांवर भिस्‍त ठेवण्‍यात येते-

 

  1.           Hon’ble State Commission Circuit Bench at Nagpur First Appeal No.-1/17/34-“Tata AIG-Versus-Smt.Charu Mahendra Bhope” Order dated-20.03.2019

 

       मा. राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ नागपूर यांनी आपल्‍या अपीलीय निवाडया मध्‍ये खालील मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयांवर भिस्‍त ठेवली-

 

A            I (2015)CPJ 146 (NC) “Bajaj Allianz General Insurance Company Ltd.-Versus-  Achala Rudranwas Marde”

 

B                 III (2015)CPJ 104 (NC) “M.Sujatha-Versus-Bajaj Allianz General       Insurance   Company Limited”

 

C                2015(2) CPR 316 (NC) “Executive Engineer, IPH Division-Versus-     Shisma Devi  and others.

 

D               2015 (2) CPR 345 (NC) “New India Assurance Co.Ltd.-Versus-Ashminder   Pal Singh”

 

 

सदर मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडयांवरुन मा.राज्‍य ग्राहक आयोग  खंडपिठ नागपूर यांनी पुढील प्रमाणे मत नोंदविले-

       “The Ratio laid down in the above mentioned authorities can be broadly drawn as that mere postmortem and Forensic Science Laboratory report cannot be a conclusive proof to repudiate the claim under the exclusion clause of influence of alcohol at the time of Accident.”

          सदर मा.न्‍यायनिवाडयांचे आधारे विमा कंपनीने केलेले अपिल मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ नागपूर यांनी फेटाळले असून जिल्‍हा ग्राहक आयोग, नागपूर यांनी दिलेला आदेश कायम ठेवला. मा. राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ नागपूर यांनी अपिलीय प्रकरणात पारीत केलेला आदेश आमचे समोरील हातातील प्रकरणात लागू पडतो असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

                                                                      ****** 

 

  1.        Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- I (2018)CPJ 541 (NC) “Anil Kumar-Versus-National Insurance Company Limited and others”

 

उपरोक्‍त न्‍यायनिवाडया मध्‍ये मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने पुढील प्रमाणे मत नोंदविले- “Case history reveals factum of alcohol influence without any supportive or cogent evidence it cannot be concluded as person was under alcohol influence”

                                                                          ******

 

  1.         Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- I (2015)CPJ 146 (NC) “Bajaj Allianz General Insurance Company Ltd.-Versus-Achala Rudranwas Marde”

 

उपरोक्‍त न्‍यायनिवाडया मध्‍ये मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने पुढील प्रमाणे मत नोंदविले- “Gross post-mortem findings are not supported by any histopathological evidence of acute Alcohol injury to liver”

                                                     ******

 

  1.         Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- III (2015)CPJ 104 (NC) “M.Sujatha-Versus-Bajaj Allianz General Insurance Company Limited”

उपरोक्‍त न्‍यायनिवाडया मध्‍ये मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने पुढील प्रमाणे मत नोंदविले-Mere smell of alcohol or presence of ethyl alcohol in tissue samples cannot lead to inference that a person is incapable of taking care of himself”

                                                          ******

 

  1.         Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- 2015(2) CPR 316 (NC) “Executive Engineer, IPH Division-Versus-Shisma Devi and others.

 

      उपरोक्‍त न्‍यायनिवाडया मध्‍ये मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने पुढील प्रमाणे मत नोंदविले- “It would not be just fair and reasonable to deny benefit of insurance policy to complainants only on the basis of report of State Forensic Science Laboratory” उपरोक्‍त मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचा न्‍यायनिवाडा आमचे समोरील हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो याचे कारण असे की, केवळ राज्‍य न्‍यायवैद्दक विज्ञान प्रयोगशाळा (Statel Forensic Science Laboratory) यांनी दिलेल्‍या अहवालाचे आधारे विमा कंपनीला विमा दाव्‍याची रक्‍कम नामंजूर करता येणार नाही असे मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने स्‍पष्‍ट केलेले आहे. आमचे समोरील हातातील प्रकरणात प्रादेशिक न्‍यायवैद्दक विज्ञान प्रयोगशाळा नागपूर (Regional Forensic Science Laboratory, State of Maharashtra, Nagpur) यांचा अहवालाच अभिलेखावर नाही.

                                                                  ******

 

  1.         Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi-  2015 (2) CPR 345 (NC) “New India Assurance Co.Ltd.-Versus-Ashminder Pal Singh”

 

उपरोक्‍त न्‍यायनिवाडया मध्‍ये मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने पुढील प्रमाणे मत नोंदविले- “Car Accident claim Repudiated-On ground of smell of alcohol- Appellant Insurance Company not provided evidence of proof that Respondent Insurer under influence of intoxication at the  time of accident”

                                                                           ****** 

 

  1.        Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- III( 2011) CPJ 232 (NC)  “Life Insurance Corporation.-Versus-Ranjit Kaur”

उपरोक्‍त न्‍यायनिवाडया मध्‍ये मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने पुढील प्रमाणे मत नोंदविले- Mere presence of alcohol even above usually prescribed limits is not a conclusive proof of intoxication”

 

    उपरोक्‍त मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडयां मधील तत्‍वे काही अंशी हातातील प्रकरणात लागू होतात परंतु विरुदपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल होई पर्यंत निषकारण प्रलंबित ठेऊन तिला दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते.

 

12.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरात असेही नमुद केले की, मृतकाचा मृत्‍यू हा सन 2018 मधील असून तक्रारकर्तीने विमा दावा हा सन 2021 मध्‍ये दाखल केला त्‍यामुळे तक्रार मुदतीत नाही या संदर्भात जिल्‍हा आयोगाव्‍दारे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तक्रारकर्ती ही ग्रामीण भागातील निरक्षर स्‍त्री असून तिला विमा दाव्‍या संबधात फारशी माहिती नसून ती अज्ञानी आहे. तसेच पतीचे अपघाती मृत्‍यू मधून सावरलया नंतर दसतऐवजांची जुळवाजुळव करुन  तिने  विमा दावा दाखल केलेला आहे.   शेतकरी अपघात विमा योजना ही शासनाने शेतक-यांचे अपघाती मृत्‍यू नंतर त्‍यांचे कुटूंबियांना विमा रकमेची मदत मिळावी या उद्दात हेतूने चालविलेली कलयाणकारी योजना आहे  आणि अशा आशयाचे अनेक न्‍यायनिवाडे मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांनी वेळोवेळी पारीत केलेले आहेत त्‍यामुळे विमा दावा मुदतीत दाखल केलेला नाही या विमा कंपनीचे आक्षेपा मध्‍ये जिल्‍हा ग्राहक आयोगास कोणतेही तथ्‍य दिसून येत नाही.

 

 

13.  आम्‍ही महाराष्‍ट्र शासनाचे कृषी, पशुसवंर्धन, दुग्‍ध व्‍यवसाय व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक-19 सप्‍टेंबर, 2019 रोजीचे परिपत्रकाचे वाचन केले, त्‍यामध्‍ये विमा कंपनी या सदरा खाली विमा कंपनीस सुचना दिलेल्‍या आहेत, त्‍यामधील विमा दावा निकाली काढण्‍यासाठी काही सुचना पुढील प्रमाणे आहेत.

 

अक्रं-9 विमा कंपन्‍यांना सुस्‍पष्‍ट कारणां शिवाय विमा प्रस्‍ताव नाकारता येणार नाहीत. विमा कंपन्‍यांनी नामंजूर विमा दाव्‍या प्रकरणी सुस्‍पष्‍ट कारणमीमांसा संबधित शेतक-यांना कटाक्षाने मराठी भाषेतच कळविले व  त्‍याची प्रत विमा सल्‍लागार कंपनी/आयुक्‍त कृषी/ सहसंचालक कृषी/ जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्‍याकडे पाठविणे व विमा संगणक प्रणाली मध्‍ये नोंद घेणे अनिवार्य आहे.

 

अक्रं-10 विमा प्रस्‍तावात त्रुटी असल्‍यास  त्‍या बाबतचे पत्र संबधित अर्जदारास पोहोच करावे व त्‍याची प्रत विमा सल्‍लागार कंपनी/ जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दयावी. परिपूर्ण प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍या पासून 21 दिवसाच्‍या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्‍यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर पुढे 15 टक्‍के व्‍याज देय राहील.

 

अक्रं-11 प्रकरण मंजूर केल्‍यावर पंधरा दिवसांच्‍या आत अनुज्ञेय नुकसान भरपाई संबधित लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍या वर जमा करणे बंधनकारक राहील. अन्‍यथा तीन महिन्‍या पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर 15 टक्‍के व्‍याज देय राहील.

 

अक्रं-12 परिपूर्ण विमा दावा कंपनीकडे सादर झाल्‍या पासून त्‍यावर 21 दिवसांच्‍या आत कार्यवाही करणे विमा कंपनी वर बंधनकारक राहील. मात्र तरीही विमा कंपनीने कागदपत्रांची पुर्तता झालेल्‍या प्रकरणी मंजूरी योग्‍य प्रस्‍ताव नाकारल्‍यास विमा सल्‍लागार कंपनीने शेतक-यांच्‍या वतीने इर्डा ग्राहक तक्रार कक्ष/ विमा न्‍यायाधीश/ जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच/ राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग/न्‍यायालय येथे दावे दाखल करेल.

 

अक्रं-13 शेतक-यांचा विमा प्रस्‍ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्‍या कालावधीत  कधीही प्राप्‍त झाला तरी तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील.

   

अक्रं-14 तथापी विमा पॉलिसी कालावधीच्‍या अखेरच्‍या दिवसात झालेल्‍या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्‍या पासून 90 दिवसा पर्यंत पूर्वसूचना प्राप्‍त होणारे व संगणक प्रणाली मध्‍ये विहित कालावधीत कागदपत्रांसह नोंद झालेल्‍या पूर्वसूचना पत्रा नुसार विमा प्रस्‍ताव सुध्‍दा स्विकारणे विमा कंपनीस बंधनकारक राहील.

 

   वरील प्रमाणे  शासन परिपत्रकात सुचना विमा कंपनीसाठी निर्गमित केलेल्‍या आहेत.       महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रका नुसार परिपूर्ण प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍या पासून 21 दिवसाच्‍या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्‍यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्‍के व त्‍यानंतर पुढे 15 टक्‍के व्‍याज देय राहील असे स्‍पष्‍ट नमुद आहे.

   

14    उपरोक्‍त विवेचन केल्‍या प्रमाणे तक्रारकर्तीला  विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- मिळण्‍यास ती पात्र आहे. त्‍याच प्रमाणे  तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, लाखांदूर, जिल्‍हा भंडारा यांचे कडे विमा दावा दिनांक-21.12.2021 रोजी दाखल केलेला असल्‍याने  त्‍या दिनांका पासून विमा दावा निश्‍चीतीसाठी साधारणतः तीन महिन्‍याचा कालावधी विचारात घेतला तर सदर विमा रकमेवर दिनांक-21.03.2022 पासून  ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.15 टक्‍के दराने व्‍याज मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. त्‍याच बरोबर तिला  झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/-  आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-  मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

15.  उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

 

                                                                   ::अंतिम आदेश::

 

  1. तक्रारकर्ती श्रीमती अनुसूया पुरुषोत्‍तम हुकरे यांची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 2 दि ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे क्षेत्रीय व्‍यवस्‍थापक, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर  यांचे  विरुध्‍द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 2 दि ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे क्षेत्रीय व्‍यवस्‍थापक, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर   यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) अदा करावी आणि सदर रकमेवर दिनांक-21.03.2022 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15 टक्‍के दराने व्‍याजाची रक्‍कम तक्रारकर्तीला   अदा करावी.

 

  1. तक्रारकर्तीला   झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं 2 दि ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे क्षेत्रीय व्‍यवस्‍थापक, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांनी अदा करावेत.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं  3 तालुका कृषी अधिकारी, लाखांदूर यांचे  विरुध्‍दची  तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 दि ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे डिव्‍हीजनल ऑफीसर, पुणे यांचे नाव तक्रारी मधून वगळलेले असल्‍याने त्‍यांचे विरुद कोणतेही आदेश नाहीत.

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 2  दि ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे क्षेत्रीय व्‍यवस्‍थापक, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर  यांनी प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे  दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

  1. निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 

  1. उभय पक्षकारांनी अतिरिक्‍त संच  जिल्‍हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.
 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.