Maharashtra

Thane

CC/09/242

कलादेवी विजय कुमार गुप्‍ता - Complainant(s)

Versus

डिव्हिजनल मॅनेजर द न्‍यु इंडिया इंशुरन्‍स कं.लि - Opp.Party(s)

31 Mar 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/09/242
 
1. कलादेवी विजय कुमार गुप्‍ता
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. डिव्हिजनल मॅनेजर द न्‍यु इंडिया इंशुरन्‍स कं.लि
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 31 Mar 2015     

   न्‍यायनिर्णय        

           द्वारा- सौ.माधुरी विश्‍वरुपे...................मा.सदस्‍या.        

1.         तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदारांचे पती श्री.विजयकुमार गुप्‍ता यांचे मालकीची बजाज ऑटो रिक्षाची सामनेवाले यांचेकडे ता.28.03.2008 ते ता.27.03.2009 या कालावधी करीता विमा पॉलीसी घेतली होती.  दुर्दैवाने तक्रारदारांचे पती ऑटो रिक्षा चालवित असतांना चेंबुर येथे ता.31.01.2009 रोजी झालेल्‍या अपघातात जखमी होऊन सायन हॉस्पिटल येथे उपचारा दरम्‍यान ता.03.02.2009 रोजी मृत्‍यु पावले.  विमा पॉलीसी रु.2,00,000/- एवढया रकमेकरीता मालक ड्रायव्‍हर (Owner Cum Driver) अपघाता बाबत घेतली होती.    

2.    तक्रारदारांनी पतीच्‍या मृत्‍युनंतर सामनेवाले यांचेकडे विमा प्रस्‍ताव दाखल केला.  परंतु सामनेवाले यांनी यासंदर्भात तक्रारदारांना काहीच माहिती दिली नाही.  सामनेवाले यांनी तक्रारदारांचा प्रस्‍ताव प्रलंबीत ठेऊन त्रुटीची सेवा दिली अशी तक्रारदारांची तक्रार आहे.   

3.     सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांच्‍या पतीने विमा पॉलीसी फक्‍त 3 प्रवासी व तिस-या व्‍यक्‍तीच्‍या रक्‍कम रु.6,000/- पर्यंतच्‍या नुकसानीबाबत ( 3 Passenger and Third Party Property Damage of Rs.6,000/-)  घेतली होती.  सदर पॉलीसी व्‍यक्‍तीगत अपघाता करीता (Personal Accident) घेतली नव्‍हती.  तक्रारदारांच्‍या पतीने (Personal Accident)  व्‍यक्‍तीगत अपघाता करीता सामनेवाले यांचेकडे प्रिमियम अदा केलेला नाही.  सबब तक्रारदारांनी मागणी केल्‍याप्रमाणे रु.2,00,000/- नुकसानीची रक्‍कम देता येत नाही.  सामनेवाले यांनी योग्‍य कारणास्‍तव तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव नामंजुर केला.  यासंदर्भात तक्रारदारांनी तोंडी माहिती दिली होती.  तक्रारदारांनी पतीच्‍या अपघाताची नुकसानभरपाई मिळण्‍यासाठी मोटार अपघात विमा न्‍यायालयात अर्ज दाखल केला आहे. 

4.    तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद, सामनेवाले यांचे लेखी म्‍हणणे, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद यांचे सखोल वाचन केले.  तक्रारदार वकीलांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकला.  यावरुन खालील प्रमाणे बाबी स्‍पष्‍ट होतात. 

अ.    तक्रारदारांच्‍या पतीने ऑटो रिक्षा करीता घेतलेली विमा पॉलीसी सामनेवाले यांना मान्‍य आहे.  सदरील अपघात हा विमा कालावधीत झाला आहे.

ब.    तक्रारदारांच्‍या वकीलांनी युक्‍तीवादत नमुद केल्‍याप्रमाणे सामनेवाले यांनी विमा पॉलीसीचे प्रिमियम घेत असतांना रक्‍कम रु.50/- प्रिमियम व्‍यक्‍तीगत अपघात मालक / ड्रायव्‍हर ( Personal Accident to Owner Cum Driver) करीता भरणा करुन घेणे मोटार टेरीफ नियमानुसार बंधनकारक होते.  तक्रारदारांच्‍या वकीलांनी यासंदर्भात मोटार टेरीफ GR-36 ची प्रत दाखल केली. 

क.    GR- 36 मोटार टेरीफ नुसार

      GR-36 Personal Accidents (PA) Cover under Motor Policy

                   A- Compulsory Personal Accident Cover for Owner- Driver.

                Compulsory Personal Accident Cover shall be applicable under both liabilities only and package policies.  The owner of insured vehicle holding an effective driving licence is termed as owner Driver for the Purposes of this section.

 Cover is provided to the Owner Driver whilst driving the vehicle including Mounting into/ dismounting from traveling in the insured vehicle as a co-driver.

4.    वरील जीआर-36 मोटार टेरीफ नियमानुसार, सामनेवाले यांनी व्‍यक्‍तीगत अपघात मालक/ ड्रायव्‍हर यांचे करीता विम्‍याचे कव्‍हर देणे बंधनकारक आहे.  सामनेवाले यांनी मोटार वाहन टेरीफच्‍या नियमांचे पालन न करुन त्रुटीची सेवा दिल्‍याचे यावरुन स्‍पष्‍ट होते.   तक्रारदार यांच्‍या पतीकडून यासंदर्भात प्रिमियम भरणा करुन घेऊन व्‍यक्‍तीगत अपघाताबाबतची विमा सुविधा देण्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी सामनेवाले यांची असल्‍यामुळे तक्रारदार पतीच्‍या अपघाती मृत्‍युच्‍या नुकसानीची रक्‍कम रु.2,00,000/- तक्रारदारांना देणे बंधनकारक आहे असे मंचाचे मत आहे. 

5.    सामनेवाले यांनी रु.50/- चा व्‍यक्‍तीगत अपघाता संदर्भातील प्रिमीयम भरणा न करुन निष्‍काळजीपणा दर्शविला आहे.  सामनेवाले यांची सदरची कृती मोटार वाहन टेरीफच्‍या नियमा विरुध्‍द आहे.  सबब सामनेवाले यांचे सेवेतील त्रुटी स्‍पष्‍ट झाल्‍यामुळे तक्रारदारांना विमा पॉलीसीच्‍या नियमानुसार रु.2,00,000/- नुकसानभरपाईची रक्‍कम देणे तसेच तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.5,000/- देणे योग्‍य राहिल असे मंचाचे मत आहे.      

6.    उपरोक्‍त चर्चेनुरुप व निष्‍कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.

7.    “ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही .                           

                              - आदेश -

1. तक्रार क्रमांक-242/2009 अंशतः मंजुर करण्‍यात येते.

2. सामनेवाले यांनी व्‍यक्‍तीगत अपघाताबाबतचा प्रिमियम भरणा न करुन घेऊन त्रुटीची सेवा

   दिली असे जाहिर करण्‍यात येते.

3. सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की,तक्रारदारांना विमा लाभ रक्‍कम रु.2,00,000/-

   (अक्षरी रुपये दोन लाख) तक्रार दाखल तारखेपासुन 30 एप्रिल-2015 पर्यंत दरसाल दर

   शेकडा 6 टक्‍के व्‍याज दराने दयावी, तसे न केल्‍यास ता.01.05.2015 दरसाल दर शेकडा

   9 टक्‍के व्‍याजदरासह दयावी.   

4. सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारीच्‍या खर्चापोटी तक्रारदार यांना रक्‍कम

   रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) आदेश मिळाल्‍यापासुन 30 दिवसात दयावी.  विहीत

   मुदतीत अदा न केल्‍यास दरसाल दर शेकडा 9 टक्‍के व्‍याजदरासह दयावी.

4. आदेशाची पुर्ती केल्‍याबद्दल / न केल्‍याबद्दल उभयपक्षांनी ता.15.05.2015 रोजी शपथपत्र मंचामध्‍ये

   दाखल करावे.

5. आदेशाच्‍या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्‍य व विनाविलंब पोस्‍टाने पाठविण्‍यात याव्‍यात.

ता.31.03.2015

जरवा/

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.