(आदेश पारीत व्दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्यक्ष)
1. तक्रारकर्ता यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने श्रीरामपूर येथील मे.दिवाणी न्यायालय यांचेकडे रे.मु.नं.106/2014 हा दाखल केला, त्याचा निकाल ता.30.01.2015 रोजी झाला आणि सामनेवाला हिस तिचे वडीलोपार्जित मिळकतीपैकी 00.41 आर इतके क्षेत्र तिचे हिश्यास आले. त्यानंतर सदर निकालाविरुध्द सामनेवाला हिने श्रीरामपूर येथील मे.जिल्हा न्यायालय यांचेकडे रे.अपील क्र.14/2015 दाखल केले. परंतु सदरचे अपील हे दिनांक 07.11.2014 रोजी फेटाळण्यात आले. त्यानंतर तक्रारकर्ताने सामनेवाला हिचेकडे जावून तिला तिचे हिश्यास आलेल्या क्षेत्राची खरेदी करुन देण्याची विनंती केली. सामनेवाला हिने तिचे हिश्यास 00.80 आर इतके क्षेत्र येईल असा भरवसा तक्रारकर्तास दिला होता, त्यावरुन त्याची किंमत रु.7,75,000/- इतकी ठरली होती. परंतु सामनेवालाचे अपेक्षेपेक्षा निम्मे क्षेत्र तिला कोर्टाकडून मिळालेने ठरलेली रकमेचे निम्मी रक्कम देऊन तक्रारकर्ताने खरेदी देण्याची विनंती सामनेवाला हिस केली असता तिने त्यास नकार दिला. तेव्हा तक्रारकर्ताने सामनेवाला हिस विसार पावती नोंदवितेवेळी दिलेले रक्कम रु.2,00,000/- आणि कोर्ट केससाठी केलेला खर्च रु.1,00,000/- असे एकुण रु.3,00,000/- देण्याची विनंती केली असता त्यास सामनेवाला हिने नकार दिला. म्हणून तक्रारकर्ताने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. तक्रारकर्ताने सदर रक्कम मिळण्याची विनंती केली आहे. तक्रारकर्ता तर्फे प्राथमिक युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारकर्ता व सामनेवाला यात असलेला वाद हा दिवाणी स्वरुपाचा असल्याचा प्रथमदर्शनी दिसून येतो. तसेच त्या वादाविषयी मा.दिवाणी न्यायालय यांनी निर्णय घेतलेला आहे. सबब सदर तक्रार चालविण्यास या मंचाला अधिकारक्षेत्र येत नाही असे मंचाचे मत ठरले आहे व सिध्द होते. सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श –
1. तक्रारकर्ताची तक्रार या मंचास चालविण्याचे अधिकारक्षेत्र नसल्याने सदर तक्रार अस्विकृत करण्यात येते.
2. तक्रारकर्तास सदर तक्रार योग्य त्या न्यायालयात दाखल करण्यास परवानगी देण्यात येते.
3. या आदेशाची प्रथम प्रत तक्रारकर्ता यांना निःशुल्क देण्यात यावी.
4. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.
5. सदर आदेश आज रोजी डायसवर पारीत करण्यात आला.