सुनिल पिता मारोतराव घुमडे filed a consumer case on 29 Jan 2015 against झेंस ग्लोबल प्रा लि in the Aurangabad Consumer Court. The case no is CC/13/354 and the judgment uploaded on 16 Mar 2015.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद
_______________________________________________________________________________________________
ग्राहक तक्रार क्रमांक :-354/2013
तक्रार दाखल तारीख :-30/11/2013
निकाल तारीख :- 29/01/2015
__________________________________________________________________________________________________________________________
श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष
श्रीमती संध्या बारलिंगे,सदस्या श्री.के.आर.ठोले,सदस्य
________________________________________________________________________________________________
सुनिल मारोतराव घुमडे,
रा. प्रभाश्री अपार्टमेंट, प्लॅट नं.9, मामा चौक,
पदमपुरा, औरंगाबाद (एम.एस) 431005 …….. तक्रारदार
विरुध्द
1. ZYNC GLOBAL PRIVATE LIMITED
बी-119, सेक्टर 2, नोएडा (एनसीआर), उत्तरप्रदेश,
भारत – 201301
2. North India Top Company (p) Ltd (तक्रारदाराचे विनंतीवरुन वगळण्यात आले)
Cluster # 20197, व्हीलेज संपका, तहसिल फारुख नगर,
गुडगांव पतुडी रोड, बिहाइंड गती लॉजीस्टीक पार्क,
हरियाणा – 122005
3. मोबाईल शॉपी,
सेल्स सर्व्हिस, होलसेल एन रिटेल,
ऑल टाईप ऑफ मोबाईल रिपेअरिंग, सन्नी कॉर्नर,
ऑपोझिट- नोकीया प्रायओरीटी, पैठण गेट,
औरंगाबाद – 431 001 ........ गैरअर्जदार
________________________________________________________________________________________________
तक्रारदारातर्फे – अॅड. व्ही.डी.बोधंनकर
गैरअर्जदारातर्फे – अॅड.
________________________________________________________________________________________________
निकाल
(घोषित द्वारा – श्रीमती. संध्या बारलिंगे, सदस्या)
तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्ये दाखल केली आहे.
तक्रारदाराने Home Shop18 वरील जाहिरात पाहून 7” Capacititive Tablet Calling (Sim Slot ) By Zinc ही वस्तु विकत घेण्याची ऑर्डर दिली. दि. 25/4/13 रोजी Home Shop 18 यांनी तक्रारदारास कळवले की, सदर वस्तु 7-8 दिवसात तक्रारदारास प्राप्त होईल आणि त्याची किंमत रु.6990/- अशी असेल. Home Shop18 ने सदर वस्तु तक्रारदाराच्या पत्यावर पाठवल्याचे कळवले. दि.26/4/13 रोजी North India Top Co (P ) यांनी Invoice सहित सदर वस्तु तक्रारदाराच्या पत्यावर पोहचवली. तक्रारदाराने Order देताना cash on delivery हे option निवडलेले असल्यामुळे वस्तु प्राप्त झाल्यावर तक्रारदाराने रु.6990/- दिले. परंतु त्याचे charging नीट होत नाही आणि display crack झाल्यामुळे तक्रारदाराने दि. 7 जुलै 2013 रोजी तक्रार नोंदवली. Home Shop 18 ने तक्रारदारास service centre ला तक्रार नोंदवण्यास सांगितले. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं 1 याच्याकडे तक्रार नोंदवली. त्यांच्या सल्यानुसार तक्रारदाराने सदर tablet गैरअर्जदार क्रं 3 याच्याकडे दुरुस्तीला दिले. सदर दुरूस्ती त्याच्याकडून झाली नाही म्हणून त्याने तो नादुरुस्त tablet गैरअर्जदार क्रं 1 व 2 यांच्याकडे पाठवला. त्यानंतर तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं 1 यांना अनेक वेळा संपर्क करून त्याचा tablet परत देण्याची आणि warranty कालावधीत असल्यामुळे त्याऐवजी नवीन tablet देण्याची विनंती केली. परंतु गैर अर्जदाराने अद्यापपर्यंत काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तक्रारदार नादुरुस्त tablet च्या ऐवजी नवीन tablet दिलेल्या तारखेपसून warranty मिळावी किंवा त्याची रक्कम परत करावी अशी मागणी केली आहे. तसेच नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्रं 1 व 3 यांना नोटिस मिळून देखील हजर झाले नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध एकतर्फा आदेश पारित करण्यात आला. गैरअर्जदार क्रं 2 यांचे नाव वगळण्याचा तक्रारदाराने अर्ज दिला.
आम्ही तक्रारदाराचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराची तक्रार आणि दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले.
दि.26/1/2013 रोजीच्या Invoice नुसार तक्रारदाराने 7” Capacitive Tablet With Calling (Sim Slot ) By Zync रु.6990/- देऊन Home Shop 18 या Website वरून Online Purchase केलेले आहे.
तक्रारदाराने गैरअर्जदार 1 यांना सदोष tablet विषयी तक्रार केल्याच्या ईमेल च्या प्रती दाखल केल्या आहेत. गैरअर्जदार क्रं 3 याच्याकडे दुरुस्तीला दिल्याची पावती दाखल केली आहे.
तक्रारदाराने Online Shop Home Shop 18 या website वर ऑर्डर देऊन गैरअर्जदार क्रं 1 यांच्या कंपनीचा tablet फोन मागवला. त्याला दि.26/4/2013 रोजी सदर वस्तु घरपोच प्राप्त झाली. परंतु त्याचा वापर सुरू केल्यानंतर काही दिवस त्याचे charging होत नाही आणि display ला crack गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने दि. 7 जुलै 2013 रोजी Home Shop18 ला तक्रार केली. त्यांच्या सल्यानुसार तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं 1 यांच्या सर्विस सेंटरला तक्रार केली व नादुरुस्त tablet गैरअर्जदार क्रं 3 यांच्याकडे दिल्याचे दाखल केलेल्या पावतीवरून दिसून येते. तक्रारदारास त्याचा tablet अद्यापपर्यन्त प्राप्त झालेला नाही. गैरअर्जदार क्रं 1 याने तक्रारदाराचा tablet परत न देऊन सेवेमध्ये त्रुटी दिलेली आहे. Online Shopping करताना ग्राहकाकडून रक्कम वसूल करून त्यानंतर सेवा न देणे, हा गैरप्रकार बर्याचदा आढळून येतो. अतिशय मोठी प्रलोभने देऊन ग्राहकांना आकर्षित करणे व त्यांच्याकडून रक्कम घेऊन त्यांना सदोष माल देणे, ही अनुचित व्यापारी प्रथा आहे. गैर अर्जदार क्रं 1 याने तक्रारदारास सदोष मोबाईल दुरुस्त करून देणे किंवा त्या ऐवजी त्याच वर्णनाचा नवीन tablet देणे आवश्यक होते. परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद न देऊन त्यांची फसवेगिरी करण्याची वृती दर्शवून दिली आहे. त्यामुळे तक्रारदारास त्याने दिलेली रक्कम परत करणे हा योग्य पर्याय असल्याचे आमचे मत आहे.
वरील कारणामुळे हा मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
(श्रीमती संध्या बारलिंगे) (श्री.के.एन.तुंगार)
सदस्या अध्यक्ष
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.