जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 94/2020. आदेश दिनांक : 04/10/2022.
सौ. महानंदा भ्र. त्र्यंबक उंबरगे,
रा. साकोळ, तालुका : शि. अनंतपाळ, जिल्हा : लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) चेअरमन, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.,
साकोळ, तालुका : शि. अनंतपाळ, जिल्हा : लातूर व इतर - 3. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष यांच्याकडून विमा रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळावी आणि अन्य नुकसान भरपाई मिळण्याच्या अनुतोषाकरिता तक्रारकर्ती यांनी प्रस्तुत ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रारी सुनावणीसाठी प्रलंबीत असताना विरुध्द पक्ष क्र.4 यांनी जिल्हा आयोगामध्ये रु.1,00,000/- रकमेचा धनादेश क्र.169783, दि. 20/4/2021 सादर केला. लेखी निवेदनपत्रामध्येही त्यासंबंधी कथन केलेले दिसून येते. असे दिसते की, तक्रारकर्ती व त्यांचे विधिज्ञ अनेक तारखांपासून अनुपस्थित आहेत. विरुध्द पक्ष क्र.4 यांनी जमा केलेल्या रकमेसंबंधी त्यांचे निवेदन दिसून येत नाही. तक्रारकर्ती यांचा अन्य अनुतोष असल्यासंबंधी पाठपुरावा दिसून येत नाही. अशा स्थितीत ग्राहक तक्रारीचा निर्णय देण्यासंबंधी असणा-या विहित मुदतीचा विचार केला असता व प्रकरणाचा साकल्याने विचार केला असता अन्य अनुतोषासंबंधी तक्रारकर्ती यांचा पाठपुरावा नसल्यामुळे ग्राहक तक्रार निकाली काढणे न्यायोचित आहे. त्या अनुषंगाने ग्राहक तक्रार निकाली काढण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-