आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2) सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदार यांना मुदतठेव रक्कम रु.50,000/- (अक्षरी रु.पन्नास हजार) व त्यावर मुदतठेव तारखेपासून द.सा.द.शे.10 टक्के व्याज 30 दिवसात द्यावे. सदर रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यत द.सा.द.शे.11 टक्के व्याज द्यावे. सदर आदेशाची पुर्तता निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
3) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना झालेल्या
मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.5,000/-
(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी
रु.2000/- (अक्षरी रुपये दोन हजार) दयावेत.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड