Maharashtra

Latur

CC/142/2022

भाग्यश्री देवानंद पाटील - Complainant(s)

Versus

कार्यकारी अभियंता, म. रा. वि. वि. कं. लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड. ए. ए. बिडवे

08 Jan 2024

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/142/2022
( Date of Filing : 05 May 2022 )
 
1. भाग्यश्री देवानंद पाटील
रा. भादा ता. औसा जि. लातूर
...........Complainant(s)
Versus
1. कार्यकारी अभियंता, म. रा. वि. वि. कं. लि.
साळे गल्ली लातूर
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Amol B. Giram PRESIDENT
 HON'BLE MRS. Rekha R. Jadhav MEMBER
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 08 Jan 2024
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 142/2022.                            तक्रार दाखल दिनांक : 05/05/2022.                                                                             तक्रार निर्णय दिनांक : 08/01/2024.

                                                                                       कालावधी : 01 वर्षे 08 महिने 03 दिवस

 

भाग्यश्री भ्र. देवानंद पाटील, वय 31 वर्षे,

व्यवसाय : घरकाम, रा. भादा, ता. औसा, जि. लातूर.                                             तक्रारकर्ती

 

                        विरुध्द

 

(1) महावितरण कार्यकारी अभियंता,

     महावितरण विभागीय कार्यालय, साळे गल्ली, लातूर, ता. जि. लातूर.

(2) उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग, मुरुड, ता. जि. लातूर.

(3) सहायक अभियंता, महावितरण शाखा, भादा, ता. औसा, जि. लातूर.                विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :          श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष

                        श्रीमती रेखा जाधव, सदस्य

                        श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :-  अंगद बी. बिडवे

विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :-  एस. आर. जानते

 

आदेश 

 

श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

(1)       तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, एकत्र कुटुंबाच्या तडजोडीअंती मौजे भादा, ता. औसा, जि. लातूर येथील जमीन गट क्र. 330 मधील क्षेत्र 1 हे. 41 आर. याच्या त्या मालक व कब्जेदार आहेत. त्यांना शेतजमिनीचे मुळ मालक त्रिंबक विश्वनाथ पाटील यांच्या मृत्यूपश्चात शाहुराज पाटील यांची सुन नात्याने एकत्र कुटुंबाच्या तडजोडीअंती उक्त शेतजमीन प्राप्त झालेली आहे. त्या क्षेत्राचे मुळ मालक त्रिंबक विश्वनाथ पाटील यांनी त्यांच्या हयातीमध्ये विरुध्द पक्ष (यापुढे "महावितरण") यांच्याकडून विद्युत पुरवठा घेतलेला होता आणि तक्रारकर्ती व मयत त्रिंबक हे हिंदु एकत्र कुटुंबाचे सदस्य असल्यामुळे त्यांनी विद्युत जोडणी स्वत:चे नांवे केलेली नाही.

 

(2)       तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, त्या शेतीकरिता ग्राहक क्र. 626170274934 अन्वये महावितरणच्या ग्राहक आहेत. सन 2021-22 मध्ये त्यांनी 1 हे. 41 आर. क्षेत्रामध्ये ऊस पीक घेतले होते. गट क्र. 330 मधून महावितरणची 3 फेज 3 ताराची लघुदाब वाहिनी गेलेली आहे. गट क्र. 330 मध्ये साधारणत: 5 ते 6 खांब असून त्यांच्या तारा लोंबकळत होत्या आणि ठिणग्या खाली पडत होत्या.  त्याबाबत पूर्वसूचना देऊनही दखल घेतली गेली नाही.

 

(3)       तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, दि.21/2/2022 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वा-यामुळे गट क्र.330 मधील विद्युत तारा एकमेकांस चिटकल्या आणि ठिणग्या निर्माण होऊन ऊसाच्या पिकामध्ये पडल्या. ज्यामुळे आग लागून ऊसाने पेट घेतला आणि 2 एकर क्षेत्रातील ऊस पीक व ठिबक सिंचन संच जळून खाक झाले. ऊस पिक जळून गेल्यामुळे ऊस पीक व ठिबक सिंचन संचाचे रु.4,77,280/- चे नुकसान झाले. महावितरणसह तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व विद्युत निरिक्षक यांना घटनेची सूचना दिल्यानंतर तहसील कार्यालय व विद्युत निरीक्षक यांनी पंचनामा केला. विद्युत निरीक्षकांच्या अभिप्रायानुसार महावितरण यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले. महावितरण यांच्या निष्काळजीपणा व अकार्यक्षम सेवेमुळे त्यांना नुकसान झाले असून महावितरण यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे. उक्त कथनाच्या अनुषंगाने ऊस पिकाचे नुकसान रु.4,00,000/- व ठिबक सिंचन संचाचे नुकसान रु.77,280/- व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- देण्याचा महावितरण यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.

 

(4)       महावितरण यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले. त्यांचे कथन असे की, त्यांनी तक्रारकर्ती यांना विद्युत जोडणी दिलेली नाही किंवा तक्रारकर्ती यांचा ग्राहक क्र. 626170274934 नाही. त्यांच्यामध्ये 'ग्राहक' व 'सेवा पुरवठादार' नाते नसल्यामुळे व ऊस पीक हे पैसे कमविण्याच्या उद्देशाने घेतल्यामुळे तक्रारकर्ती त्यांच्या ग्राहक नाहीत. महावितरण यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने खोटे असल्याचे नमूद करुन अमान्य केले आहेत. त्यांचे पुढे कथन असे की, तक्रारकर्ती, त्यांचे पती किंवा सासरे शाहुराज यांना महावितरण यांनी विद्युत जोडणी दिलेली नाही. फेरफार क्र. 3427 अन्वये त्रिंबक विश्वनाथ पाटील व तक्रारकर्ती यांचे सासरे शाहुराज हे एकत्र कुटुंबाचे सदस्य नाहीत. महावितरणच्या तारा सुव्यवस्थित व सुस्थितीत होत्या व आहेत. तारा ढिल्या असल्याबद्दल घटनेपूर्वी तक्रारी नव्हत्या. जळीत ऊस साखर कारखान्यास नेण्यात येतो आणि कारखान्याच्या देयकावर त्याची नोंद नाही. तसेच महावितरण यांनी ठिबक सिंचन संच खरेदी देयक, तलाठी व पोलीस ठाण्याच्या पंचनाम्यावर आक्षेप घेतला आहे. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती महावितरणतर्फे करण्यात आली.

 

(5)       तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, महावितरण यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्‍यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्‍यात येतात आणि त्‍या मुद्दयांची कारणमीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

                       

मुद्दे                                                                                                 उत्तर

 

(1) तक्रारकर्ती महावितरण यांच्या ग्राहक आहेत काय ?                                              नाही

(2) काय आदेश  ?                                                                                      अंतिम आदेशाप्रमाणे

 

 

 

कारणमीमांसा

 

(6)       मुद्दा क्र.1 :- सर्वप्रथम महावितरण यांनी घेतलेली हरकत अशी की, त्यांनी तक्रारकर्ती, त्यांचे पती किंवा सासरे शाहुराज यांना महावितरण यांनी विद्युत जोडणी दिलेली नाही किंवा तक्रारकर्ती यांचा ग्राहक क्र. 626170274934 नाही. तसेच फेरफार क्र. 3427 अन्वये त्रिंबक विश्वनाथ पाटील व तक्रारकर्ती यांचे सासरे शाहुराज हे एकत्र कुटुंबाचे सदस्य नाहीत. उभय पक्षांमध्ये 'ग्राहक' व 'सेवा पुरवठादार' नाते नसल्यामुळे तक्रारकर्ती त्यांच्या ग्राहक नाहीत. तक्रारकर्ती यांच्यातर्फे नमूद करण्यात आले की, शेतजमिनीचे मुळ मालक त्रिंबक विश्वनाथ पाटील यांच्या मृत्यूपश्चात शाहुराज पाटील यांची सुन नात्याने एकत्र कुटुंबाच्या तडजोडीअंती उक्त शेतजमीन प्राप्त झालेली आहे. त्या क्षेत्राचे मुळ मालक त्रिंबक विश्वनाथ पाटील यांनी त्यांच्या हयातीमध्ये महावितरणकडून विद्युत पुरवठा घेतलेला होता आणि तक्रारकर्ती व मयत त्रिंबक हे हिंदु एकत्र कुटुंबाचे सदस्य आहेत. त्या शेतीकरिता ग्राहक क्र. 626170274934 अन्वये तक्रारकर्ती ह्या महावितरणच्या ग्राहक आहेत.

 

(7)       अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता 7/12 उता-यानुसार गाव : भादा, ता. औसा येथील भूमापन क्रमांक व उपविभाग : 330 मध्ये 1.41.00 क्षेत्राकरिता तक्रारकर्ती यांचे नांव भोगवाटदार असल्याचे निदर्शनास येते. विद्युत देयकाचे अवलोकन केले असता दि.01/10/00 रोजी त्रिंबक विश्वनाथराव पाटील यांच्या नांवे विद्युत जोडणी दिल्याचे व ग्राहक क्र. 626170274934 असल्याचे निदर्शनास येते. उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ती ह्या उक्त विद्युत पुरवठ्याचा वापर करीत असल्या तरी महावितरणच्या 'ग्राहक' होऊ शकतात काय ? हा प्रश्न उपस्थित होतो. हे सत्य आहे की, ग्राहक क्र. 626170274934 अन्वये तक्रारकर्ती यांच्या नांवे विद्युत जोडणी दिलेली नाही. उलटपक्षी, त्रिंबक विश्वनाथराव पाटील यांच्या नांवे ग्राहक क्र. 626170274934 अन्वये विद्युत जोडणी असून त्यांचा मृत्यू झाल्याबद्दल मान्यस्थिती आहे.  7/12 उतारा पाहता तक्रारकर्ती व त्रिंबक विश्वनाथराव पाटील यांच्यामध्ये सामाईक शेतजमीन क्षेत्र आढळत नाही. त्रिंबक विश्वनाथ पाटील यांच्या पश्चात शाहुराज यांच्यानंतर तक्रारकर्ती यांना शेतजमीन प्राप्त झालेली असली तरी ग्राहक क्र. 626170274934 विद्युत पुरवठा तक्रारकर्ती यांच्या शेतजमीन क्षेत्रामध्ये आहे, हे सिध्द होत नाही.

 

(8)       ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे कलम 2 (7)(ii) खालीलप्रमाणे आहे.

            "consumer" means any person who -

            (ii) hires or avails of any service for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such service other than the person who hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person, but does not include a person who avails of such service for any commercial purpose.

 

 

 

 

            उक्त तरतूद पाहता प्रतिफल देऊन किंवा देण्याचे अभिवचन देऊन किंवा अंशत: देऊन किंवा अंशत: अभिवचन देऊन किंवा अन्‍य पध्दतीने रक्कम अदा करुन सेवेचा लाभ घेणारी व्यक्ती 'ग्राहक' संज्ञेत येते. तसेच उक्त पध्दतीने सेवा घेणा-या प्रथम व्यक्तीच्या संमतीने अशा सेवेचा लाभ घेणारी व्यक्ती सुध्दा लाभार्थी होत असल्यामुळे 'ग्राहक' संज्ञेत अंतर्भूत आहे.

 

(9)       प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारकर्ती यांनी विद्युत जोडणी घेऊन शेती प्रयोजनार्थ सेवेचा लाभ घेतलेला नाही. तसेच विद्युत जोडणी त्रिंबक विश्वनाथराव पाटील यांच्या नांवे असून ते मयत  आहेत. आमच्या मते, त्रिंबक विश्वनाथराव पाटील यांच्या नांवे असणा-या विद्युत जोडणीकरिता मयत त्रिंबक यांची संमती ठरु शकत नसल्यामुळे तक्रारकर्ती लाभार्थी नात्याने 'ग्राहक' संज्ञेत येत नाहीत.

 

(10)     महावितरण यांनी अभिलेखावर मा. महाराष्ट्र राज्य आयोगाच्या औरंगाबाद परिक्रमा पिठाने "मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि., लातूर /विरुध्द/ सौ. राजाबाई हरिश्चंद्र शिंगाडे" प्रथम अपिल नं. 277/2012 मध्ये दि.13/1/2015 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयाचा संदर्भ सादर केला. त्यामध्ये नमूद न्यायिक तत्व काहीअंशी लागू पडते.

 

(11)     उक्त विवेचनाअंती तक्रारकर्ती ह्या महावितरण यांच्या 'ग्राहक' नसल्यामुळे ग्राहक तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. तक्रारकर्ती ह्या महावितरण यांच्या 'ग्राहक' नसल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही आलो असल्यामुळे ग्राहक तक्रारीमध्ये उपस्थित अन्य प्रश्न व मुद्दे; तसेच अन्य न्यायनिवाड्यांना व पुराव्यांना स्पर्श न करता मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

आदेश

 

 

 

                             (1) ग्राहक तक्रार नामंजूर करण्‍यात येते.       

                             (2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.

 

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)             (श्रीमती रेखा  जाधव)                 (श्री. अमोल बा. गिराम)

             सदस्‍य                                         सदस्‍य                                            अध्यक्ष

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MR. Amol B. Giram]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rekha R. Jadhav]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.