जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 362/2022. आदेश दिनांक : 07/06/2023.
ज्ञानोबा पिता रामराव तोंडारे, वय 75 वर्षे,
रा. तोंडारे निवास, शिव नगर, निडेबन,
उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ,
ग्रामीण उपविभाग, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- व्ही. जी. शंके
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष यांनी बेकायदेशीर थकबाकीची मागणी केल्याच्या वादकारणाच्या अनुषंगाने अनुतोष मिळण्याकरिता तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रार दाखल करुन घेण्यात आली आणि विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्याचा आदेश करण्यात आला. त्यानंतर तक्रारकर्ता व विधिज्ञ सातत्याने अनुपस्थित आहेत. विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणी होण्याकरिता तक्रारकर्ता यांचेद्वारे उचित कार्यवाही झालेली नाही. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने स्वारस्य दिसून येत नाही. ग्राहक तक्रार कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रारकर्ता यांच्याकडून उचित पूर्ततेअभावी ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-