जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 184/2021. आदेश दिनांक : 04/10/2022.
श्री. सौदागर धोंडीराम कदम, वय 50 वर्षे,
व्यवसाय : व्यापार व शेती, रा. 8312, रिंग रोड,
पोद्दार स्कुलजवळ, खाडगांव रोड, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
कार्यकारी अभियंता, उपविभागीय कार्यालय लातूर शहर (दक्षीण),
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., मंडळ कार्यालय,
विद्युत भवन, साळे गल्ली, लातूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- राजाभाऊ व्ही. गायकवाड
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष यांनी आकारणी केलेले विद्युत देयक रद्द होऊन मिळावे आणि नुकसान भरपाई मिळण्याच्या अनुतोषाकरिता तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्यात आले. उचित संधी प्राप्त होऊनही विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणीसंबंधी तक्रारकर्ता यांनी आवश्यक पूर्तता केलेली नाही. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ हे अनेक तारखांपासून सातत्याने अनुपस्थित आहेत. तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने स्वारस्य दिसून येत नाही. ग्राहक तक्रारींचे कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त अनुषंगाने तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-