Maharashtra

Beed

CC/13/57

शैलेश प्रभाकरराव कुलकर्णी - Complainant(s)

Versus

कार्यकारी अभिंयता महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी लि. - Opp.Party(s)

कुंभार

07 Jan 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/13/57
 
1. शैलेश प्रभाकरराव कुलकर्णी
जयशंकर कॉलनी बीड
बीड
महाराष्‍ट
...........Complainant(s)
Versus
1. कार्यकारी अभिंयता महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी लि.
जालना रोड बीड
बीड
महाराष्‍ट
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                     निकाल
                      दिनांक- 06.01.2014
                  (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)
            तक्रारदार शैलेश प्रभाकरराव कूलकर्णी यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे, तक्रारदार हा मागील
ब-याच वर्षापासून व्‍यवसाय करीत आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदारास विज पुरवठा दिलेला आहे.त्‍यांचा विज मिटर क्रमांक 576010350556 असा आहे. सदरील विज वापर हा व्‍यापारी कामासाठी दिलेला आहे. तक्रारदार यांनी  विज मिटरचे बिल वेळोवेळी दिलेले आहे.
      तक्रारदार हे सदरील जागेत कूलकर्णी नांवाचे दुचाकी वाहन दुरुस्‍तीचे गँरेज चालवतात.तक्रारदार हे दुचाकी वाहनाचे दूरुस्‍तीचा व्‍यवसाय करतात.      तक्रारदार यांनी तक्रारीत पूढे असे कथन केले आहे की, सामनेवाले यांचा विज पुरवठा तक्रारदार यांचे दूकानाचे जवळ असलेले डि.पी.वरुन दिलेला आहे. तक्रारदार व इतर ग्राहकांना सामनेवाले यांनी त्‍या डि.पी. मधून विज पुरवठा केलेला आहे.सदर डि.पी. चे काम हे सामनेवाला यांनी निकृष्‍ट साहित्‍य वापरुन व निष्‍काळजीपणे केलेले आहे.सदरील डि.पी.वर क्षमतेपेक्षा जास्‍त ग्राहकांना विज पुरवठा दिलेला आहे. सदर डि.पी. मध्‍ये वारंवार बिघाड होत असतो. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून डि.पी. ची योग्‍य ती दखल घेतली जात नाही. विज पोल पासून तक्रारदार यांचे मिटरपर्यत केलेला विज पुरवठा योग्‍य निकृष्‍ट साहित्‍य वापरुन केलेला नाही.
            तक्रारदार यांनी पूढे असे कथन केले आहे की,दि.12..4.2013 रोजी 1 वाजेचे सुमारास सामनेवाले यांनी डि.पी.चे वापरलेले निकृष्‍ट साहित्‍यामुळे, निष्‍काळजीपणामुळे व दूर्लक्षापणामुळे डि.पी. मध्‍ये स्‍पार्कीग झाले. तीच स्‍पार्कीग तक्रारदार यांना दिलेल्‍या विज पोलपर्यत पोहचली व तेथून पूढे सामनेवाले यांचे विज मिटर करिता वापरलेल्‍या सर्व्‍हीस वायरमधून तक्रारदार यांचे विज मिटर पर्यत पोहची. त्‍यामुळे स्‍पार्कीग होऊन तक्रारदार यांचे दूकानास आग लागली. एक सुमो गाडी व गॅरेज मधील संपूर्ण साहित्‍य व कागदपत्र व सनी मोटार सायकल, एक यामाहा कंपनीची मोटार सायकल,एक कॉम्‍प्‍यूटर, पत्रयाचे शेड, साऊंड बॉक्‍स व व दुकानातील सर्व कागदपत्र  जळाले.तक्रारदार यांचे जवळपास रु.5,00,000/- चे नुकसान झाले. घटनेची फिर्याद शेख गफार शेख जाकेर यांनी पोलिस स्‍टेशनमध्‍ये फिर्याद दिली. संबंधीत पोलिस स्‍टेशनने गून्‍हा नोंद करुन घटनास्‍थळ पंचनामा केला व नुकसान भरपाईचे मुल्‍यामापन केले. तक्रारदार यांचे कथन की, सदरील घटनेस सामनेवाले हे सर्वस्‍वी जबाबदार असून सामनेवाले यांचे निष्‍काळजीपणामुळे व डि.पी. स वापरलेल्‍या निकृष्‍ट साहित्‍यामुळे स्‍पार्कीग होऊन तक्रारदार यांचे दूकान जळाले आहे. सामनेवाले हे तक्रारदार यांना नुकसान भरपाई देण्‍यास जबाबदार आहेत. तक्रारदार यांचे दूकान जळाल्‍यामुळे त्‍यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,00,000/- असे मिळून सामनेवाले यांचेकडून एकूण रक्‍कम रु.6,00,000/- मिळावे अशी मागणी केली आहे.
            सामनेवाले हे या मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी लेखी कैफियत दाखल केली. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे तक्रारीतील केलेले सर्व आरोप फेटाळलेले आहेत. सामनेवाले यांचे कथन की, सामनेवाले यांचे डी.पी., पोल तारा यांची नियमित देखभाल केली आहे. उत्‍कृष्‍ट दर्जाची उपकरणे वापरली आहेत. तक्रारदार अगर इतर कोणत्‍याही डि.पी. सदोष आहे. अगर साहित्‍य निकृष्‍ट दर्जाचे वापरले आहे याबददल तक्रार केलेली नाही. मालकाच्‍या घराजवळील डि.पी. मध्‍ये कोणतेही स्‍पार्कीग झालेले नाही. घटनेनंतर सामनेवाले यांनी विज कंपनीचे अभिंयता यांनी घटनास्‍थळी जाऊन निरिक्षण व पाहणी केली आहे. डि.पी., पोल, तारा, वायर मध्‍ये कूठलेही स्‍पार्कीग झाल्‍या बाबत खुणा आढळून आल्‍या नाहीत. निरीक्षणामध्‍ये दूकानामध्‍ये वापरासाठी इनव्‍हर्टर, बॅटरीज, ज्‍वलनशिल पदार्थ ठेवलेले होते. दूकानातील आतील बाहेरील भागामध्‍ये स्‍पार्कीग होऊन आग लागली आहे. दूकानामध्‍ये पेट्रोलियम पदार्थ ठेवल्‍यामुळे ती आग इतरत्र पसरुन सात दूकान जळून खाक झालेले आहेत. सदरील अपघात हा तक्रारदार यांचे चूकीमूळे झालेला आहे. तक्रारदार यांनी त्‍यांचे दूकानात ठेवलेल्‍या उपकरणाची योग्‍य देखभाल केलेली नाही. सदरील उपकरणे हे तक्रारदार यांचे मालकीची आहेत. विज उपकरणामधील दोषामुळे सदरील आग लागली आहे. सदरील घटना ही केवळ अपघात असून त्‍या बाबत तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाई मागू शकत नाहीत. सामनेवाले यांनी पूढे असे कथन केले आहे की,सदरील विज जोडणी ही व्‍यापारी/औद्योगिक कारणासाठी घेतलेली आहे. सदरील तक्रार या न्‍यायमंचासमोर चालण्‍यास पात्र नाही. सदरील विज पूरवठा हा तक्रारदार यांना केलेला नाही. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत. सबब, तक्रारदार यांना सदरील तक्रार या मंचासमोर दाखल करण्‍याचा अधिकार नाही. वर नमूद केलेल्‍या कारणावरुन तक्रारदार यांची तक्रार रदद करावी अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
            तक्रारदार यांनी तक्रारीसोबत घटनास्‍थळाचा पंचनामा, तहसीलदार यांनी केलेला पंचनामा व विज बिल, ही कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार यांनी स्‍वतःचे शपथपत्र मंचासमोर हजर केले आहे. तसेच रमेश म‍च्‍छी्द्र ऊफाडे या साक्षीदाराचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाले यांनी विज निरीक्षक यांचा अहवाल दाखल केला आहे.
            तक्रारदार यांचे वकील श्री.महाजन यांचा यूक्‍तीवाद ऐकला, सामनेवाले यांचे वकील श्री.पाटील यांचा यूक्‍तीवाद ऐकला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
            मुददे                                            उत्‍तर
1.     तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत ही बाब
      तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय ?                     नाही.
2.    सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पुरवलेल्‍या सेवेत त्रूटी
      ठेवली आहे त्‍यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले आहे
      ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय ?              नाही.
3.    तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे काय ?       नाही.
4.    काय आदेश  ?                             अंतिम आदेशाप्रमाणे.
 
 
                        कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
            तक्रारदार यांचे वकील श्री.महाजन यांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार  हे कूशल कारागीर असून त्‍यांनी दुचाकी वाहन दुरुस्‍तीचे गॅरेज ते स्‍वतःचे जागेत  व्‍यवसाय करतात. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. सबब, तक्रारदार यांना सदरील तक्रार दाखल करण्‍याचा अधिकार आहे.
            तक्रारदार यांचे वकीलांनी पुढे असा यूक्‍तीवाद केला की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे दूकाना शेजारी ठेवलेली विज डि.पी. ही सदोष होती. निकृष्‍ट प्रकारचे साहित्‍य वापरलेले आहे. त्‍यामुळे डी.पी. मध्‍ये थिणगी पडून ती थिणगी पुढे विज वाहक तारेतून पोलपर्यत गेली व पोलवरुन तक्रारदार यांचे दूकानात बसवलेल्‍या मिटरमध्‍ये जाऊन ते स्‍पार्कीग होऊन दूकानास आग लागली व तक्रारदार यांचे दूकानातील माल जळून गेला. सामनेवाले यांनी निकृष्‍ट सेवा प्रदान केल्‍यामुळे तक्रारदार यांचे दूकानास आग लागली आहे. तक्रारदार यांचे आगीत रक्‍कम रु.6,00,000/- चे नुकसान झाले आहे.
            तक्रारदार यांचे वकिलांनी या मंचाचे लक्ष तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या दस्‍तावरती वेधले. तक्रारदार यांनी तहसीलदार यांनी केलेला पंचनामा सादर केला आहे. सदरील पंचनामा हा तहसीलदार यांनी तक्रारदार यांचे विनंतीवरुन केलेला दिसतो.सदरील पंचनाम्‍यामध्‍ये सात दूकाने जळाल्‍या बाबत उल्‍लेख आहे. त्‍यामध्‍ये तक्रारदार यांचे एक दुकान आहे.सदरील पंचनाम्‍यामध्‍ये सदरील आगेचे कारण हे शेख गफार शेख जाफर यांचे दूकानाचे शेजारी डि.पी. असल्‍यामुळे सदरील डि.पी. वरुन थिणग्‍या बाहेर आल्‍यामुळे जळीत झाल्‍या बाबत मजकूर लिहीलेला आहे. तसेच शिवाजी नगर पोलिस स्‍टेशन यांनी घटनास्‍थळावर जाऊन पंचनामा केला आहे. त्‍या पंचनाम्‍यामध्‍ये सात दूकाने जळाली आहे व प्रत्‍येक दूकानात ठेवलेला वेगवेगळया वस्‍तू जळाल्‍या आहेत ही बाब नमूद केली आहे. तक्रारदार यांचे वकिलांनी साक्षीदाराचे शपथपत्रावर या मंचाचे लक्ष वेधले. तसेच तहसीलदार यांनी पंचनामा केला त्‍यावेळी हजर असलेले साक्षीदार रमेश ऊफाडे यांचे शपथपत्रावरुन व सोबत दाखल केलेल्‍या पंचनाम्‍यावरुन तक्रारदार यांचे नुकसान झालेले आहे ही बाब सिध्‍द झाल्‍याचे कथन तक्रारदार यांचे वकिलांनी केलेले आहे.
 
            तक्रारदार यांचे वकिलांनी त्‍यांचे यूक्‍तीवादाचे समर्थनार्थ मा.सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी दिलेला न्‍यायनिवाडयावर मंचाचे लक्ष वेधले.
 
 
 
 
2004 SAR (Civil) 583
 
Supreme Court
 
                     Ghaziabad Development Authority Vs. Balbir Singh
 
                        Their Lordship of Supreme Court in para no.8, 11, 18 and 19 of the Judgement has held that, having examined the wide reach of the Act and jurisdiction of the Commission to entertain a complaint not only against business or trading activity but even against service rendered by statutory and public authorities the stage is now set for determining if the Commission in exercise of its Jurisdiction under the Act could award compensation and if such compensation could be for harassment and agony to a consumer.
 
                        It is further observed that, thus the is that the Consumer Protection act has a wide reach and the Commission has jurisdiction even cases of service rendered by statutory and public authorities. Such authorities become liable to compensate for misfeasance in public office i.e. an act which is oppressive or capricious or arbitrary or negligent provided loss or injury is suffered bu a citizen.
 
                        वरील नमुद केलेल्‍या केसेसचा आधार घेऊन तक्रारदार यांचे वकिलांनी सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
            सामनेवाले यांचे वकिलांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत. तक्रारदार यांना सदरील तक्रार दाखल करण्‍याचा कोणताही अधिकार नाही. सदरील विज पूरवठा हा व्‍यापारी व व्‍यवसायीक कारणासाठी केलेला आहे.सबब, सदरील तक्रार ही या मंचासमोर चालू शकत नाही.
            सामनेवाले यांचे वकिलांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारीत ज्‍या पध्‍दतीने सदरील घटने बाबत विवेचन लिहीलेले आहे ते पाहता अशा प्रकारे तक्रारदार यांचे दूकानाला आग लागणे अशक्‍यप्राय आहे.सामनेवाले यांचे वकिलांनी या मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या पंचनाम्‍यावर वेधले. आग लागण्‍याचे मुख्‍य कारण तक्रारदार व इतर दूकानदार यांनी त्‍यांचे दूकानामध्‍ये एक सुमो गाडी व गॅरेज मधील संपूर्ण साहित्‍य व कागदपत्र व सनी मोटार सायकल, एक यामाहा कंपनीची मोटार सायकल,एक कॉम्‍प्‍यूटर इतर ज्‍वलनशिल पदार्थ ठेवलेले होते तसेच शेख गफार शेख जाफर यांचे दूकान डि.पी. शेजारी आहे डि.पी.तून थिणगी बाहेर आल्‍यामुळे दूकानास आग लागली असे कथन केलेले आहे.सबब, विज प्रवाह पुरवणा-या डि.पी. वरुन वायर सदोष असल्‍यामुळे तक्रारदार यांचे दूकानापर्यत स्‍पार्कीग होऊन तक्रारदार यांचे दूकान जळाले आहे हे जे कथन केलेले आहे ते वस्‍तूस्थितीला धरुन नाही व खरे नाही. सामनेवाले यांचे वकिलांनी असे कथन केले आहे की, सदरील घटना ही तक्रारदार व इतर दूकानदारांचे निष्‍काळजीपणामुळे घडली आहे व तो एक अपघात आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाहीत.
            वर नमुद केलेल्‍या यूक्‍तीवाद लक्षात घेतला व तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्र व शपथपत्र यांचे काळजीपूर्वक अवलोकन केले. तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केले त्‍याप्रमाणे तक्रारदार यांचे दूकानास आग लागणे शक्‍य नाही असे या मंचाचे मत आहे. कारण डि.पी. मध्‍ये दोष असता तर डि.पी. चा स्‍फोट होऊन त्‍याठिकाणी तसे अवशेष आढळून आले असते. तसेच पंचनामा करीत असताना तक्रारदार यांचे डि.पी. वरुन पोलपर्यत व पोलपासून तक्रारदार यांचे दूकानापर्यत जी वायर गेलेली आहे त्‍यामध्‍ये दोष आहे ही बाब निदर्शनास आली असती. तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या पंचनाम्‍यावरुन असा कोणताही दोष सदरील डि.पी. मध्‍ये अगर वायरमध्‍ये आढळून आलेले नाही तसेच पोलिसांनी विद्यूत निरीक्षक यांचेकडे सदरील आग लागण्‍यास कोणतेही कारण घडलेले आहे या बाबत चौकशी करुन अहवाल मागितली आहे. सदरील अहवाल हा सामनेवाले यांनी या मंचासमोर हजर केलेला आहे. त्‍यांचे अवलोकन केले असता महाराष्‍ट्र राज्‍य विज मंडळाचा विभागीय कार्यालया जवळ पत्रयाचे शेड ठोकून सात दूकाने होती. त्‍यापैकी पाच दूकानाना सिंगल फेज कनेक्‍शन होते व काही दूकानामध्‍ये वापरासाठी इन्‍व्‍हर्टर, बँटरी ऑईल, इत्‍यादी ज्‍वालाग्रही पदार्थ ठेवलेले आढळतात. तसेच तक्रारदार यांनी त्‍यांचे दूकानापर्यत जो विज प्रवाह दिलेला आहे त्‍यामध्‍ये दोष होता ही बाब सिध्‍द करु शकलेले नाहीत. सदरील वाहनात आग रात्री 1 वाजेचे सुमारास लागली. त्‍यावेळी नेमके कोणते कारण घडले या बाबत कोणताही सबळ पुरावा मंचासमोर हजर केलेला नाही. केवळ डि.पी. मध्‍ये स्‍पार्कीग झाले आहे त्‍यामुळे आग लागली आहे हे कोणत्‍या प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदाराने पाहिले नाही अगर डि.पी. मध्‍हये स्‍पार्कीग होऊन वायर जळाल्‍या बाबत कोणताही पूरावा मंचासमोर हजर केलेला नाही.
            तक्रारदार हे त्‍याठिकाणी आपला व्‍यवसाय करीत होते या बाबत कोणतेही कागदपत्र अगर दस्‍ताऐवज हजर केलेला नाही. तक्रारदार यांचे दूकान नगर परिषद मध्‍ये शॉप अँक्‍ट खरेदी नोंदणीकृत दूकान आहे या बाबतही कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सदरील विज प्रवाह हा व्‍यापारी अगर औद्योगिक कारणासाठी घेतलेला असल्‍यामुळे सदरील तक्रार या मंचापूढे चालू शकत नाही.
            सामनेवाले यांचे वकिलांनी या मंचाचे लक्ष सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी दिलेल्‍या न्‍यायनिवाडयाकडे वेधले.
Westlaw India
 
Supreme Court of India
1 July 2013
 
Uttar Pradesh Power Corporation Limited and others
V
Anis Ahmad
 
                        In this reported case, the Lordship of Supreme Court in para no.24 of the Judgment has held that, the complainant had electrical connection for industrial/commercial purpose and, therefore, they do not come within the meaning of “Consumer ” as defined under section 2 (1)(d) of the Consumer Protection Act, 1986, they can not be treated as “Complainant ” nor they are entitled to file any “Complaint” before the Consumer Forum. 
           संपूर्ण पुराव्‍याचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता या मंचाचे मत की, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नाहीत.सदरील विज पूरवठा हा  व्‍यापारी कारणासाठी पुरविण्‍यात आला होता तसेच सदरील तक्रारदार यांचे दूकानास लागलेली आग ही सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे त्‍यामुळे लागली आहे या सर्व बाबी तक्रारदार हे शाबीत करुशकलेले नाही. सबब, तक्रारदार यांची तक्राररददहोण्‍यास पात्र आहे.
                 मुददा क्र.1 ते 3 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.
                  सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
                     आदेश
1.     तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2.    खर्चाबददल आदेश नाही.
      3.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
                       (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
                       श्रीमती मंजुषा चितलांगे             श्री.विनायक लोंढे                                      
                                सदस्‍य                    अध्‍यक्ष     
                                                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
 
 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.