Maharashtra

Nagpur

CC/12/419

राजेंद्र भगवान पाटील, - Complainant(s)

Versus

ओरीअंटल इंश्‍युरन्‍स कंपनी मर्यादीत, - Opp.Party(s)

श्री. अभयकुमार जाधव.

02 Nov 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/419
 
1. राजेंद्र भगवान पाटील,
अंदाजे वयः 32 वर्षे, व्‍यवसायः शेती, राह. कोरेगाव, ता. वाळवा, जिल्‍हा सांगली.
सांगली.
महाराष्‍ट्र.
...........Complainant(s)
Versus
1. ओरीअंटल इंश्‍युरन्‍स कंपनी मर्यादीत,
श्री. एस.व्‍ही. महाजन, मॅनेजर, ओरीअंटल इंश्‍युरन्‍स कंपनी मर्यादीत, प्‍लॉट नं.8, हिंदुस्‍थान कॉलनी, अजनी चौक, वर्धा रोड, नागपूर.
नागपूर.
महाराष्‍ट्र.
2. ओरीअंटल इंश्‍युरन्‍स कंपनी मर्यादीत,
शुक्‍ला भवन वेस्‍ट हायकोर्ट रोड,धरमपेठ, नागपूर.
नागपूर.
महाराष्‍ट्र.
3. काबल इंश्‍युरन्‍स कंपनी मर्यादीत,
118, बी मित्‍तल टॉवर, 11 वा मजला, नरीमन पॉइंट मुंबई.
मुंबई.
महाराष्‍ट्र.
4. महाराष्‍ट्र सरकार कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग,
मंत्रालय विस्‍तार, मुंबई.
मुंबई.
महाराष्‍ट्र.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE PRESIDENT
 HON'ABLE MS. GEETA BADWAIK MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्रीमती गीता बडवाईक, सदस्‍या यांच्‍या आदेशाप्रमाणे.
 
-आदेश-
(02.11.2012)
1.           तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विम्‍याची रक्‍कम मिळण्‍याकरीता दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांचा तक्रार दाखल करुन घेण्‍याच्‍या मुद्यावर युक्‍तीवाद ऐकला. तक्रारकर्त्‍याची तक्रार व दाखल केलेले दस्‍तऐवज यांचे अवलोकन केले असता ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्ता हा रा. कोरेगाव, ता. वाळवा, जि. सांगली येथील राहिवासी आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांचा दि.21.03.2008 रोजी भाजी आणण्‍याकरीता मंडईत गेले असता अज्ञात वाहनाच्‍या धडकेने त्‍यांचा मृत्‍यु झाला असे तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद केले आहे. परंतू सदर अपघात कोठे झाला, तक्रारकर्त्‍याचे शेत कोणत्‍या ठिकाणी आहे, तसेच कोणत्‍या तहसिलदारांकडे तक्रारकर्तीचा विमा दावा अर्ज आणि इतर कागदपत्रे जमा केली याबाबत तक्रारीत कुठेही उल्‍लेख नाही. दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांची शेती मौजा कोरेगाव, ता. वाळवा, जि. सांगली येथे गट क्र. 1317 ही आहे व तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांच्‍या मृत्‍युची नोंद ही पोलिस स्‍टेशन हातकणंगले येथे करण्‍यात आलेली आहे.
2.          तक्रारकर्त्‍याने शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना शासन निर्णयाची प्रत दाखल केलेली आहे. ज्‍यामध्‍ये स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे की, घरातील कर्त्‍या व्‍यक्‍तीस झालेल्‍या अपघातामुळे कुटुंबाचे उत्‍पन्‍नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्‍थीती निर्माण होत असल्‍याने अशा अपघातग्रस्‍त शेतक-यास/त्‍यांच्‍या कुटुंबास आर्थिक लाभ देण्‍यासाठी कोणतीही स्‍वतंत्र विमा योजना नसल्‍याने सदर योजना शासनाने कार्यान्‍वीत केलेली आहे. यामध्‍ये शासन निर्णयामध्‍ये प्रामुख्‍याने नमूद केले आहे की, राज्‍यातील महसुल विभागाकडील नोंदीप्रमाणे 12 ते 75 वयोगटातील शेतकरी यांचे वतीने शासन त्‍यांच्‍या व्‍यक्‍तीगत अपघात व अपंगत्‍व यासाठी प्रस्‍तुत शासन निर्णयाद्वारे विमा पॉलिसी उतरवित आहे. यामध्‍ये विमा कंपनीची नावे आणि त्‍या‍ विमा कंपनीला सोपविण्‍यात आलेले कार्यक्षेत्र हे नमूद केलेले आहे. तक्रारकर्त्‍याची शेती ही मौजा कोरेगाव, ता. वाळवा, जि. सांगली येथे आहे. तसेच तिथल्‍याच तहसिलदाराकडे तक्रारकर्त्‍याने विमा दावा प्रपत्र दाखल केले असे तक्रारकर्ता आपल्‍या तक्रारीत नमूद करतो. शासन निर्णयानुसार तक्रारकर्त्‍याने त्‍याचे शेत ज्‍या कार्यक्षेत्रात येते, त्‍या कार्यक्षेत्रातील संबंधित अधिका-याकडे म्‍हणजेच तालुका निरीक्षक व तहसिलदार यांचेकडे विमा दावा दाखल केलेला आहे. त्‍यामुळे सदर तक्रार नागपूर मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही. करीता तक्रारकर्त्‍याची तक्रार त्‍याला परत करण्‍यात येते. तक्रारकर्ता योग्‍य त्‍या मंचासमोर दाद मागण्‍यास मुक्‍त आहे. करीता खालीलप्रमाणे आदेश.
 
-आदेश-
      तक्रारकर्त्‍याची तक्रार तिला परत करण्‍यात येत आहे. तक्रारकर्ता योग्‍य त्‍या मंचासमोर दाद मागण्‍यास मुक्‍त आहे. खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.         
 
 
 
[HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MS. GEETA BADWAIK]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.