Maharashtra

Thane

CC/343/2013

मेसर्स स्‍टरलाईट मेटल रोलीग मिल्‍स प्रा लिमिटेड तर्फे श्री. प्रशांत बाबुलाल पचसिया - Complainant(s)

Versus

एम एस ई बी कंपनी लिमिटेड तर्फे अधिक्ष‍क अभियंता - Opp.Party(s)

अॅड अे अे गर्ग

25 Oct 2013

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच,ठाणे
 
CC NO. 343 Of 2013
 
1. मेसर्स स्‍टरलाईट मेटल रोलीग मिल्‍स प्रा लिमिटेड तर्फे श्री. प्रशांत बाबुलाल पचसिया
मु. पॉवर ऑफ ऑथरणी होल्‍डर - प्‍लॉट नं 161 ते 170 , वि. विठठलवाडी रेल्‍वे स्‍टेशन, उल्‍हासनगर -421301
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. एम एस ई बी कंपनी लिमिटेड तर्फे अधिक्ष‍क अभियंता
मु .कल्‍याण सर्कल 2, तेजश्री, 3रामजला, बि. जहागिर मेहरवानजी रोड, कल्‍याण 421301
ठाणे
महाराष्‍ट्र
2. अधिक्ष‍क अभियंता एम एस ई बी कंपनी लिमिटेड
मु .कल्‍याण सर्कल 2, तेजश्री, 3रामजला, बि. जहागिर मेहरवानजी रोड, कल्‍याण 421301
ठाणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. UMESH V. JAWALIKAR PRESIDENT
 HON'ABLE MR. N D KADAM MEMBER
 
PRESENT:
तक्रारदार व तक्रारदारतर्फे वकील जितेंद्र ओक हजर
 
 
ORDER

ता.25.10.2013

प्रस्‍तुत तक्रार आज उशिर माफीचे अर्जावर व दाखल सुनावणीकामी वादसूचीवर होती. तक्रारदाराचे वकीलांनी दीर्घकाळ युक्‍तीवाद केला. प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये तक्रारदाराने तक्रार दाखल करण्‍यास 90 दिवसांचा उशिर झाला असून सदर उशिर माफ करणेबाबत विनंती अर्ज दिला आहे. मूळ तक्रारीमधील विनंतीमध्‍ये विद्युत देयकाचे व्‍याजात झालेल्‍या चुकीच्‍या आकारणीबाबत दाद मागितली आहे. तक्रारदाराने असाही युक्‍तीवाद केला ही प्रस्‍तुत तक्रारदार हे दुसरे सह दिवाणी न्‍यायालय वरिष्‍ठ स्‍तर यांनी विशेष दिवाणी दावा क्र. 813/1996 मध्‍ये पारीत अंतीम आदेश दि. 06/01/2010 चे पूर्णपणे पालन केले असून सदर आदेशाविरुध्‍द कोणत्‍याही न्‍यायालयात अपिल दाखल केलेले नाही. तसेच तक्रारदार यांचेकडे बसविलेले विद्युत मापक हे वाणिज्यिक एल.टी.2 या प्रवर्गात येत असल्‍याने व मूळ तक्रारदार स्‍टरलाईट मेटल रोलींग मिल्‍स प्रा.लि. ही कंपनी कायदयान्‍वये नोंदणीकृत कंपनी असून नफ्याच्‍या उद्देशाने चालविली जात होती. प्रस्‍तुत तक्रारदाराने तक्रारीत वाणिज्‍यीक स्‍वरुपात वापर केलेल्‍या विदयुत बिलाचे आकारणीत अतिरिक्‍त व्‍याज नमूद केल्‍यामुळे सामनेवाले यांचेविरुध्‍द दाद मागितली आहे. दिवाणी न्‍यायालयाच्‍या आदेशाच्‍या पूर्ततेकामी नमूद व्‍याजाची मागणी सामनेवाले यांनी केली आहे. त्‍याची पूर्तता तक्रारदाराने केलेली आहे. तक्रारदाराने दाखल तक्रारीतील दाद व विनंती ही वाणिज्यिक स्‍वरुपाच्‍या देयकाशी संबंधीत असल्‍याने या मंचास सदर तक्रार चालविणेचे अधिकारक्षेत्र नसल्‍याने सदरची तक्रार दाखल करुन घेणे न्‍यायोचित नाही. सबब सदरची तक्रार निकाली काढण्‍यात येते. तक्रारदाराने दाखल केलेला किरकोळ अर्ज निकाली काढण्‍यात आला.

 
 
[HON'ABLE MR. UMESH V. JAWALIKAR]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. N D KADAM]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.