जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक -४१/२०१४
तक्रार दाखल दिनांक -१२/०३/२०१४
तक्रार निकाली दिनांक -२८-०३-२०१४
(१) श्री.प्रकाश दामोदर चौधरी ----- तक्रारदार
उ.व.६०, धंदा-निवृत्त
(२) श्री.आशिश प्रकाश चौधरी
उ.व.३२, धंदा-नोकरी
वरील दोन्ही राहणार
प्लॉट नं.४/ब रुपा स्मृती,
फुले कॉलनी,धुळे.ता.जि.धुळे
विरुध्द
(१) एनएसजी डेव्हलपमेंट कार्पोरेशन ----- सामनेवाले
श्री गणेश नानासाहेब गायवाड
प्रोप्रा.एनएसजी हाऊस सर्व्हे नं.१२२६/२ब
औध,पुणे-४११००७
(२) रेश्मा मते-मॅनेजर
एनएसजी डेव्हलपमेंट कार्पोरेशन
एनएसजी हाऊस सर्व्हे नं.१२२६/२ब
औध,पुणे-४११००७
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.के.आर.लोहार)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदार यांनी फ्लॅट खरेदीकामी अदा केलेली रक्कम सामनेवालेंकडून परत मिळण्यासाठी सदरचा तक्रार अर्ज, ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केला आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांना पुणे येथे फ्लॅट खरेदी करावयाचा असल्याने त्यांनी सामनेवाले क्र.१ यांचेकडून सिंहगड रोड, पुणे येथील फ्लॅट नंबर बी-६०१ क्षेत्रफळ ८६९ स्क्वे.मि. हा फ्लॅट रु.४८,०६,०३९/- या किमतीस विकत घेण्याचे ठरवले. या कामी सामनेवाले यांना रोख रक्कम व धनादेशने रु.३,८०,८८०/- एवढी रक्कम अदा केली. सामनेवालेंनी लगेच फ्लॅट खरेदी करुन फ्लॅटचा कब्जा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु बराच कालावधी जावून देखील सामनेवाले यांनी फ्लॅटचा रजिष्ट्रेशन व कब्जा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांच्या लक्षात आले की, त्यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे त्यांनी सामनेवाले यांना लेखी पत्र पाठवून सदरचा व्यवहार रद्द केला व त्या व्यवहारापोटी अदा केलेली रक्कम परत मिळण्याची विनंती केली. सामनेवाले यांनी सदर रक्कम अद्यापपावेता परत केलेली नाही. म्हणून सदरची रक्कम व्याजासह देण्यास व मानसिक त्रास व खर्चाची रक्कम देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत.
सदर फ्लॅट खरेदीच्या बुकींगसाठी तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांना धुळे येथील एस.बी.आय. चा धनादेश दिला. तसेच ठराव हा धुळे येथे झालेला आहे. व्यवहारापोटी रकमेचा भरणा हा वेळोवेळी धुळे येथून दिलेला आहे. त्यामुळे वादास कारण हे या मंचाच्या अधिकार कक्षेत व स्थल सिमेत आहे. सबब या मंचास सदरचा तक्रार अर्ज चालवून त्यावर निकाल देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सदरची तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(३) तक्रारदाराची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांना फ्लॅट खरेदीकामी अदा केलेली रक्कम रु.३,८०,८८०/- व्याजासह मिळावी व अर्जाचा खर्च मिळावा.
तक्रारदारांनी त्यांच्या कथनाचे पुष्टयर्थ नि.नं.४ वर शपथपत्र तसेच नि.नं.६ वरील वर्णन यादी प्रमाणे एकूण ९ कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. त्यात फ्लॅट बुकींगचा ठराव, सामनेवालेंनी पैसे स्वीकारल्याची पावती, इ.चा समावेश आहे.
(४) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारांचा अर्ज,शपथपत्र व दाखल कागदपत्रे पाहता आमच्यासमोर खालील मुद्दा उपस्थित होतो व त्याचे उत्तर आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दा : |
निष्कर्षः |
(अ)तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, ग्राहक संरक्षण कायदा कलम ११ प्रमाणे या मंचाचे कार्यक्षेत्रात आहे काय ? |
:नाही. |
(ब)आदेश काय ? |
:अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(५) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज या मंचाचे अधिकार क्षेत्रात येतो काय ? हा मुद्दा तक्रार दाखल करुन घेण्याच्या टप्प्यावर काढला गेला आहे. या मुद्यावर तक्रारदार वकीलांचा युक्तिवाद ऐकण्यात आला.
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’–तक्रारदार यांच्या सदर तक्रार अर्जाचा विचार करता असे दिसते की, तक्रारदार हे धुळे जिल्हा येथे राहणारे असून त्यांना पुणे येथे फ्लॅट खरेदी करावयाचा आहे. त्याकामी त्यांनी पुणे येथील सामनेवाले क्र.१ एनएसजी डेव्हलपमेंट कार्पोरेशन श्री गणेश नानासाहेब गायकवाड. प्रोप्रा. एनएसजी हाऊस सर्वेनं.१२२६/२ब औध, पुणे- ४११००७. यांचेशी व्यवहार करुन फ्लॅट बुक केला व त्याकामी रोख रक्कम रु.३,८०,८८०/- अदा केली आहे.
यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी पुणे येथे फ्लॅट बुक केलेला आहे व सदर फ्लॅट बाबत वाद असून, सदर वादग्रस्त मिळकत ही पुणे येथे आहे. तसेच सामनेवाले हे पुणे येथे व्यवसाय करतात व त्यांचे कार्यालय पुणे येथे आहे. म्हणजेच सदर फ्लॅट बाबतचा व्यवहार हा पुणे येथे झालेला आहे. सामनेवाले हे पुणे येथे कार्यरत आहेत. त्यामुळे सदर अर्जास कारण हे पुणे येथे घडल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.
(७) तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, सदर फ्लॅट बुकींगसाठी तक्रारदारांनी धुळे येथून एसबीआय चा धनादेश दिला व ठराव हा धुळे येथे झाला. तसेच या व्यवहारासाठी आवश्यक असेलेली रक्कम धुळे येथूनच अदा केलेली आहे. त्यामुळे या मंचाच्या अधिकारक्षेत्रात सदर तक्रार दाखल करता येते. परंतु सदर वादग्रस्त फ्लॅट मिळकत ही पुणे येथे आहे. तसेच सामनेवाले यांचे कार्यालय पुणे येथे आहे. त्यामुळे सदर फ्लॅट खरेदी करण्याचा ठराव हा सामनेवाले यांचे कार्यालय पुणे येथे झाला, असे स्पष्ट होते. तसेच या बाबतच्या कोणत्याही ठरावाची प्रत तक्रारदार यांनी पुराव्याकामी दाखल केलेली नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना धुळे येथून धनादेश दिलेला आहे. परंतु सामनेवाले यांना फ्लॅट बुकींग कामी धनादेश हा कोणत्या गावातून दिला ही बाब कार्यक्षेत्र ठरविण्याकामी विचारात घेता येणार नाही. सामनेवाले यांचे ज्या ठिकाणी कार्यालय आहे व ज्या ठिकाणी वादग्रस्त मिळकत आहे त्या जिल्ह्याच्या ग्राहक मंचास, तक्रार चालविण्याचा अधिकार प्राप्त होतो.
(८) तक्रारदार यांचे पुढे असेही म्हणणे आहे की, सामनेवाले यांनी सदर फ्लॅटचे रजिष्ट्रेशन व कब्जा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांची सामनेवालेंकडून फसवणूक झाली आहे असे लक्षात आल्याकारणाने, सदरचा व्यवहार रद्द केला आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, सामनेवालेंनी फसवणूक केली आहे. तक्रारदार यांच्या म्हणण्याप्रमाणे जर सामनेवालेंनी त्यांची फसवणूक केलेली असेल तर, सामनेवाले यांनी फसवणूक केली आहे किंवा नाही हे ठरविण्याचे अधिकार या मंचास नाही. त्याकामी तक्रारदार यांना फसवणूकीची तक्रार योग्य त्या न्यायाधिकरणाकडे दाखल करावी लागेल.
(९) उपरोक्त बाबीचा विचार करता, तक्रारदार यांची सदर तक्रार या मंचाचे कार्यक्षेत्रात येत नाही असे आमचे मत आहे. त्यामुळे तक्रारदार यांच्या म्हणण्यात तथ्य नाही. या बाबत आपण ग्राहक संरक्षण कायदा कलम ११ चा विचार करणे योग्य होईल.
ग्राहक संरक्षण कायदा कलम ११ :
(2) Acomplainant shall be instituted in a District Forum within the local limits of whose jurisdiction.
(a) the opposite party or each of the opposite parties,where there are more than one, at the time of the institution of the complaint,actually and voluntarily resides or [carries on business or has a branch office or] personally works for gain,or
(b) any of the opposite parties,where there are more than one,at the time of the institution of the complaint,actually and voluntarily resides,or [carries on business or has a branch office],or personally works for gain,provided that in such case either the permission of the District Forum is given,or the opposite parties who do not reside,or [carry on business or have a branch office],or personally work for gain,as the case may be, acquiesce in such institution,or
(c) the cause of action,wholly or in part,arises.
या कलमा प्रमाणे, कोणतेही प्रकरण त्याच जिल्हा ग्राहक मंचाच्या ठिकाणी चालू शकते, ज्या ठिकाणी सामनेवालेराहतात व व्यवसाय करतात. किंवा ज्या ठिकाणी त्यांची शाखा आहे व त्या शाखेत कारण घडले असेल त्याच ठिकाणी प्रकरण दाखल करता येते. परंतु ज्या ठिकाणी तक्रारदार राहतात किंवा व्यवसाय करतात, त्या ठिकाणी प्रकरण दाखल करता येत नाही. सदर प्रकरणात सामनेवाले यांची धुळे येथे शाखा नसून वादग्रस्त मिळकत ही धुळे येथे नाही. तसेच सामनेवाले क्र.१ यांचे कार्यालय हे ता.जि.पुणे येथे आहे व त्या ठिकाणी तक्रारदारांना फ्लॅट खरेदी करावयाचा असल्याने, अर्जास कारण हे पुणे मंचाच्या कार्यक्षेत्रात घडलेले आहे. सबब धुळे मंचाच्या कार्यक्षेत्रामध्ये सदर तक्रार दाखल करण्यास पात्र नाही. याचा विचार होता, वरील प्रकरण चालविण्याचे प्रांतीय अधिकार क्षेत्र “territorial jurisdiction” या मंचास नाही. जरुर तर तक्रारदार हे योग्य त्या कार्यक्षेत्र असलेल्या मंचात तक्रार दाखल करु शकतात. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(१०) या कामी मंचामार्फत खालील न्यायनिवाडयांचा आधार घेण्यात आला आहे.
· Civil Appeal No.1560 of 2004 Order Dated Oct.20,2009 (S.C.)
Sonic Surgical Vs National Insurance Company Ltd.
· AIR 2000 Supreme Court 579
H.V.Jayaram Vs Industrial Credit and Investment Corporation of India Ltd. & Anr.
· II (2011) CPJ 88 (NC)
Neha Singhal Vs Unitech Limited. And
Abhishek Singhal Vs Unitech Limited
· I (2012) CPJ 81
Saluja Ford Vs Hira Lal Thakur & Ors.
· II (2004) CPJ 36 (NC)
Arup Kumar Bhattacharya Vs Kundu Tirtha Special & Anr.
· 1997 (1) Bom. C.R.(Cons.)1 (N.C.D.R.C. New Delhi)
Rajaram Com Producers Punjab Ltd Vs Suryakant Nitin Kumar
Gupta.
(११)मुद्दा क्र. ‘‘ब’’– वरील सर्व कारणांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
· तक्रारदारांचा तक्रार अर्ज दाखल करुन घेण्याच्या मुद्यावर, खारीज करण्यात येत आहे.
धुळे.
दिनांकः २८-०३-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.