जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 82/2023. आदेश दिनांक : 17/04/2023.
सचिन पिता सूर्यभान राठोड, वय 35 वर्षे, व्यवसाय : कन्स्ट्रक्शन,
रा. नाईक नगर, देगलूर रोड, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
एच.डी.बी. फायनान्शीयल सर्व्हीसेस लि.,
ऑफीस : एस. एस. टॉवर, पहिला मजला, पंजाब नॅशनल बँकेच्या
वर, भगतसिंग रोड, बाफना टी पॉईन्ट, नांदेड - 431 602.
(व्यवस्थापक यांच्यावर सूचनाबत्र बजावण्यात यावे.) विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. राजू गोविंद राठोड
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) ग्राहक तक्रार व कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ता यांच्या विद्वान विधिज्ञांचा प्रकरण दाखलपूर्व युक्तिवाद ऐकला.
(2) तक्रारकर्ता यांच्या कथनांनुसार ते माल वाहतूक, ट्रान्सपोर्टेशन व कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात. अझॅक्स फ्लोरी ॲग्रो-2000 काँक्रीट मिक्सर (Arax Flori Agro 2000 Concrete Mixer) नोंदणी क्र. एम.एच.24 ए.एस.6407 खरेदी करण्यासाठी त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.23,50,000/- कर्ज घेतले होते. प्रतिमहा रु.60,800/- प्रमाणे 52 हप्त्यांमध्ये दि.4/3/2018 ते 4/6/2022 कालावधीमध्ये परतफेड करावयाची होती. ऑगस्ट 2019 पर्यंत त्यांनी कर्ज रकमेची परतफेड केली. परंतु वाहनाच्या इंजीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे व कोविड-19 जागतिक महामारीमुळे व्यवसाय बंद झाला आणि हप्ते भरता आले नाहीत. त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी पूर्वसूचना व कायदेशीर सूचनापत्र न देता दि.19/12/2021 रोजी वाहन जप्त केले आणि रु.19,51,628/- रकमेची मागणी केली. तक्रारकर्ता यांनी रु.13,00,000/- स्वीकारण्याची विनंती केली; परंतु विरुध्द पक्ष यांनी लिलाव प्रक्रियेद्वारे वाहनाची विक्री केलेली आहे. विरुध्द पक्ष यांच्या त्रुटीयुक्त सेवेमुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन रु.13,00,000/- स्वीकारुन वाहनाचा ताबा परत करण्याचा व प्रतिमहा रु.1,50,000/- नुकान भरपाई देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांचे निवेदन, कागदपत्रे व युक्तिवाद पाहता तक्रारकर्ता हे 'ग्राहक' संज्ञेत येतात काय ? हा मुद्दा उपस्थित होतो.
(4) ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2 (7) मध्ये 'ग्राहक' शब्दाची संज्ञा नमूद आहे. ती अशी की,
(7) "consumer" means any person who—
(i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment, when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or
(ii) hires or avails of any service for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any system of deferred payment and includes any beneficiary of such service other than the person who hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment, when such services are availed of with the approval of the first mentioned person, but does not include a person who avails of such service for any commercial purpose.
Explanation.—For the purposes of this clause,—
(a) the expression "commercial purpose" does not include use by a person of goods bought and used by him exclusively for the purpose of earning his livelihood, by means of self-employment;
(b) the expressions "buys any goods" and "hires or avails any services" includes offline or online transactions through electronic means or by teleshopping or direct selling or multi-level marketing;
(5) तक्रारकर्ता यांचे निवेदन असे की, ते माल वाहतूक, ट्रान्सपोर्टेशन व कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात आणि अझॅक्स फ्लोरी ॲग्रो-2000 काँक्रीट मिक्सर खरेदी करण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्याकडून कर्ज घेतलेले आहे. तक्रारकर्ता यांनी खरेदी केलेले वाहन हे बांधकाम व्यवसायाशी निगडीत दिसते. प्रामुख्याने, व्यापारी स्वरुपाचा उद्योग नफा प्राप्तीसाठी असतो आणि ज्यामध्ये गुंतवणुकीवर लाभ मिळविणे, हे प्रमुख ध्येय असते. तक्रारकर्ता यांची कथने, दस्त, पुरावे पाहता वाहन खरेदीचा उद्देश हा दैनंदीन जीवनावश्यक गरजा भागविणेसाठी उत्पन्नाचे साधन नसून केवळ व्यापारी तत्वाने नफा मिळविणे, असा दृष्टीकोन दिसतो. वाद-तथ्ये व कायदेशीर तरतूद पाहता तक्रारकर्ता हे 'ग्राहक' संज्ञेत येणार नाहीत आणि ग्राहक तक्रार रद्द होण्यास पात्र ठरते. उक्त विवेचनाअंती तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
(संविक/स्व/17423) -०-