(पारीत व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक-11 मार्च, 2022)
- तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35 खाली विरुध्दपक्ष सुरभी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था मर्यादित, कारधा, तालुका जिल्हा भंडारा रजि.नं.-337/99-2000 ही सहकारी संस्था आणि संस्थे तर्फे- अध्यक्षा- सौ.शालीना बुध्देश्वर गडपायले आणि व्यवस्थापक श्री महेंद्र महादेव तिरपुडे यांचे विरुध्द पतसंस्थे मध्ये गुंतवणूक केलेल्या रकमा देय लाभासंह व व्याजासह मिळण्यासाठी दाखल केलेली आहे.
- तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे यामधील विरुध्दपक्ष सुरभी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, कारधा, तालुका-जिल्हा- भंडारा रजि.नं.-337/99-2000 ही सहकारी संस्था असून विरुध्दपख क्रं 1 व क्रं 2 हे सदर संस्थेचे संचालक आहेत. सदर संस्था बॅंकींग व्यवहार पाहते. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष सहकारी संस्थे मध्ये खालील विवरणपत्रा प्रमाणे रकमांची गुंतवणूक केली-
अक्रं | दस्तऐवजाचे विवरण | मुदत ठेवीचा रसिद क्रमांक | मुदत ठेवीचा खाते क्रमांक | मुदत ठेवी मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम | मुदत ठेवीचा कालावधी | मुदती नंतर मिळणारी परिपक्व रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
1 | दामदुप्पट/मासिक/ मुदती ठेव पावती | 126 | 829 | 2,20,000/- | 20.04.2020 ते 21.04.2026 | 4,40,000/- |
2 | दामदुप्पट/मासिक/ मुदती ठेव पावती | 101 | 820 | 1,00,000/- | 14.02.2020 ते 15.02.2026 | 2,00,000/- |
या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष संस्थेतील बचत खात्या मध्ये खालील प्रमाणे रक्कम जमा केली.
अक्रं | दस्तऐवजाचे विवरण | बचत ठेव खाते क्रमांक | व्याजाचा दर | बचत खात्या मध्ये जमा असलेली शिल्लक रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 |
1 | बचत ठेव खाते | 597 | 5% | 47,736/- |
तक्रारकर्त्याचे पुढे असे म्हणणे आहे की, त्याची आर्थिक स्थिती हलाखीची असून त्याला आईचे वैद्दकीय उपचारा करीता रकमेची गरज असल्याने त्याने विरुध्दपक्षां कडे मुदती ठेवी परिपक्व होण्या पूर्वीच जमा रकमेची मागणी केली असता त्याला रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली व अपमानीत केले. त्याने विरुध्दपक्ष संस्थे मध्ये मुदत ठेवी मध्ये आणि बचत खात्यात जमा रक्कम परत मिळण्या बाबत दिनांक-09.02.2021 व दिनांक-22.02.2021 अशा तारखांचे अर्ज सादर केलेत परंतु वर उल्लेखित एकूण रक्कम रुपये-3,67,736/- व त्यावरील नियमा नुसार देय व्याजाची रक्कम परत केली नाही व त्याची फसवणूक केली. अशाप्रकारे विरुध्दपक्षांनी त्याला दोषपूर्ण सेवा दिली म्हणून त्याने विरुध्दपक्षांना वकीलांचे मार्फतीने कायदेशीर नोटीस दिनांक-06.04.2021 रोजीची रजि. पोस्टाने पाठविली, सदर नोटीस विरुध्दपक्षांना मिळूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष संस्थे मध्ये दामदुप्पट योजने मध्ये गुंतवणूक केलेली रक्कम आणि बचत खात्यातील जमा रक्कम असे मिळून एकूण रक्कम रुपये-3,67,736/- आणि सदर रकमेवर रक्कम जमा केल्याचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18 टक्के दराने व्याज यासह येणारी रक्कम विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याला परत करण्याचे आदेशित व्हावे.
- त्याला झालेल्या शारिरीक मानसिक व आर्थिक त्रासा बददल नुकसान भरपाई तसेच तक्रारीचा खर्च असे मिळून रुपये- 1,30,000/- विरुध्दपक्षांनी देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. दोन्ही विरुध्दपक्षांचे नाव आणि पत्त्यावर जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे रजिस्टर पोस्टाव्दारे नोटीस पाठविल्या असता सदर नोटीसेस उभय विरुध्दपक्षांना दिनांक-06.09.2021 रोजी प्राप्त झाल्या बाबत रजिस्टर पोच अभिलेखावर दाखल आहेत परंतु अशी नोटीस प्राप्त झाल्या नंतरही दोन्ही विरुध्दपक्ष हे जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा त्यांनी लेखी निवेदन दाखल केले नाही म्हणून दोन्ही विरुध्दपक्षां विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात दिनांक-27.10.2021 रोजी पारीत केला. तक्रारकर्त्याची तक्रार सत्यापनावर दाखल असून त्याने पुराव्या दाखल स्वतःचे शपथपत्र दाखल केलेले आहे तसेच दोन्ही विरुदपक्षांनी आपले बचावार्थ कोणतेही लेखी निवेदन दाखल केलेले नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजी पुराव्याचे आधारे प्रस्तुत तक्रार गुणवत्ततेवर (On Merit) निकाली काढण्यात येत आहे.
04. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र आणि त्याने दाखल केलेले दस्तऐवज इत्यादीचे जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन करण्यात आले त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थेने तक्रारकर्त्यास मुदतठेवीच्या जमा रकमा आणि बचत खात्या मधील जमा रक्कम आणि त्यावरील व्याज न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | -होय- |
2 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: निष्कर्ष ::
मुद्दा क्रं 1 बाबत
05. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीचे समर्थनार्थ विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे मध्ये मुदत ठेव महणून जमा ठेवलेल्या रकमांच्या पावत्यांच्या प्रती तसेच बचत ठेव खाते पुस्तीकेची प्रत पुराव्यार्थ दाखल केली. दोन्ही मुदत ठेव पावत्यांच्या प्रतीं वरुन असे दिसून येते की, दोन्ही मुदतठेवींच्या रकमा या सन-2026 मध्ये परिपक्व होणार होत्या परंतु तक्रारकर्त्याला आईचे उपचारार्थ तसेच दुसरी कडून घेतलेले कर्ज फेडण्या करीता रकमांची गरज असल्यामुळे त्याने दोन्ही मुदतठेवी परिपक्व होण्या आधीच मागणी फेब्रुवारी-2021 मध्ये केलेली आहे त्यामुळे तक्रारकर्त्यास विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थेच्या नियमा प्रमाणे परिपक्व रक्कम मिळणार नाही व देय लाभांसह परिपक्व रक्कम मिळाली पाहिजे अशी तक्रारकर्त्याची मागणी सुध्दा नाही, तक्रारकर्त्याने जमा मुदतठेवीच्या रकमां व बचत खात्यातील जमा रक्कम आणि जमा रकमांवर व्याजाची मागणी केलेली आहे. तक्रारकर्त्याने त्याच्या मुदतठेवी मध्ये जमा असलेल्या रकमा तसेच बचत खात्या मधील जमा रक्कम मिळण्या करीता दिनांक-09.02.2021 आणि दिनांक-22.02.2021 रोजी दिलेल्या विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे मध्ये सादर केलेल्या अर्जाच्या प्रती दाखल केल्यात. सदर दोन्ही अर्ज विरुध्दपक्ष पतसंस्थेला मिळाल्या बाबत पोच म्हणून विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थेची सही व शिक्का दोन्ही अर्जावर नमुद आहे परंतु तक्रारकर्त्याचे मागणी अर्ज प्राप्त झाल्या नंतरही विरुध्दपक्ष पतसंस्थे तर्फे कोणताही प्रतीसाद मिळाला नाही. म्हणून तक्रारकर्त्याने त्याचे वकीलांचे मार्फतीने दोन्ही विरुध्दपक्षांना वकीलांचे मार्फतीने कायदेशीर नोटीस दिनांक-06.04.2021 रोजीची रजि. पोस्टाने पाठविली, सदर नोटीस विरुध्दपक्षांना मिळूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारकर्त्याने पुराव्यार्थ विरुध्दपक्ष क्रं 1 ते 10 विरुध्दपक्ष सहकारी संस्थेच्या अध्यक्षा तसेच संचालक आणि व्वस्थापक यांना कायदेशीर नोटीस पाठविल्या बाबत दिनांक-06.04.2021 रोजीची कायदेशीर नोटीसची प्रत अभिलेखावर दाखल केली. अशाप्रकारे वारंवार मागणी करुनही विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याला मुदतठेवी तसेच बचत खात्या मधील जमा रक्कम आणि त्यावरील व्याज न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं 2 बाबत
06 . विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थेच्या दोषपूर्ण सेवेमुळे त्याला शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रास झालेला आहे आणि ही तक्रार दाखल करावी लागली असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे कडून दोन्ही मुदतठेवींच्या जमा रकमा आणि बचत खात्या मधील जमा रक्कम व्याजासह मंजूर करणे तसेच त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- विरुध्दपक्ष पतसंस्थे कडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. या ठिकाणी एक महत्वाची बाब नमुद करण्यात येते की, तक्रारकर्त्याने तक्रारी मध्ये श्री महेंद्र महादेव तिरपुडे यांना व्यवस्थापक म्हणून दर्शविलेले आहे परंतु महेंद्र महादेव तिरपुडे हे संस्थेचे संचालक असल्यास त्यांची तक्रारकर्त्याला जमा रक्कम व व्याज देण्याची जबाबदारी येते परंतु ते संचालक असल्या बाबत कोणताही पुरावा जिल्हा ग्राहक आयोगा समोर आलेला नाही त्यामुळे तुर्तास श्री महेंद्र महादेव तिरपुडे यांचे विरुध्द कोणतेही आदेश पारीत करता येत नाहीत मात्र श्री महेंद्र तिरपुडे हे संचालक असल्यास त्यांची या प्रकरणात जबाबदारी येईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
07. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन जिल्हा ग्राहक आयोग प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्ता श्री नरेश पांडूरंग मुलूंडे यांची तक्रार विरुध्दपक्ष सुरभी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कारधा तालुका-जिल्हा भंडारा नोंदणी क्रं-337/99-2000 ही सहकारी पतसंस्था आणि सदर सहकारी संस्थेच्या विरुध्दपक्ष क्रं 1) अध्यक्षा सौ. शालीना बुध्देश्वर गडपायले आणि विरुध्दपक्ष सुरभी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था कारधा, तालुका जिल्हा भंडारा आताचे आणि तत्कालीन सर्व संचालक मंडळ यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष सुरभी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कारधा तालुका-जिल्हा भंडारा नोंदणी क्रं-337/99-2000 ही सहकारी पतसंस्था आणि सदर सहकारी संस्थेच्या विरुध्दपक्ष क्रं 1) अध्यक्षा सौ. शालीना बुध्देश्वर गडपायले आणि विरुध्दपक्ष सुरभी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था, कारधा, तालुका-जिल्हा भंडारा आताचे आणि तत्कालीन सर्व संचालक मंडळयांना आदेशित करण्यात येते की
त्यांनी तक्रारकर्त्याला रसिद क्रं-126, मुदत ठेव दिनांक-20.04.2020 अन्वये जमा रक्कम रुपये-2,20,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष वीस हजार फक्त) परत करावी आणि सदर रकमेवर रक्कम जमा केल्याचा दिनांक-20.04.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्के दराने व्याज दयावे.
- विरुध्दपक्ष सुरभी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कारधा तालुका-जिल्हा भंडारा नोंदणी क्रं-337/99-2000 ही सहकारी पतसंस्था आणि सदर सहकारी संस्थेच्या विरुध्दपक्ष क्रं 1) अध्यक्षा सौ. शालीना बुध्देश्वर गडपायले आणि विरुध्दपक्ष सुरभी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था, कारधा, तालुका-जिल्हा भंडारा आताचे आणि तत्कालीन सर्व संचालक मंडळयांना आदेशित करण्यात येते की त्यांनी तक्रारकर्त्याला रसिद क्रं-101, मुदत ठेव दिनांक-14.02.2020 अन्वये जमा रक्कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त) परत करावी आणि सदर रकमेवर रक्कम जमा केल्याचा दिनांक-14.02.2020 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्के दराने व्याज दयावे.
- विरुध्दपक्ष सुरभी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कारधा तालुका-जिल्हा भंडारा नोंदणी क्रं-337/99-2000 ही सहकारी पतसंस्था आणि सदर सहकारी संस्थेच्या विरुध्दपक्ष क्रं 1) अध्यक्षा सौ. शालीना बुध्देश्वर गडपायले आणि विरुध्दपक्ष सुरभी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था, कारधा, तालुका-जिल्हा भंडारा आताचे आणि तत्कालीन सर्व संचालक मंडळयांना आदेशित करण्यात येते की त्यांनी तक्रारकर्त्याला त्याचे विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थे मध्ये असलेले बचत खाते क्रं-597 मध्ये जमा रक्कम रुपये-47,736/-(अक्षरी रुपये सत्तेचाळीस हजार सातशे छत्तीस फक्त) परत करावी आणि सदर रकमेवर रक्कम जमा केल्याचा दिनांक-14.02.2020 पासून ते रकमेच्या प्रतयक्ष अदायगी पावेतो बचत खात्या वरील नमुद व्याज द.सा.द.शे.-5 टक्के दराने व्याज दयावे.
- विरुध्दपक्ष सुरभी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कारधा तालुका-जिल्हा भंडारा नोंदणी क्रं-337/99-2000 ही सहकारी पतसंस्था आणि सदर सहकारी संस्थेच्या विरुध्दपक्ष क्रं 1) अध्यक्षा सौ. शालीना बुध्देश्वर गडपायले आणि विरुध्दपक्ष सुरभी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था, कारधा, तालुका-जिल्हा भंडारा आताचे आणि तत्कालीन सर्व संचालक मंडळ यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अशा रकमा तक्रारकर्त्याला दयाव्यात.
- विरुध्दपक्ष क्रं-2 सुरभी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कारधा तालुका-जिल्हा भंडारा नोंदणी क्रं-337/99-2000 तर्फे व्यवस्थापक श्री महेंद्र महादेव तिरपुडे हे विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्थेचे संचालक/पदाधिकारी असल्या बाबत कोणताही पुरावा आलेला नसल्याने तुर्तास त्यांचे विरुध्द कोणतेही आदेश पारीत नाहीत. परंतु ते विरुध्दपक्ष पतसंस्थेचे संचालक असल्यास त्यांची या प्रकरणात जबाबदारी राहिल.
- सदर आदेशाचे अनुपालन सुरभी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कारधा तालुका-जिल्हा भंडारा नोंदणी क्रं-337/99-2000 ही सहकारी पतसंस्था आणि सदर सहकारी संस्थेच्या विरुध्दपक्ष क्रं 1) अध्यक्षा सौ. शालीना बुध्देश्वर गडपायले आणि विरुध्दपक्ष सुरभी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था, कारधा, तालुका-जिल्हा भंडारा आताचे आणि तत्कालीन सर्व संचालक मंडळ यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांना-त्यांना परत करण्यात याव्यात.