-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्या.)
( पारित दिनांक-10 ऑक्टोंबर, 2016)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) सहकारी संस्थे मध्ये मुदती ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) ही सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी संस्था असून विरुध्दपक्ष क्रं-1) हे संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते तर विरुध्दपक्ष क्रं-2) हे संस्थेचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष सहकारी संस्थेमध्ये मुदतीठेवी मध्ये “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे रकमा गुंतविल्यात-
“परिशिष्ट-अ”
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | परिपक्वता तिथीस देय रक्कम | व्याजाचा वार्षिक दर |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
1 | 006599 | 13/05/2009 | 60,000/- | 13.02.2011 | 74,700/- | |
2 | 003518 | 10/08/2006 | 20,000/- | 10.06.2012 | 40,000/- | |
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष संस्थेच्या कारभारातील अनियमिततेमुळे संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.
तक्रारकर्त्याची मुख्य तक्रार अशी आहे की, त्याने विरुध्दपक्ष सहकारी संस्थे मध्ये मुदतीठेवी मध्ये गुंतविलेल्या रकमा त्यातील देयलाभांसह परत मिळण्यासाठी वारंवार मागणी करुनही त्या रकमा परत करण्यात आल्या नाहीत. तक्रारकर्त्याचे वडील श्री महादेव चोपडे यांचे औषधोपचारासाठी आणि मुलांचे शिक्षणासाठी त्याला पैशाची गरज असल्यामुळे त्याने दिनांक-11/06/2010 आणि दिनांक’01/04/2011 रोजी विरुध्दपक्ष संस्थेमध्ये अर्ज केलेत परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, इतकेच नव्हे तर उत्तरही देण्यात आले नाही. तक्रारकर्त्याने मुदतीठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम मागणी करुनही न मिळाल्यामुळे त्याला त्याचे वडीलांवर औषधोपचार करता आला नाही तसेच मुलांचे शिक्षणावर खर्च करता आला नाही त्यामुळे त्यांचे भविष्याची हानी झालेली आहे. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दिनांक-02/07/2012 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली, सदर नोटीस मिळूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नोटीसला गैरअर्जदार क्रं-1 व क्रं 3 यांनी उत्तर देऊन आपली जबाबदारी टाळली.
म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन विनंती केली की, विरुध्दपक्ष संस्थेला आदेश देण्यात यावे की, त्याला परिपक्वता तिथी नंतर मिळणारी मुदतठेवीची रक्कम रुपये-1,14,700/- परिपक्वता तिथी पासून द.सा.द.शे.-25% दराने व्याजासह परत करावी तसेच शारिरीक, मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसानीपोटी रुपये-50,000/- व तक्रारखर्च व नोटीस खर्च म्हणून रुपये-17,000/- देण्याचे विरुध्दपक्ष संस्थेला आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष नागमित्र नागरी सहकारी पतसंस्थे अनुक्रमे विरुध्दपक्ष क्रं-1) अध्यक्ष व विरुध्दपक्ष क्रं-2) व्यवस्थापक तसेच विरुध्दपक्ष क्रं-3) प्रशासक यांना मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली. मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस विरुध्दपक्ष क्रं-1) यांना मिळाल्या बाबतची पोच नि.क्रं-7 वर उपलब्ध आहे तर विरुध्दपक्ष क्रं-2) यांना मंचाची नोटीस मिळाल्या बाबतच्या रजिस्टर पोच नि.क्रं-9 वर अभिलेखावर दाखल आहे परंतु अशी नोटीस प्राप्त झाल्या नंतरही विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-2) मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा त्यांनी आपले लेखी निवेदनही सादर केले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात दिनांक-14/08/2014 रोजी मंचाने पारीत केला.
04. विरुध्दपक्ष क्रं-3) प्रशासक यांना मंचा तर्फे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस घेण्यास नकार (Refused return to sender) या पोस्टाचे शे-यासह परत आली व ती नि.क्रं-15 वर दाखल आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं-3) प्रशासका विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक-13/04/2016 रोजी मंचाव्दारे पारीत करण्यात आला.
05. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, दाखल दस्तऐवजाच्या प्रती आणि तक्रारकर्त्याचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
06. विरुध्दपक्ष ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्था आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष सहकारी संस्थेत “परिशिष्ट-अ” मध्ये नमुद केल्या प्रमाणे मुदतीठेवी मध्ये दिनांक-13/05/2009 रोजी रक्कम रुपये-60,000/- आणि दिनांक-10/08/2016 रोजी रक्कम रुपये-20,000/- गुंतविल्या संबधाने मुदतीठेवी पावत्यांच्या प्रती अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत, सदर मुदतीठेवीच्या पावत्या या विरुध्दपक्ष संस्थे तर्फे निर्गमित केलेल्या असून पावत्यांवर विरुध्दपक्ष सहकारी संस्था ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत असल्याचे त्यावरील संस्थेच्या नोंदणी क्रमांका वरुन सिध्द होते. सदर एकूण-02 मुदत ठेवींच्या पावत्यांवरुन असे दिसून येते की, दिनांक-13/05/2009 रोजी गुंतवलेली रक्कम रुपये-60,000/- परिपक्वता दिनांकास (Maturity Date) म्हणजे दिनांक-13.02.2011 रोजी व्याजासह रुपये-74,700/-
तसेच दिनांक-10/08/2006 रोजी गुंतवलेली रक्कम रुपये-20,000/- परिपक्वता दिनांकास (Maturity Date) म्हणजे दिनांक-10/06/2012 रोजी व्याजासह रुपये-40,000/- तक्रारकर्त्यास देण्याचे अभिवचन विरुध्दपक्ष संस्थे तर्फे देण्यात आले होते.
07. तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे त्याने विरुध्दपक्ष सहकारी संस्थे मध्ये मुदतीठेवी मध्ये गुंतविलेल्या रकमा त्यातील देयलाभांसह परत मिळण्यासाठी वारंवार मागणी करुनही त्या रकमा परत करण्यात आल्या नाहीत. तक्रारकर्त्याचे वडील श्री महादेव चोपडे यांचे औषधोपचारासाठी आणि मुलांचे शिक्षणासाठी त्याला पैशाची गरज असल्यामुळे त्याने दिनांक-11/06/2010 आणि दिनांक’01/04/2011 रोजी विरुध्दपक्ष संस्थेमध्ये अर्ज केलेत, सदर अर्जाच्या प्रती तक्राकर्त्याने पुराव्या दाखल अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत, त्या पत्रांवर ते विरुध्दपक्ष सहकारी संस्थेस मिळाल्या बाबत सही व शिक्का नमुद आहे. परंतु सदर पत्र प्राप्त होऊनही विरुध्दपक्ष सहकारी संस्थे तर्फे कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, इतकेच नव्हे तर उत्तरही देण्यात आले नाही. त्याने मुदतीठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम मागणी करुनही न मिळाल्यामुळे त्याला वडीलांवर औषधोपचार करता आला नाही तसेच मुलांचे शिक्षणावर खर्च करता आला नाही त्यामुळे त्यांचे भविष्याची हानी झालेली आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दिनांक-02/07/2012 रोजी कायदेशीर नोटीस पाठविल्या बाबत नोटीसची प्रत, पोस्टाच्या पावत्या व पोच अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत. सदर नोटीस मिळूनही विरुध्दपक्षा तर्फे कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नोटीसला विरुध्दपक्ष क्रं 3 प्रशासकाने उत्तर देऊन आपली जबाबदारी टाळली, या उत्तराची प्रत पुराव्या दाखल तक्रारकर्त्याने दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्यास परिपक्वता तिथी उलटून गेल्या नंतरही आज पर्यंत त्याने विरुध्दपक्ष सहकारी संस्थे मध्ये मुदतीठेवी मध्ये गुंतवलेली रक्कम देय लाभांसह मिळालेली नाही ही वस्तुस्थिती आहे.
08. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने लेखी पत्रव्यवहार करुनही विरुध्दपक्ष संस्थे तर्फे कोणताही प्रतिसाद त्याला मिळाला नाही, ही बाब दाखल पुराव्यां वरुन सिध्द होते. तक्रारकर्त्यास त्याने विरुध्दपक्ष संस्थेत मुदती ठेवीमध्ये गुंतविलेली रक्कम परिपक्वता तिथी उलटून गेल्या नंतरही तसेच वारंवार मागणी करुनही मिळालेली नाही, तक्रारकर्ता यास त्याचे वडीलांचे वैद्दकीय उपचारासाठी तसेच मुलांचे शिक्षणासाठी रकमेची नितांत गरज असताना विरुध्दपक्ष संस्थेने त्यास रक्कम परत केलेली नाही ही त्यांची दोषपूर्ण सेवा आहे आणि यामुळे तक्रारकर्त्याला निश्चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
09. मंचात तक्रार दाखल केल्या नंतर, मंचा तर्फे रजिस्टर पोस्टाने विरुध्दपक्ष क्रं-1 व 2 यांना नोटीस मिळूनही ते अनुपस्थित राहिले तर विरुध्दपक्ष क्रं-3) प्रशासकाने मंचाची नोटीस घेण्यास नकार दिल्याने ती नोटीस परत आली म्हणून विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांचे विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्यात आली. विरुध्दपक्ष संस्थे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) तसेच विरुध्दपक्ष क्रं-3) प्रशासकाला आपले म्हणणे मांडण्याची संधी देऊनही त्यांनी तक्रारकर्त्याचे तक्रारीला कोणतेही उत्तर दाखल केले नाही वा आपली बाजू मंचा समक्ष मांडलेली नाही. तक्रारकर्त्याची तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल आहे.
10. सर्वसाधारणपणे सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्थेच्या व्यवहारात काही अनियमितता आढळल्यास राज्य शासनाचे वतीने प्रशासकाची नियुक्ती संस्थेचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी केल्या जाते परंतु संस्थेच्या अनियमितते बद्दल वा गैरव्यवहारा बद्दल प्रशासकाची जबाबदारी येते असे होत नाही. संस्थेवर प्रशासक नेमला म्हणून संस्थेची दायीत्वाची जबाबदारी संपली असे म्हणता येणार नाही, संस्थेच्या दायीत्वाची जबाबदारी ही संस्था आणि तिचे पदाधिकारी यांचेवरच आहे. आम्ही मंचाचे आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष संस्थे कडून होण्यासाठी प्रशासकाने योग्य ते सहकार्य करावे एवढया पुरतीच प्रशासकाची जबाबदारी निश्चीत करतो असे आदेशित करतो. मंचाचे आदेशाचे अनुपालनाची सर्वस्वी जबाबदारी ही विरुध्दपक्ष सहकारी संस्था आणि तिचे तर्फे तिचे कार्यरत पदाधिकारी यांचीच येते. तसेच विरुध्दपक्ष क्रं-2) हा संस्थेचा व्यवस्थापक असून तो विरुध्दपक्ष संस्थेच्या नौकरीत असल्याने त्यास दोषमुक्त करण्यात येते.
11. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्त्याची, विरुध्दपक्ष नागमित्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हनुमान नागपूर ही संस्था आणि तिच्या तर्फे कार्यरत पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-1) अध्यक्ष यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-2) व्यवस्थापक हा संस्थेचा पदाधिकारी नसून तो नौकरीत असल्याने त्यास दोषमुक्त करण्यात येते.
(03) विरुध्दपक्ष क्रं-(3) प्रशासक, नागमित्र नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड,नागपूर यांचे विरुध्दची तक्रार ही औपचारीकरित्या (Formal)म्हणजे विरुध्दपक्ष सहकारी संस्थे कडून मंचाचे आदेशाचे अनुपालन, विरुध्दपक्ष क्रं-(1) अध्यक्षाचे मार्फतीने होईल एवढया मुद्दा पुरती मंजूर करण्यात येते.
(04) विरुध्दपक्ष नागमित्र नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हनुमान नागपूर आणि तिचे तर्फे कार्यरत पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(1) अध्यक्ष यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी या निकालपत्रातील “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे तक्रारकर्त्याने मुदतीठेवी मध्ये गुंतवलेली रक्कम रुपये-60,000/-परिपक्वता दिनांकास (Maturity Date) म्हणजे दिनांक-13.02.2011 रोजी व्याजासह रुपये-74,700/- (अक्षरी रुपये चौ-याहत्तर हजार सातशे फक्त) परिपक्वता तिथीचे एक महिन्या नंतर (कार्यवाहीचा कालावधी सोडून) म्हणजे दिनांक-13/03/2011 पासून तसेच मुदतीठेवी मध्ये गुंतवलेली रक्कम रुपये-20,000/- परिपक्वता दिनांकास (Maturity Date) म्हणजे दिनांक-10/06/2012 रोजी व्याजासह रुपये-40,000/- (अक्षरी रुपये चाळीस हजार फक्त) परिपक्वता तिथीचे एक महिन्या नंतर (कार्यवाहीचा कालावधी सोडून) म्हणजे दिनांक-10/07/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह येणा-या रकमा प्रस्तुत निकालाची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्त्यास परत करावी. विहित मुदतीत रक्कम तक्रारकर्त्यास न दिल्यास विरुध्दपक्ष संस्था मुदत ठेवींची देय रक्कम आदेशित दिनांकां पासून द.सा.द.शे. 9% दरा ऐवजी द.सा.द.शे.12% दराने दंडनीय व्याजासह तक्रारकर्त्यास देण्यास जबाबदार राहिल.
(05) तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष नागमित्र नागरी सहकारी पतसंस्थे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-1) अध्यक्ष यांनी तक्रारकर्त्यास द्दावेत.
(06) सदर आदेशाचे अनुपालन नागमित्र नागरी सहकारी पतसंस्था आणि तिचे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-1)संस्थेचे अध्यक्ष यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे. विरुध्दपक्ष क्रं-(3) प्रशासकाने मंचाचे आदेशाचे अनुपालन त्यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष नागमित्र नागरी सहकारी पत संस्था आणि तिचे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-1) तिचे अध्यक्ष यांचे कडून होईल असे पहावे.
(07) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.