Maharashtra

Ahmednagar

MA/19/69

श्री.अशोक नारायण गायकवाड - Complainant(s)

Versus

१. सिनियर मॅनेजर, कॅनरा बॅक, - Opp.Party(s)

एल.के.गोरे

31 Mar 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Miscellaneous Application No. MA/19/69
( Date of Filing : 17 Dec 2019 )
In
Complaint Case No. CC/19/360
 
1. श्री.अशोक नारायण गायकवाड
रा.प्‍लॉटनं.१८ ब,बडोदा बॅंक कॉलनी बालिकाश्रम रोड,अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. १. सिनियर मॅनेजर, कॅनरा बॅक,
रमेश मार्केट,मेन रोड,श्रीरामपुर ता.श्रीरामपुर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2. डेप्‍युटी जनरल मॅनेजर, कॅनरा बॅंक
सर्कल ऑफीस,मंगला टॉकीज जवळ,शिवाजी रोड,शिवाजी नगर,पुणे-४११००५
पुणे
महाराष्‍ट्र
3. Chairman & Managing Director, Canara Bank,
Head Office,112, J.C.Road,Banglore, Karnatak
Bangalore
Karnatak
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:एल.के.गोरे, Advocate for the Appellant 1
 
Dated : 31 Mar 2021
Final Order / Judgement

किरकोळ अर्जावर आदेश

आदेश दिनांक – ३१/०३/२०२१

 (द्वारा मा. अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.  तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करण्‍यास झालेला विलंब माफ करणेबाबत अर्जसादर केलेला आहे. त्‍यात तक्रारदाराने म्‍हटले आहे की, दिनांक ३१-०८-२०१३ रोजी सामनेवालेचे गृहकर्जाची संपुर्ण परतफेड केली. त्‍यानंतर तक्रारदार यांना सामनेवालेकडे मुळ कागदपत्राची मागणी केली. सामनेवाले यांनी मे. कोर्टात दिनांक ०४-०२-२०१६ रोजी कागदपत्रे गहाळ झालेली आहेत, असे प्रतिज्ञापत्र दिले, त्‍यावेळी तक्रारदारास समजले. तक्रारदाराला दिनांक १४-१०-२०१७ रोजी ह्दय विकाराचा त्रास होऊ लागल्‍याने पुणे येथील वाडीया हॉस्‍पीटलमध्‍ये अॅडमीट व्‍हावे लागले. पुणे येथील हॉस्‍पीटलमध्‍ये दिनांक १७-१०-२०१७ रोजी तक्रारदाराची बायपास सर्जरी करावी लागली व त्‍यानंतर तक्रारदाराला विश्रांतीचा सल्‍ला देण्‍यात आला. त्‍यानंतर तक्रारदाराला दिनांक ०७-७-२०१८ रोजी ओम्‍बुडसमन द्वारा रिझर्व बॅंक ऑफ इंडिया, मुंबई यांच्‍या आदेशाबाबत माहिती पडले. तक्रारदाराने दिनांक २४-०९-२०१९ रोजी सामनेवाले यांना नोटीस पाठविली. त्‍यामुळे सदर तक्रार दाखल करण्‍यास सुमारे १ वर्ष ११ महिने विलंब झाला आहे व सदर विलंब माफ करून तक्रार दाखल करण्‍यात यावी, अशी विनंती सदर अर्जात करण्‍यात आलेली आहे.

२. सामनेवाले यांनी सदर अर्जावर हजर होऊन त्‍यांचा जबाब दाखल केला व त्‍यात त्‍यांनी असे नमुद केलेले आहे की, बॅंक ओम्‍बुडसमन यांनी दिलेल्‍या आदेशाप्रमाणे सामनेवालेने आदेशाची पुर्तता कलेली आहे व तक्रारदाराला पार्टीशन डीड ची सत्‍य प्रत देण्‍यात आलेली आहे व त्‍या संदर्भात रक्‍कम रूपये ४०,०००/- नुकसान भरपाई देण्‍यात आलेली आहे. म्‍हणुन सदर तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नसल्‍याने सदर विलंब माफीचा अर्ज नामंजुर करण्‍यात यावा, अशी विनंती करण्‍यात आलेली आहे.

३.   उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यात आला. सदर अर्जावर या आयोगाला फक्‍त एवढा निर्णय घ्‍यावयाचा आहे की, तक्रारदाराला तक्रार दाखल करणेकरीता झोलला विलंब माफ होणेसारखा आहे किंवा नाही. तक्रारदाराने सदरहु अर्जात नमुद केले आहे की, दिनांक १४-१०-२०१७ रोजी ह्दय विकाराचा त्रास होऊ लागल्‍याने पुणे येथील वाडीया हॉस्‍पीटलमध्‍ये अॅडमीट व्‍हावे लागले व त्‍यांची बायपास सर्जरी झाली. त्‍यामुळे त्‍याला सुमारे १ विश्रांतीचा सल्‍ला देण्‍यात आलेला होता. त्‍यामुळे तक्रारदाराला १ वर्षाचा विलंब झाला. तसेच सामनेवालेला तक्रारदाराने नोटीस पाठविली व त्‍या नोटीसीवर त्‍यांनी कोणतीही दखल घेतली नसल्‍याने तक्रारदाराला एकुण विलंब १ वर्ष ११  महिन्‍यांचा झाला. सदर कारण आयोगासमोर योग्‍य असल्‍याने सदर अर्ज मंजुर करण्‍यासारखे  आहे, असे आयोगाचे मत ठरले आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश.

आ दे श

१. तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्ज मंजुर करण्‍यात येत आहे.

२. तक्रारदाराला तक्रार दाखल करण्‍यास झालेला १ वर्ष ११ महिन्‍यांचा विलंब  माफ करण्‍यात येत आहे.

३. सदर अर्जाचा खर्च तक्रारदार यांनी स्‍वतः सहन करावा.  

४. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.