Maharashtra

Ahmednagar

CC/21/80

सौ.सुमनबाई आसाराम बुधवंत - Complainant(s)

Versus

१. शाखा व्‍यवस्‍थापक,नॅशनल बॅंक फॉर अॅग्री अॅण्‍ड रुरल डेव्‍हलपमेंट नाबार्ड - Opp.Party(s)

संदीप मुळे

01 Apr 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/21/80
( Date of Filing : 04 Mar 2021 )
 
1. सौ.सुमनबाई आसाराम बुधवंत
रा.मु.निंबेनांदूर,ता.शेवगाव
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. १. शाखा व्‍यवस्‍थापक,नॅशनल बॅंक फॉर अॅग्री अॅण्‍ड रुरल डेव्‍हलपमेंट नाबार्ड
दुसरा मजला,डी विंग,सी,२४,जी ब्‍लॉक बांद्रा कुरला कॉम्‍पलेक्‍स रोड,बांद्रा इस्‍ट मुंबई ४०००५१
मुंबई
महाराष्‍ट्र
2. 2. मा.मुख्‍य कार्यकारी अधिकारी,दि अहमदनगर डिस्‍ट्रीक्‍ट सेंट्रल को ऑप बॅंक लि.
मुख्‍य शाखा,स्‍टेशन रोड,अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
3. ३. मा.व्‍यवस्‍थापक,निंबेनांदूर विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादीत ,निंबेनांदूर
ता.शेवगाव
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:संदीप मुळे, Advocate for the Complainant 1
 
Dated : 01 Apr 2021
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – ०१/०४/२०२१

 (द्वारा मा. अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.  तक्रारदाराने सामनेवाले क्रमांक १ यांचे योजनेअंतर्गत सामनेवाले क्रमांक ३  यांचे डेअरी उद्योजकता विकास योजनेचे अंतर्गत सर्व साधारण सभासदास एकुण रकमेचे २५ टक्‍के सबसिडी देण्‍याचे आश्‍वासन वेळोवेळी दिले होते. परंतु ती सबसिडीची रक्‍कम सामनेवालेकडुन मुदतीत मिळाली नाही, म्‍हणुन सदर तक्रार या आयोगात दाखल करण्‍यात आली आहे.

२.   तक्रारदार तर्फे वकील श्री. एस.बी. मुळे हजर होऊन त्‍यांचा युक्तिवाद ऐकण्‍यात आला. तक्रारदाराने दस्‍तऐवज, शपथपत्र, सामनेवालेचे नोटीसीचे उत्‍तर दाखल केलेले आहे. त्‍यात असे नमुद करण्‍यात आलेले आहे की, केंद्र सरकार पुरस्‍कृत डेअरी उद्योजकता विकास योजने अंतर्गत सदर अनुदान मिळणेकामी दिलेल्‍या कागदपत्र केंद्र सरकारला प्राप्‍त होते व त्‍यानंतर कर्ज धारकाला ती रक्‍कम देण्‍यात येते. रक्‍कम केंद्र सरकारकडुन प्राप्‍त झाली नाही.

३.   तक्रारदाराची तक्रार, दाखल दस्‍तऐवज व तक्रारदारतर्फे वकिलांचा युक्तिवाद ऐकुण असे निदर्शनास येते की, सदर तक्रार ही तक्रारदाराने केंद्र सरकार पुरस्‍कृत डेअरी उद्योजकता विकास योजनेचे अंतर्गत मिळणारी २५ टक्‍के  सबसिडी करता दाखल केलेली आहे. सदर सबसिडी ही केंद्र सरकारकडुन मिळणार होती, या तक्रारीत केंद्र सरकारला पक्षकार केलेली नाही, तसेच तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यात कोणताही ग्राहक वाद नसल्‍याने सदर तक्रार खालील आदेशाप्रमाणे नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.   

आ दे श

१. तक्रारदाराची तक्रार अस्विकृत करून नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२. तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

३. या आदेशाची प्रथम प्रत तक्रारदार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

४. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.