Maharashtra

Ahmednagar

MA/19/32

पोपट संतोष पाटोळे (मयत) वारस, श्री.प्रशांत पोपट पाटोळे, - Complainant(s)

Versus

१. मुख्य कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कं.लि. - Opp.Party(s)

राजेंद्र मोहनराव देवळालकर

19 Dec 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Miscellaneous Application No. MA/19/32
( Date of Filing : 21 Aug 2019 )
In
Complaint Case No. CC/19/283
 
1. पोपट संतोष पाटोळे (मयत) वारस, श्री.प्रशांत पोपट पाटोळे,
रा. सावतानगर, पंपीग स्टेशन, नागरदेवळे, ता. जि. अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. १. मुख्य कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कं.लि.
अहमदनगर विभाग,अहमदनगर
अहमदनगर
Maharashtra
2. २. उप अभियंता, महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कं.लि.
भिंगार विभाग अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Appellant:राजेंद्र मोहनराव देवळालकर, Advocate
For the Respondent:
Dated : 19 Dec 2019
Final Order / Judgement

किरकोळ अर्जावरील आदेश

आदेश दिनांक – १९/१२/२०१९

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.     तक्रारदाराने जुलै २०१८ मध्‍ये मीटर फॉल्‍टी असल्‍याची सामनेवाले यांच्‍याकडे तक्रार केली.  त्‍या अनुषंगाने सामनेवालेने तक्रारदाराला सरासरी देयके दिली. सदर वादातील देयके चुकीची असल्‍याने तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली व तक्रारदाराचा विद्युत पुरवठा सामनेवालेने खंडीत केला तो पुर्ववत सुरू करण्‍यात यावा, अशी विनंती सदर तक्रार अर्जात करण्‍यात आली.

२.   दिनांक ०१-१०-२०१९ रोजी सदर अर्जावर अंतरीम आदेश पारीत करण्‍यात आला. त्‍यात तक्रारदाराला वादातील देयकाची ५० टक्‍के रक्‍कम भरावी, सामनेवालेने तक्रारदाराचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू करण्‍याचा आदेश करण्‍यात आला.

३.   सामनेवाले प्रकरणात हजर राहुन सदर अर्जावर जबाब व कैफीयत दाखल केलेली आहे. सामनेवालेने त्‍याच्‍या जबाबात असे नमुद केले आहे की, तक्रारदाराला विद्युत देयके सरासरी युनिटप्रमाणे देण्‍यात आलेली होती व त्‍याची  त्‍यांनी केलेली तक्रारीमुळे त्‍याचे मिटरपण तपासण्‍यात आले होते. दिलेल्‍या देयकांमध्‍ये तक्रारदाराला रिबेट देण्‍यात आली होती. तसेच तक्रारदाराचा विद्युत पुरवठा खंडीत करण्‍याचे पुर्वी विद्युत कायदा २००३ प्रमाणे नोटीस देण्‍यात आली होती.

४.   उभयपक्षांचा सदर अर्जावर युक्तिवाद ऐकण्‍यात आला. तक्रारदाराला जून २०१८ पासुन ते जुलै २०१९ पर्यंत देण्‍यात आलेली देयके योग्‍य किंवा चुकीची आहेत, ही बाब निर्णयाप्रत येणेसाठी पुराव्‍याची आवश्‍यकता आहे. सबब     दिनांक ०१-१०-२०१९ निशाणी ३ वर पारीत केलेला आदेश तक्रारीचा निर्णय होईपर्यंत कायम ठेवण्‍यात येत आहे. तसेच तक्रारदाराला निर्देश देण्‍यात येतो की, नियमीतपणे विद्युत देयकांची रक्‍कम सामनेवालेकडे भरणा करावी. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आ दे श

 

१.    दिनांक ०१-१०-२०१९ रोजी नि.३ वर पारीत केलेला आदेश तक्रारीचा निर्णय लागेपर्यंत कायम ठेवण्‍यात येत आहे.

२.   तक्रारदाराने सामनेवालेकडे नियमीत देयकांचा भरणा करावा.

३.   सदरील किरकोळ अर्जातील आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना विनामुल्‍य देण्‍यात यावी.

४.  तक्रारदाराने सदर किरकोळ अर्जाचा खर्च स्‍वतः सहन करावा.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.