Maharashtra

Ahmednagar

MA/20/107

श्री.दादाराव बापुराव जांभळे - Complainant(s)

Versus

१.मा.शाखाधिकारी साहेब,चोलामंडलम इन्‍व्‍हेंसमेंट अॅण्‍ड फाय.कं.लि. - Opp.Party(s)

सुनिल मुंदडा

04 Mar 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Miscellaneous Application No. MA/20/107
( Date of Filing : 11 Aug 2020 )
In
Complaint Case No. CC/20/210
 
1. श्री.दादाराव बापुराव जांभळे
रा.मु.पो.बोधेगांव (साईधाम),ता.शेवगांव
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. १.मा.शाखाधिकारी साहेब,चोलामंडलम इन्‍व्‍हेंसमेंट अॅण्‍ड फाय.कं.लि.
पहिला मजला,वेस्‍टर्न हाईटस,शिवाजी रोड,नगर परीषद,श्रीरामपूर ता.श्रीरामपूर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. 2.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी साहेब
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,नगर सोलापूर रोड,चांदणी चौक,अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:सुनिल मुंदडा, Advocate for the Appellant 1
 
Dated : 04 Mar 2021
Final Order / Judgement

किरकोळ अर्जावर आदेश

आदेश दिनांक – ०४/०३/२०२१

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.  तक्रारदार तर्फे वकिलांचा निशाणी ६ वर तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यात आला.  तक्रारदाराने हुकुम मनाईचे अर्जावर असे नमुद केलेले आहे की, सामनेवाले     क्र.१ व २ व त्‍याचे अधिकृत एजंट यांनी तक्रारदाराचे वाहन क्रमांक एम.एच.-१६-सी.सी.-२८७० बेकायदेशीररितीने जप्‍त केले व सदर वाहन सामनेवाले क्र.१ व २ हे विक्री करू शकतात. सदर सामनेवालेने तक्रारदाराशिवाय दुस-या इसमाचे ताब्‍यात देऊ नये, म्‍हणुन सदर तुर्तातुर्त मनाई हुकुमाचा अर्ज सादर करण्‍यात आला.

२.   सदर अर्जावर सामनेवाले यांना दिनांक १९-०८-२०२० ला नोटीस पाठविण्‍यात आली. सदर नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर सामनेवाले क्र.२ प्रकरणात हजर झाले व त्‍यांनी त्‍यांचा जबाब दाखल केला. सामनेवाले क्र.१ हजर होऊन त्‍यात कोणताही जबाब दाखल केला नाही, म्‍हणुन सदर अर्ज दिनांक २५-०२-२०२१ ला जबाबाशिवाय चालेविणेचे आदेश पारीत करण्‍यात आला.  सामनेवाले क्र.२ यांनी त्‍यांचे जबाबात असे नमुद केलेले आहे की, मालवाहू वाहन क्रमांक एम.एच.१६ सी.सी.२८७० या वाहनाचे संदर्भात त्‍यांचेकडे माहिती दिनांक २१-०९-२०२० रोजी पर्यंत नमुद अर्ज किंवा प्रकरण सादर केलेले नाही. सदर मालवाहु हस्‍तांतरण न करणेबाबत दिनांक २१-०९-२०२० पर्यंत कोणताही अर्ज आलेला नाही. सदर वाहन हे दिनांक २१-०९-२०२० पर्यंत अर्जदाराचे नावे आहे. दिनांक २१-०९-२०२० रोजी पर्यंत अर्जदाराचे नावे दिसुन येत आहे.       सामनेवाले क्र.१ ने हुकुम मनाईचे अर्जावर कोणताही जबाब दाखल केलेला नाही व सदर अर्जावर तक्रारदारतर्फे युक्तिवाद ऐकुण तसचे तक्रारदाराचे शपथपत्रावरून असे दिसुन येते की, सामनेवाले क्र.१ ने वाहनाचा घेतलेला ताबा, इतर इसमाला  ताब्‍यात किंवा लिलावात विक्री करू शकतो अशी शक्‍यता नाकारता येत नाही.   सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.

 

आ दे श

१. सामनेवाले क्रमांक १ यांनी सदर तक्रारीत नमुद वाहन क्रमांक एम.एच.-१६-सी.सी.-२८७० याची विक्री किंवा लिलाव तक्रार निकाल होईपर्यंत करू नये, असा आदेश करण्‍यात येत आहे.

२. सदर अर्ज सामनेवाले क्रमांक २ चे विरूध्‍द नामंजुर करण्‍यात येत आहे.

३. अर्जाचा खर्च अर्जदार यांनी स्‍वतः सहन करावा.  

४. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.