Maharashtra

Latur

CC/182/2022

गजानन श्रीराम वडामिले - Complainant(s)

Versus

हेमानी, एंटरप्राईजेस प्रा. लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड. एस. आय. शेख

01 Jun 2023

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/182/2022
( Date of Filing : 15 Jun 2022 )
 
1. गजानन श्रीराम वडामिले
रा. धानोश (बु.) ता. अहमदपुर लातूर
...........Complainant(s)
Versus
1. हेमानी, एंटरप्राईजेस प्रा. लि.
गुडगाव, हरीयाणा
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. REKHA R. JADHAV PRESIDENT
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 01 Jun 2023
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक :  182/2022.                           तक्रार दाखल दिनांक : 15/06/2022.                                                                             तक्रार निर्णय दिनांक : 01/06/2023.

                                                                                       कालावधी : 00 वर्षे 11 महिने 17 दिवस

 

गजानन पि. श्रीराम वडमिले, वय 35 वर्षे,

व्यवसाय : शेती, रा. धानोरा (बु.), ता. अहमदपूर, जि. लातूर.                                 तक्रारकर्ता

 

                        विरुध्द

 

(1) हेमानी इंटरप्राईजेस प्रा. लि., 501 अपलम स्प्रिंग प्लाझा, गोल्फ

     कोर्स रोड, सेक्टर 54, गुरुग्राम, गुडगाव, हरियाणा - 122 002.

(2) स्नॅपडील प्रायव्हेट लिमिटेड, सहावा मजला, सायबर स्केप, गोल्फ

     कोर्स एक्स्टेंशन रोड, सेक्टर 59, गुरुग्राम, गुडगाव, हरियाणा-122 002.          विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :          श्रीमती रेखा जाधव, अध्‍यक्ष (अतिरिक्त कार्यभार)

                        श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :-  सलीम आय. शेख

विरुध्द पक्ष :-  अनुपस्थित / एकतर्फा चौकशी

 

आदेश 

 

श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-

 

(1)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या स्नॅपडील ॲपद्वारे 'पतंजली गिलोय घनवटी' च्या 2 नग-वस्तू 50 टक्के सवलतीमध्ये म्हणजेच रु.499/- ऐवजी रु.249/- मुल्यामध्ये विक्रीस ठेवलेल्या होत्या. दि.20/1/2022 रोजी तक्रारकर्ता यांनी 'पतंजली गिलोय घनवटी' 2 नग-वस्तू खरेदी केल्या आणि त्याचा ऑर्डर आय.डी. 44139498076 होता. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना 'पतंजली गिलोय घनवटी' वस्तू पाठवून दिल्या आणि त्याकरिता रु.249/- मुल्य तक्रारकर्ता यांनी अदा केले. 'पतंजली गिलोय घनवटी' प्राप्त झाल्यानंतर वस्तू पाहणीअंती त्यावर प्रतिवस्तू रु.100/- एम.आर.पी. दिसून आली. मात्र विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी रु.49/- अतिरिक्त वसूल केले आणि त्यांची फसवणूक केली. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे नमूद करुन रु.49/- व्याजासह परत करण्याचा; शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- नुकसान भरपाई देण्याचा व रु.10,000/- ग्राहक तक्रार खर्च देण्याचा आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.

 

(2)       विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.

 

(3)       तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, त्यांनी अभिलेखावर दाखल केलेल्या कागदपत्रे व लेखी युक्तिवादाचे अवलोकन केले.

 

 

(4)       तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर 'पतंजली गिलोय घनवटी' खरेदी केल्यासंबंधी पावती व 'पतंजली गिलोय घनवटी' वस्तुच्या छायाप्रती दाखल केल्या आहेत. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिले आणि तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व दाखल पुराव्यांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला नाही. अशा स्थितीत, तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्रांना विरोधी पुरावा नाही. 

 

(5)       वाद-तथ्ये व अभिलेखावर दाखल कागदपत्रांची दखल घेतली असता तक्रारकर्ता यांनी 'पतंजली गिलोय घनवटी' वस्तू खरेदी केल्याचे निदर्शनास येते. असे दिसते की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 यांच्या ई-कॉमर्स संकेतस्थळाचा वापर करुन विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून 'पतंजली गिलोय घनवटी' वस्तू खरेदी केल्या आहेत. 'पतंजली गिलोय घनवटी' वस्तुच्या विक्री जाहिरातीनुसार 2 नगाकरिता रु.499/- मुल्य नमूद करुन 50 टक्के सवलत दिल्यानंतर रु.249/- विक्री मुल्य दर्शविलेले आहे. मात्र 'पतंजली गिलोय घनवटी' 1 नग-वस्तुचे कमाल मुल्य रु.100/- दिसून येते. तसेच पावतीनुसार 2 नगाकरिता मुल्य रु.211.02 पैसे व IGST रु.37.98/- असे एकूण रु.249/- मुल्य दर्शविलेले आहे. उक्त बाबी पाहता 'पतंजली गिलोय घनवटी' च्या 1 नग-वस्तुचे मुल्य कमाल मुल्य रु.100/- असताना विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या ई-कॉमर्स संकेतस्थळावर 2 नग-वस्तुकरिता रु.499/- दर्शवून अनुचित विक्री पध्दतीचा अवलंब केल्याचे निदर्शनास येते. शिवाय, 'पतंजली गिलोय घनवटी' च्या 1 नग-वस्तुचे मुल्य कमाल मुल्य रु.100/- असताना विरुध्द पक्ष क्र.1 यांनी 2 नग-वस्तुकरिता रु.249/- म्हणजेच रु.49/- अतिरिक्त वसूल केल्याचे निदर्शनास येते.

 

 

(6)       मुख्यत: विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन फसवणूक केली, असा तक्रारकर्ता यांचा वाद आहे. वाद-तथ्ये व कागदोपत्री पुरावे पाहता 'पतंजली गिलोय घनवटी' विक्री करताना कमाल विक्री मुल्यपेक्षा अतिरिक्त रक्कम वसूल करुन विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी सेवेमध्ये त्रुटी व अनुचित प्रथेचा अवलंब केल्याचे सिध्द होते.

 

(7)       विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडून रु.49/- व्याजासह परत मिळावेत, अशी तक्रारकर्ता यांची विनंती उचित असल्यामुळे रु.49/- दि.20/1/2022 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने परत करण्याचा आदेश करणे न्याय्य आहे.  

 

(8)       तक्रारकर्ता यांनी आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. नुकसान भरपाईच्या रकमेची निश्चिती त्या–त्‍या परिस्थितीजन्य गृहीतकावर अवलंबून असते. असे दिसते की, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वस्तुच्या मुळ मुल्यापेक्षा अतिरिक्त रक्कम वसूल केल्यामुळे तक्रारकर्ता यांना जिल्‍हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्‍ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्‍या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्‍यायप्रविष्‍ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्‍यय होतो आणि त्यामुळे तक्रारकर्ता यांना त्रास होणे नैसर्गिक व स्‍वाभाविक आहे. योग्‍य विचाराअंती शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.3,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.2,000/- मंजूर करणे न्याय्य ठरेल, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.

 

(9)       उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

आदेश

 

(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्‍यात येते.     

(2) विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना रु.49/- परत करावेत.

तसेच, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी रु.49/- वर दि.20/1/2022 पासून उक्त रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज द्यावे.

(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.3,000/- नुकसान भरपाई व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.2,000/- द्यावेत.

(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)                                                         (श्रीमती रेखा  जाधव)                

            सदस्‍य                                                                           अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)             

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MRS. REKHA R. JADHAV]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.