Maharashtra

Thane

CC/17/2013

श्रीमती.निमा संभाजी पाटिल - Complainant(s)

Versus

हाऊसफुल इंटरनॅशनल लि., तर्फे डायरेक्टमर - Opp.Party(s)

एल.एस.बोरनाक

15 Jul 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/17/2013
 
1. श्रीमती.निमा संभाजी पाटिल
बी-102, प्रमिला को.ऑप.हौ.सोसायटी लि., मच्‍छी मार्केट जवळ, खारेगांव, कळवा(प), ठाणे-400605.
...........Complainant(s)
Versus
1. हाऊसफुल इंटरनॅशनल लि., तर्फे डायरेक्‍टर
बिग शॉपिंग सेंटर, पहिला मजला, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे(प).
2. .
.
3. .
.
ठाणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 15 Jul 2015

               न्‍यायनिर्णय   

               (द्वारा सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

                                                         

  1.        तक्रारदारांनी सामनेवाले यांचे शोरुममधून दि. 24/03/2012 रोजी जावा डायनिंग सेट, सोफा कम बेड व एक कॅबीनेट असे घरगुती वापराकरीता फर्निचर एकूण किंमत रु. 28,969/- एवढया रकमेचे घेतले. सामनेवाले यांनी फर्निचर खरेदीची पोच पावती दिली. सदर पावती मंचात दाखल आहे.
  2.         सामनेवाले यांनी दि. 10/04/2012 रोजी सदर फर्निचरची डिलीव्‍हरी तक्रारदारांना दिली. सामनेवाले यांनी दिलेली डिलेव्‍हरी चलन पावती दि. 10/04/2012 रोजीची मंचात दाखल आहे.
  3.        तक्रारदारांनी जून, 2012 मध्‍ये सोफा कम बेडच्‍या पायात दोष असल्‍याचे लक्षात आले. तसेच सोफ्याचे कव्‍हरही फाटलेले होते. तक्रारदारांनी यासंदर्भात सामनेवाले यांना माहिती दिली व सदर फर्निचर बदलून देण्‍यास सांगितले. सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या प्रतिनिधीद्वारे तक्रारदारांच्‍या फर्निचरची दुरुस्‍ती करुन देण्‍याचे आश्‍वासन दिले.
  4.            त्‍यानंतर जुलै, 2012 मध्‍ये डायनिंग टेबल वाकडा झाला व केबीनेटचा सनमाईका निघून गेला. तक्रारदारांनी सदर माहिती सामनेवाले यांना दिली. सामनेवाले यांच्‍या प्रतिनिधींनी तक्रारदारांच्‍या डायनिंग टेबलचा टॉप बदलून दिला. परंतु इतर फर्निचर बदलून दिले नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदोष फर्निचरची विक्री केली त्‍यामुळे तक्रारदारांचे निश्चितच मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान झाले व प्रस्‍तुतची तक्रार दाखल करावी लागली.
  5.        सामनेवाले यांचेतर्फे एकतर्फा आदेश झाला आहे. तक्रारदारांनी तक्रारीत दाखल केलेल्‍या मजकुरास आक्षेप दाखल नाही. सबब तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून घेतलेल्‍या फर्निचरचे फोटो मंचात दाखल केले आहे.
  6.         तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या फर्निचरचे फोटोचे अवलोकन केले असता अल्‍पावधीतच खुर्चीचे पाय निघाले आहेत. डायनिंग टेबलचा पाय वाकडा झाला आहे. सोफ्याचे खालचे बाजूचे कापड फाटलेले आहे. कॅबिनेटचा सनमाईका निघाला असल्‍याचे दिसते. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना चांगल्‍या प्रतीचा, दर्जाचा माल विक्री केला नाही. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे रोख रक्‍कम रु. 28,996/- देऊन फर्निचर खरेदी केले. परंतु सामनेवाले यांनी कमी प्रतीचे, हलक्‍या दर्जाचे व सदोष फर्निचरची विक्री तक्रारदारांना करुन व्‍यापा-याच्‍या अनुचित पध्‍दतीचा वापर (Unfair Trade Practice) केल्‍याचे दिसते. अशा परिस्थितीत सामनेवाले यांनी तक्रारदारांनी फर्निचरची पूर्ण किंमत व्‍याजासह देणे उचित होईल असे मंचाचे मत आहे.
  1.         सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदोष फर्निचरची विक्री केल्‍यामुळे निश्चितच खूप मानसिक त्रास झाला आहे व सदरची तक्रार दाखल करावी लागली. त्‍यामुळे तक्रारीचा खर्च रु. 5,000/- देणे योग्‍य आहे असे मंचास वाटते.

 

सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

                आ दे श

  1. तक्रार क्र. 17/2013 अंशतः मान्‍य करण्‍यात येते.
  2. सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की तक्रारदारांना फर्निचरची एकूण किंमत रु. 28,969/- (अक्षरी रुपये अठ्ठाविस हजार नऊशे एकोणसत्‍तर) दि. 24/03/2012 पासून द.सा.द.शे. 6% दराने 45 दिवसांत म्‍हणजेच दि. 16/08/2015 पर्यंत दयावी. तसे न केल्‍यास दि. 17/08/2015 पासून 9% व्‍याजदराने दयावी.
  3. सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की त्‍यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार)            45 दिवसांत म्‍हणजेच दि. 16/08/2015 पर्यंत दयावी. तसे न केल्‍यास दि. 17/08/2015 पासून 6% व्‍याजदाराने दयावी.
  4. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.