Maharashtra

Nagpur

MA/13/21

प्रविण पुंडलिक इंगळे - Complainant(s)

Versus

स्‍पॅनको नागपूर - Opp.Party(s)

बी. एस. वर्मा

06 May 2013

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Miscellaneous Application No. MA/13/21
 
1. प्रविण पुंडलिक इंगळे
वय 34 वर्षे रा. बारुद कंपनी टेकानाका नारी रोड नागपूर प्‍लाट नं. 378 सन्‍लालनगर नागपूर 440026
नागपूर
महाराष्‍ट्रा
...........Appellant(s)
Versus
1. स्‍पॅनको नागपूर
कार्यालय 5 वा माळा नारंग टावर पालम रोड सिव्‍हील लाईन नागपूर 440001
नागपूर
महाराष्‍ट्रा
2. 2. उपकार्यकारी अभियंता
5 वा माळा नारंग टावर पालम रोड नागपूर 440001
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. AMOGH KALOTI PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
PRESENT:
 
ऍड. एम.एस.वकील
 
ORDER

(पारित दिनांक - 06 मे, 2013)

1. तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये त.क्र.81/13 दाखल करुन, अंतरीम आदेश मिळण्‍यासाठी प्रस्‍तुत अर्ज दाखल केलेला आहे. अर्जदाराचे कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे -

2. गैरअर्जदार क्र. 2 ही महावितरण कंपनी असून, गैरअर्जदार क्र. 1 हे सदर कंपनीचे फ्रेंचाईझी आहेत. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक असून त्‍याचे घरी गैरअर्जदाराकडून ग्राहक क्र. 130808 (जुना) व नविन 410011099096 अन्‍वये विज पुरवठा केल्‍या जातो. गैरअर्जदाराने दि.05.02.2013 रोजी कायदेशीर बाबीचे पालन न करता, अर्जदाराचा विज पुरवठा खंडित करुन विज मिटर ताब्‍यात घेतले व त्‍याचदिवशी अर्जदाराला कार्यालयात बोलावून विज  चोरी केल्‍याचे सांगून रु.2,10,548/- बील रकमेचे व कंपाऊंडींग शुल्‍कापोटी रु.60,000/- अशा रकमेचे 7 महिन्‍याचे विज चोरीचे देयक भरण्‍यास सांगितले. अर्जदाराचे कथनानुसार त्‍याने आजपर्यंत सर्व‍ विद्युत देयकाचा गैरअर्जदाराकडे नियमित भरणा केला असून गैरअर्जदाराने दिलेले सदर देयक पूर्णतः चुकीचे असल्‍याचे सांगितले व विज पुरवठा पूर्ववत करण्‍याची विनंती केली. 

3. अर्जदाराने सादर केलेल्‍या प्रस्‍तुत अर्जावर गैरअर्जदारावर नोटीस काढण्‍यात आली. अर्जदाराने सादर केलेल्‍या पोचपावतीवरुन गैरअर्जदारांना दि.22.03.2013 रोजी नोटीसची बजावणी झाल्‍याचे दिसून येते. नोटीसची बजावणी झाल्‍यावर गैरअर्जदार हजर झाले व त्‍यांनी प्रस्‍तुत अर्जावर लेखी म्‍हणणे दाखल केले.

 

4. प्रस्‍तुत अर्जावर अर्जदाराच्‍या व गैरअर्जदाराचे वकिलांचे म्‍हणणे ऐकले. आव्‍हानांकित विज देयक चुकीचे असल्‍याचे व विज पुरवठा पूर्ववत करण्‍याकरीता देयकाची 1/4 रक्‍कम भरण्‍यास तयार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  आपले कथनाचे पुष्‍टयर्थ त्‍यांनी मा. केरळ राज्‍य ग्राहक आयोग, यांचा K.S.E.B. Vidyut Bhawan  Vs.  John K. Mathew या प्रकरणातील निकालाचा हवाला दिला.  प्रस्‍तुत प्रकरणी जिल्‍हा ग्राहक मंच, कोट्यायम (केरळ) यांनी समांतर परिस्थितीमध्‍ये आव्‍हानांकित देयकाची 1/4 रकमेचा भरणा विज कंपनीकडे करुन विज पुरवठा पूर्ववत करण्‍याचे निर्देश दिले होते. सदर प्रकरणी गैरअर्जदार विज कंपनीने मा. राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, केरळ यांचेकडे जिल्‍हा मंचाचे निर्णयास  आव्‍हान दिले होते. गैरअर्जदाराचे आव्‍हान फेटाळून मा. राज्‍य आयोग, केरळ यांनी जिल्‍हा मंचाचा आदेश कायम ठेवला. मा. राज्‍य ग्राहक आयोग, केरळ यांचा सदर प्रकरणी दिलेला निकाल प्रस्‍तुत प्रकरणास लागू पडतो. त्‍यामुळे अर्जदाराने विवादित विज देयकाच्‍या 1/4 रकमेचा भरणा गैरअर्जदाराकडे करुन अर्जदाराचा विज पुरवठा पूर्ववत करुन देणे न्‍यायोचित ठरेल असे मंचाचे मत आहे. करिता खालीलप्रमाणे आदेश.

-आदेश-

1) अर्जदाराचा किरकोळ अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

2) अर्जदाराने विवादित देयकाच्‍या 1/4 रकमेचा भरणा गैरअर्जदाराकडे करावा. गैरअर्जदारास आदेश देण्‍यात येतो की, अर्जदाराने 1/4 रकमेचा भरणा केल्‍यानंतर 48 तासाचे आत त्‍याचेकडील विज पुरवठा पूर्ववत करुन द्यावा.

3) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.

4) सदर आदेशांन्‍वये किरकोळ प्रकरण निकाली काढण्‍यात येऊन, मुळ तक्रार क्र. 81/13 ही वि.प.चे लेखी उत्‍तराकरीता दि. 11.07.2013 रोजी ठेवण्‍यात येत आहे. वि.प.ने ह्याची नोंद घ्‍यावी.  

 

  

 
 
[HON'ABLE MR. AMOGH KALOTI]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.