Maharashtra

Nanded

CC/14/227

युसुफ जमालोद्दीन दौलताबदी - Complainant(s)

Versus

स्टेट बँक ऑफ हैद्राबाद - Opp.Party(s)

अँड. ए.आर. पंजोल

04 Aug 2015

ORDER

District consumer Disputes Redressal Forum
Nanded
Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
 
Complaint Case No. CC/14/227
 
1. युसुफ जमालोद्दीन दौलताबदी
शारदा नगर, देग्लूर
नांदेड
...........Complainant(s)
Versus
1. स्टेट बँक ऑफ हैद्राबाद
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, शाखा देगलूर
नांदेड
महाराष्ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smita B.Kulkarni PRESIDENT
 HON'BLE MR. R.H.Bilolikar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                                 निकालपत्र

(दि.04.08.2015)

(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्‍यक्ष)

 

1.          अर्जदार यांनी  गैरअर्जदार यांचेविरुध्‍द सेवेत त्रुटीच्‍या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.

            अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्‍यात खालील प्रमाणेः-

2.         अर्जदार  हा देगलूर येथे राहणारा असून त्‍याचे वेल्‍डींगचे दुकान आहे.  गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे अर्जदाराने मुदत ठेवी ठेवलेल्‍या आहेत. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे दिनांक 23.04.2001 रोजी रक्‍कम रु.40,000/- मुदत ठेव 87 महिन्‍याकरीता ठेवली होती, त्‍याचा क्रमांक 0238796 असा असून त्‍याची परिपक्‍वता रक्‍कम रु.81,856/- होती.  87 महिन्‍याच्‍या कालावधीनंतर अर्जदाराने वर नमुद ठेव 36 महिन्‍याकरीता ट्रान्‍सफर  केली होती.  त्‍या मुदत ठेवीचा क्रमांक 481510 असा असून त्‍याची परिपक्‍वतेची तारिख 04.08.2011 अशी होती व परिपक्‍वता रक्‍कम रु.1,06,891/- अशी होती.   सदरील ठेव मुदतीनंतर अर्जदाराने उचलून घेतलेली असून बंद करण्‍यात आली.  अर्जदाराने दिनांक 30.05.2001 रोजी एकूण 5 मुदत ठेवी गैरअर्जदार यांचेकडे ठेवलेल्‍या होत्‍या त्‍यापैकी स्‍वतःच्‍या नावे मुदत ठेव क्रमांक 0238921, मुलगी रेश्‍मा हीच्‍या नावे दोन मुदत ठेवी ज्‍याचा क्रमांक 238919 व 238923 , मुलगा नदिम याचे नावे मुदत ठेव क्रमांक 0238922 तसेच मुलगा वसीमचे नावे मुदत ठेव क्रमांक 0238920 असे आहेत.  वर नमुद पाचही ठेवी हया प्रत्‍येकी रक्‍कम रु.40,000/- च्‍या असून त्‍यांची मुदत 87 महिन्‍यांची म्‍हणजेच दिनांक 30.08.2008 पर्यंत होती.  सदरील पाचही मुदत ठेवी मुदत संपल्‍यानंतर अर्जदाराने पुन्‍हा 87 महिन्‍याकरीता नुतनीकरणाव्‍दारे गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे ठेवल्‍या.  त्‍यांच्‍या परिपक्‍वतेची तारिख दिनांक 02.01.2015 असून परिपक्‍वता रक्‍कम रु.1,58,919/- अशी आहे. अर्जदाराने वर नमुद पाचही मुदत ठेवीवर व्‍यवसायाकरीता गैरअर्जदार क्र. 1 कडून कर्ज उचलून नियमानुसार भरणा करीत होता.  दिनांक 14.08.2003 रोजी अर्जदाराने कर्जाची रक्‍कम वाढवून मिळणेसाठी अर्ज केल्‍यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास पाच मुदत ठेवीपैकी मुदत ठेव क्रमांक  0238921 ही चालू नसल्‍याचे किंवा अस्तित्‍वात नसल्‍याचे सांगितले व मुदत ठेव क्रमांक 0238921  हा चुक असून खरा क्रमांक 0238796 असा आहे.  गैरअर्जदार क्र. 1 यांनी मुदत ठेव क्रमांक 0238921 वर गोल करुन त्‍याला मुदत ठेव क्रमांक 0238796 असा क्रमांक हस्‍ताक्षराव्‍दारे टाकला.  वास्‍तविकतः मुदत ठेव क्रमांक 02389796 ही दिनांक 23.07.2008 रोजी परिपक्‍वतेनंतर 36 महिन्‍याकरीता ठेवण्‍यात आली व दिनांक 04.08.2011 रोजी परिपक्‍वता रक्‍कम रु.105,891/- अर्जदाराने उचलून घेतली.   मुदत ठेव क्रमांक 02389796 व मुदत ठेव क्रमांक 0238921 याचा एकमेकांशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही.   अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे ठेवण्‍यात आलेल्‍या पाचही मुदत ठेवी परिपक्‍वतेच्‍या आधी सोडविण्‍याचा निर्णय घेतला.  त्‍यानुसार गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 19.10.2013 रोजी विनंती अर्ज केला. तसेच अर्जदार यांनी माहिती अधिकारानुसार सर्व मुदत ठेवींचा तपशिल मागीतला.  गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिनांक 10.03.2014 रोजी त्‍यांना सांगितले की, गैरअर्जदार हा रक्‍कम परत करणेस तयार आहे तरी माहितीचे अधिकाराचा अर्ज परत घ्‍यावा. त्‍यानुसार अर्जदार यांनी माहितीचे अधिकाराचा अर्ज मागे घेतला असल्‍याचे गैरअर्जदाराला कळविले.  गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिनांक 11.03.2014 रोजी मुदत ठेव क्रमांक 0238919,0238920,0238922 व 02138923ची रक्‍कम मुदतीच्‍या आत नियमानुसार परत केली. परंतु मुदत ठेव क्रमांक 0238921 ची रक्‍कम परत करणेस नकार दिला व सदरील मुदत ठेव आस्तित्‍वात नसल्‍याचे सांगितले.  अर्जदाराने दिनांक 15.09.2014 रोजी गैरअर्जदार यांना नोटीसव्‍दारे कळविले की, मुदत ठेव क्रमांक 02389796 व मुदत ठेव क्रमांक 0238921 यांचा आपसात कसल्‍याही प्रकारचा संबंध नसून मुदत ठेव क्रमांक 0238921 ची रक्‍कम अर्जदारास परत करावी.  परंतु गैरअर्जदार यांना नोटीस मिळाल्‍यानंरतही अर्जदाराची रक्‍कम परत न केल्‍याने अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्‍ये अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून दिनांक 30.05.2001 रोजी 87 महिन्‍याकरीता व नुतनीकरण करुन परत 87 महिन्‍याकरीता ठेवलेल्‍या मुदत ठेव क्रमांक 0238921 ची रक्‍कम अर्जदारास  गैरअर्जदार यांनी नियमाप्रमाणे परत द्यावे. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,00,000/- व दावा खर्च रु.25,000/- इत्‍यादी रक्‍कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्‍दारे केलेली आहे.

3.          गैरअर्जदार क्र. 1 व 2  यांना मंचाची नोटीस तामील झाल्‍यानंतर गैरअर्जदार क्र. 1 हे वकीलामार्फत हजर होऊन त्‍यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस प्राप्‍त होऊनही गैरअर्जदार क्र. 2 हे मंचात हजर झालेले नाहीत.  त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 2 यांचेविरुध्‍द दिनांक 08.01.2015 रोजी त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत करण्‍यात आला.

            गैरअर्जदार क्र. 1 यांचे लेखी जबाबातील म्‍हणणे थोडक्‍यात पुढील प्रमाणेः-

4.          अर्जदाराची तक्रार ही खोटी असून तक्रारीतील मजकूर हा न्‍यायालयाची दिशाभूल करणारा आहे. मुदत ठेव क्रमांक 02389796 व मुदत ठेव क्रमांक 0238921 हया मुदत ठेवी एकच आहेत.  गैरअर्जदार क्र. 1 व त्‍यांच्‍या कर्मचा-यांनी हस्‍ताक्षराव्‍दारे कोणताही क्रमांक टाकलेला नाही.  गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास माहिती अधिकाराचा अर्ज परत घेण्‍याचा सांगितलेले नव्‍हते.  तसेच रक्‍कम परत करण्‍याची तयार आहोत असेही सांगिलेले नाही.  गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिनांक 11.03.2014 रोजी अर्जदारास मुदत ठेव क्रमांक 0238919,0238920,0238922 व 02138923ची रक्‍कम मुदतीच्‍या आत नियमानुसार परत केली व मुदत ठेव क्रमांक 02389796 म्‍हणजेच मुदत ठेव क्रमांक 0238921 ची रक्‍कम दिनांक 31.07.2008 रोजी परत केलेली आहे.  अर्जदाराने मुदत ठेव क्रमांक 0238921ची रक्‍कम अगोदरच उचललेली आहे.  त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 1 हा अर्जदारास मुदत ठेव क्रमांक 0238921 ची रक्‍कम देणे लागत नाही.  गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिनांक 07.04.2015 रोजी अर्जदार यांनी मुळ पावती क्रमांक 0238921 हा न्‍यायमंचात दाखल करावा म्‍हणून अर्ज दिला होता.  परंतु अर्जदाराने मुळ मुदत ठेव पावती दाखल केलेली नाही.   मुदत ठेव क्रमांक 0238921 ही बँकेत विदड्रॉसाठी जमा केली म्‍हणून त्‍याची पावतीसुध्‍दा या न्‍यायमंचात दाखल केलेली नाही.  त्‍यामुळे अर्जदार मंचाची दिशाभूल करुन सदर मुदत ठेव क्रमांक 0238921ची रक्‍कम परत उचलण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे.  त्‍यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्‍या लेखी जबाबाव्‍दारे केलेली आहे.

5.           अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्‍याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  दोन्‍ही बाजूंचा युक्‍तीवाद ऐकला.  दोन्‍ही बाजूंनी दाखल  केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्‍टी स्‍पष्‍ट होतात. 

6.          अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे मुदत ठेवी ठेवलेल्‍या असन मुदतीच्‍या आत अर्जदाराने मुदत ठेवीची रक्‍कम मागीतली असता गैरअर्जदार यांनी अर्जदारास 4 मुदत ठेवीच्‍या रक्‍कम परत केल्‍या असून मुदत ठेव क्रमांक 0238921 या मुदत ठेवीची रक्‍कम पुर्वीच उचललेली असल्‍याने अर्जदारास परत केलेली नाही.  गैरअर्जदार यांचे हे म्‍हणणे चुकीचे असल्‍याने सदर मुदत ठेवीची रक्‍कम अर्जदारास मिळावी अशी प्रमुख तक्रार अर्जदाराची आहे.  गैरअर्जदार यांचे म्‍हणणे असे आहे की, अर्जदाराने सदर मुदत ठेव क्रमांक 02389796 व मुदत ठेव क्रमांक 0238921 हया दोन्‍ही मुदत ठेवी एकच असून सदर मुदत ठेवीची रक्‍कम अर्जदाराने दिनांक 31.07.2008 रोजी उचलून घेतलेली आहे.  गैरअर्जदार यांनी मंचामध्‍ये हजर झाल्‍यानंतर अर्जदाराने मुळ  मुदत ठेव क्रमांक 0238921 ची मुळ प्रत दाखल करावी असा अर्ज दिलेला होता.  त्‍यावर अर्जदाराने म्‍हणणे देऊन अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडे पाचही मुदत ठेवी मुदतपुर्व तोडण्‍याची विनंती केली असल्‍याने पाचही मुदत ठेवी गैरअर्जदार यांचेकडे सुपुर्द केलेल्‍या होत्‍या.  गैरअर्जदार यांनी उर्वरीत 4 मुदत ठेवीची रक्‍कम परत केली होती.  परंत वादग्रस्‍त मुदत ठेव क्रमांक 0238921ची रक्‍कम परत केलेली नाही.  सदरील मुदत ठेव क्रमांक 0238921 ही गैरअर्जदार यांचे ताब्‍यात आहे असे म्‍हणणे दिले आहे.  अर्जदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव क्रमांक 0238921 च्‍या प्रतीचे अवलोकन केले असता अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडे सदरील मुदत ठेव ही दिनांक 30.05.2001 रोजी ठेवलेली असून मुदत ठेवीची परिपक्‍वता दिनांक 30.082008 म्‍हणजेच 87 महिन्‍याची असल्‍याचे दिसून येते. तसेच मुदत ठेवीची रक्‍कम ही रक्‍कम रु.40,000/- असून मुदत ठेवीची परिपक्‍वता रक्‍कम रु. 81,856/- अशी आहे.  त्‍यानंतर मुदत ठेवीच्‍या पाठीमागच्‍या पानाचे अवलोकन केले असता अर्जदाराने सदरील मुदत ठेव ही नुतनीकरण केलेली असून नुतनीकरण दिनांक 30.08.2008 असा असून मुदत ठेव रक्‍कम रु.81,8902/- असा असून मुदत ठेवीचा कालावधी 87 महिन्‍याचा असून दिनांक 30.08.2008 पासून ते दिनांक 02.12.2015 पर्यंतचा आहे.  मुदत ठेवीची परिपक्‍वता रक्‍कम ही रु.1,58,919/-  असल्‍याचे दाखल पावतीवरुन दिसून येते.  गैरअर्जदार यांनी अर्जदाराची मुदत ठेव क्रमांक 0238921 या क्रमांकाची मुदत ठेव व मुदत ठेव क्रमांक 02389796 ही एकच असल्‍याचे म्‍हटलेले आहे. परंतु त्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍टयर्थ गैरअर्जदार यांनी कुठलाही पुरावा दिलेला नाही.  याऊलट अर्जदाराने मुदत ठेव क्रमांक 02389796 याचीही झेरॉक्‍स प्रत दाखल केलेली आहे. सदरील मुदत ठेव क्रमांक 02389796 चे अवलोकन केले असता सदरील मुदत ठेव ही अर्जदाराने दिनांक 23.04.2001 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे ठेवलेली असून दिनांक 23.07.2008 रोजी मुदत ठेव परिपक्‍व होत असल्‍याचे दिसून येते. मुदत ठेवीची रक्‍कम ही रक्‍कम रु.40,000/- असून परिपक्‍वता रक्‍कम रु..81,856/- असल्‍याचे दिसते.  सदर मुदत ठेवीच्‍या पाठीमागच्‍या पानाचे अवलोकन केले असता सदर मुदत ठेव ही अर्जदाराने नुतनीकरण केलेली नाही. सदरील मुदत ठेव परिपक्‍व झाल्‍यानंतर अर्जदाराने दिनांक 31.07.2008 रोजी परिपक्‍वतेची रक्‍कम उचलून घेतलेली आहे.  गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्‍यावर Paid असा शिक्‍का मारलेला आहे.  यावरुन मुदत ठेव क्रमांक 02389796 ची रक्‍कम अर्जदाराने दिनांक 31.07.2008 रोजी उचलून घेतलेली असल्‍याचे दिसून येते. अर्जदाराने त्‍यापुर्वीच म्‍हणजेच दिनांक 30.05.2001 रोजी अर्जदाराने मुदत ठेव क्रमांक 0238921 ही गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे ठेवलेली असल्‍याचे दिसते. त्‍यामुळे दोन्‍ही मुदत ठेवी हया एकच आहे हे गैरअर्जदार यांचे म्‍हणणे कुठल्‍याही अर्थाने सिद्ध होत नाही.  गैरअर्जदार यांनी दोन्‍ही मुदत ठेवी एकच असल्‍याचा पुरावा मंचासमोर दिलेला नाही.  आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍टयर्थ कुठलेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.   यावरुन गैरअर्जदार यांचे म्‍हणणे की, मुदत ठेव क्रमांक 02389796 व मुदत ठेव क्रमांक 0238921 हया दोन्‍ही एकच आहेत हे म्‍हणणे चुकीचे व बेकायदेशीर आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे ठेवलेल्‍या मुदत ठेवीची रक्‍कम अयोग्‍य कारण सांगून अर्जदारास रक्‍कम देण्‍याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिलेली आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.

                       आ दे श

 

1.     अर्जदार यांची  तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास  मुदत ठेव क्रमांक 0238921  ची परिपक्‍व रक्‍कम  रु.1,58,818/- दिनांक 02.01.2015 पासून द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजासहीत आदेश तारखेपासून तीस दिवसाच्‍या आत द्यावे.

3.    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.2500/- आदेश तारखेपासून तीस दिवसाच्‍या आत द्यावे.

4.    आदेशाची पूर्तता झाल्‍याबद्दलचा अहवाल दोन्‍ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात    दाखल करावा.  प्रकरण 45 दिवसानंतर पुन्‍हा आदेशाच्‍या पूर्ततेच्‍या अहवालासाठी ठेवले   जाईल. 

5.    दोन्‍ही पक्षकारास निकालाच्‍या प्रती मोफत पुरविण्‍यात याव्‍यात.  

 
 
[HON'BLE MRS. Smita B.Kulkarni]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. R.H.Bilolikar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.