Maharashtra

Bhandara

CC/21/95

वासुदेव खोपडुजी वाडीभस्‍मे - Complainant(s)

Versus

सुनिल संपत पारधी - Opp.Party(s)

श्री. राजकुमार वाढीभस्‍मे

27 Mar 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/21/95
( Date of Filing : 14 Sep 2021 )
 
1. वासुदेव खोपडुजी वाडीभस्‍मे
तह.तुमसर. जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. सुनिल संपत पारधी
रा.सब्‍जी मंडी. तह.तुमसर जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
2. प्रबंधक. प्रथम बायोटेक प्रा. लि.
४०२ हायवे कास्‍टे अमरावती रोड, काचीमेट, नागपुर तह.जि.नागपुर.
नागपुर
महाराष्‍ट्र
3. तालुका कृषी धिकारी
तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय तह.तुमसर जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
4. महाराष्‍ट्र शासन तर्फे. जिल्‍हाधिकारी. भंडारा
जिल्‍हाधिकारी कार्यालय, भंडारा. जि.भंडारा ४४१९०४
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 27 Mar 2023
Final Order / Judgement

                          (पारीत व्‍दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्‍य )

                          

 

01.  तक्रारकर्ता श्री वासुदेव खोपडूजी वाडीभस्‍मे यांनी प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे  कलम 35 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1  व क्रं-2  अनुक्रमे बियाणे विक्रेता व बियाणे निर्माता कंपनी यांचे विरुध्‍द सिरी ग्‍लोरीयस या धानाचे भेसळयुक्‍त बियाण्‍या मुळे त्‍यांचे झालेल्‍या नुकसानीची भरपाई मिळण्‍यासाठी  जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे. .

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे

    

      तक्रारकर्ता हा व्‍यवसायाने शेतकरी असून तो उपरोक्‍त नमुद पतत्‍यावर  राहतो. त्‍याचे वडीलोपार्जीत मालकीची शेत जमीन  मौजा परसवाडा  तालुका तुमसर,  जिल्‍हा भंडारा येथे गट/भूमापन  क्रं-392, 393 व 133/2  आहे व सदर शेतीचे क्षेत्रफळ अनुक्रमे 0.20 हेक्‍टर आर, 0.52 हेक्‍टर आर व 1.85 हेक्‍टर आर असून एकूण क्षेत्रफळ 2.57 हेक्‍टर आर आहे. तक्रारकर्त्‍याची शेती ही शेता जवळील नहर कालव्‍यावर अवलंबून असल्‍याने तो दोन्‍ही हंगामात पिक घेत होता.

 

  तक्राकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे विक्रेता यांचे दुकानात भेट दिली असता त्‍यांनी लवकर व कमी कालावधीत उत्‍पादन देणारे महालक्ष्‍मी बियाणे जे मेसर्स वर्षिता बायोसायन्‍स प्राच्‍हेट लिमिटेड हैद्राबाद येथील नामांकित कंपनीचे महालक्ष्‍मी बियाणे उपलब्‍ध आहे तसेच  सिरी (ग्‍लोरीअस) हे विरुध्‍दपक्ष क्रं 2 प्रथम बायोटेक प्रायव्‍हेट लिमिटेड नागपूर येथील कंपनीचे धानाचे बियाणे उपलब्‍ध असल्‍याचे सांगितले.  दोन्‍ही धान बियाणे उत्‍तम गुणवत्‍तेचे असून  उत्‍पादन कालावधी 90 ते 100 दिवसाचा आहे व 100 टक्‍के उत्‍पादनाची हमी दिली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनी प्रथम बायोटेक कंपनीचे सिरी (ग्‍लोरीअस) या प्रजातीचे बियाणे प्रतीबॅग 10 किलो वजनाचे एकूण 05 बॅग्‍स प्रती बॅग किम्‍मत रुपये-750/-प्रमाणे एकूण किम्‍मत रुपये-3750/- मध्‍ये विकत घेतले.त्‍याच बरोबर वर्षिता बायोसायन्‍स प्रायव्‍हेट लिमिटेड, हैद्राबाद निर्मित महालक्ष्‍मी बियाणे प्रतीबॅग दर रुपये-700/- प्रमाणे एकूण 09 बॅग्‍स रुपये-6300/- मध्‍ये विकत घेतले. वरील प्रमाणे दोन्‍ही वाणाचे बियाणे  बिल क्रं 439, बिल दिनांक-28.01.2021 नुसार  एकूण रुपये-10,050/- मध्‍ये खरेदी केले.(तक्रारकर्त्‍याने तक्रारी मध्‍ये बिल क्रं 580 नमुद केलेला असून प्रत्‍यक्षात बिल क्रं 439 असल्‍याचे बिलाचे प्रती वरुन दिसून येते.) तक्रारकर्त्‍याचे असेही म्‍हणणे आहे की, त्‍याचे मालकीची वर उल्‍लेखित  शेती गट क्रं 392, 393 व 133/2 तसेच श्री प्रेमलाल चिंतामण तुमसरे यांचे कडून वार्षिक ठेक्‍याने घेतलेली जमीन गट क्रं 535 शेत जमीन अशी अनुक्रमे 0.20 हेक्‍टर आर, 0.52 हेक्‍टर आर, 1.85 हेक्‍टर आर व 0.39 हेक्‍टर आर अशी एकूण  2.57 हेक्‍टर आर अधि‍क 0.39 हेक्‍टर आर बरोबर एकूण 2.96 हेक्‍टर आर धानाचे बियाणे पेरणीपूर्वी योग्‍यप्रकारे नांगरणी करुन  मशागत केली आणि दिनांक-01.02.2021 रोजी  धान बियाण्‍याची पेरणी केली व त्‍यानंतर पिकाची रोवणी दिनांक-02.03.2021 पासून सुरु केली. पिकाची लागवड केल्‍या नंतर वेळोवेळी खते, रासायनिक औषधे, किटकनाशकांची फवारणी करण्‍यात आली. तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, त्‍याने विरुध्‍दपक्षक्रं 2 प्रथमबायोटेक व्‍दार निर्मित सिरी  ग्‍लोरीयस  बियाणे एकूण शेता पैकी  स्‍वतःचे मालकीचे  जागेतील 1 हेक्‍टर आर म्‍हणजेच अडीच एकरा मध्‍ये मौजा परसवाडा, तहसिल तुमसर  जिल्‍हा भंडारा येथे  लागवड केली.  अशाप्रकारे संपूर्ण पिकाचे व्‍यवस्‍थापन करुनही धान पिक हे 90 ते 100 दिवसात गर्भातच पुन्‍हा लोंबी न येता कोमजलेले दिसून आले.  धान पेरणीचे 100 दिवसा नंतर नहारात पुन्‍हा पाणी येईल याची शाश्‍वती दिसून येत नव्‍हती, नहर कोरडे पडले होते. वस्‍तुतः विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याने सदर धानाचे उत्‍पादन हे 90 ते 100 दिवसात येईल याची हमी दिली होती. तक्रारकर्त्‍याने धानाचे बियाणे योग्‍य नसल्‍या बाबत विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर, सरपंच, परसवाडा, तलाठी यांचे कडे लेखी तक्रार केली. त्‍या अनुषंगाने तालुका तक्रार निवारण समिती यांनी दिनांक-27.05.2021 रोजी तक्रारकर्त्‍याचे  शेतामध्‍ये प्रत्‍यक्ष भेट देऊन धान पिकाची पाहणी करुन पंचनामा केला. तालुका तक्रार निवारण समितीचे अहवाला प्रमाणे धान सिरी वाणाचा असून प-हा निांक-01.02.2021 रोजी टाकला व दिनांक-02.03.2021 रोजी रोवणी केली.  समितीचे पाहणीचे दिवशी पिकास 120 दिवस पूर्ण झाले आहे आणि केवळ 20-25% धान गर्भात (पोटरीत आहे) धान होण्‍यास 30 ते 35 दिवसांचा कालावधी लागेल यावरुन धानाचा एकूण कालावधी 145 दिवसाचा होतो.  बियाणे उत्‍पादक कंपनीचे माहिती पत्रका प्रमणे 120-125 दिवसात वाणाचा कालावधी आहे.  धानाचा  कालावधी 30 ते 35 दिवसांनी वाढल्‍यामुळे व शेतक-याचे पाणी 110 दिवसाच्‍या दरम्‍यान संपले असल्‍यामुळे पिक सुकण्‍याच्‍या अवस्‍थेत आहे. जास्‍त कालावधी धान निघाल्‍यामुळे शेतक-याचे 80 ते 90 टक्‍के  नुकसान संभवते असे नमुद केले.     

 

    तक्रारकर्त्‍याने सिरी ग्‍लोरीयस बियाण्‍याची लागवड 1.00 हेक्‍टर आर क्षेत्रात म्‍हणजेच अडीच एकर क्षेत्रात केली असून त्‍याला खालील प्रमाणे खर्च आला-

 

अक्रं

मुद्दा

खर्चाची रक्‍कम

1

मजूरी, ट्रॅक्‍टर, बैलबंडी व ईतर वाहतूक खर्च, नांगरणी पेरणी, रोवणी देखरेख जाणे येणे यासाठी

रुपये-29,000/-

2

बावनथडी नहाराचे पाणी रुपये- 600/- रुपये प्रती एकर  प्रमाणे

रुपये-1500/-

3

तीन वेळा सिरी ग्‍लोरीअस पिका करीता किटक नाशक औषधी खते यासाठीचा खर्च

रुपये-12,364/-

4

लोंबी व उत्‍पादीत नसलेले नापिक धानाचे मरड कापणी खर्च  

रुपये-8750/-

5

तक्रारकर्ता व त्‍यांचे कुटूंबियांनी(07 व्‍यक्‍ती)  दुसरे काम न    करता शेतासाठी केलेली मेहनत

रुपये-35,000/-

 

धान पिकासाठी आलेला एकूण खर्च    

रुपये-76,964/-

 

                       

 

   विरुध्‍दपक्षांनी  एका एकर क्षेत्रात 40 क्विंटल धानाचे उत्‍पादन होईल असे आश्‍वासन दिले होते त्‍यामुळे अडीच एकर क्षेत्रात कमीत कमी 100 क्विंटल उत्‍पादन अपेक्षीत होते परंतु धानाचे रोपे बरोबर आले नाहीत, रोवणी नंतर धान पिकास जागोजागी चुडे पडले, ते पूर्ण वाढून आले नाही.  धान लोंबी परिपक्‍व न होता, बदरा व मरड तनिसच झाली होती त्‍यावेळेस सदर प्रतीचे नियमित उत्‍पादीत धानाची किम्‍मत रुपये-1868/- प्रती क्विंटल शासकीय दराने होती त्‍यामुळे  रुपये-1,86,800/- चे उत्‍पादन मिळणे आवश्‍यक व गरजेचे होते. तसेच सदर  धान शासनास विकले असते तर 15 टक्‍के बोनस रक्‍कम म्‍हणजे रुपये-28,020/- मिळाले असते. तक्रारकर्त्‍याचे 90 टक्‍के नुकसान झालेले आहे म्‍हणजेच  अपेक्षीत उत्‍पादनाची हानी रुपये-1,68,120/-अधिक बोनसचे नुकसान रुपये-25,218/- असे एकूण उत्‍पन्‍न रुपये-1,91,338/- चे नुकसान झालेले आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी व विरुध्‍दपक्ष क्रं 4 जिल्‍हाधिकारी  हे कृषी निर्माता कंपनी  व कृषी विक्रेता यांचेवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी आहेत परंतु तालुका कृषी अधिकारी यांनी सुध्‍दा दोषपूर्ण सेवा दिली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षांना दिनांक-17.06.2021 रोजी नोटीस पाठविली परंतु प्रतिसाद मिळालानाही एवढेच नव्‍हे तर नोटीसला उत्‍तर सुध्‍दा दिले नाही.म्‍हणून शेवटी  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत  तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा  समक्ष दाखल करुन  त्‍याव्‍दारे  विरुध्‍दपक्षां विरुध्‍द  खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

 

 

  1. विरुध्‍दपक्षां कडून तक्रारकर्त्‍यास मजूरी,ट्रॅक्‍टर,बैलबंडी, नांगरणी पेरणी व रोवणी करीता आलेला खर्च रुपये-29,000/- देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. तक्रारीतील परिच्‍छेद कं 7मध्‍ये दर्शविल्‍या प्रमाणे सिरी ग्‍लोरीअस धानाचे वाणाची रुपये-76,964/- ची नुकसानी विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्त्‍यास देण्‍यचे आदेशित व्‍हावे

 

  1. तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे विक्रेत्‍या  कडून  सिरी ग्‍लोरीयस बियाणे खरेदीसाठी केलेला खर्च रुपये-3750/- व त्‍याचा ने-आण खर्च रुपये-200/- विरुध्‍दपक्षां कडून  तक्रारकर्त्‍यास देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

4.    तक्रारीतील परिच्‍छेद क्रं 8 प्रमाणे 90 टक्‍के अपेक्षीत उत्‍पादनाची हानी झाल्‍यामुळे   रुपये-1,68,120/- व बोनसची रक्‍कम रुपये-25,218/- चे नुकसान झालेले असल्‍याने  अशा रकमा  विरुध्‍दपक्षां कडून  तक्रारकर्त्‍यास देण्‍याचे  आदेशित व्‍हावे.

 

  1. नहराचे पाणी आणण्‍यासाठी 600/- रुपये प्रती एकर प्रमाणे आलेला खर्च रुपये-1500/- विरुध्‍दपक्षां कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. तीन वेळा खत खरेदी,किटक नाशक औषधी खरेदी यासाठी आलेला खर्च रुपये-12,364/- विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्त्‍यास देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. नापीक धानाचे मरड कापणी खर्च रुपये-8750/- विरुध्‍दपक्षां कडून  तक्रारकर्त्‍यास देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

8.   तक्रारकर्ता व त्‍याचे कुटूंबियांनी अन्‍य दुसरे काम न करता शेतीसाठी  केलेली मेहनत याचा खर्च रुपये-35,000/- विरुध्‍दपक्षा कडून  देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

9.   तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-30,000/-  तसेच आश्‍वासना प्रमाणे सेवा न दिल्‍याने रुपये-50,000/- आणि नोटीस व तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्‍दपक्षां कडून  तक्रारदारास देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

        10.  या शिवाय योग्‍य ती दाद त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे विक्रेत्‍याने आपले लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल केले. त्‍याने आपले लेखी उत्‍तरा मध्‍ये तक्रारकर्ता हा त्‍याचे दुकानात धानाचे बियाणे खरेदीसाठी दिनांक-28.01.2021 रोजी आला होता ही बाब मान्‍य केली परंतु कमी कालावधीचे उत्‍कृष्‍ट धान बियाणे विषयक त्‍याने चौकशी केली होती हे विधान नामंजूर केले.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 हा बरेच वर्षा पासून मे. नवदुर्गा कृषी केंद्र नावाने बियाणे विक्रीचा व्‍यवसाय करीत आहे परंतु त्‍याने  तक्रारकर्त्‍याला धान बियाण्‍याची हमी दिली होती  हे विधान नामंजूर  केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनी प्रथम बायोटेक कंपनीचे सिरी (ग्‍लोरीअस) या प्रजातीचे बियाणे प्रतीबॅग 10 किलो वजनाचे एकूण 05 बॅग्‍स प्रतीबॅग किम्‍मत रुपये-750/-प्रमाणे एकूण किम्‍मत रुपये-3750/- मध्‍ये विकत घेतले.त्‍याच बरोबर वर्षिता बायोसायन्‍स प्रायव्‍हेट लिमिटेड, हैद्राबाद निर्मित महालक्ष्‍मीबियाणे प्रतीबॅग दर रुपये-700/- प्रमाणे एकूण 09 बॅग्‍स रुपये-6300/- मध्‍ये विकत घेतले. वरील प्रमाणे दोन्‍ही वाणाचे बियाणे  बिल क्रं 439, बिल दिनांक-28.01.2021 नुसार  एकूण रुपये-10,050/- मध्‍ये खरेदी केले.(तक्रारकर्त्‍याने तक्रारी मध्‍ये बिल क्रं 580 नमुद केलेला असून प्रत्‍यक्षात बिल क्रं439 असल्‍याचे बिलाचेप्रती वरुन दिसून येते.) या बाबी मान्‍य केल्‍यात. तक्रारकर्त्‍याने सर्व विरुध्‍दपक्षांना सि.पी.सी कोड कलम 80 प्रमाणे नोटीस दिली होती ही बाब मान्‍य आहे. आपले विशेष कथनात असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनी कडून बियाण्‍या बाबत जे काही सांगितले जाते तेच त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास सांगितले होते. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेता ज्‍या  स्थितीत बियाणे निर्माता  कंपनी कडून बियाणे प्राप्‍त होते त्‍याच स्थितीत बियाण्‍याची विक्री करतो. बियाण्‍याची संपूर्ण माहिती ही बियाण्‍याचे पिशवीवर  दिलेली असते. दोषपूर्ण बियाण्‍याचे नुकसानीची सर्व काही जबाबदारी ही विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता  कंपनीची  येते. सबब विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे विक्रेत्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती  केली.

 

 

04.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनी तर्फे वकील श्री अनिल कांबळे यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष लेखी अर्ज सादर करुन त्‍याव्‍दारे  त्‍यांना तक्रारीचे नोटीस सोबत जी तक्रारीची प्रत मिळाली ती वेगळया विरुध्‍दपक्षाची असल्‍याने योग्‍य तो आदेश व्‍हावा असे नमुद केले.  जिल्‍हा ग्राहक आयोगाने अभिलेखाचे अवलोकन करुन विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनीव्‍दारे केलेला अर्ज दिनांक-18.11.2022 रोजी नामंजूर केला. विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनीला लेखी उत्‍तरासाठी संधी देऊनही त्‍यांनी आपले लेखी उत्‍तर दाखल केले नाही.

 

 

05.  विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर यांनी आपले लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले, त्‍यांनी लेखी उत्‍तरा मध्‍ये असे नमुद केले की, त्‍यांचे विभागा मार्फत कृषी परवाना, कृषी केंद्रातील बियाणे तपासणे , प्रयोगशाळेत बियाणे नमुना सादर करणे ही कामे केली जातात,  तक्रारकर्त्‍याचे तक्रारी नुसार दिनांक-27.05.2021 रोजी तालुका तक्रार निवारण समितीने पिक पाहणी करुन अहवालाची प्रत तक्रारकर्त्‍यास दिलेली आहे व त्‍यास ग्राहक मंचात जाऊन दाद मागण्‍यास कळविलेले आहे. तक्रारकर्त्‍याचे नोटीसला त्‍यांनी दिनांक-15.09.2021 रोजी दिले आहे.

 

06.   तक्रारकर्त्‍याची तक्रार, व शपथे वरील पुरावा,  विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे विक्रेता यांचे लेखी उत्‍तर,  तसेच प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवज ईत्‍यादीचे जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन करण्‍यात आले, त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर तक्रारीचे न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

  

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

1

तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 विक्रेत्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनी तर्फे  निर्मित दोषपूर्ण धान बियाण्‍याची विक्री केली आहे काय ?

-होय-

 

 

2

दोषपूर्ण धान बियाण्‍यामुळे झालेल्‍या पिकाची नुकसान भरपाई मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे काय?

-होय-

3

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

                   

                                                                                    :: निष्‍कर्ष ::

मुद्दा क्रं 1 बाबत

 

 

 

07.    विरुध्‍दपक्ष  क्रं 2 निर्मीत सिरी (ग्‍लोरीयस) धानाचे बियाणे दोषपूर्ण होते किंवा कसे या बाबतीत तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल वाचन करुन योग्‍य तो निर्णय देणे आवश्‍यक आहे. तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवालावर    श्री मिलींद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी,भंडारा, तालुका कृषी अधिकारी, तुमसर   श्री विकास अंकुश काळे, मंडळ कृषी अधिकारी श्री जे.बी. सरोदे, कृषी अधिकारी पंचायत समिती तुमसर श्री संजय एस.न्‍यायमूर्ती तसेच विक्रेता प्रतिनिधी श्री सुनिल पारधी, तक्रारकर्ता शेतकरी श्री वासदुदेव खोपडूजी वाडीभस्‍मे यांच्‍या स्‍वाक्ष-या असल्‍याचे दिसून  येते. फक्‍त पंजाबराव कृषी विद्दापिठ यांचे शास्‍त्रज्ञ व विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे निमाता कंपनीचे प्रतिनिधीची स्‍वाक्षरी नाही. सदर समितीचे  अहवालावरुन असे दिसून येते की, या मधील अहवालावर शासनाचे कृषी विभागातील  तज्ञांच्‍या स्‍वाक्ष-या  आहेत.

 

      तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने तक्रारकर्त्‍याचे शेतात लागवड केलेल्‍या धान पिकाची पाहणी दिनांक-27.05.2021 रोजी करुन आपला विस्‍तृत अहवाल दिलेला आहे, ज्‍यामध्‍ये बियाणे विक्रेत्‍याचे नाव, खरेदी केलेल्‍या बियाण्‍याचा तपशिल-धान सिरी, विक्रेत्‍याने दिलेल्‍या बिलाचा क्रमांकव बिल दिनांक-28.01.2021  खरेदी केलेले वाण-सिरी, लॉट क्रमांक-PRSRE/2021/16, उत्‍पादक कंपनीचे नाव-प्रथम बायोटेक प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर  नमुद केलेले आहे. समीतीने  आपले पाहणी अहवाला मध्‍ये शेतीचा सर्व्‍हे क्रं-392 व 393 नमुद  केलेला असून  लागवड क्षेत्र अनुक्रमे 0.20 व 0.52 हेक्‍टर आर नमुद केलेले असून जमीनीचा प्रकार मध्‍यम असल्‍याचे नमुद केले. पेरणीची तारीख-01/02/2021 व पुर्नलागवड तारीख-02/03/2021 नमुद केलेले आहे. सिंचनाची सुविधा नहर बावनथडी असे नमुद केलेले आहे. सदर समितीचे अहवालावर तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष कं 1 बियाणे विक्रेता यांच्‍या सहया आहेत.

 

तालुकास्‍तरीय तक्रार निवारण समितीचे अहवाला मध्‍ये मुद्दा क्रं 3 मध्‍ये योग्‍य मशागत केल्‍याचे तसेच  मुद्दा क्रं 6  मध्‍ये बावनथडी नहर व्‍दारे सिंचनाची व्‍यवस्‍था केल्‍याचे नमुद  आहे. सदर अहवाला मध्‍ये पेरणी पुर्नलागवड पध्‍दतीने योग्‍य अंतर ठेवून केल्‍याचे सुध्‍दा नमुद आहे. समितीचे अहवालामध्‍ये तक्रारकर्ता याने स्‍वतः  साक्ष दिलेली आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2    श्री सुनिल  पारधी या बियाणे विक्रेता याने तक्रारकर्त्‍याला बिल  क्रं 590  दिनांक-28.01.2021 अनुसार  बियाणे विक्री केल्‍याचे अहवालात मान्‍य केलेले आहे. सदर समितीचे अहवाला वर  तक्रारकर्ता आणि  विरुध्‍दपक्ष क्रं 1 बियाणे विक्रेता यांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.

 

 

08.      तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने अहवाला मध्‍ये  खालील प्रमाणे निष्‍कर्ष नोंदविला-

 

      दिनांक-27.05.2021 ला समितीने  तक्रारदार शेतकरी श्री वासुदवे वाडीभस्‍मे यांचे  शेताची पाहणी केली .प-हे दिनांक-01.02.2021 व रोवणी दिनांक-02.03.2021 ला केली.  पाहणीच्‍या दिवशी धानाला 116 दिवस पूर्ण झाले आहे व अजून कापणीला 30 ते 35 दिवस लागतील.   उत्‍पादक कंपनीच्‍या माहितीपत्रका नुसार 120-125  दिवसात धान पिक निघणे अपेक्षीत आहे.  भाताचा कालावधी 30 ते 35 दिवसानी वाढलयामुळे  व शेतक-याचे पाणी 110  दिवसाच्‍या दरम्‍यान संपले असल्‍याने पिक  सुकण्‍याच्‍या अवस्‍थेत आहे. जास्‍त कालावधीचा सिरी वाण निघालयाने शेतक-याचे 80 ते 90 टक्‍के नुकसान संभवते.  नुसान भरपाई करीता ग्राहक मंचात जाण्‍याची शिफारस करण्‍यात येते.  तालुकास्‍तरीय तक्रार निवारण  समितीचे  दिनांक-27.05.2021 रोजीचे पाहणी अहवाला वरुन एक बाब प्रकर्षाने दिसून येते की, समितीचे अहवाला प्रमाणे  बियाणे निर्माता कंपनीच्‍या माहितीपत्रका नुसार सिरी ग्‍लोरीयस हे धानाचे बियाणे  120-125 दिवसाचे आहे परंतु प्रत्‍यक्षात पक्‍वतेसाठी 30 ते 35 दिवस वाढले आहे. तसेच नहाराला पाणी कमी झालेले असल्‍याने पिक वाळण्‍याची शक्‍यता आहे. जर विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचे माहितीपत्रका प्रमाणे विहित मुदतीत पिक परिपक्‍व झाले असते तर नहराचे पाणी मिळाले असते परंतु पिकाचा कालावधी लांबल्‍या गेल्‍यामुळे व नहाराला पाणी नसल्‍यामुळे पिक सुकण्‍याची शक्‍यता आहे या बाबी सिध्‍द झालेल्‍या आहेत. सदर शासना मार्फत गठीत केलेल्‍या स‍मीती मध्‍ये कृषी क्षेत्रातील तज्ञ व्‍यक्‍तींचा समावेश आहे, त्‍यामुळे त्‍यांनी दिलेल्‍या अहवालावर अविश्‍वास दाखविण्‍याचे कोणतेही प्रयोजन जिल्‍हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही.   तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनीव्‍दारे निर्मित सिरी ग्‍लोरीयस धानाचे दोषपूर्ण बियाणे विक्री केल्‍याची बाब सिध्‍द होते करीता मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी” नोंदवित आहोत.

 

 

09.  तक्रारकर्त्‍याचे वकीलांनी तक्रारीतील युक्‍तीवादाचे समर्थनार्थ खालील नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडयांवर आपली भिस्‍त ठेवली-

 

  1.     Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ Kanta Kantha Rao- Verus-Y.Surya Narayana” (2017) CJ 619       (N.C.)- Revision Petition Nos.1008,1009 and 1010 of 2017 Decided on 03-05-2007

 

        Petitioner had never filed any objections to report of Scientist nor did not file any application under Section 13 (1) (c) requesting for sample seeds to be sent to appropriate laboratory for testing. Petitioner could have sent sample for testing to laboratory which it had failed to do so. Revision Petitions dismissed.

                                                   ***** 

 

  1.             Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ Dharam Pal & Sons- Verus-Som Prakash” (2014) CJ 666 (N.C.)- Revision Petition No.-4672 of 2012 Decided on 08-05-2014

           We have perused the evidence on record, the report submitted by the Committee constituted by the Deputy Director, Agriculture, Sirsa. Thus, as per the report, it is clear that the Complainant had sufferd his paddy crop, to the extent of 50%, on account of substandard quality of seeds sold to him by the Ops. Revision Petition dismissed.

                                               *****  

 

  1. Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ National Seeds Corporation Ltd.- Verus-Abdul Azia Fakir Mohd. Inamdar & Another” (2009) CJ 518 (N.C.)- Revision Petition No.-1227 of 2004 Decided on 19-01-2009

        In view of report of District Seeds Complaint Enquiry Committee seeds supplied to complainant were defective and a wrong representation had been made to complainant that seeds were certified and were having 85% germination capacity. Revision Petition dismissed.

                                              *****    

 

  1.  Hon’ble National Consumer Commission, New Delhi- “ Maharashtra State Seeds Corporation Ltd.- Verus-Arvind Bajirao Borkar &Others” (2014) CJ 35 (N.C.)- Revision Petition No.-1412 of 2013 Decided on 06-09-2013

         There is nothing on record to show that at the time of preparation of Panchanama made  by  District Seeds Complaint Enquiry Committee, representative of petitioners ever objected to same. As per Panchanama 50% of seeds were infected.

                                                  *****   

 

  1. Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- “ Western Agri Seeds Pvt.Ltd. & Others -Verus-K. Murlidhar Reddy & Others” (2015)CJ 920(NC)

    

 

     या व्‍यतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे खालील नमुद मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे  व मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयांवर भिस्‍त ठेवण्‍यात येत आहे-

 

 

  1.      Hon’ble Supreme Court of India-  H.N.S.Shastry- Verus-“Asstt. Director Agriculture” (2004 (4) Mh.L.J.- (Page No.-838 to 841) Civil Appeal No. 2253 of 1999 decided on 06-05-2004

 

सदर न्‍यायनिवाडया मध्‍ये मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने असे नमुद केलेले आहे की, Under Section 14(1) of the Consumer Protection Act, 1986, if the District Forum is satisfied that the goods complained against suffer from any defect, it could grant reliefs which include return of the price of the paddy and also compensation to the consumer for any loss suffered. Granting of relief to the consumer does not depend upon whether he should have made alternative arrangement. In the present case, it was enough for the appellant to establish that the paddy seeds supplied by the respondent were defective.  

 

     आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने विकत घेतलेले सिरी ग्‍लोरीयस जातीचे धान बियाण्‍याचा परिपक्‍वतेचा कालावधी वाढलयाने नुकसान झाल्‍याचा  निष्‍कर्ष तालुका स्‍तरीय बियाणे तक्रार समितीने अहवाला मध्‍ये नोंदविलेला असल्‍याने सदर मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतो असे आमचे मत आहे.

                                                                    ******  

 

 

  1.      Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- “ Indian Farmers Fertilizers Co-operative Ltd. -Verus-Vijay Kumar And Another” (2018)CJ 861 (N.C.)

 

    सदर न्‍यायनिवाडया मध्‍ये मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केलेले आहे की, “If despite all efforts made by the farmer, there is no flower and foliage in as many as 60-70% of the plants, it is obvious that there was some adulteration   in the seeds.   The team of the Agriculture Department also noted in this regard that there was a mixture of Gwar seeds shown to it.
Therefore, there is no reason to discard the report prepared by the officers of the Agriculture Department”.
 

   सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद आहे की, शेतक-याने पिक लागवडीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्‍न केल्‍या नंतरही 60 ते 70 टक्‍के झाडांना फुले व बोंडे आलेले नाहीत आणि बियाणे भेसळयुक्‍त असल्‍याचा अहवाल कृषी अधिकारी यांचे समीतीने दिलेला असून सदर अहवाल अमान्‍य करण्‍याचे कोणतेही प्रयोजन नाही.

 

         आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा वादातील सिरी ग्‍लोरीयस जातीचे धान बियाणे दोषपूर्ण  असल्‍याचा निष्‍कर्ष तालुका स्‍तरीय बियाणे तक्रार समितीने अहवाला मध्‍ये नोंदविलेला असल्‍याने सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचा निवाडा हातातील प्रकरणात अंशतः लागू पडतो असे आमचे मत आहे.

                                                                         ******

 

  1.      Hon’ble National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi- “ Avon Beej Company- -Verus-Anoop Singh And Others” (2020)CJ 954 (N.C.)

 

सदर न्‍यायनिवाडया मध्‍ये मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केलेले आहे की, “Report of the Agriculture Experts Committee wherein it has been found that 31% plants were of off-type due to which the Complainant suffered 29% loss of paddy crop and Off-type means any seed or plant not a part of the same variety and make include, seeds or plants of  other varieties. Further, it is established that the seeds were not pure. The report submitted by the team of Agriculture Experts was not discarded”.

 

आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा वादातील सिरी ग्‍लोरीयस  जातीचे धान बियाणे दोषपूर्ण असल्‍याचा निष्‍कर्ष तालुका स्‍तरीय बियाणे तक्रार समितीने अहवाला मध्‍ये नोंदविलेला असल्‍याने सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचा निवाडा हातातील प्रकरणात अंशतः लागू पडतो असे आमचे मत आहे.

                                                                                    ******

 

मुद्दा क्रं 2 बाबत 

 

10.    तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवालाचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता असे दिसून येते की, तालुकास्‍तरीय तक्रार निवारण  समितीचे  दिनांक-27.05.2021 रोजीचे पाहणी अहवाला वरुन एक बाब प्रकर्षाने दिसून येते की, समितीचे अहवाला प्रमाणे  बियाणे निर्माता कंपनीच्‍या  माहितीपत्रका नुसार सिरी ग्‍लोरीयस हे धानाचे बियाणे  120-125 दिवसाचे आहे परंतु प्रत्‍यक्षात पक्‍वतेसाठी 30 ते 35 दिवस वाढले आहे तसेच नहाराला पाणी कमी झालेले असल्‍याने पिक वाळण्‍याची शक्‍यता आहे. जर विरुध्‍दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचे माहितीपत्रका प्रमाणे विहित मुदतीत पिक परिपक्‍व झाले असते तर पिकाला नहाराचे पाणी मिळाले असते परंतु पिकाचा कालावधी लांबल्‍या गेल्‍यामुळे व नहाराला पाणी नसल्‍यामुळे पिक सुकण्‍याची शक्‍यता आहे या बाबी सिध्‍द झालेल्‍या आहेत. सदर शासना मार्फत गठीत शेतीमध्‍ये कृषी क्षेत्रातील तज्ञ व्‍यक्‍तीचा समावेश असून समीतीचे अहवालावर अविश्‍यास ठेवण्‍याचे कोणतेही प्रयोजन जिल्‍हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही.  तक्रारकर्त्‍याने आपले तक्रारी मध्‍ये पिकाची मशागत, वाहतूक, पाणी व्‍यवस्‍थापन  रासायनिक औषधी, खते,  किटकनाशके, पिक कापणी, मजूरी  अशा विविध  बाबींवर केलेल्‍या  संपूर्ण खर्चाची मागणी केलेली आहे परंतु  जिल्‍हा ग्राहक आयोगा व्‍दारे तक्रारकर्त्‍यास अपेक्षीत  उत्‍पन्‍नाची   नुकसान भरपाई  मंजूर होणार असल्‍या मुळे वेगवेगळया बाबी करीता वेगवेगळी भरपाई देण्‍याचे  कोणतेही  प्रयोजन नाही कारण अपेक्षीत उत्‍पादनाची  नुकसान भरपाई  मंजूरी विचारात घेण्‍यात येणार आहे.

 

 

11.       तक्रारकर्त्‍यास अपेक्षीत धानाचे पिकाचे नुकसानीची भरपाई देण्‍यासाठी जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, नागपूर येथील प्रचलीत  दराचा आधार घेण्‍यात येते. कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, नागपूर मधील  तांदुळाचे दर सन-2018-2019 मध्‍ये सरासरी जास्‍तीत जास्‍त रुपये-4725/- आणि कमीतकमी रुपये-2750/- संगणकावर दर्शविलेले आहेत, त्‍यानुसार तक्रारकर्त्‍यास  धान पिकाचा भाव प्रती क्विंटल रुपये-3000/- एवढा दर मंजूर करण्‍यास कोणतीही अडचण नाही.  तक्रारकर्त्‍याने तक्रारी मध्‍ये रुपये-1868/- प्रती क्विंटल  आणि त्‍यावर 15 टक्‍के बोनस या प्रमाणे 170 क्विंटल अपेक्षीत उत्‍पादनाचे नुकसानीची मागणी केलेली आहे. म्‍हणजेच धान पिकाचे नुकसान रुपये-3,17,560/- आणि बोनस रुपये-47,634/- असे मिळून एकूण रुपये-3,65,194/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे.

 

 

12.   जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मते पारंपारीक शेती आणि मशागतीचा विचार करता विदर्भा मध्‍ये धानाचे अपेक्षीत उत्‍पादन हे प्रती एकर 20 क्विंटल एवढे येते. तक्रारकर्त्‍याने  तालुकास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवाला प्रमाणे धानाचे बियाणे शेतामध्‍ये 0.72 हेक्‍टर आर एवढया क्षेत्रामध्‍ये पेरले होते. सर्वसाधारणपणे 40 आर शेती म्‍हणजे एक एकर आणि 2.5 एकर म्‍हणजे 100 आर म्‍हणजेच एक हेक्‍टर असे गणल्‍या जाते. तक्रारकर्त्‍याने  0.72 हेक्‍टर आर मध्‍ये वादातील धानाचे बियाणे पेरले याचाच अर्थ तक्रारकर्त्‍याने 02 एकर एवढया क्षेत्रात वादातील धानाचे बियाणे पेरले, पेरणी केलेले क्षेत्र बघता त्‍याला एकूण 40 क्विंटल धानाचे अपेक्षीत उत्‍पादन होणे आवश्‍यक आहे. परंतु तालुकास्‍तरीय तक्रार निवारण समितीचे अहवाला प्रमाणे तक्रारकर्त्‍याचे  अपेक्षीत उत्‍पादनाच्‍या 80 टक्‍के नुकसान झालेले असल्‍याने त्‍या नुसार नुकसान भरपाई मंजूर केल्‍यास एकूण 40 क्विंटलच्‍या 80 टक्‍के म्‍हणजे 32 क्विंटल धानाचे उत्‍पादनाची नुकसान भरपाई धानास  प्रती क्विंटल रुपये-3000/- दर लक्षात घेता तक्रारकर्त्‍यास  रुपये-96,000/- एवढी  नुकसान भरपाई  विरुध्‍दपक्ष  क्रं 2 बियाणे निर्माता  कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे  मत आहे.

 

 

13.   तक्रारकर्त्‍यास  वेळेवर त्‍यांचे पिकाचे झालेल्‍या नुकसानीची भरपाई न मिळाल्‍याने शेवटी प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करावी लागली. विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनीचे सिरी ग्‍लोरीयस  जातीचे धानाचे बियाणे दोषपूर्ण असल्‍याची बाब तालुका तक्रार निवारण समितीचे अहवाला वरुन सिध्‍द झालेली असल्‍याने  त्‍याला  नाहक या प्रकरणात त्रास सहन करावा लागला त्‍यामुळे त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-  विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनी कडून देण्‍याचे आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थीनोंदवित आहोत. विरुध्‍दपक्ष क्रं 1 हा बियाणे विक्रेता असून दोषपूर्ण  बियाण्‍या संबधाने त्‍याची कोणतीही जबाबदारी येत नसल्‍याने त्‍याचे विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर  आणि विरुध्‍दपक्ष क्रं 4 जिल्‍हाधिकारी भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.  अशाप्रकारे मुद्दा क्रं 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थीनोंदविण्‍यात आल्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 3 अनुसार तक्रारी मध्‍ये  खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.

                 

                                                                                :: अंतिम आदेश ::

 

 

 

  1.    तक्रारकर्ता श्री वासुदेव खोपडूजी वाडीभस्‍मे यांची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं-2 बियाणे निर्माता कंपनी प्रथम बायोटेक प्रायव्‍हेट लिमिटेड नागपूर  आणि तिचे मालक/ कार्यकारी संचालक यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

 

  1.       विरुध्‍दपक्ष क्रं-2 बियाणे निर्माता कंपनी व तिचे मालक/कार्यकारी संचालकांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास पुरविलेले सिरी ग्‍लोरीयस या  दोषपूर्ण धान पिकाचे बियाण्‍यामुळे झालेल्‍या नुकसान भरपाई दाखल रक्‍कम रुपये-96,000/- (अक्षरी रुपये श्‍याहण्‍णऊ हजार फक्‍त) आणि सदर नुकसान भरपाईचे रकमेवर तक्रार दाखल दिनांक-14.09.2021 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याज प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्त्‍यास अदा करावी.

 

 

  1.       तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल भरपाई म्‍हणून रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) अशा रकमा विरुध्‍दपक्ष क्रं 2 बियाणे निर्माता कंपनी व तिचे मालक/ कार्यकारी संचालक यांनी तक्रारकर्त्‍यास अदा कराव्‍यात.

 

 

  1.       विरुध्‍दपक्ष क्रं-1 नवदुर्गा  कृषी केंद्र तुमसर तर्फे प्रोप्रायटर श्री सुनिल संपत पारधी  या बियाणे विक्रेत्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

 

  1.       विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, तुमसर आणि विरुध्‍दपक्ष क्रं 4 जिल्‍हाधिकारी, भंडारा यांचे विरुध्‍दची  तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

 

  1.       सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं- 2 बियाणे निर्माता कंपनी आणि तिचे मालक/कार्यकारी संचालक यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या प्रस्‍तुत निकालपत्राची  प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.

 

 

  1.       निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 

 

  1.      उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त संच त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.              

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.