Maharashtra

Aurangabad

CC/12/327

प्रेमसिंग मच्छिंद्रसिंग राजपूर, - Complainant(s)

Versus

सहाय्यक व्‍यवस्‍थापक, लेखा व वित्‍त, - Opp.Party(s)

तक्रारदार स्‍वतः

10 Jan 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/327
 
1. प्रेमसिंग मच्छिंद्रसिंग राजपूर,
रा.प्‍लॉट नंबर २७,एस.नं.१७९,हर्सूल ऑडीटर सोसायटी, जळगांव रोड, औरंगाबाद
औरंगाबाद
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. सहाय्यक व्‍यवस्‍थापक, लेखा व वित्‍त,
जीटीएल उर्जा, फोर्ड शोरुमच्‍या वर, कॅनॉट प्‍लेस, टाऊन सेंटर, औरंगाबाद
औरंगाबाद
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Smt.Rekha Kapadiya PRESIDING MEMBER
 HON'ABLE MRS. Sow.Madhuri S.Vishwarupe MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                   (घोषित द्वारा – श्रीमती रेखा कापडिया, प्र.अध्‍यक्षा)
            अर्जदार यांनी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्‍यांना देण्‍यात आलेल्‍या वाढीव वीज बिलाच्‍या तक्रारीची गैरअर्जदार यांनी दखल न घेतल्‍यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
 
            अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीनुसार त्‍यांनी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी त्‍यांना जानेवारी 2012 ते मार्च 2012 या तीन महिन्‍यात मीटर फॉल्‍टी असल्‍याचे दर्शवून सरासरीवर आधारीत 171 युनिट प्रति महिना या प्रमाणे वीज बिल दिले.  एप्रील 2012 मध्‍ये त्‍यांना 438 युनिट वीज वापराचे बिल देण्‍यात आले जे चुकीचे असल्‍याचे अर्जदाराचे म्‍हणणे आहे. अर्जदाराने या चुकीच्‍या वीज बिलाबाबत गैरअर्जदार यांच्‍याकडे दिनांक 18/7/2012 रोजी तक्रार केली पण त्‍याची दखल घेण्‍यात आली नाही. गैरअर्जदार यांनी सुधारीत बिल देण्‍याची व नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे.
 
            अर्जदाराने तक्रारी सोबत गैरअर्जदार यांनी दिलेली वीज बिले, गैरअर्जदार यांना दिलेली तक्रार इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
            गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या जवाबानुसार जानेवारी 2012 ते मार्च 12 या काळात मीटर रिडींग उपलब्‍ध न झाल्‍यामुळे अर्जदारास सरासरीवर आधारीत वीज बिल दिले. अर्जदाराचा वीज वापर जास्‍त असून मार्च 2012 मध्‍ये त्‍यांना 1565.72 रुपये वीज बिलातून कमी करुन दिले आहेत. जून 2012, ऑगस्‍ट 2012 या महिन्‍यात त्‍यांना वीज बिल कमी करुन दिले आहे. अर्जदार वीज बिल नियमितपणे भरत नसल्‍याचे सांगून तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली आहे. गैरअर्जदार यांनी जवाबासोबत अर्जदाराचे सीपीएल दाखल केले आहे.
 
            अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन असे आढळून येते की अर्जदार यांनी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्‍यांचा ग्राहक क्रमांक 490012527516 असा असून मीटर क्रमांक 641649608 असा आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे जुलै 2011 ते सप्‍टेबर 2012 या कालावधीचे सीपीएल मंचात दाखल केले आहे. या सीपीएल चे निरीक्षण केलयावर असे दिसून येते की डिसेंबर 2011 पर्यंत दोन्‍ही पक्षात वीज बिलाबाबत वाद नव्‍हता. जानेवारी 2012 ते मार्च 2012 या कालावधीत गैरअर्जदार यांनी अर्जदारास फॉल्‍टी मीटर दर्शवून 171 युनिट वीज वापराचे सरासरीवर आधारीत वीज बिल दिले. एप्रील 2012 मध्‍ये मागील रिडींग 2304 व चालू रिडींग 2541 दर्शवून 438 युनिट वीज वापराचे बिल अर्जदारास आकारण्‍यात आले व या बिलातून 1565.72 रुपये क्रेडीट केल्‍याचे दिसून येते. मे 2012 नंतर अर्जदारास मीटर वरील रिडींग प्रमाणे बिल आकारणी केली असल्‍याचे दिसून येते. एप्रील 2012 मध्‍ये गैरअर्जदार यांनी जरी 1565.72 रुपये वीज बिलातून कमी केले असले तरी अर्जदारास जानेवारी 2012 ते मार्च 2012 या तीन महिन्‍यात वीज आकारापोटी 557.27 + 557.27 + 562.97 = 1677.11 रुपये तसेच इंधन अधिभार व वीज शुल्‍कापोटी अनुक्रमे 168.83 व 318.82 तसेच डिपीसी चार्जेस म्‍हणून लावलेले 34.54 रुपये कमी असे एकूण 2199.70 रुपये लावण्‍यात आलेले दिसून येते. गैरअर्जदार यांनी 1565.72 रुपये कमी केले परंतु त्‍याबद्दल कोणतेही विवरण मंचात दाखल केलेले नाही. अर्जदारास लावण्‍यात आलेल्‍या विविध दराची एकूण रक्‍कम रु 2199.70 लक्षात घेता गैरअर्जदार यांनी केवळ 1565.72 रुपयेच एप्रील 2012 च्‍या वीज बिलातून वजा केले असल्‍याचे दिसून येते.
 
            वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदाराची तक्रार मान्‍य करण्‍यात येते.
 
 
                                                                                                              आदेश
 
  1. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेले एप्रील 2012 चे वीज बिल रद्द करण्‍यात येते.
  2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास एप्रील 2012 च्‍या वीज बिलात 2199.70 रुपयाचे क्रेडीट द्यावे व सुधारीत वीज बि‍ल 30 दिवसात द्यावे.
  3. गैरअर्जदार यांनी नियमिपणे मीटर रिडींग न घेता वीज बिल आकारणी केल्‍यामुळे झालेल्‍या मानसिक त्रासाबद्दल रु 500/- व खर्चाबद्दल रु 500/- 30 दिवसात द्यावे.
 
 
 
     (श्रीमती एम.एस.विश्‍वरुपे)                                                                                     (श्रीमती रेखा कापडिया)
           सदस्‍या                                                                                                                        प्र.अध्‍यक्षा
UN
 
 
 
[HON'ABLE MRS. Smt.Rekha Kapadiya]
PRESIDING MEMBER
 
[HON'ABLE MRS. Sow.Madhuri S.Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.