जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 277/2021. आदेश दिनांक : 03/01/2023.
यशवंत पि. बाळासाहेब पाटील, वय 35 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. हरंगुळ (बु.), ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मर्या.,
शाखा हरंगुळ बु., ता. जि. लातूर.
(2) मुख्य कार्यकरी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मर्या.,
गंजगोलाईच्या बाजूस, साळे गल्ली, लातूर, ता. जि. लातूर.
(3) सहायक अभियंता (लातूर ग्रामीण),
अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मर्यादीत, सब-डिव्हीजन,
जुनी एम.आय.डी.सी., किर्ती ऑईल मीलच्या बाजूस, लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- महेश एस. गोमचाळे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष यांच्या विद्युत पुरवठ्याच्या तारांमध्ये घर्षण झाल्यामुळे ठिणग्या पडून शेती उपयोगी वस्तुंचे नुकसान झाले आणि त्यासंबंधी नुकसान भरपाई मिळण्यासाठी विरुध्द पक्ष यांच्याविरुध्द प्रस्तुत ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रार दाखल करुन घेण्यात आली आणि विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्याचा आदेश करण्यात आला. मात्र, विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठविणे / बजावणी करण्यासंबंधी तक्रारकर्ता यांनी आवश्यक पूर्तता केली नाही. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ सातत्यपूर्ण अनुपस्थित आहेत. उचित संधी प्राप्त होऊनही आवश्यक पूर्तता केली नाही आणि ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांना स्वारस्य नाही, असे दिसते. ग्राहक तक्रारींचे कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त अनुषंगाने ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-